प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आजीवक , वि ष य प्र वे श - बौद्ध व जैनसंप्रदायांच्या अतिप्राचीन सूत्रग्रांथावरून त्या पंथांच्या स्थापनेच्या कालीं म्हणजे. इ.स. पूर्वी सहाव्या शतकाच्या अखेरीस आजीवक नांवाचा एक धर्मपंथ अस्तित्त्वांत होता, अशें दिसून येतें. कांहीं जैन ग्रंथांवरून या पंथाचा मुख्य संस्थापक गोशाल मंखलीपुत्र हा होता असें कळून यतें, गोशालापूर्वीं नंदवच्छ व किससंकिच्छ हे आचार्य होऊन गेले असें कांहीं पंडित म्हणतात. जैनांच्या सातव्या अंगग्रंथामध्यें गोशाल यानें सद्दलपुत्त नांवाच्या पुरुषास आजीवक पंथांत समविष्ट करून घेतल्याचा उल्लेख आहे, व भगवतीसूत्रामध्यें गोशालाच्या चरित्राची हकीकत दिली आहे. बौद्ध व जैन आख्यायिकांमध्यें या पंथास इच्छास्वातंत्र्य व नैतिक जबाबदारी ही तत्त्वें अमान्य असल्याचें म्हटलें आहे.

आजीवक या संज्ञेचा बरोबर अर्थ काय आहे या विषयी अपणांस माहिती आढळत नाहीं. आजीव या संस्कृत शब्दाचे अर्थ एका विशिष्ठ जातीचा धंदा किंवा वृत्ति असा असून बौद्ध संप्रदायामध्यें भिक्षूस अवश्यक असलेल्या आठ गोष्टींपैकीं सम्यकू आजीव म्हणजे चांगली वृत्ति ही एक आहे. कर्मतत्त्वाच्या शुंखलेमधून मुक्त झालेल्या भिक्षूनें कोणता धंदा पत्करावा याविषयीं गोशालाची कांहीं विशिष्ट मतें बनलेलीं होतीं असें दिसतें. या विशिष्ट मतांचा ज्यांनीं स्वीकार केला होता, त्या लोकांस विरुद्ध पंधाच्या लोकांनीं आजीवक ही संज्ञा प्रथम दिली व नंतर या संज्ञेंतील वाईट अर्थ निघून जाऊन हें केवळ एका पंथाचें नाव बनलें.

गो शा ला चें च रि त्र. - गोशालाच्या बापाचें नांव मंखली असें असून तो धंदेवाईक भिक्षेकरी होता. त्याचे आईबाप दरिद्री असल्यामुळें एकदां पर्जन्यकाळात एका गोठ्यामध्यें आश्रयास राहिले असतां त्या ठिकाणीं या आजीवक पंथांच्या संस्थापकाचा जन्म झाला असल्यामुळें यास गोशाल हें दुसरें नामाभिधान देण्यांत आलें. गोशाल हा मोठा झाल्यावर त्यानें आपल्या बापाचाच पेशा पत्करिला व अशा रीतीनें तो भटकत असतां त्याची व निग्गंथ ( निर्ग्रंथ) पंथाचा संस्थापक जो महावीर याची अनेक वेळां गांठ पडली. महावीरास लोकांकडून पुष्कळ मान मिळतो हें पाहून गोशालानें अनेक झिटकारण्या सोसून सरतेशेंवटीं हरप्रयत्नानें आपणांस महावीराच्या शिष्यशाखेमध्यें समाविष्ट करून घेतलें. परंतु या दोघां पुरुषांच्या स्वभावामध्यें व वागणुकीमध्यें जमीनअस्मानाचें अंतर असल्यामुळें व गोशाल हा एक लबाड, लफंग्या गृहस्थ असल्यामुळें सहा वर्षांच्या अवधींमध्यें या दोघांची मैत्री तुटली. यानंतर गोशालानें आजीवक लोकांचा निराळच एक पंथ स्थापन करून श्रावस्ति नगरांतील एक कुंभारिणीच्या वाडयामध्यें आपला मुक्काम केला पुढे सोळा वर्षांनंतर महावीर हा श्रावस्ति नगरांत आला असतां त्यानें तेथे चाललेली गोशालाची चलती पाहून त्या ढोंगी तपस्व्याची बिंगें बाहेर काढली. या गोष्टीचा सूड उगविण्याकरितां गोशालानें महावीराकडे जाऊन महावीराच्या पूर्वीच्या गोशाल नांवाच्या मित्रापेक्षां आपण स्वतः भिन्न असल्याचें भासविलें. परंतु गोशालाची लबाडी उघडकीस आली व दोन्ही पंथांची मारामारी होऊन तींमध्यें गोशालास हार खावी लागली. या दुष्कीर्तीचा गोशालाच्या मनावर इतका अनिष्ट परिणाम झाला कीं, त्यानें सर्व नियंत्रणें झुगारून देऊन मद्यपान, नाचरंग, त्या कुंभाराच्या दुकानांतील राड झालेलें थंड पाणी आंगावर शिंपडून घेणें, कुंभारिणीसाठीं लाळ घोटणें इत्यादि गोष्टीकडे आपणांस वाहून घेतलें. कांहीं दिवसांनीं त्याला एकाएकी पश्चाताप झाला व त्यानें आपल्या शिष्यांस महावीराच्या स्वतःविषयींच्या ( गोशालाविषयींच्या ) भाषणाची आठवण दिली व आपली निंद्याकृत्यें चव्हाटयावर जाहीर करून नंतर आपला अंत्यविधिकरण्याविषयीं आज्ञा केली. अर्थात् शिष्यांनी त्यानें सांगितल्याप्रमाणें केलें नाहीं हें सांगावयास नकोच.

बौद्ध ग्रंथांमध्यें आलेली गोशालचरित्राची माहिती अगदीं त्रोटक आहे. बौद्धग्रंथामध्यें त्याजविषयीं असें म्हटलें आहे की, गोशाल यानें आपल्या धन्याच्या घरचें तेलाचें भांडें एकदां फोडिलें व आपला धनी रागावून आपणांस फटके देईल या भीतीनें तो आपले कपडे तेथेंच टाकून नग्नस्थितींत एका खेडेगांवी पळून गेला. त्या ठिकाणीं लोकांनीं त्याला शरीर झांकण्याकरितां वस्त्रें देऊं केलीं; परंतु नग्नमुनिवृत्तींत राहिल्यानें आपला चरितार्थ जास्त चांगल्या प्रकारें चालेल अशी अशा वाटून त्यानें वस्त्रें स्वीकारलीं नाहींत. भगवती सूत्रामध्यें गोशालाच्या मृत्यूनंतर महावीर हा सोळा वर्षें जिवंत होता, व गोशालाच्या मृत्यु मगधराजा अजातशत्रू व वैशालीचा राजा छेद्ग या दोघामध्यें झालेल्या युद्धशी समकालीन होय असें म्हटलें अहे. यावरून गोशालाचा मृत्यू इ.स. पूर्वीं ५४३ मध्यें झाला असावा. हा गोशालाच्या मृत्यूचा काल अंदाजापेक्षां बराच पलीकडे गेलेला दिसतो कारण हें युद्ध इ.स. पूर्वीं ५०० च्या सुमारास झालें असावें असें इतर पुराव्यावरून निश्चित ठरतें, व याच सुमारास गोशालास मृत्यु आला.

गो शा ला चे आ चा र वि चा र. - या पंथाची विचार पद्धति व आचारधर्म कशा प्रकारचे होते याविषयीं गोशाल किंवा त्याचा एखादा शिष्यं यापैकीं कोणींच काहीं माहिती दिली नसल्यामुळें याविषयीं थोडी अस्पष्ट कल्पना वरील बौद्ध व जैन धर्मग्रंथावरूनच येणार आहे. बौद्ध व जैन संप्रदाय हे गोशालाच्या मताचें प्रतिस्पर्धीं असल्यानें त्यांनीं केलेली विधानें जशींच्या तशी घेणें बरोबर नाहीं. तथापि  दाही प्रकारच्या पंथांमधील माहितीमध्यें असलेलीं सादृश्यें व या दोन्हीं बौद्ध व जैन संप्रदायाचें परस्परविरोधित्व या दोन गोष्टींमुळें वरील माहितीस पुष्कळच किंमत आहे.

मज्जिमानकाय या बौद्धग्रंथामध्यें बुद्धानें त्या कालीं अस्तित्वांत असलेल्या आठ तापस संप्रदायांचे उल्लेख केल्याचें म्हटलें आहे. त्यापैकीं चार अब्रम्हचर्यवास म्हणजे अनीतिप्रवर्तक आहेत; व राहिलेले चार अनस्सासिक म्हणजे असंतोषकारक आहेत असें बुद्धानें म्हटलें असून पहिल्या विभागांत गोशालाचा व दुसऱ्या विभागांत महावीराच्या संप्रदाय समाविष्ट केला आहे. बुद्धानें गोशालाची 'मोघपुरिस' म्हणजे पाजी मनुष्य या नांवानें संभावना केली आहे.

या पंथाचें आद्यत्त्व म्हणजे एकंदर विश्वामध्यें कसल्याहि प्रकारचा कार्यकारणभाव नसून सर्व घटना स्वभावतःच होत असते, व कोणतीहि गोष्ट कोणाच्या प्रयत्नावर अवलंबून नाहीं, हें होय या विचारपद्धतीचे उल्लेख दीघनिकाय, उवासग दसाओ इत्यादि बौद्ध व जैन ग्रंथांमध्यें आले आहेत. हें तत्व अमलांत आणलें तर अत्यंत अनर्थोत्पादक होईल हें स्पष्ट आहे. व गोशाल हें तत्व प्रत्यक्ष आचरणांत आणींत होता असें बौद्ध व जैन ग्रंथांमध्यें ऐकमत्यानें म्हटलें आहे. परस्त्रीगमन केल्यानें मुनीस कसल्याहि प्रकारचें पाप लागत नाहीं अशी गोशालाची शिकवणूक आहे असें महावीरानें स्पष्ट म्हटलें आहे. जैन ग्रंथांमध्यें गोशाल हा प्रथम महावीराचा शिष्य होता असें म्हटलें आहे. यावरून एवढें ठरतें की, महावीर व गोशाल यांची विचारपद्धति सारखीच होती; परंतु महावीर हा अपालें तत्त्वज्ञान शब्दशः आचरणांत आणीत नसे व गोशाल हा आणीत असे, एवढाच दोघांमध्यें फरक होता. विशेषतः विश्वांतील सर्व पदार्थांची विभागणी करण्यामध्यें गोशाल व महावीर या दोघाच्या विचारपद्धतीत ज्या दोन सारख्या गोष्टी दिसतात त्यापुढील प्रमाणें:- (१ ) उत्तराध्यन सूत्रांत दर्शविल्याप्रमाणें सर्व प्राण्यांची एकेद्रिय द्विरिंद्रिय त्रिरिंद्रिय, चतुरिंद्रिय व पंचेंद्रिय अशी वर्गवारी, ( २ ) व मानव जातीची सहा अभिजातींमध्यें विभागणी या होत.

कांहीं बाबतींत मात्र महावीर व गोशाल यांच्या विचारपद्धतींमध्ये असलेले भेद जैनांच्या आख्यायिकामध्यें स्पष्ट दाखविले आहेत.  ''दष्टवाद'' नांवाच्या बाराव्या अंगामध्यें जैन तत्त्वज्ञानाच्या पूर्ण आकलनासाठीं सांगितलेली पूर्व तयारी असें जें ''परिक्कम'' त्यामध्यें सहा भाग सांगितले आहेत व दुसऱ्या काहींनीं सात भाग सांगितले आहेत. ही दुसरीं सात भागांची गणना गोशालानें स्थापिेल्या आजीवकांची होय. ह्या बाबतींत महावीरानें आत्म्याचे बद्ध व मुक्त असे दोन भाग पाडले, परंतु गोशालाचें म्हणजे असें की, ह्या खरोखरीच्या  'बद्ध' व महावीराच्या दिसण्यांत मुक्त सदराखेरीज तिसरा एक  ''बद्ध नामुक्त'' असा एक विभाग पाडिला पाहिजे. कारण महावीराच्या 'मुक्त' अवस्थेंत देखीस एक प्रकारचा तात्त्विक उद्दामपणा, स्वसंप्रदायाची प्रतिष्ठा वगैरे दोष असल्यामुळें हे मुक्त जीव देखील वस्तुतः बद्धच होत. अर्थात् गोलाशाच्या मतें तिसरे उत्तम प्रकारचे जीव  ''बद्ध नामुक्त'' हे होत.

दुसरी एक गोशालाचीच कल्पना म्हणजे त्याचें पुनर्जन्मकल्प नेशीं जोडलेलें  ''चैतन्यसंक्रमणाचें'' नवीन तत्त्व. ही कल्पना गोलाशाला बरेच दिवस अगोदर सुचली होती असे जैन आख्यायिकेमध्यें म्हटलें आहे. गोलाशानें ही पुस्ती जोडण्यांचे कारण म्हणजे त्याच्या नीतिबाह्य वर्तनाबद्दल महावीरानें केलेल्या टीकेची तीव्रता कमी करण्याकरितां केलेला प्रयत्न होय असें भगवतीसूत्रांतील गोशालाच्या स्वतःच्या उद्गरावरूनच स्पष्ट होतें.

आजीवकाचें भगवतीसूत्रांत सांगितलेलें दुसरें एक विशिष्ट मत म्हटलें म्हणजे ''अठ्ठ चरमाणि'' (शेवटच्या आठ गोष्टी ) होत. त्या आठ गोष्टी म्हणजे शेवटचा मद्याचा पेला, शेवटचें गीत, शेवटचा नाच, शेवटचें प्रियाराधन, शेवटचा झंझावात, शेवटचा तुषार उडविणारा हत्ती, शिलायुक्त अस्त्रांचें शेवटचें युद्ध व शेवटचा तीर्थकर मंखली पुत्त ह्या होत. गोशालाच्या शेवटच्या आयुष्याच्या भागांत जे काही प्रसंग उद्भवले त्यापासून वरील आठ चरम तत्त्वांची उत्पति झालेली दिसते. ह्यापैकी पहिले चार प्रसंग गोशाला यानें निधनापूर्वीं केलेली कृत्यें होत, व यानंतरचे तीन प्रसंग गोशालाच्या मृत्युसमयींच घडून आल्याचें गोशालाच्या चरित्रावरून दिसतें.

गोशालाच्या मृत्युसमयीं घडून आलेल्या अशाच एका प्रसंगावरून ''चत्तरिपाठागाइम् चत्तारि अपाणगाइम्'' प्राशन करावयाच्या चार गोष्टी व प्राशन न करतां केवळ स्पर्श करावयाच्या चार गोष्टी, या विशिष्ट तत्तवाची उत्पत्ति झाली. तापाच्या झटक्यांत गोशालानें एक आंबा हातांत गेतला व कुंभाराच्या अगंणांत असेलल्या चिखलांत स्वतःस बुडवून घेतलें असें सांगितलें आहे. ह्या प्रसंगावरूनंच त्याला एकदम वरील विचार सुचले असावेत.

''मज्झिम निकाय'' या बौद्ध ग्रंथामध्ये  'सच्छक' नांवाचा एक निग्गंध पंथातील मनुष्य, गोशाल मंखलीपुत्त व त्याचे दोन मित्र ह्यांनीं स्थापन केलेल्या आर्जावक पंथांतील लोकांचे आचार कसे असतात ह्याची माहिती बुद्धास देत असल्याचें दाखविलें आहे. दीघ निकाय ह्या ग्रंथामध्येंहि अशीच हकिकत आहे. ह्यावरून हें वर्णन केलेल आचार सरसहा तापस संप्रदायास सारखेच लागू पडत असावेत असें दिसतें. ह्याठिकाणीं असेंहि म्हटलें आहे कीं, आजीवक हे कधीं कधीं खाण्यापिण्याची खूप चैन करतात व लठ्ठ बननात. अर्थात् हें विधन गोशालाच्या रंगेल चरित्रास उद्देशूनच केलेलें असावें.

वरील विवेचनावरून एवढें स्पष्ट दिसून येईल कीं, आजीवक पथांची कांहीं मतें जरी सर्वांस पटणारीं नसलीं तरी ह्य पंथाचा समावेश जैनांमध्येच करणें सयुक्तिक दिसतें. महावीर व गोशाला यांचे मतभेद तत्वासंबंधीं नसून केवळ आचारासंबंधी होते. उदाहरणार्थ 'सूत्रकृतांग' ग्रंथामध्यें गाशाल याच्या बरोबर महावीराच्या आर्दक नांवाच्या एका शिष्याचा वादविवाद झाल्याचें दाखविलें आहें. त्यामध्यें (१) शींतजल प्राशन (२) न शिजविलेले धान्य खाणें, (३) मुद्दाम तयार केलेल्या वस्तूंचा परिग्रह, (४) स्त्रीसंग करणें ह्या चार गोष्टीबद्दल महवीरानें जे निंर्बंध घातले होते ते गोशालास मान्य नव्हतें. विशेषतः ह्यापैकीं शेवटची गोष्ट जी स्त्रींसंग तीबद्दल तर विशेषच वाद होता. महावीर व गोशाल ह्या पूर्वींचा जो पार्श्व त्यानें आपल्या अनुयायांस (१) अहिंसा, (२) सत्य ( ३) अस्तेय व (४) अपरिग्रह ही चार व्रतें सांगितलीं होतीं. ह्यामध्यें महावीरानें ब्रह्मचर्य व्रताची भर घातलीं. परंतु दरम्यान साधारण समजून अशी हाती कीं, ब्रह्मचर्याचें जरी साक्षात विधान केलेलें नाहीं तरी तें अध्याहृत आहेच. परंतु वास्तविक गोष्ट अशी होती कीं, जरी विवाहित स्त्री ही एक मालमत्ता समजली जात असल्यामुळें अपरिग्रहानें तिचा निषेध होतो त्याचप्रमाणें अस्तेयव्रतांने परस्त्रीगमनाचा निषेध होतो. परंतु अनूढागमनाच्या पापकर्माची वासलात कशा लावावयाची? ही आपत्ति टाळण्याकरितां महावीरानें सरसकट ब्रह्मचर्य व्रताचा उपदेश केला. अशा रीतानें गोशालाच्या नीतिबाह्य आचरणामुळें महावीरास ब्रह्मचर्य नियमाची कडक स्थापना करावी लागली, व दोघांमधील भांडणांचें मूळ हेंच होय.

ह्या एका मुख्य कारणाखेरीज दुसरीं मतभेदाचीं कारणें बरीच होती. उदाहरणार्थ महावीरानें भिक्षेकरितां एक पात्र जैनमुनीनें बाळगावें अशी सवलत दिली. परंतु गोशालाचें म्हणणें असें कीं अन्न हें हाताच्या अंजलीरूप भिक्षा पात्रांतच खाल्लें पाहिजे. तसेंच वस्त्रप्रावरणांच्या बाबतींत पार्श्वानें शरीराभोंवती परिकरवस्त्र वापरण्याची परवानगी दिली होती, व महावीरानें फक्त जरूरीपुरतेंच कटिबंधन वापरण्याची सवलत दिली, परंतु गोशालानें मात्र नग्न स्थितींतच राहण्याचा उपदेश केला. तथापि महावीर व गोशाल हे एकत्र असतांनां महावीर हा नग्न स्थितीतच रहात असे. ह्या किंवा अशाच दुसऱ्या कित्येक मतभेदामुळें आजीवक पंथाची जैनापासून विभागणी करण्यात आली.

आ जी व कां ची ऐ ति हा सि क मा हि तीः - अशोकाच्या ज्या शिलालेखामध्यें आजीवकाचा प्रथम उल्लेख येतो, ते शिलालेख इ. सनापूर्वीं २२७ पासूनचे आहेत. या नंतर इ. सनाच्या ५५० च्या सुमारास होऊन गेलेल्या वराहमिहिरानें आपल्या बृहज्जातक, लघुजातक या ज्योतिष विषयक ग्रंथात आजीवकासह सहा प्रकारच्या तापसांचा उल्लेख केला आहे. वराहमिहिराच्या वेळीं ह्या पंथाचे लोक सर्वत्र असावेत असें दिसतें. यानंतर इ.स. ८७६ च्या सुमारास होऊन गेलेल्या शीलांक नांवाच्या जैन टीकाकारानें आजीवकांच्या अस्तित्वाबद्दल पुरावा दिला आहे. या उल्लेखामध्यें आजीवक हे दिगंबर  जैन होत असें प्रथमच दर्शविलें आहे. यानंतर इ.स. ९५० च्या सुमारास होऊन गेलेल्या हलायुधानें आपल्या ‘अभिधान रत्नमाला नामककोशांत’ जैनांचे दिगंबर व श्वेतांबर हे पंथ व त्याचे असंख्य पोटभेद सांगितले असून त्यामध्यें दिगंबरांनाच ''आजीवक'' म्हणतात असें त्यानें सांगितले आहे. यानंतरचे  'आजीवक' पंथासंबंधी शेवटचे उल्लेख इसवी सनाच्या तेराव्या शतकांत झालेल्या काहीं देवालयातील जुन्या लेखामध्यें आले असून हे लेख म्हटलें म्हणजे इ.स. १२३८ ते १२५९ च्या दरम्यान राजराज नांवाच्या चोल घरण्यांतील नृपतींने विरिंचिपुराशेंजारी असलेल्या पोयगै येथील पेरुमाल देवालयास कायमच्या खर्चाकरिता दिलेल्या जमिनीं संबंधीं भिंतीवर कोरलेल्या दानपत्रिका होत. या लेखावरून आजीवक हेच दिगंबर जैन होत असें दिसतें. अशा रीतीनें इ.स. च्या सहाव्या शतकापासून आजीवक हें नांव जैनांमध्यें दिगंबर पंथांस लाविलें असल्याचें  दिसतें.
आजीवक हे वैष्णव होते की काय या संबंधानें वाद आहे. प्रो. कर्न व बुडलर हे त्यांनां वैष्णव समजतात. प्रो. पाठक व डॉ. भांडारकर यांनीं हें म्हणणें चुकीचें म्हणून सिद्ध केलें आहे. (बुद्धपूर्व जग पा. १२९-१३२ पाहा.)

गोशाल ह्यास मंखलीपुत्त किंवा मंखली  ( दंड हातांत घेणारा ) असें म्हणत असत ही गोष्ट वर आलीच आहे. यावरून तो मूळांत एकदंडी तापसांच्या पंथापैकीं एक होता असें स्पष्ट दिसतें; व पुढें जरी त्यानें महावीराची विचार पद्धति स्वीकारली तरी अपालीं स्वतःचीं कांही मतें व हातांत दंड घेण्याची प्राचीन चाल ही मात्र कायम ठेविलीं. यामुळेच निग्गंथ पंथामध्यें गोशालाच्या अनुयायांस आजीवक किंवा एकदंडी या संज्ञा देण्यांत आल्या. सांप्रत देखील श्वेतंबरांपेक्षां दिगंबरांचे वरील आचार भिन्न आहेत. अशा तऱ्हेनें निरनिराळया बांजूनीं विचार केला तर जैनांमधील दिगंबर व श्वेतांबर या दोन पंथांच्या विभागणीचें मूळ त्या संप्रदायांच्या महावीर व गोशाल या दोन संस्थापकापर्यंत जाऊन भिडतें. बौद्ध संप्रदायाच्या धर्मग्रंथामध्यें आजीवक पंथाबद्दल कांहीं महत्त्वाचे उल्लेख आढळतात. परंतु त्यांवरून स्वतंत्रपणे महत्त्वाची माहिती कांहींच उपलब्ध होण्यासारखी नाहीं असें दिसतें.

(संदर्भग्रंथ.-बुहलर एपिग्राफ्रिका इंडिका पु. २. याकोबी जैन सूत्राज ए. बी. ई. पु. २१ आणि ४४. कर्नमॅन्युअल ऑफ इंडियन बुद्धिझम. ओल्डेनबर्ग-बुट् ऱ्हीस डेव्हिडस्-बुद्धिस्ट इंडिया; डायालोग्स ऑफ बुद्ध. रॉकहिल् लाइफ ऑफ बुद्ध. सेनार्ट-इन्स्क्रिप्शन्स डि पियदस्सी. स्मिथ-अशोक. वेबर-कॅटलॉग ऑफ दि रॉयल लायब्ररी, बर्लिन, होर्नेल-ए. रि. एथिक्स ( आजीविकाज् ) हलायुध-अभि-धानरत्नमाला. त्रिपिटक ग्रंथ. ज्ञानकोश-बुद्धपूर्व जग, इंडियन अँटिक्करि पु. ४१. जर्नल बॉ.ए.सो. (पृ. २०;२१.)

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .