विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आग्रातहशील - उत्तरअक्षांश २७.३ ते २७,१७ व पूर्व रेखांश ७७५१, त ७८. १३ यावर असून २०२ चौरस. मैल आहे. इ.स. १९०१ मध्यें येथील लोकसंख्या २९१०४४ होती. यांत १४० खेडीं व आग्राशहर असून हें जिव्हा व तहशिलीचें मुख्य ठिकाण आहे. इ.स. १९०३-४ मध्यें जमीनींचा वसूल ( सरकार सारा २२४००० व इतर कर ३०००० होता. पूर्व व उत्तर या दोन सिमेवरून यमुना नदी वाहत जाते. या नदीच्या खोऱ्यांत उगवणाऱ्या गवताच्या दोऱ्या व छपरें होतात. यांतील व पुष्कळ रान चराईचें आहे. बहुतेक संबंध तहशील एक पठारच आहे. इ.स. १९०३-०४ मध्यें १५१ चौ.मै. जमीन लागवडीस आली. होती आग्रा कनाहलमुळें पुष्कळ जमीन भिजते व बाकीची जमीन विहिरींच्या पाण्यावर कसली जाते.