विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आतीव्र. - सं.औ.प. भा. १७२.० (यिटर्बिअम किंवा निओ यिटर्बिअम) आतीव्र हें रासायनिक धातुमूलतत्त्व असून दुर्मिळ मृत्तिकाधातुवर्गांतील आहे. याचा शोध इ.स. १८७८ सालीं मेरिग्नाक यानें लावला. हें मूलतत्त्व प्रथम स्कंदयुक्त असें यानें काढलें होतें. आतीव्राचा प्राणिद (ओ२.प्र३.) हा पांढरा असून त्याचें वर्णहीन स्फटिक होतात. याचा स्फटिक रूप हरिद ( औह ३.६ उ२ प्र) वर्णहीन व आर्द्रता शोषक असतो. निर्जल हरिद उष्ण केल्यावर त्याचा ऊर्ध्व पात होतो. इ.स. १९०७ सालीं अर्बेन यानें आतीव्रांतातून दोन नवीं मूलतत्त्वें निरनिराळीं केलीं. त्यांचीं नांवें नवआतीव्र उर्फ र्निओयिटेर्बिअम, व लुटेसिअम (प.भा.१७४.०) अशीं आहेत. इ.स्. १९०८ सालीं एव्हान वेल्श बॉश यानें आपलें हेंच मत प्रसिद्ध केलें; परंतु त्यानें या मूलतत्त्वांस आल्डेबरेनियम आणि कॅसिओपियन अशीं नांवे दिलीं.