प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आटयापाटया - हा प्रसिद्ध महाराष्ट्रीय खेळ किती जुना आहे हें सांगवत नाहीं. तुकारामाच्या अभंगांत मृंदग पाटीचा उल्लेख सापडतो. तथापि मराठयांच्या नवसंशोधित इतिहासांत या खेळाचा नामनिर्देश कोठें आहे कीं काय हें कोणी पाहिलेलें दिसत नाहीं. कोणी म्हणतात मराठयांचा गनीमी कावा या खेळांत अंतर्भूत झालेला आहे. कसेंहि असो, एवढें मात्र उघड दिसतें कीं, या खेळांत महाराष्ट्रीयांचा नेहमींचा साधेपणा व अडदांडपणा ( सरळ अर्थानें) भरलेला आहे. या खेळाची ठोकळ रूपरेषा, एकानें दुसऱ्या ठराविक जागेंत  (पार्टीत ) आडवावयाचें व दुसऱ्यानें त्याला हुलकावणी देऊन निसटून जावयाचें, अशी आहे. मध्यंतरी बरीच वर्षे क्रिकेट फुटबालचा प्रचार इकडे झाल्यापासून हा खेळ मागें पडला होता. पण पुन्हां राष्ट्राभिमानी मंडळींच्या प्रयत्नानें त्याचा समावेश  'शील्ड मॅच' मध्यें होऊं लागला. व ह्याकरितां या खेळास आटपशीरपणा व शिस्तहि लावून देण्यांत आली. तेव्हां आतां हा महाराष्ट्रीय खेळ अस्सल खेळाडूंनां खेळण्यास लायक आहे हें पुण्याच्या डेक्कन जिमखान्यांच्या आठ्यापाट्याच्या नियमावलीवरू समजून येईल. त्याच नियमावलींतून आम्ही जी पुढील माहिती उदधृत करीत आहों ती या खेळाची कल्पना आणून देण्यास पुरेशी आहे. पुण्यांतील हायस्कुलांत आट्यापाट्यांच्या शर्यती होऊन त्याबद्दल शील्ड टेवण्यांत आलें आहे. निरनिराळया कॉलेज्यांच्याहि आतां आट्यापाट्यांत शर्यती होतात. शिक्षण संस्थांच्या चुरशी सुरू झाल्यापासून खेळास व्यवस्थित स्वरूप आलें आहे व फेरबदलहि झाले आहेत. उदहारणार्थ, खेळणाऱ्यांपौकीं एखादा भिडू मेला तर डाव संपत असे. पुढें तीन गडी मरेपर्यंत खेळणाऱ्या पक्षाचें आयुष्य वाढविण्याचा प्रकार  ''पूना स्कूल्स अथलेटिक असोसिएशननें पाडला. '' डेक्कन जिमखान्यानें गडी मरण्यावर खेळाचा शेवट अवलंबून न ठेवतां खेळाला कालमर्यादा घातली आणि प्रत्येक दोषाबद्दल किती गुण कापावें हें ठरविलें.

पू र्व त या री. - अंगण बिनचूक आंखतां यावें म्हणून एक पोलादी टेप, चार लांकडी मेखा, खिळे, तारेच्या चुका, अच्छेर सुतळीं, मोठी लोखंडी मेख, चुन्याची फक्की, पाणी, झारी व इतर किरकोळ साहित्य संग्रहीं असावें.

आकृति नं. १ मधील बाहेरील मोठ्या काटकोन चौकोनांच्या चार कोपऱ्यांत चार लांकडी मेका माराव्या. हे चार बिंदू एकदां कायम करून, बाहेरील चौकोन प्रथम नक्की झाले कीं, बाकीचें सर्व अंगण, दिलेलीं अंतरें टेपानें मोजून घेऊन झटकन बिनचूक आंखता येतें. बाहेरील चौकोन ८९ फूट १ इंच लांब व २३ फूट रुंद चौकनाचा कर्ण (अदमासें) ''९१ ११'' आहे (आकृति नं. १ पाहा).

मा पें. - (१) प्रत्येक पाटी १३ इंच रुंद व २३ फूट लांब. ( २) सूर १३ इंच रुंद व ८९ फूट १ इंच लांब. (३) सुराच्या योगानें प्रत्येक पाटीचे दोन बरोबर समान विभाग झाले पाहिजेत. (४) एका पाटीच्या बाहेरील रेषेपासून शेजारील पाटीच्या बाहेरील रेषेपर्यंत अंतर -११ फूट. प्रत्येक काडेंछेद (उ. 'ट')- १३ इंचाचा चौरस असावा.

व्या ख्या व नि य म. - १. आरंभीच्या पाटीस ( आकृति नं. १ मधील 'अ' ही पाटी) चांभारपाटी अगर कंपाळपाटी म्हणतात. सर्व पाटयांनां दुभागून जाणाऱ्या उभ्या पाटीस (आकृतिनं. १ मधील, 'क ख' ही उभी पाटी) मृदंग अगर सूर असें म्हणतात. शेवटच्या पाटीस (आकृति नं. १ मधील 'ओ' ही पाटी) लोणपाटी म्हणतात.

२. सूर व इतर पाट्या ह्यांमधील छेदास ( आकृति नं. २ मधील 'ट' 'ठ' इत्यादि छोट्या चौरसास ) कांडें छेद म्हणतात.

३. सुराच्या योगानें झालेल्या पाटीच्या प्रत्येक विभागास पाटीचें काडें असें म्हणतात ( उदाहरणार्थ, आकृति नं. २ मधील 'य' हा विभाग) व दोन पाट्यांमधील सुराच्या भागास सुराचें काडें म्हणतात (उदाहरणार्थः- आकृति नं. २ मधील 'क्ष' हा विभाग).

४. सुरानें डावाच्या सुरवातीस चांभारपाटींतील कांडेंछेदांत निदान एक पाऊल ठेऊन. पहिल्या पाटींतील कांडेंछेदांत निदान एक पाऊल टाकून, परत पुन्हां चांभारपाटींतील कांडेछेदांत एक पाऊल टाकणें यांस काडें चिरणें असें म्हणतात ( आकृति नं. १ मध्ये 'क' पासून 'ट' पर्यंत जाऊन फिरून 'ट' पासून 'क पर्यंत येणें').

५. पाटयांवर उभें राहून विरुद्ध पक्षास अडवून मारण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना पाट्या धरणारे अथवा पाटीवाले म्हणतात आणि पाटया ओलांडण्याचा जे प्रयत्न करितात त्यांना खेळणारे अस म्हणतात.

६. चांभारपाटी व सूर ह्या दोन्ही पाठ्या एकच गडी धरतो; व ह्या पाठ्या धरणाऱ्या गड्यास मृदंग अगर सूर असें म्हणतात. बाकीच्या पाट्यांवरून प्रत्येक पाटीवर एक एक याप्रमाणें गडी नेमून देतात.

७. खेळणारानें ( लोण असतांना ) पाटीवाल्यास उद्देशून 'तोंड' असा शब्द स्पष्ट व मोठयानें उच्चारणें ह्यास तोंड मागणें म्हणतात. हा शब्द ऐकतांक्षणींच पाटीवाल्यानें आपलें तोंड लोणपाटीकडे फिरविलें पाहिजे.

८. पाटीवाल्याच्या शरीराचा कोणताहि भाग पाटीच्या मर्यादेच्या बाहेर झुकून मागील अगर पुढील बाजूस जमीनीवर लागला तर त्यास पाय चुकला असें म्हणतात.

९. पाटीवाल्याच्या पावलांशिवाय इतर कोणताहि भाग जर जमीनीस लागला तर त्यानें हात टेकला असें म्हणतात.

१०. एक पाऊल जमीनीवरून उचलून पाटीवाला जर दुसऱ्या पायावर उभा राहील तर त्यानें पाय उचलला असें म्हणावें.

 

११. खेळणाराचें पाऊल जर मर्यादेच्या बाहेर गेलें तर त्याचा तो पाय बाहेर गेला असें म्हणतात. (नियम २४ पहा).

(टीप (१): अंगठ्याचें टोंक मर्यादेंत जमिनीस लागलेलें असून इतर सर्व शरीर बाहेर असलें तरी पाय बाहेर गेलासें होत नाहीं.  (२): संबंध शरीर मर्यादेबाहेर अधांतरीं असल्यास पाय बाहेर गेलासें होत नाहीं.)

१२. नियमांचे उल्लंघन न करितां पाटीवाल्यानें खेळणाऱ्यास हातानें स्पर्श करणें यास गडी मारणें असें म्हणतात.

१३. चांभारपाटीकडून लोणपाटीकडे खेळत जाणें यास वरून खालीं जाणें व लोणपाटी उलटून चांभारपाटीकडे परत खेळत येणें यास खालून व येणें असें म्हणतात.

१४. खेळणारांपैकीं खालून वर येणारा व वरून खालीं जाणारा हे एका चौकांत आले म्हणजे लोण मिळालें असें म्हणतात. व तें खालून वर येणाऱ्यानें वरून खाली जाणारास पोंचविलें असें म्हणतात.

१५. आकृतींत दर्शविल्याप्रमाणें आंगण आंखावें. आंखलेल्या आंगणाच्या प्रत्येक बाजूला निदान दहा दहा फूट जागा मोकळी ठेवावी.

१६. सुरुवातीच्या वेळीं खेळणारांनीं चांभारपाटीच्या बाहेर असलें पाहिजे, व पाटीवाल्यांनी चांभारपाटीकडे तोंड करून पाटीवर असावें.

१७. सुरुवातीची सूचना झाल्याबरोबर सुरानें कांडें चिरावे. कांडें चिरल्याखेरीज त्यास गडी मारतां येत नाहीत.

१८. (अ) कांडें चिरतांना सुरानें मृदंगावरच असलें पाहिजे. (आ) सुरानें योग्य रीतींनें कांडें न चिरल्यास पंचांनीं त्यास तें पुन्हा चिरण्यास सांगावें. मात्र सूर पहिल्या दोन पाटया ओलांडून गेल्यावर त्यास कांडें पुन्हा चिरण्यास सांगतां येणार नाहीं.

१९. इतर पाटीवाल्यांनीं डावाच्या सुरुवातीची सूचना झाल्याबरोबर लगेच गडी मारण्यस हरकत नाहीं.

२०. पाटीवाल्यानें गडी मारण्याच्या  ऐन वेळेस पाटीच्या हद्दीच्या मागील बाजूस हात जाऊं देऊं नये. हा नियम सुरास लागू नाहीं.

( टीप:-परंतु खेळणाऱ्या गड्याच्या शरीरास अडकून हात मागे गेल्यास चालेल.)

२१. पाटीवाल्यांनीं मारतांना व त्यानंतर लगेच (१) वर पाय उचलूं नये, (२) हात टेकूं नये, (३ ) आपलीं पावलें विरुद्ध  दिशेस वळवूं नयेत, ( काटकोनापयेंत फिरविण्यास हरकत नाहीं) अगर पाय चुकूं देऊं नये व ( ४ ) हात मागें नेऊं नये. यापैकीं कोणतीहि अट मोडल्यास गडी मारला नाहीं असें समजावें.

२२. पाटी धरीत असतां, पाटी धरण्याच्या वेगांत डावाची हद्द ओलांडून, आपल्या पाटींच्या सरळ रेषेंत पाटीवाल्यास पलीकडे जाण्यास हरकत नाही.

२३. मृदंगानें पाय उचलण्यास व आपल्या पाटीवर हात टेकण्यास हरकत नाहीं.

२४. खेळणारानें दोन्ही पाय एकदम बाहेर जाऊं देतां कामा नये. एक पाय बाहेर गेल्यास चालेल. मात्र या वेळीं दुसऱ्या पायाचें टोंक  मर्यादेंत जमीनीवर टेंकलेलें असलें पाहीजे ( या संबंधी कोंडीचे नियम निराळे आहेत. ते पुढें पाहावेत, खेळणाऱ्या पक्षापैकीं सर्वांत पुढच्या गडयानें लोणपाटी धरणाऱ्याजवळ तोंड असा शब्द स्पष्ट उच्चारुन तोंड मागावें. तोड पोंचल्यावर ह्या वेळीं त्या पाटींत असणाऱ्या सर्व खेळणाऱ्यांनीं आगोदर खालीं यावें व नंतर ती पाटी पुन्हा ओलांडण्यास लागावें  ( गडी खाली येत असतांना पाटीवाल्यास त्यांनां मारतां येत नाहीं ) प्रत्येक पाटींत या प्रमाणें  करीत चांभारपाटीकडे यावें. खेळणाऱ्या पक्षापैकीं सर्वांत पुढील गडी चांभारपाटी  ओलांडुन  गेल्याबरोबर लोण झालें असें म्हणतात.

२६. लोण झाल्याबरोबर न मेलेल्या गड्यांनीं डाव पुन: लगेच सुरु करावा. या खेपेसहि सुरानें कांडें चिरावयास पाहिजे.

२७. लोण पोहोंचविणारा व घेणारा हे दोघे एकाच चौकांत अथवा कांडयांत आले पाहिजेत; एरव्ही लोण मिळालेसें होणार नाहीं. एकास लोण मिळाल्याशिवाय त्यास तें दुसऱ्यास पोहोंचवितां येत नाहीं.

२८. लोण न मिळतां  अगर वर गडी आल्यास, त्यानें तें न पोहोंचवितां गडी वर गेल्यास, तो बारगळला म्हणजे मेला असें समजावें; व जेथपर्यंत तोंड पोंचलें असेल तेथपर्यंतच लोण झालें असें समजावें.

२९. तोंड मागितल्याखेरीज आपण होऊन पाटीवाल्यानें तोंड देऊ नये. खेळणाऱ्या गड्यानें तोंड मागतांक्षणींच पाटीवाल्यानें त्यास तोंड दिलें पाहिजे. एकदां तोंड दिल्यावर मग खेळणाऱ्यास त्या पाटींत पुन्हा तोंड मागण्याची जरुरी नाही. एकदां तोंड दिल्यावर पाटीवाल्यानें डाव संपेपर्यंत अगर लोण होईपर्यंत आपलें तोंड चांभारपाटीकडे वळवूं नये.

३०. कोणताहि खेळणारा गडी मेला अगर कोणत्याहि रीतीनें वाद झाला तर त्यानें लगेच खेळाच्या बाहेर येऊन सरपंचास तशी वर्दीं द्यावी व ते सांगतींल त्या ठिकाणीं डावाबाहेर बसावे.

कों डी.- [ १ ] पाटीवाला व सूर हे दोघे एकाच चौकांत खेळणारे गडी कोंडतात त्यास कोंडी धरणें असें म्हणतात असतात. परंतु खेळणारा गडी कोंडीमधील पाटीवाल्याच्या समोरील कोंडीतील पाटीवर, जर लागला नसेल तर ती कोंडी समजूं नये.

[ टीपः-खेळणाऱ्या गडयाच्या शरीराचा कोणताहि भाग पाटीवर असल्यास तो पाटीवर लागला आहे असें समजावें. ]

(२) कोंडींत व तिच्या लगतच्या वरच्या पाटींत लागतांनां दोन्हीं पावलें पूर्णपणें अंतिम मर्यादेच्या आंत पाहिजेत; व त्या ओलांडल्याबरोबर कोणताहि पाय बाहेर असतां कामा नयें.

[ ३ ]  कोंडीच्या वरील लगतच्या पाटींत, कोंडीच्या बाजूच्या चौकांत (अ) जर मुळींच खेळणारा नसेल तर त्या पाटीवाल्यानें आपल्या पाटीच्या कोंडीपलीकडील अर्ध्यांतच राहिलें पाहिजे. उदाहरणार्थ  'प' ह्या चौकांत कोंडी असून 'फ' ह्या चौकांत मुळींच खेळणारा नसेल तर 'मभ' पाटीवाल्यानें 'भ' ह्या अर्ध्यांतच उभें राहिलें पाहिजे.  (आ) त्या चौकांत खेळणारा असेल तर पाटीवाल्यास त्यास (कोंडीतून लागणाऱ्या गड्यास मुद्दाम अडथळ न करतां) या कांडयांत मारण्याचा अधिकार आहे; परंतु मारतांना जर एखाद्या नियमाचें उल्लंघन झालें तर खेळणाऱ्या गडयास परत पुन्हां पाटींत आलें पाहिजे. उदाहरणार्थ 'प' ह्या चौकांत कोंडी असून 'फ' ह्या चौकांत खेळणारा असेल तर 'मभ' ह्या पाटीवाल्यानें 'म' ह्या अर्ध्यांत येऊन, कोंडीतून लागणाऱ्या गडयास अडथळा न करितां, 'फ' ह्या चौकांतील गडयास अडवावें.

[ ४ ]  कोंडीच्या वरील लगतच्या पाटींत जर एकच खेळणारा असेल तर त्यानें कोंडी असेपर्यंत कोंडीतून सुराच्या कडेंनें लागणार आपला गडी पाटीवाल्याच्या मार्गांतून दूर होईपर्यंत, त्या पाटीच्या पलीकडील अर्ध्यांतच असलें पाहिजे उदाहरणार्थ  'प' ह्या चौकांत कोंडी असून वरील लगतच्या पाटींत एकच खेळणारा गडी असल्यास त्यानें  'ब' ह्या अर्ध्यांतच राहिलें पाहिजे  [ आट्यापाट्या व खो खो, डेक्कन जिमखाना पुणें १९२२ ].

या खेळाच्या सामन्याची व्यवस्था पहाण्याकरितां सरपंच, पंच, वेळाधिकारी (टाईमकीपर) हिशोबनीस नेमण्यांत येतात. जितक्या पाट्या ओलांडल्या असतील त्याप्रमाणें गुण देण्यांत येतात व जास्त गुण मिळविणाऱ्या पक्षाचा जय झाला असें मानतात.

खेळाची पद्धतिः - आट्यापाट्याचें मैदान आकृतीत दाखविल्याप्रमाणें आंखून त्यावर पाटीवालें व खेळणारे तयारीनें उभे राहिले असतां संकेत झाल्याबरोबर सूर झपाटयानें कांडें चिरतो व बहुतकरून तिसऱ्या पाटींत कोंडी धरतो. इतक्या अवधींत खेळणारे गडयांनीं चपळाई करून चांभार पाटीवर व मृदंगावर सुराचा धाव चुकवून इतर पाटीवाल्यांनां हुलकावण्या देऊन शक्य तितकें खालीं जावें. साधेल तर चौथ्या व पुढल्या पाटींत निसटून यावें. कारण गडी खालीं गेले कीं, सुराला वरची कोंडी सोडून खालीं कोंडी करणें प्राप्त होतें, कोंडीची पाठी ( वरची व खालची) धरणारे गडी व सूर लांब हाताचे नजरबाज व चपळ असतील तर कोंडी फुटणें मुष्किलीचें जातें. अशा वेळीं कोंडींत वेढलेले खेलाडू धिम्मेपणानें हुलकावण्या देता देतां कडेनें अगर मधून आंग चुकवून निसटले तर त्यांनीं मात केली म्हणावयास हरकत नाहीं. कडेनें आंखडून पडण्याची विद्या याच प्रसंगांत कामाला येते. कोंडीतील तिन्ही गडयांच्या हुलकावण्या एक्या ठेक्यांत बेतशीर पडतील तर कार्यभाग लवकर साधतो. अशा कोंड्या फोडीत व पाटया ओलांडीत खेलणारे पुढें सरकत असतात. शेवटची म्हणजे लोणपाटी, हिला या डावांत फार महत्त्व आहे. ती ओलांडली कीं डाव उलटतो. गडयांचीं तोंडें फिरतात. या उलटींत खालून वर येणारा गडी विजयाचें  'लोण' अगर पाणी वर आणतो. एका भिडूचे हस्तें दुसऱ्याला, असें तें लोण एक एक मुक्काम पुढें सरतें. त्यांने जर चांभारपाटी ओलांडली तर लोण पुर होऊन पुनः खेळणाऱ्यांचा मारा सुरू होतो! या खेळांत उगीच घाई करून गडी मरूं दिल्यास व्यर्थ नुकसान होतें. सबब खेळणाऱ्यांच्या नायकानें बारीक नजरेनें वेळप्रसंग ओळखून काम चालविलें पाहिजे व इतरांनीं नायकांचे हुकूम ऐकून कामें उठविली पाहिजेत. यासाठीं या नायकीचें जबाबदारीचें काम समयज्ञ खेलाडूकडेच द्यावें. आतां पाटीवाल्यांचे बाजूनें विचार करावयाचा म्हटलें त्यांचा मुख्य आधार म्हणजे सूर इतरांच्या मानानें सुरावर कामाचा बोजाहि फार पडतो. सर्व पाटीवाले व सूर यांनी आपापलें आंग फार तोललें पाहिजे व पाय वगैरे मर्यादेंत ठेवावे. पाय चुकतां कामां नयेत. प्रथमपासूनच जर पाटीच्या मागच्या रेघेला खेंचून पाय ठेवण्याची सवंय केली तर पुढें चुकण्याची भीति रहात नाहीं. खेळणारांच्या हुलकावण्या बरोबर पाटीवाल्यानें पाय नाचवूं नयेत; तर स्थिरपणें खेळणाऱ्याचे नजरेला नजर न भिडवितां फक्त त्याचे पायांवर लक्ष ठेवून त्याला निसटण्याला अवसर न देतां अपालें अंग तोलून सावधपणें पाय चाळवीत असावें. पाटीवाल्यानें खेळणाऱ्या गड्यास स्पर्श करावयाचा तो स्पष्ट कळण्याजोगा करावा. तोंड देणें, वरून गडी आल्यास अटकावणें, सूर आल्यास झटकन कोंडी करणें, किंवा कोंडी पालटणें ही कामें त्यानें चपळाईंनें व तत्परतेनें केलीं पाहिजेत बेसावधपणा या खेळांत केव्हांच कामाचा नाहीं. खेळणार्‍या बाजूनें आपले हलके व कच्चे गडी सांपडूं नयेत म्हणून शक्य तर भारी गडयांतून बुजगावणी व हलुकावण्या देऊन, धांवणारा चकवावा; अगर त्यास पळवावें व दमवावें. थोडया वेळांत गडी मारणें हें धोरण बसणाऱ्यांचें असावें; व शक्य तितके गडी कमी खर्चीं घालून जास्त वेळ विरुद्ध पक्ष झुलकावा हें धोरण उभे राहणाऱ्यां पक्षाचें असावें.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .