प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आंग्लो इंडियन वाङ्मय, प्र स्ता व ना. - भारतांत निरनिराळे जे पंथ, जाती आणि विचारसंप्रदाय आहेत व ज्या निरनिराळया भाषा आहेत त्यामुळें निरनिराळीं  वाङ्मयें उत्पन्न होतात. सर्व देशव्यापकवाङ्मय देशांत असतेंच. त्या बरोबर विशिष्ट वाङ्यम्येंहि असतातच. प्राचीन कालापासून ही  प्रवृति दिसत आहे. सर्वजनव्यापी वाङ्मय  संस्कृतमध्ये असे. परंतु  विशिष्टजनव्यापी वाङ्मय कधीं कधीं प्रकृतमध्यें होई. महाराष्ट्रीय वाङ्मय हें विशिष्ट पण प्रदेशिक होय, तर बौद्धांचें पाली  वाङ्मय आणि जैनांचे प्रकृत  वाङ्मय हो सांप्रदायिक होय. संस्कृत हें शिष्टवाङ्मय पडलें. त्यामुळे लोकप्रिय चाली आणि लोकप्रियं गाणी संस्कृतांत फारशीं शिरलीं  नाहींत. लोकप्रिय चालींचा प्रवेश  संस्कृतमध्यें अगदीं झाला नाहीं असें नाहीं. आचार्योंच्या नांवावर खपणारी त्यांची चर्पटपंजरी, जयदेवाची अष्टपदी किंवा अर्वाचीनांत प्रचलित असणारें ''मंदमंद वायुविचलति '' हे पद हीं सर्व लौकिक वाङ्मयाचा किंवा लौकिकवाङ्मयाश्रित ग्रंथ  रुपांचा संस्कृत भाषेंत प्रवेश दाखवितात. गुणाढ्याचा  बृहत्कथासागर, कथासरित्सागररूपानें अखिलभारतीय झाला ही गोष्ट वरील नियम स्पष्ट करिते. सध्यांचे हिदुस्थानांत जें इंग्रजी वाङ्मय तयार झालें आहे तें अनेक प्रकारच्या कारणामुळें व अनेक प्रकारच्या माणसांनीं उत्पन्न केलें आहे. लोकांना जबाबदार नसलेली राजसत्ता आपलें लिखाण देशी भाषेंत न करतां परकीय भाषेंत करी यांत नवल नाहीं. हिंदुस्थानांतील देशी संस्थाने आपले अहवाल इंग्रजींतच छापतात. याचें कारण त्यांस लोकमताची जबाबदारी फारशी वाटत नसून इंग्रज सरकारासच आपण जबाबदार आहोंत असें वाटतें. वर्तमानपत्रें इंग्रजींतच पुष्कळ चालवावीं लागतात. याचें कारण संपादकाची टीका सरकारच्या नजरेस पडली पाहिजे हें होय.

आंग्लो इंडियन वाङ्मय म्हणजे भारतविषयक व भारतभूमीवर झालेलें इंग्रजी वाङ्मय याचें व्यापक क्षेत म्हणून येणेंप्रमाणें सांगतां येईल.  (१) इंग्रजांचे इतिहास व इतिहाससाधनें, ( २ ) इंग्रजांचे प्रवासविषयक ग्रंथ, ( ३ ) हिंदुस्थानांतील वाङ्मयाचीं इंग्रजी भाषांतरें,  (४) सरकारी अहवाल व कागदपत्रें (५) काँग्रेससारख्या देशी संस्थांचे अहवाल किंवा देशी वर्तमानपत्रें, मासिकें वगैरे, (६) राजकीय, सामाजिक किंवा पारमार्थिक प्रश्नासंबंधानें किंवा विषयासंबंधानें देशी लोकांनी व इंग्रजांनी केलेली स्वतंत्र पुस्तकें, (७) इंग्रजांनी किंवा आंग्लकुलसंभवांनीं उत्पन्न केलेलें ललित वाङ्मय, (८) देश्यांनी उत्पन्न केलेलें. इंग्रजी ललित वाङ्मय, (९) संशोधनात्मक वाङ्मय यांपैकीं ललित वाङ्मयाकडेच सघ्यां लक्ष देऊं. इतर विषयांवरील वाङ्मय त्यांतील विषयाप्रमाणें अनेक सदरांत जाईल.

ल लि त वा ङ्म य - हिंदुस्थानांत इंग्रजी राज्य स्थापन झाल्यामुळें कल्पनाप्रचुर भावनासंपन्न व गुह्यविचारात्मक पौर्वात्य भूमिकेंत पाश्चात्य वाङ्मयाचें बीं रुजविण्याचा प्रसंग अवचित् घडून आला. देश्य व परकीय या दोन वाङ्मयांचा पूर्ण मिलाफ होणें शक्यं नव्हतें परंतु त्यांचा एकमेकांवर कांहींच परिणाम होऊं नये हेंहि दुरापास्त होतें. त्यामुळे अखेर मिश्रविचारांचे आंग्लो इंडियन ललितवाङ्मय निर्माण झालें. यांत नामांकित लेखकांची संख्या अल्प प्रमाणांत आहे.

हिंदुस्थानांतील निरनिराळ्या वनस्पतींची व प्राणिमात्रांची नयनमनोहर स्वरूपें पाहून कोणाहि परदेशस्थ लेखकास स्फूर्ति झाल्याशिवाय रहाणें शक्य नव्हतें. सर्व जगांत-अत्युच्च व बर्फाच्छदित शिखरें धारण करणाऱ्या पर्वतांच्या रांगा येथें आहेत. भागीरथीसारख्या नदीच्या दर्शनाने जरा कोणांस काव्य करण्याची स्फूर्ति झाली तर त्यांत अस्वाभाविक असें कांहींच नाहीं. त्याचप्रमाणें येथे प्रत्यहीं दृष्टीस पडणारे जातीजातींतील व निरनिराळ्या पंथाच्या लोकांतील परस्पर कलह पाहून विचारी मनुष्यस नवीन विचार सुचल्या शिवाय रहात नाहींत. याशिवाय आंग्लोंइंडियन लोकांच्या आयुष्यक्रमांतील कांहीं विशिष्ट अनुभवामुळेंहि कांहीं विचार व भावना उत्पन्न होऊन त्यायोगानें वाङ्मयाचें कार्य होणें अपरिहाय होतें.

 

द्रव्यार्जन करणें व कीर्ति मिळविणें यांपैकीं कोणत्या तरी एका हेतूनें प्रेरित होऊन लेखक वाङ्मयाचें कार्य करण्यास प्रवृत्त होतो असें मानण्यास हरकत नाहीं. हिंदुस्थानांतील आंग्लोइंडियन लेखकांस द्रव्यार्जनाच्या बुद्धीनें लेखनाचें कार्य करण्याची आवश्यकता नसते ही अनुभवाची गोष्ट आहे. जेव्हां एखादा इंग्रज नोकरी, धंदा किंवा व्यापार करण्याकरितां हिंदुस्थानांत येतो तेव्हां त्याची अगोदरपासूनच सर्व प्रकारची उत्तम व्यवस्था करून ठेवलेली असते. त्यामुळें जर त्याला वाङ्मयविषयक कार्य करण्याची इच्छा झाली तर तो तें आपल्या फुरसतीच्या वेळीं करणार हें उघड आहे.

आंग्लोइंडियन ललितवाङ्मय अगदीच साधारणप्रतीचें कां व्हावें यास दुसरींहि अनेक कारणें देण्यांत येतात. त्यांपैकीं एक असें आहे कीं इकडील वरिष्ट अधिकाऱ्यांच्या मतानें, जर एखादा अंमलदार लेखनाचें कार्य करूं लागला तर त्याजकडून त्याच्यावर सोंपविलेंले सरकारी काम नीट रीतीनें होणार नाहीं, आणि म्हणून वरिष्ठ अधिकारी होतां होईल तों तशा लेखकांस त्याच्या लेखनकार्यापासून परावृत्त करितात. दुसरें असें कीं, आंग्लोइंडियन वाङ्मय वाचणारा वाचकवर्ग अगदीं अल्पसंख्यांक असल्यामुळें लेखकास आपलें कार्य करण्यास नीटपणें उत्तेजन मिळत नाहीं. तिसरें असें कीं जो इंग्रज हिंदुस्थानांत येतों तो आपल्या व्यवसायांत निमग्न असतो. त्याला इतर काम करण्यास फुरसत नसते, तें करण्याची त्याला आवश्यकताहि नसतें, जर कीर्ति मिळविण्याच्या हेतूनें तो लेखनाचें कार्य हातीं घेईल तर इंग्रज लोकांचे इंग्लंड व हिंदुस्थान यांमध्यें एकसारखें दळणवळण चालूं असल्यामुळें त्यानें लिहिलेले ग्रंथ वाचण्याला कायमचा वाचकवर्गहि मिळणें मुष्किलीचे होईल. अशा स्थितींत हल्लीं उपलब्ध असलेलें वाङ्मयच कसें निर्माण झालें याचें आश्चर्य वाटतें.

असो वर निर्दिष्ट केलेल्या विपरीत स्थितींत आंग्लोइंडियन वाङ्मयाचा विस्तार हळूं हळूं वाढत गेलेला आहे. हिंदुस्थानचें सृष्टिसौंदर्य, एतद्देशियांचा आयुष्यक्रम व निरिनराळें धर्मपंथ हे सर्व विषय आंग्लोइंडियन वाङ्मयांत येऊन गेलेले आहेत. परंतु सर्व प्रकारच्या गद्यात्मक व पद्यात्मक आंग्लो-इंडियन वाङ्मयांत चहूंकडे भरलेला एक विषय म्हटला म्हणजे स्वदेशविरहविलाप हा होय.

ललितवाङ्मयारंभ - हिंदुस्थानांतील आंग्लोइंडियन ललितवाङ्मयास इ. स. १७८३ सालीं प्रारंभ झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. यापूर्वींचा काळ लढाया, रक्तपात राजकारणी मसलती, हिंदुस्थानासारखा हिरा आपल्या मुगुटांत असावा याकरितां दोन पाश्चात्य राष्ट्रांत चालूं असलेला लढा आणि शिस्तींने चालणाऱ्या अल्पसंख्याकांनीं शिस्तीनें न चालणाऱ्या बहुसंख्याकांवर मिळविलेला विजय इत्यादि गोष्टीनीं व्यापलेला आहे. तो काल लेखणी बाजूस ठेवून तरवार चालविण्याचा होता. शांततेच्या काळांत उदय पावणाऱ्या वाङ्मयास शस्त्रास्त्रांच्या खणखणाटांत वर डोकें करण्यास अवकाश न मिळावा हें साहजिक आहे.
इ.स. १७८३ सालीं आंग्लोइंडियन वाङ्यमयाचा उद्य झाल्यापासून एकोणिसाव्या शतकाची पहिलीं तीस वर्षें संपेपंर्यत फक्त दोनच ग्रंथकारांचीं नांवें प्रामुख्यानें नमूद करण्यासारखीं आहेत आणि तीं म्हणजे सर विल्यम जोन्स व जॉन लेडन हीं होत . इतर सर्व वाङ्मयाप्रमाणें ऑग्लोइंडियन वाङ्मयाचाहिं प्रारंभ कवितेपासून झाला.
सर विल्यम जोन्सः - सर विल्यमजोन्स हा प्राधान्यें करू कायदेपण्डितः व पौर्वभाषाभिज्ञ होता आणि कविता करणें हा त्याच्या कार्यक्रमांतील गौण भाग होता. तो इ.स. १७८३ मध्यें न्यायाधीशाच्या जागेवर कलकत्यास आला. आपल्या जागेवर रुजूं झाल्याबरोबर त्यानें स्वतःस शास्त्रीय व भाषाविषयक संशोधनाच्या कार्यास वाहून घेतलें, आणि  ''दि कलकत्ता सोसायटी'' या नांवाची संस्था स्थापून तिचा तो पहिला अध्यक्ष झाला. इंग्लंडमध्यें असतांनांच त्यानें पौर्व विषयांचा व्यासंग केलेला होता आणि हिंदुस्थानांत आल्यावर तर त्यानें चहूंकडे प्रवास केला आणि पौर्व अद्भुत व गूढविद्येचें संपूर्ण ज्ञान करून घेतलें. तें ज्ञान संपादन करीत असतां त्यांतील काहीं भाग केवळ इंग्रजी वाचकांकरिता इंग्रजी कवितेंतून प्रसिद्ध करण्याचा त्यानें क्रम ठेवला होता. अशा तऱ्हेचें वाङ्मयकार्य करण्यास तो सर्वतोपरी पात्र होता. कार्यकृर्तृत्त्वास प्रधान धर्म मानून आळसांत काळ घालविणें हें मोठें पाप आहे असें समजणाऱ्यापैकीं तो एक होता.

आंग्लोइंडियन - काव्य-लेखकांत सर विल्यम जोन्स याला ज्या काव्यांवरून येवढें श्रेष्ठ स्थान प्राप्त झालें ती अशीः (१) ''दि एचॅन्टेड फ्रूट, ऑर हिंदू वाइफ,'' (२) संस्कृत, पर्शिअन व अरेबिक काव्यांची भाषांतरे आणि (३) अनेक देवतांची स्तोत्रें.

(१)  ' दि एन्चँटेड फ्रूट ऑर हिंदु वाईफ', -हें सर विल्यम जोन्स यांचे सर्वांत मोठे काव्य आहे. त्यांतील कथानक प्रळ्यकाळापूवींचे आहे असें कवीने म्हटलें आहे. तें कथानक असेः- पांच भाऊ व त्या सर्वांची मिळून एक पत्नी, असे सहाजण एका फळझाडापाशीं गेले व त्या भावांपैकीं एकानें त्या झाडावर साठ हातांच्या उंचीवर असलेलें फक्त एकच फळ नेम धरून पाडलें तें फळ पाडलेलें पाहुन श्रीकृष्ण त्यांस म्हणाले, हें तुम्हीं पाडलेलें फळ एका महामुनीचें आहे आणि तें जर तुम्ही जागच्या जागीं लटकावून न द्याल तर तुमचा नाश होईल. तें जागचे जागीं जाऊन चिकटण्यास एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हटला म्हणजे प्रत्येकानें आपण केलेलीं पापें अगदीं सत्यनिष्ठपणानें व प्रामाणीकपणानें ताबडतोब कबूल करावींत. त्या पांच भावांनीं आपआपलीं पापें कबूल केल्यावर तें फळ पन्नास हात वर चढलें. आतां तें फळ फक्त दहा हात वर जावयाचें राहिलें होतें परंतु त्या भावांच्या पत्नीनें आपलें पाप पूर्णपणें कबूल न केल्यामुळें तें फळ फक्त आठच हात वर चढले. अखेर सर्व भावांनीं आग्रह केल्यामुळें ब्राह्मण गुरूनें आपलें चुंबन घेतल्याची तिनें कबुली दिली. याप्रमाणें तिनें कबुली दिल्यावर तें फळ लगेच आपल्या जागी जाऊन बिलगलें आणि त्या सर्वांचे प्राण वांचले.

(२) संस्कृत पर्शिअन व अरेबिक काव्यांची भाषांतरे. - सर विल्यम जोन्सनें केलेलीं भाषांतरें सुरस व सुंदर आहेत. त्या सर्वांत कविकुलगुरु कालिदासाच्या अभिज्ञान-शाकुंतल नाटकाचें भाषांतर तर अप्रतिम झालें आहे. इंग्रजी वाचकांस संस्कृत नाटकाची कल्पना येण्यास तें एक उत्तम साधन झालें ही गोष्ट निविंवाद आहे.

(३) अनेक देवतांची स्तोंत्रें, - सर विल्यम जोन्स यानें ज्या आठ हिंदू देवतांवर स्तोत्रें रचिलीं आहेत त्याचीं नांवे येणें प्रमाणेः-कामदेव, प्रकृति, इंद्र, सूर्य, लक्ष्मी, नारायण, सरस्वती आणि गंगा.

इ.स. १७९४ मध्यें सर विल्यम जोन्स निवर्तल्यावर जवळ जवळ दहा वर्षें आंग्लो-इंडियन वाङ्मयांत कांहींच भर पडली नाहीं.

जॉन लेडनः - इ.स. १८०३ मध्यें जॉन लेडनसारखा सुप्रसिद्ध कवि व लेखक हिंदुस्थानांत आला. त्याचें भाषाज्ञान सर विल्यम जोन्सच्या बरोबरचें होतें. लेडन हा इ.स. १८०३ च्या अखेरीस हिंदुस्थानांत आला आणि लागलींच त्यानें आपलें लेखनकार्य सुरू केलें. या पूर्वीं त्यानें  ''सीन्स ऑफ इन्फन्सी'' ''लॉर्ड साउलिस'' ''दि मर्मेड'' ''दि एल्फिन किंग'' इत्यादि काव्यग्रंथ लिहिले होते. आणि त्यावरून हिंदुस्थानांत आल्यावरहि काव्यकर्तृत्वाचें काम करण्याची आपली पात्रता त्यानें सिद्ध केली होती.

गंगानदीच्या मुखाजवळ असलेल्या सागर नांवाच्या बेटांत त्यानें  ''व्हर्सेस'' हा काव्यग्रंथ लिहिला. त्यानंतर ''ओड ऑन लीव्हिंग वेलार'' “डर्ज ऑफ दि डिपार्टेड इयर” “ख्रिस्टमस इन पेनांग” ''व्हर्सेस ऑन दि डेथ ऑफ नेल्सन'' ''ओड ऑन दि बॅटल ऑफ कोरुना'' आणि  ''दि बॅटल ऑफ आसई'' हे काव्यग्रंथ त्यानें लिहले. परंतु वरील सर्व काव्यांपेक्षां  ''ओड टू अॅन इंडियन गोल्ड कॉईन'' या त्याच्या काव्यांत काव्यरस उत्त्कृष्ट उतरला आहे. हिंदुस्थानांत आल्यावर आंग्लोइंडियन लोकांच्या मनांत जे मनोविकार उद्भवतात ते सर्व सदर काव्यांत उत्तम रीतीनें व्यक्त झाले आहेत. हिंदुस्थानांतील पैशांच्या लोभानें इंग्रजांस आपल्या गृहसौख्यास कसें अंतरावें लागतें, याचें त्यानें त्यांत हृदयस्पर्शीं चित्र रेखाटलें आहे.

लेडन हा जरी हिंदुस्थानांत आठच वर्षें होता, तरी तेवढया काळांतील त्याच्या कार्यावरून त्याच्या निधनानें आंग्लोइंडियन वाङ्मयाचें अतोनात नुकसान झालें असें म्हणावें लागतें. सर विल्यम जोन्सप्रमाणें लेडन हाहि कवीपेक्षां भाषाभिज्ञ या नात्यानें अधिक महत्त्वाचा होता. विद्वत्तेमध्यें जरी सर विल्यम जोन्सपेक्षां लेडन हा कमी प्रतीचा होता, तरी त्याचें काव्यकर्तृत्व जोन्सपेक्षां अधिक सरस होतें.

किरकोळ कवीः - उत्तम काव्य निर्माण होण्यास कवीच्या अंगची प्रतिभा व बाहेरची अनुकूल परिस्थिति या दोन गोष्टी कारणीभूत होतात. त्यांपैकीं एक किंवा दोन्ही गोष्टींचा अभाव असेल तर कवीची कृति  ''किरकोळ'' या सदराखालीं येते. या सर्व आंग्लो-इंडियन किरकोळ कवींच्या काव्यांतून स्वदेश-विरह-विलाप प्रामुख्यानें दृष्टीस पडतो. अशा प्रकारच्या कल्पना हेबरेंन आपल्या पत्नीस उद्देशून लिहिलेल्या कवितेंत आढळतात. तोच नमुना रिचर्डसन विरचित ''कन्सोलेशन ऑफ एग्झाईल''  ''ए ब्रिटिश इंडियय एग्झाईल टु हिज डिस्टंट जिल्ड्रेन'',''होम व्हिजन्स'' या काव्यांतून पहावयास सांपडतो; परंतु या दोन कवींचा समकालीन कवि जो काल्डरकॅबेल याच्या कवितेंत वरील कल्पनांच्या विरुद्ध विचार प्रगट केलेले आहेत. यानंतर वीस वर्षांनीं फिरून डब्ल्यू. ई. कँटोफरच्या  ''दि आंग्लो इंडियन लायर'' या काव्यांत वरील स्वदेश विरहबिलाप कानीं येतो आणि या एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं ट्रेगो वेब आणि लायल या कवींनीं त्या विलापास परम कारुणिक स्वरूप दिलें. याविषयीं लायलचें  ''लॅड ऑफ रिग्रेटस'' हें काव्य सुप्रसिद्ध आहे.

व र्ण न प र का व्यें - भावनाप्रधान काव्यांखेरीज आंग्लोइंडियन कवींनीं वर्णनपर काव्येंहि लिहिलीं आहेत. आर. हाल्डेन राट्रे यानें इ.स. १८३० मध्यें  ''दि एग्झाईल'' नांवाचें वर्णनात्मक काव्य लिहिलें त्यांतील कथानक असें:- अॅथॉल नांवाचें जहाज आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर आपटून नाश पावलें. या अपघातातां काव्यनायकाच्या सर्व जिवंलग नातलगांस जलसमाधि मिळाली. त्यामुळें या काव्याचें वाचन जरी उदास व कंटाळवाणें होतें, तरी अडचणीच्या वेळीं मनुष्याच्या मनाचे व्यापार कसे चालतात, याचें हुबेहूब वर्णन त्यांत पहावयास सांपडतें. याच सुमारास एच मेरिडथ पार्कर याचें  ''दि ड्रॉट ऑफ इम्मोर्टेलिटी'' हें काव्य निर्माण झालें. पृथ्वीवर मदिरेचें आगमन हा त्या काव्याचा विषय असून तो महाभारतांतून घेतलेला आहे. जे.बी. नॉर्टनचें  ''नेमेसिस'' आणि मि. कीनचीं  ''मिचेल डि मास'' व ''दि गोल्ड फाइंडर'' हीं काव्यें वर्णनात्मक काव्याच्या सदरांत पडणारीं आहेत. या सर्व कवींमध्ये ज्यानें या जातीच्या काव्यरचनेंत श्रेष्ठपणा संपादन केला तो यूरेशियन कवि हेन्री एल. व्ही. डेरोझिओ हा होय. ''फकीर ऑफ जुंघीरा'' हें त्याचें उत्कृष्ट काव्या आहे. त्यांतील संविधानक शोकरसप्रधान आहे. नलिनी या त्या काव्यांतील नायिकेचा पति निवर्तल्यावर तिनें त्या वेळच्या चालीप्रमाणें सती जाण्याची तयारी केली. सती जाण्याच्याविरुद्ध जरी तिच्या मनाचा कल होता, तरी केवळ कर्तव्य करण्याच्या बुद्धीनें तिनें तशी तयारी केली होती. सर्व तयारी झाल्यावर ती सूर्याचें शेवटचें स्तवन करीत असतां तिच्या प्रेमास पात्र झालेल्या एका दरोडेखोरांच्या नायकानें तिला उचलून नेले. त्यानंतर त्या दोघांनीं कांहीं काळ अत्यंत सौख्यांत घालविला; परंतु अशा तऱ्हेचें सौख्य फार वेळ टिकत नाहीं. नलिनीच्या पित्यानें तिला सोडविण्याकरितां कांहीं लोक जमा केले व त्या दरोडेखोरांच्या टोळीवर छाप घातला. त्या लढयांत दरोडेकोरांचा जय झाला; परंतु त्यांचा नायक पडला व त्याजबरोबर नलिनीनें आपला आत्मयज्ञ केला. याप्रमाणें डेरोझिओचीं अनेक काव्यें आहेत आणि हें सर्व वाङ्मयकार्य त्यानें वयाच्या विसाव्या वर्षाच्या आंत केले; परंतु पुढें चार वर्षांच्या आंतच तो कॉलऱ्याच्या भक्ष्यस्थानीं पडला, व कीट्सच्या मृत्यूनें ज्याप्रमाणे इंग्रजी वाङ्मयाचें अपरिमित नुकसान झालें, त्याप्रमाणें त्याच्या मृत्यूनें आंग्लोइंडियन वाङ्मयाचें झाले.वर्णनात्मक,काव्यें रचणाऱ्यांमध्ये मिस मेरी ई. लेस्ली या कवयित्रीचा उल्लेख केला पाहिजे.  ''इना अँड अदर पोएम्स'' हा तिचा पहिला काव्यग्रंथ इं.स. १८५६ मध्यें प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर थोड्याच अवधींत “सां रोज” “अॅस्पिरेशन्स अँड लिजेंड्स फ्रॉम इंडिया'' व ''हार्ट एकोज फ्रॉम दि ईस्ट'' हीं काव्यें अंतराअंतरानें प्रगट झालीं. “लिजेंडस फ्राम इंडिया” या काव्यांत १८५७ सालच्या बंडावरील कवयित्रीचे विचार प्रदर्शित झाले आहेत. “हार्ट एंकोज फ्राम दि ईस्ट ” या काव्यांत ती ज्या पवित्र क्षेत्रांस गेली होती. त्यांचीं वर्णनें व तेथें तिच्या मनांत उत्पन्न झालेले विचारतरंग नमूद केलेले आहेत. याशिवाय वर्णनात्म ककाव्यांत नमूद करण्यासारखीं आंग्लो इंडियन काव्यें म्हटलीं म्हणजे जॉर्ज पॉवेल थॉमस याचा  ''पोएम्स'' या नांवाखालीं प्रसिद्ध झालेला काव्यग्रंथ आणि वुइल्यम वॉटरफील्ड या कवीचा ''इंडियन बॅलड्स अँड अदर पोएम्स'' हा काव्यग्रंथ हीं होत. ए.स. १८८९ त एच. बी. डब्ल्यू. गॅरिफ यानेंहि ज्यांत ऐतिहासिक व पुराणवस्तुविषयक माहिती दिली आहे, असा ''इंडिया'' नांवाचा काव्यग्रंथ प्रसिद्ध केला. अशा रीतीनें विशेष बारकाईंनें विचार केला, तर वर्णनात्मक काव्यांच्या सदरांत पडण्यासारखीं आणखीहि दहा बारा काव्यांची नावें शोधून काढतां येण्यासारखीं आहेत. त्यांपैंकीं बऱ्याच काव्यांस इ. स. १८५७ सालच्या बंडाचा विषय कारणीभूत झाला. अशा तऱ्हेच्या काव्यांत चार्लस आर्थर केली यांच्या ''दिल्ली अँड आदर पोएम्स'' या काव्यग्रंथाचा उल्लेख केला पाहिजे.

सर एड्विन आर्नोल्ड किंवा सर आल्फ्रेड लायल हे कवी जर बाजूस ठेवले तर आंग्लो-इंडियन लेखकांत तत्त्वविवेचन करणारे कवि फारच थोडे होऊन गेले मिसेस कारशोरचा ''साँग्स ऑफ दि ईस्ट'' या नांवाचा जो काव्यग्रंथ आहे त्यांतील  ''फॅन्सी अँड रीझन'' या भागांत मानवी जीवितासंबंधीं कांहीं विचार प्रदर्शित केले आहेत. त्याचप्रमाणे कोणी आर. एफ.एफ. या संक्षिप्त नांवाखाली ''ड्रीम ऑफ ए स्टार'' नांवाचें एक विचारपूर्ण काव्य प्रसिद्ध केलेलें आहे.

ना ट्य ग्रं थ - स्वतंत्र प्रकरणांत विचार करण्याइतके आंग्लोइंडियन लेखकांनी लिहिले नसल्याकारणानें त्यांचांहि विचार या प्रकरणांत केला असतां गैरवाजवी होणार नाहीं. डब्ल्यू. टी. पिअसींनें लिहिलेलें  ''अवर इंडियन अंकल '' नांवाचें प्रहसन व अशाच तऱ्हेचीं काहीं किरकोळ नाटके वाज केलीं तर आनंदरसप्रधान आंग्लो-इंडियन नाटकें नाहींतच, असें म्हटलें तरी चालेल. अलेक्झांडर डो यांचे अनुकरण करून ज्यांत पौस्तरय चालीरीतीचें चित्र रेखाटलें आहे, असें  ''तारा दि सती'' नावाचें शोकरसप्रधान नाटक लेफ्टनंट कर्नल जे.सी. डेव्हिडसन यानें लिहिलें. त्यांतील संविधानक थोडक्यांत असें आहेः-रामचंद्र नांवाचा कोणी एक ब्राह्मण दुराचरणी व ठग झाला होता; परंतु तारा नावाच्या कोण्या स्त्रीची दुःस्थिति पाहून त्यानें तिच्याकरितां आपलें वर्तन सुधारलें व तिच्याशीं विवाह करण्याचें कबूल केले. तारेचा यापूर्वीं कुलीन नांवाच्या इसमाशीं वाङ्निश्चय झालेला होता; परंतु तो बहुपत्नीक असल्यामुळें विवाह त्याच्यांशीं करणें तिला पसंत नव्हते. आणि म्हणून रामचंद्राबरोबर लग्न करण्यास तीहि तयार झाली. शेवटीं ती त्याच्या नाशास न कळत कारणीभूत होऊन ठग लोकांच्या हातांत सांपडली. त्यांच्याकडून आपली विटंबना होऊं नये म्हणून तिनें अग्निकाष्ठें भक्षण करून प्राणत्याग केला. या डेव्हिडसनच्या नाटकाचें अनुकरण करून मि.ई.आर. मॅकग्राथ हिनें ''दि मेड ऑफ काश्मीर'' हें नाटक रचिलें. त्यांत नूर अफशानच्या वैवाहिक दुस्थितीचें चित्र रेखाटलें  आहे. यांशिवाय आणखीहि एक दोन नाटकें लिहिलेलीं असतील; परंतु त्यांचा निर्देश करण्याइतकीं तीं महत्त्वाचीं नाहींत. एतद्देशीयांच्या जीवनक्रमासंबंधीं इतकींच नाटकें आहेत. याशिवाय आंग्लो इंडियन व तदितर जीवनक्रमाविषयीं आंग्लो इंडियन लेखकांनी लिहिलेलीं आणखीहि नाटकें आहेत. उदाहरणार्थ, जी.पी. थॉमसनें लिहिलेलीं  ''मिचेल ओरोम्बेलो, ऑर दि फेटल सीक्रेट'' व ''दि अॅसेसिन, ऑर दि रायव्हल लव्हर्स.'' हीं नाटकें, जे. ए. पार्करचें  ''ऑनेस्ट इंग्लंड, ऑर ए सोल लेड बेअर'' हें नाटक व या सर्वांत अधिक लोकप्रिय झालेलें एल. सी. इन्स यांनीं लिहिलेलें  ''रेडिव्हिव्हा'' हें नाटक, इत्यादि नाटकें या प्रकारचीं होत.

सर एडविन आर्नोंल्डः – हे आपल्या 'दि लाईट ऑफ एशिया' नांवाच्या अत्युत्कृष्ट ग्रंथाच्या प्रस्तावनेंत म्हणतात कीं, जगातील सर्व धर्मांत बुद्धधर्माचा प्रसार जास्त असून एका पिढीच्या मागें या आशियांतील धर्माचा यूरोपियन लोकांस भागमूसहि नव्हता. बुद्धधर्माचा प्रसार नेपाळ, सीलोन व पूर्वेकडील द्वीपकल्प पासून तो चीन, जपान, तिबेट, मध्य आशिया, सायबेरिया व स्वीडिश लॅप्लंड पर्यंत झाला आहे, व ज्या देशांत त्या धर्माचा प्रवर्तक जन्मास आला त्या हिंदुस्थानातहि त्याचा प्रभाव नाहींसा झाला असें नाहीं. ज्या जगांतील एकतृतीयाशापेक्षां अधिक मानव जातीस नैतिक व धार्मिक कल्पना दिल्या तो, अत्यंत श्रेष्ठ अत्यंत सौम्य, अत्यंत पवित्र व अत्यंत परोकारी असला पाहिजे हें उघड आहे.

गेल्या पन्नास वर्षांत अन्यधर्मी लोक सदर धर्माचा विचार करूं लागले आहेत. मॅक्समुल्लर सारख्यानीं पाश्चात्य लोकांस या आशियांतील धर्माची ओळख करून दिली आहे. जें कार्य त्या लोकांनी तत्वशोधकांकरितां केलें आहे तेंच सर एड्विन आर्नोल्ड यानें काव्यप्रेमी लोकाकरितां केलें आहे. त्यानें आपल्या  ''दि लाइट ऑफ एशिया'' या सर्वोत्तम काव्यांत गौतमबुद्धाचा आयुष्यक्रम व त्याचें तत्व ज्ञान  यांची माहिती दिली आहे. हातीं घेतलेल्या विषयाची आवड व वर्ण करण्याची अप्रतिम शैली या दोन्ही गोष्टी ओर्नोल्डच्या ठिकाणी असल्यामुळें त्याचें काव्या अत्युत्तम झाले आहे.

सर एड्विन आर्नोल्ड इतर काव्यग्रंथाचे विषयहि संस्कृत पुस्तकांतून घेतलेले आहेत, उदाहरणार्थः-''इंडियन पोएट्रि'' यांत ''गीतगोविंद'' या संस्कृत काव्याची छाया असून मूळ ग्रांथांतील कल्पना व विषयासक्तीचा भागहि जसाच्या तसाच त्यांत उतरला आहे. इंडियन आयडिल्स यांत महाभारतांतील आख्यायिकासंग्रह आहे. त्यांत विस्तृत व चित्तवेधक आख्यायिका नलदमयन्तीसंबधीं आहे.

''दि साँग सेलेस्चियल'' यांत भगवद्गीतेंतील श्रीकृष्णार्जुनसंवाद घेतलेला आहे. ''दि सीक्रेट ऑफ डेथ'' या काव्यांतील विषय वेदांतपर व नीरस आहे. या शिवाय ''पर्लस् ऑफ दि फेथ और इस्लाम्स रोझरी'' आणि ''लोट्स अॅड ज्युएल'' या सारखीं आणखीहि काव्यें आर्नोल्ड कवीनें लिहिली आहेत. त्याच्या इतर सर्व ग्रंथांचा उल्लेख न केला तरी एका ग्रंथाचा केलाच पाहिजे आणि तो ग्रंथ म्हणजे ''दि लाईट ऑफ दि वर्ल्ड'' हा होय.

विंनोदी व हास्यरसोत्पादक कविताः - हा ऑग्लो इंडियन वाङ्मयांतील विशिष्ट प्रकार आहे. असल्या कविता प्रथम ऑलोइंडियन पत्रांतून प्रसिद्ध होऊन नंतर त्यांतील निवडक पुस्तकरूपानें प्रसिद्ध झालेल्या आहेत. ज्या वेळी ऑग्लोइंडियन वाचकांस लायलच्या लांबलचक तात्विक विवेचनाचा व लेडनच्या करुणरसमय विलापलहरींचा कंटाळा आला होता, तेव्हां हास्यरस उत्पन्न करण्यास किंवा मनोरंजन करण्यास असल्या वाङ्मयाचा फार उपयोग झाला. डब्ल्यू ट्रेगो वेब याचा ''इंडियन लिरिक्स'' या नांवाचा एक असला विनोदी काव्यग्रंथ आहे. त्यांत नेटिव्ह नोकरांचे दोष सरकारी नोकरांच्या कामाची ठराविक पद्धत, हिंदुस्थानांतील ऑँग्लोइंडियन लोकांची थाटाची रहाणी आणि गिर्यारोहण वगैरे ऑंग्लोइंडियन लोकांच्या आयुष्यांतील इतर गोष्टी इत्यादि विषयांवर विनोदीपूर्ण कविता आहेत. त्याचप्रमाणें ''अवरसेल्वज अॅड अदर्स'' ''दि ओल्ड'''' पंखावाला'' ''दि नाचगर्ल'' व ''दि पार्शीहॅट'' या त्याच्या कवितांवरून एतद्देशीयांच्या आयुष्यक्रमांतील व चारित्र्यांतील कांहीं भागांचें चित्र रेखाटण्यांत तो किती तरबेज होता हें दिसून येते. देशी लोकांची त्यांतल्या त्यांत सुशिक्षित लोकांची रहाणी व वागणूक इंग्रज लेखकांस विनोदपूर्ण लेख लिहिण्यास व इंग्रज वाचकांस हंसविण्यास फार सोपें साधन आहे हें पुष्कळ लेकांनीं ओळखिलें आणि त्या प्रकारच्या लेखांची परंपरा जी त्या वेळेस सुरूं झाली ती आजून अव्याहत चालू आहे. शिवाय इतर ऑंग्लोइंडियन कवींप्रमाणे स्वदेशविरहविलापपर कविता आहेत. त्यांत त्यानें इतर कवीचेंच अनुकरण केलेलें. आहे. ''दि साँग ऑफ डेथ'' ''बेबीज् ग्रेव्ह'' आणि ''दि मेमोरियल वेल अँड गार्डन्स'' व ''कानपूर'' या त्या कविता होत.

अशा तऱ्हेच्या कविता लिहिणारा दुसरा कवि टी.ए. बिग्नोल्ड हा होय. त्याच्या कवितेंत उपहासाचा व मस्करीचा बराच भाग आहे. ''लेव्हिओरा ऑर दि ऱ्हाईम्स ऑफ ए सक्सेसफुल कांपिटेटर'' व ''दि रायझिंग मॅन'' ''अवर पीयर्स'' हे त्याचे उत्कृष्ट काव्यग्रंथ आहेत.

परंतु विनोदी व मस्करीच्या कवितेचे अत्युत्कृष्ट व नमुनेदार मासले पहावयाचे असल्यास ते ''अलिफ चीम'' या टोपण नावानें प्रसिद्ध असलेल्या कवीच्या “लेज ऑफ इंड” आणि किप्लिंगच्या ''डिपार्टमेंटल डिट्टीज'' या काव्यांत पहावयास मिळतील. हीं दोन्हींहि काव्यें प्रथम वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालीं होतीं. दोन्हीहि काव्यांत आंग्लोइंडिअन आयुष्यक्रमांतील निरनिराळया अवस्थांचीं विनोदी वर्णनें दिलेलीं वाचावयास सांपडतात. मधून मधून उदात्त विचारहि प्रगट केलेले आहेत.

विनोदी व औपरोधिक निबंधकार हेन्री मेरिडिथ पार्कर यानें या विनोदी निबंध लिहिण्याच्या प्रकाराचा पाया घातला. त्याचा ''बोल पोंजिस'' हा निबंधसंग्रह सर्वमान्य झालेलां आहे. त्याच्या मागून इ.स. १८७८ मध्यें फिल रॉबिन्सन यानें हिंदुस्थानांतील वनस्पति, पशु, पक्षी व मानवी प्राण्यांच्या विशिष्ट चालीरिती यांचें विनोदी व चटकदार वर्णन केलेलें आहे. ''इन माय इंडियन गार्डन'' ''ऑन लीव्ह इन् माय कांपाउंड'' ''अंडर दि पंखा'' हे त्याचे मुख्य निबंधसंग्रह आहेत. या विनोदी वाङ्मयानंतर औपरोधिक वाङ्मयास सुरुवात झाली. या प्रकारचे निबंध लिहिण्यास जी. अॅबेरिघ मॅके नांवाच्या लेखकांनें  'सर अल्लिज्बाबा' या टोपण नांवाखालीं सुरवात केली. त्यानें ''ट्वेंटीवन डेज इन इंडिया'' हा एकच निबंधसंग्रह लिहिला. परंतु तेवढयानें त्यानें आपल्यास ऑंग्लोइंडियन वाङ्मयलेखकांत कायमचें स्थान मिळविलें आहे; तथापि विनोदी व औपरोधिक निबंध लिहिण्याच्या कामीं ज्यानें सर्वांवर ताण केली तो इल्टयुडस प्रिर्चड. हा निबंधकार होय. त्याचा ''दि  क्रांनिकल्स ऑफ बजबजपूर'' हा निबंध संग्रह सर्वविश्रुत झालेला आहे. यापूर्वी ऑग्लोइंडियन काव्यवाङ्मयांत लेडन, हेबर, रिचर्डसन व वेब या कवीनीं अनेक विलापगीतें रचलेलीं होती. त्यानंतर तसल्या प्रकारच्या वाङ्मयांत कांहीं तरी बदल होणें अवश्य होतें. अशा वेळी फिल रॉबिन्सन, सर अल्लिबाबा, पारकर, औपरोधिकलेखनपटु प्रिचर्ड आणि विविध वाङ्मयलेखक किपलिंग यांनीं आपल्या विनोदी लेखांनीं पूर्वीच्या कवींच्या विलापरवांनीं उत्पन्न केलेलें नैराश्यपूर्ण वातावरण बदलून टाकलें.
 
का दं ब री वा ङ्म य.. - कादंबरी वाङ्मयाची लोकप्रियता व विपुलता हें एकोणिसाव्या शतकांतील वाङ्मयाचें वैशिष्ट आहे आणि तें वैशिष्टय आंग्लो-इंडियन वाङ्मयाच्या बाबतींतहि दृष्टीस पडतें;तथापि आंग्लोइंडियन कादंबरीकारांचें कार्य अनेक दृष्टीनीं फार कठिण होतें. त्यास आपला एक डोळा इंग्रजी जनतेकडे तर दुसरा ऑंग्लोइंडियन समाजाकडे ठेवावा लागत असे. ज्यांनी आपलें सारें लक्ष इंग्रजी समाजाकडेच दिलें त्यांनीं आपल्या वाचकांच्या सोयीकरितां इकडील बारीक सारीक गोष्टीबद्दलहि स्पष्टीकरणाची रेलचेल केल्यामुळें त्यांच्या कादंबरींतील संविधानकाची ओढाताण झाली आहे; व ज्यांनीं आपलें लक्ष्य ऑंग्लोइंडियन समाजाकडे ठेविलें त्यांनीं स्पष्टीकरणास अजीबात फाटा दिल्यामुळें त्यांच्या कादंबऱ्या इंग्रजांस दुर्बोध झाल्या आहेत. शिवाय ऑंग्लोइंडियन कादंबरीकारांनीं आपल्या कादंबऱ्या इंग्लंडांतील वाचकांनीं वाचाव्या या महत्त्वकांक्षेनें न लिहिता जर त्या ऑंग्लोइंडियन लोकांची व एतद्देशीयांची लोकप्रियता संपादन करण्याच्या बुद्धीनें लिहिल्या असत्या तर त्यांचें कार्य अधिक यशस्वी झालें असतें. असो. त्याप्रमाणें जरी ऑंग्लोइंडियन कादंबरीकारांचे कार्य जितकें यशस्वी व्हावें तितकें झालें नाहीं तरी ठराविक पद्धतीची पत्रें किंवा प्रवासवर्णनें प्रसिद्ध करीत बसण्यापेक्षां एतद्देशीय व ऑंग्लोइंडियन लोकांच्या आयुष्यक्रमाची चित्रें रेखाटण्याचें कार्य त्यांनीं सिद्ध करून दाखविले यांत तिळप्राय शंका नाही.

मोरिअरच्या इराणविषयक  ''हाजीबाबा'' नांवाच्या कादंबरीची चहूंकडे वाहवा झालेली पाहून आपणही हिंदुस्थानविषयक कादंबऱ्या लिहाव्या अशी बुद्धि ऑंग्लोइंडियन लेखकांत उत्पन्न झाली. तिला अनुसरून त्यांनीं आपल्या पहिल्या कादंबऱ्या लिहिल्या परंतु त्यास व्यवस्थित स्वरूप नसल्याकारणानें त्यांस वाङ्मयक्षेत्रांत कायमचें स्थान प्राप्त झालें नाहीं. अशा प्रकारच्या कादंबऱ्या म्हटल्या म्हणजे जे. बी. फ्रेजरच्या ''दि कुझ्झिलबश '' व  ''पार्शियन अॅडव्हेंचरर'' या कादंबऱ्या, निनांवीं प्रसिद्ध झालेली ''ईस्ट इंडिया स्केच बुक'' व दि बाबू अॅन्ड अदर टेल्स'' हीं पुस्तकें, डब्ल्यु. बी. हॉल्लेच्या ''पांडुरंग हरि'' ( या कांदबरीला  ''अनाथ पांडुरंग'' हें मराठी स्वरूप प्राप्त झालें आहे) व ''टेल्स ऑफ झेनाना'' या कांदबऱ्या आणि मेडोज टेलरची कन्फेशन्स ऑफ ए ठग'' ही कादंबरी ( यासहि  '' ठगाची जबानी'' असें मराठी स्वरूप प्राप्त झालें आहे) या होत.

या सर्व कादंबरीकारांत मेडोज टेलर हाच प्रथम विशेष प्रसिद्धीस आला. त्याची जी इतकी ख्याति झाली ती त्याच्या  ''दि कन्फेशन्स ऑफ ए टग '' या कादंबरीवरुन झालेली नसून त्यानें ज्या पुढे ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या त्यामुळें झाली. त्यानें इ.स. १८४० त ''टिपू सुलतान'' ही कांदबरी लिहिली व त्यावरून ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यास तो किती पात्र होता हें कळून आलें. त्यानंतर त्यानें ''तारा'' ''राल्फ डार्नेल'' व ''सीता'' या आपल्या तीन सुप्रसिद्ध कादंबऱ्या एकामागून एक अशा रीतीनें प्रसिद्ध करण्यास सुरवात केली. या तीन कादंबऱ्यांचा परस्परांशीं संबंध आहे. इ.स. १६५७ त शिवाजी महाराजांनीं विजापूरकरांवर विजय मिळवून मराठयांची सत्ता प्रस्थापित केली; इ.स. १७५७ त प्लासीच्या लढाईनें मराठयांची सत्ता नाहींशी होऊन तिच्याजागीं ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली. इ.स. १७५७ त शिपायांचें बंड झालें. नक्की शंभर वर्षांच्या अंतरानें घडलेल्या या तीन गोष्टींचा आधार घेऊन वरील तीन कादंबऱ्या रचण्यांत आलेल्या आहेत. इ.स. १८७८ त  ''ए नोबल क्वीन'' या नावांची मेडोज टेलरनें आपली अखेरची कादंबरी प्रसिद्ध केली. त्य कादंबरीत सुप्रसिद्ध चांदबिबीच्या पराक्रमांचे वर्णन आहे.

यानंतर अलेक्झांडर अॅलरडाइस यानें ''दि सिटी ऑफ सन्शाईन'' या नांवाची कादंबरी लिहिली. तींतील हकीकत धूपनगर या खेडयांत घडल्याचें दाखविले आहे. धर्म, जात, शिक्षण, न्याय, बालविवाह, सावकारकी इत्यादि विषयांचे विवेचन या कादंबरींत केलेलें आहे. मिसेस एफ. ए. स्टॉलच्या ''फ्रॉम दि फाईव्ह रिव्हर्स'' ''टेल्स ऑफ दि पंजाब'' ''दि फ्लावर ऑफ फर्गिव्हनेस'' आणि ''इन दि पर्मनंट वे'' या कादंबऱ्यांत पंजाबी लोकांच्या आयुष्यक्रमाचें चित्र पाहावयास सांपडते. मि. आर. ई. फॉरेस्ट याच्या ''दि बॉण्ड ऑफ ब्लड'' या नांवाच्या कादंबरीत रजपूत लोकांच्या चालीरीतींचें वर्णन केलेलें आहे. अशाच जातीच्या दुसऱ्या कादंबऱ्या म्हटल्या म्हणजे मि. आर. डब्ल्यू फ्रेजर यांनी इ.स. १८९५ त प्रसिद्ध केलेली ''सायलेंट गॉड्स, अँड सन स्टीप्ड लॅडस्'' व मि. जे. डब्ल्यू शेरर यानें लिहिलेली ''ए प्रिन्सेस अॅफ इस्लाम'' या होत.

वर सांगिलेल्या कादंबऱ्यांपेक्षा ज्यांत ऑंग्लोइंडियन आयुष्यक्रमांचे वर्णन करावयाचें होतें अशा कादंबऱ्या लिहिण्याच्या कामीं आंग्लोइंडियन लेखकांस अधिक यश आलें असल्या कादंबऱ्यांचा उपक्रम आपणांस डब्ल्यू डीलाफील्ड आर्नोल्डच्या ''ओकफील्ड, ऑर पेलोज इन् दि ईस्ट'' या कादंबरींत व जॉन लँग याच्या ''दि वेदरबाईज् टू क्लेव्हर बाय हाफ'' या कादंबरींत पहावयास सांपडतो. जॉन लँग पासून ते अखेर विशेष प्रसिद्धीस आलेल्या कांदबरीकारंपर्यंत जो मध्यंतरीचा काळ गेला त्यांत साधारण प्रतीचेच कादंबरीकार उदयास आले. फ्लॉरेन्स मॅरिअट (मिसेस रॉस चर्च), मिसेस कॅडेल यांच्या कादंबऱ्यांत नांवाजण्यासारखें विशेष कांहीं नाहीं. त्यांतल्या त्यांत सर जॉर्ज टी. चेस्ने व सर हेन्री एस. कनिंगहॅम यांस ही कला बऱ्याच अंशानें साध्य झाली होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. त्यांनीं लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांपैकीं चेस्नेची ''दि डिलेमा'' व कनिंगहॅमची ''दि क्रानिकल्स ऑफ डस्टीपूर'' या दोन कादंबऱ्यांनीं ऑग्लोइंडियन वाचकास बरेंच वेड लावून दिलें होतें.

आ ग्लो इं डि य न वा ङ्म य ले ख कां त र डि आ र्ड कि प्लिं ग ची यो ग्या ता. - आतांपर्यंत वर्णिलेल्या सर्व ऑंग्लोइंडियन लेखकांपेक्षां रडिअर्ड किप्लिंगने हिंदुस्थानविषयक गोष्टींत अधिक सहानुभूति व्यक्त केलेली दिसून येते. त्यानें आपले ''डिपाटमेंटल डिट्टीज'' हें काव्य लिहिल्यापासूनच त्याला आंग्लोइंडियन वाङ्मयक्षेत्रांत स्थान प्राप्त झाले. तथापि काव्यापेक्षां संक्षिप्त कथा लिहिण्याच्या बाबतींत त्याची बरोबरी करणारा कोणीहि आंग्लोइंडियन लेखक झाला नाहीं. हें विधान इ.स. १८९० त किंप्लिंगने हिंदुस्थान सोडण्यापूर्वींहि खरें होतें. परंतु त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या त्याच्या  ''जंगल बुक्स आणि ''किम '' या दोन पुस्तकांनीं या विधानाला अधिकच बळकटी आली. किम या पुस्तकांत दोन गोष्टीं प्रमुखपणानें दृष्टीस पडतात एक त्यांत संविधानक बिलकुल नाहीं आणि दुसरें त्यांत एतद्देशीयांचा आयुष्यक्रम, धर्म व त्याचीं कारस्थानें याजविषयीं भरपूर माहिती दिलेली आहे. त्यामुळें त्याला ''कादंबरी'' या सदरांत घालतां येत नाहीच परंतु त्यास कल्पित ग्रंथ म्हणणेंहि बरोबर होणार नाहीं. त्याचें योग्य ठिकाण म्हणजे वर्तमानपत्री वाङ्मय हें होय.

रडियार्ड किप्लिंगच्या उत्कृष्ट ग्रंथांचे चार भाग पडतात. (१) संक्षिप्त गोष्टी (२) साम्राज्यवादी कविता (३) ''दि जंगल बुक्स'' आणि (४) ''किम'' या पैकीं त्याच्या साम्राज्यवादी कविता वजा केल्या तर बाकीचे सारे ग्रंथ आंग्लोइंडियन म्हणण्यास हरकत नाही.

येणेंप्रमाणें त्याच्या ग्रंथाचे जे विभाग आंग्लोइंडियन म्हणून समजता येतात त्यांत त्यानें इतर सर्व आंग्लोइंडियन लेखकांवर ताण केसेली आहे आणि त्यामुळें त्या सर्वांत त्याला श्रेष्ठ स्थान देण्यांत येतें.

उ प सं हा रः - आंग्लोइंडियन वाङ्मयाची थोडक्यांत हकीकत आहे. या हकीकतींत त्या वाङ्मयाचे साधारण मानानें गुणदोष काय आहेत याचें दिग्दर्शन झालेलें आहे. आंग्लो-इंडियन वाङ्मयाच्या काव्य-विभागाचा कांहीं भाग स्वदेशविरहविलापानें व्यापिला आहे, तर कांहीं भागांत या देशांतील सृष्टिसौंदर्य व एतद्देशीयांचा धार्मिक आयुष्यक्रम यांचें वर्णन केलेलें आढळतें. त्याचप्रमाणें आंग्लोइंडियन लेखकांस जेव्हां या विलापगीतांचा कंटाळा आला तेव्हां प्रतिक्रियेस सुरवात होऊन विनोदी व औपरोधिक वाङ्मय उत्पन्न झाले. आणि अखेर एतद्देशीयांच्या व आंग्लोइंडियन लोकांच्या आयुष्यक्रमाची चित्रें रेखाटणाऱ्या कादंबर्‍या अनेक आंग्लोइंडियन लेखकांनीं लिहिल्या, परंतु त्या सर्वांवर रडिआर्ड किप्लिंग यानें संक्षिप्त गोष्टी लिहून ताण केली इत्यादि, हकीकत आम्ही वाचकांस निवेदन केलीच आहे. यावरून आंग्लो-इंडियन वाङ्मयाला कांहीं निश्चित दिशा नाहीं असे जें सकृद्दर्शनी वाटतें तें तसें नसून त्याचा विकास पुढील पांच दिशांनीं झाला आहे असें निश्चितपणें दिसून येतें, पहिली दिशा, स्वदेशविरहाबद्दल विलाप, दुसरी आशिया खंडांतील निरनिराळया धर्मांचें विवेचन, तिसरी आंग्लो-इंडियन लेखकांची विनोदी लेख लिहिण्याची प्रवृत्ति, चवथी एतद्देशीयांच्या आयुष्यक्रमाचें व या देशांतील सृष्टिसौन्दर्यांचें वर्णन आणि शेवटची, म्हणजे सुखप्रधान, दुःखप्रदान व सुखदुःखविवर्जित अशा आंग्लो-इंडियन सामाजिक परिस्थितीचें विवरण. या पांच दिशांनी ज्या कल्पित वाङ्मयाचा विकास झाला, त्यांत अद्याप पुष्कळ उणीवा आहेत ही गोष्ट कबूल केली पाहिजे. सुखप्रधान किंवा दुःखप्रधान नाटकांचा व निबंधांचा अद्याप त्या वाङ्मयांत ठिकाण नाहीं. कारण इंग्रजींत नाटकें करून हिंदुस्थानांत पोट भरण्याची शक्यता नाहीं.

आंग्लो इंडियन कादंबऱ्यांत जी कल्पकता विविधता आहे ती हिंदुस्थानांतील कोणत्याहि देशी भाषेंतील कादंबऱ्यांत नाहीं, असें म्हटलें तरी प्रत्यवाय नाहीं. याशिवाय आंग्लोइंडियन कादंबऱ्या जितक्या विपुल आहेत तितक्या ( बंगालीं जमेस धरली तरी) कोणत्याहि देशभाषेंत नाहींत गेल्या दोनशें वर्षांत देशी वाङ्मयाचा जों विकास झाला त्यापेक्षा आंग्लोइंडियन वाङ्मयाचा खचितच जास्त झाला, याचे कारण पैसे खर्च करण्याची इंग्रजास शक्ति, सर्व कारभार इंग्रजीत असल्यामुळे इंग्रजी छापण्याच्या अधिक सोई, आणि इंग्लंडांतील वाचकवर्गाचें अस्तित्व या गोष्टी होत्या. देशी लोकांस आंग्लोइंडियन कादंबऱ्या हें आपलें राष्ट्रीय वाङ्मय वाटत नाहीं; याची कारणें काहीं अंशीं देतां येतील ती येणेंप्रमाणें; देशी लोकांच्या करमणुकीसाठी तें वाङ्मय नसून इंग्रजांच्या करमणुकीसाठीं असल्यामुळें त्यांतील मजकूर देशी लोकांस आवेडल असा असणें शक्य नाहीं. विवेचनास हिंदुस्थानांतील मध्यमवर्गं यांत गाळलेला असे. राजेरजवाडयांचा, लुटारूंचा, पंखाकुलींचा आणि काल्पनिक फकिरांचा वर्ग यात वर्णनासाठीं असे. ( आधारग्रंथ-ओटनकृत)

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .