विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आटनेर - हें गांव बेतुल जिल्ह्यांत आहे. तें बदनूरच्या थेट दक्षिणेस असून ह्यांतील लोकसंख्या इ.स. १८७० च्या सुमारास १९३८ हातीं. येथें प्रत्येक आठवडयाला बाजार भरतो. वऱ्हाड प्रांताशीं याचा मोठा व्यापार चालतो. या ठिकाणीं पोलिस ठाणें, शाळा व दवाखाना हीं आहेत. जकातीचा नायब या गांवीं राहतो, मराठयांच्या अमंलदारींतील येथें एक पुरातन किल्ला आहे. या ठिकाणीं खोदलें म्हणजे अजून देखील चौरस केलेले दगड सांपडतात (म.प्रां. ग्या. १८७०)