प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आत्महत्या - आत्महत्या म्हणजे हेतुपूर्वक स्वतःचा प्राण स्वतः घेणें. आत्महत्या करण्यास व्यक्ति प्रवृत्त कां होतात त्या कारणांची मीमांस करण्याकडे नीतिशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ यांनीं नेहेमीं लक्ष दिल्याचें आढळतें. पाश्चात्य देशांत आत्महत्यांची सर्व जबाबदारी राजकीय परिस्थितींतील दोषावर टाकण्याची प्रवृत्ति झालेली आहे. सुधारलेल्या पाश्चात्य देशांतली या कारणांची पौरस्त्य देशांतील उदाहरणार्थ जपानसारख्या सुधारलेल्या देशांतील आत्महत्येच्या कारणांशीं तुलना करितां यावयाची नाहीं; कारण जपान वगैरे कित्येंक पौरस्तय देशांत कांहीं विशिष्ट परिस्थितींत माणसानें आत्महत्या करणें हें नैतिक व धार्मिक कर्तव्यच समजतात. उदाहरणार्थ, हिंदुस्थानांतील सती जाण्याची चाल घ्या. सती जाणें हा केवळ एक आत्महत्येचाच प्रकार असूनहि तें एक मोठें उच्च धार्मिक कृत्य आहे. असें हिंदु लोक मानतात. उलटपक्षीं ख्रिस्ती दृष्टींनें आत्महत्या करणें हें पाप गणलें असून, सर्व ख्रिस्तधर्मी देशांत तो गुन्हा मानलेला आहे. अलीकडे पुष्कळ्शा यूरोपीय देशांतील आत्महत्यांचे आंकडे मिळवून केलेल्या कार्यकारण मीमांसेवरून असें निदर्शनास आलें आहे कीं, आत्महत्येचें कृत्य व्यक्तिं स्वयंप्रेरणेनें (दुसऱ्याच्या जबरदस्तीनें नव्हे) करण्यास प्रवृत्त होते हें खरें असलें तरी, तें कृत्य करण्यास भाग पाडणारी कारणें खाजगी वैयक्तिक परिस्थिती व्यतिरिक्त इतर कांहीं निराळीच असतात व तत्संबंधीं काहीं ठराविक नियमहि निघतात. उदाहरणार्थ, निरिनराळया देशांत आत्महत्येचें प्रमाण निरनिराळे पडतें. तर त्यांच्या पृथक्करणानें हीं जाणलीं पाहिजेत.

दर लक्ष लोकसंख्येस वार्षिक आत्महत्येचें हें प्रमाण सॉक्सनी संस्थानांत इतर ठिकाणच्या मानानें फारच म्हणजे ३९२ (१८७२-८२ सालांत) होते. याच्या खालोखाल डेन्मार्कमध्यें २५१ होतें. स्वित्झर्लंडची राज्यव्यवस्था जगात नमुनेदार धरतात तरी तेथें आत्महत्येचें प्रमाण कमी नाहीं. तें २३९ (त्याच सालांत) होतें. बाडेन (जर्मनी) मध्यें १९८. वुंटरबर्ग १८९, रशिया १६६. जर्ममनीमध्येंच साक्सनी, बाडेन, रशिया, वूंटरबर्ग हीं चार संस्थानें घेतलीं तर तेव्ढयांतल्या तेवढयांत किती फरक आहे हें पहाण्याजोगें आहे, आणि स्थानिक फरकांची कारणें विचारांत घेण्याजोगीं आहेत. फ्रान्समध्यें त्याच कालांत हे प्रमाण १८० आहे. जेथे अर्वाचीन तऱ्हेचा व्यावहारिक विकास फार झाला आहे तेथें आत्महत्या अधिक असें म्हणावें, तर बेलजमसारख्या कारखान्यांच्या वाढींत अत्यंत पुढारलेल्या देशांतहि तें १०० च आहे, स्वीडनमध्यें ९२ होतें, इंग्लड व वेल्समध्यें ७५, नार्वे ६९, स्काटलंड ४९, आयर्लंड १७. वरील सर्व आंकडे १८७७ पासून १८८२ पर्यंत सालांचे आहेत.

या आकड्यांचा हिशोब करतां असें म्हटलें पाहिजे कीं, आयर्लंडच्या साडेचार पट इंग्लंडांत आत्महत्येकडे प्रवृत्ति आहे. रशिया व फ्रान्समध्यें ती दसपट आणि साक्सनीमध्यें २३ पट आहे. या दृष्टीनें विचार करूं लागले म्हणजे या आंकड्यांचे यथार्थ महत्त्व लक्षांत येईल.

ही निरनिराळ्या प्रदेशांची तुलना झाली. एकाच प्रदेशांच्या आंकड्यांकडे लक्ष अनेक दृष्टीनीं देतां येतें. आणि प्रत्येक देशांतील आकड्यांचें अधिकाधिक पृथक्करण करूं लागलें म्हणजे काहीं प्रवृत्तीहि लक्षांत येतात. इंग्लंड व वेल्समध्यें १८८२ सालीं ७५ प्रमाण होतें, तें बहुतांशी एकसारखें वाढत आहे. १८८६ सालीं ८२ झालें; पण पुढें १८९० सालीं पुन्हीं ७० झालें. तें मात्र एकसारखें वाढत चाललें आहे; आणि शेंकडा ३० प्रमाणानें पुढील १५ वर्षांत वाढलें. १८९५ पासून १९०० पर्यंत ते ९० च्या आसपास होतें. १८९५ मध्यें ९२ झालें, १८९६ मध्यें ८६ झालें. १८९७ मध्यें ९० झालें. १८९८ मध्यें ९१ झालें, १८९९ मध्यें ८९ झालें व १९०० मध्यें ९० झालें. यानंतर पुढें मात्र तें एकसारखें वाढत चाललें आहे. पुढील दरसालचे आंकडे अनुक्रमानें ९६, ९९, १०५, ९९, १०४ असे आहेत. दरसालच्या आंकडयांकडे दुर्लक्ष करून पंचवार्षिक सरासरी घेतली तर आत्महत्येकडे इंग्लंडची प्रवृत्ति एक सारखी वाडत आहे. पण इतर राष्ट्रांच्या मानानें ही प्रवृत्ति अजून फार नाही हें कबूल केलें पाहिजे. इंग्लंडमधलें स्त्री-पुरुषांचे आत्महत्येंचे आंकडे पाहिले तर असें दिसून येईल कीं, १८८६, १८९०, १८९५, १८९६, १८९७, १८९८, १८९९, १९००, १९०१, १९०२, १९०३, १९०४, १९०५ या वर्षांत स्त्रियांचे एकंदर आत्महत्या करणारांत प्रमाणे २४.४, २५.८, २५.९, २५.४, २५.१ २४.७, २५.४, २५.२ २५.७, २४.७, २४.७, २४.५, २५.७ असें दिसून येईल. १८८८ पासून १८९७ पर्यंतच्या एकंदर आंकडयांमध्यें स्त्रियांचें प्रमाण २५.३ असें येतें. सरासरीनें असें म्हणतां येईल कीं, २५ स्त्रिया जर आत्महत्या करतील तर पुरुष ७५ करतील. यावरून प्रवृत्तिकारणांवर अंशतः प्रकाश पडतो.

 

निरनिराळ्या आत्महत्या करण्याच्या पद्धती लक्षांत घेऊन त्याचें वर्गीकरण करण्यातं आलें आहे तें असेः फांस लावून, भोंसकून, पाण्यांत बुडवून घेऊन, विष खाऊन, गोळी घालून घेऊन व इतर. आत्महत्येकडे प्रृवत्तीमध्यचें केवळ स्त्रिया व पुरुष यांत फरक आहे असें नाहीं तर आत्महत्येच्या साठीं वापरलेल्या साधनांतहि हा फरक दृष्टीस पडतो. विशेष, आत्महत्यासाधनांची स्त्रियांत अगर पुरुषांत प्रियता २५शीं ७५ या प्रमाणांच्या ऐवजीं प्रत्येक प्रकारांत जी निराळीं प्रमाणें दृष्टीस पडतील त्यांवरून दृष्टीस पडेल. फांस लावून घेणारांत स्त्रिया शेंकडा २५ न दिसतां १९.०७ इतक्या दिसतात. भोंसकून घेणारांत स्त्रियांचे प्रमाण १७.६ आहे. पाण्यांत बुडवून आत्महत्या करणारांत १८.६ आहे, वीष खाणारांत मात्र सपाटून म्हणजे ४२.१ आहे हा प्रकार आत्मघातकी स्त्रियांत अधिक लोकप्रिय आहे. स्त्रियांत कमी आढळून येणारा प्रकार गोळी घालून घेऊन आत्महत्या करणारांचा. यांत १९.७ शेंकडा पुरूष तर २.३ स्त्रिया आहेत. आत्महत्येच्या इतर पद्धतींत स्त्रियांमध्ये प्रमाण २२.९ आढळतें.

कांहीं देशांत आत्महत्येचें प्रमाण इतर देशांतल्यापेक्षां अधिक कां असतें व युरोपांतील निरनिराळ्या देशांत सामान्य प्रमाण निरनिराळे कां आहे, यासंबंधीचीं कारणें निश्चित करतां ओलेलीं नाहींत. तथापि निरनिराळीं कारणें सुचविण्यांत येतात ती (१) हवामान, (२) मेंदूच्या विकाराचें प्रमाण, (३) मद्यपान हीं होत; तथापि हीं कारणें समाधानकारक नाहींत. अशी एक गोष्ट पुढें आली आहे कीं, प्रॉटेस्टंट धर्मपंथी लोकांतल्यापेक्षां रोमन कॅथोलिक लोकांत आत्महत्यांचें प्रमाण कमी आहे, आणि तें रोमन कॅथोलिकांपेक्षांहि ज्यू लोकांत कमी आहे. तसेंच शिक्षितांपेक्षां (प्राथमिक शिक्षण मिळालेले लोक धरून) अशिक्षितांत आत्महत्येंचें मान कमी असतें. ही गोष्ट विशेष विचार करण्यासारखी आहे. तसेंच आत्महत्या शहरांपेक्षां खेडेगांवांत कमी होतात. शिवाय शहरांमध्यें कांही कांहीं वेळीं आत्महत्यांची संख्या एकदम पुष्कळ वाढते व ही एक रोगाची सांथच असावी असें वाटूं लागतें. पांच वर्षांच्या वयाच्या आंत आत्महत्यां मुळींच कोठें होत नाहींत, पांच ते दहा वर्षांच्या वयांत फार क्वचित होते, दहा वर्षांच्या वयापासून मात्र हें प्रमाण सारखें वाढत जाऊन त्याची पंचावन्न ते पासष्ट या वयाच्या दरम्यान कमाल मर्यादा होते. स्त्रियांत पूर्ववयांतच आतम्हत्येची कमाल मर्यादा होते. साधनांसबंधानें पाहता पुरुषांत गळफासानें टांगून घेणारांची संख्या सर्वांत अधिक असते, तर स्त्रियांत विष खाणाऱ्याची संख्या अधिक भरते. तसेंच ॠतूंमध्यें उन्हाळ्याच्या महिन्यात आत्महत्या सर्वांत अधिक होतात, व हिवाळ्यांत सर्वांत कमी होतात. धंद्याच्या मानानें पाहतां डॉक्टर, लष्करी शिपाई, खाणावळवाले व रसायनांचा धंदा करणारे या लोकांत आत्महत्येचे प्रमाण जास्त असतें; आणि धर्मोपदेशक, रेल्वेड्राईव्हर्स, कोळसेवाले व खलाशी यात तें कमी असतें. तसेंच रोजगाऱ्यांपेक्षां बेकार लोकांत हें प्रमाण दुप्पट असतें.

धा र्मि क क ल्प ना. - मेदूं बिघडून वेडाच्या लहरींत मनुष्य आत्महत्येस प्रवृत्त होतो, यांत आश्चर्य नाहीं; पण विचारशक्ति पूर्णपणें शाबूत असतांहि अनेक कारणांमुळें मनुष्य आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. अशा कारणांपैकीं धार्मिक समजुती हें प्रबल कारण असतें. पृथ्वीच्या पाठीवरील कित्येक धर्म आत्महत्या करावी असें म्हणणारे आहेत, तर कित्येक त्यांचा पूर्णपणें निषेध करणारे आहेत. त्यांचा येथें देशवार क्रमानें विचार करूं.

हिंदुस्थानः - वैदिक ॠग्वेदकालांत ऐहिक जीवन व त्यातील अनेक प्रकारचीं सुखसौख्यें यांवर इतकी आसक्ति असल्याचें दिसून येतें कीं, आत्महत्येसंबंधानें ॠग्वेदांत मुळींच उल्लेख नाहींत व यांत आश्चर्य नाहीं. सतीसंबंधानेंहि त्यावेळीं प्रतिकूल मत होतें असें अनुमान निघतें. इतर वेदांच्या संहितांत व ब्राह्मणग्रंथांतहि यासंबंधानें उल्लेख नाहींत. तथापि ब्राह्मणग्रंथांत अशी कल्पना पुढें मांडलेली आहे कीं, इतर सर्व यज्ञांपेक्षां आत्मयज्ञ श्रेष्ठ होय. तसेंच शतपथ ब्राह्मणांत पुरुषमेध व सर्वमेध या यज्ञांत यजमानानें सर्वस्वाचा त्याग करून वनांत जावें असें प्रतिपादिलें आहे, या दोन्ही गोष्टी मनुष्याला आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त करण्याऱ्या व त्याच्या कृत्यास धार्मिक संमति दर्शविणाऱ्या आहेत, असें  ''एनसा. रि. एथिक्स'' मध्यें डा. कीथ म्हणतात, पण वैराग्य व आत्महत्या यांचें समीकरण करणें योग्य नाहीं. उपनिषद्ग्रंथांत व्यक्तिगत आत्मा आणि परमात्मा हे एकच असून ते एकमेकांत विलीन होऊन जाणें हें पारमार्थिक ध्येय मानिलें आहे. जाबाल, कंठश्रुति या उत्तरकालीन उपनिषदांत तर ज्याला आत्मज्ञान झालें आहे, अशा संन्याशानें महाप्रस्थानास निघावें किंवा प्रायोपवेशनानें, जल समाधि घेऊन अथवा अग्निकाष्ठें भक्षण करून आपलें ऐतिकअस्तित्त्व संपदावें असें सांगितलेलें आहे.

महाभारतकालीनः - ज्याप्रमाणें भारतीयांचा प्रयत्न आयुष्यांत उदार आचरणानें राहण्याचा असे त्याचप्रमाणें उदात्त रीतीनें मृत्यु यावा अशीहि त्यांची महत्त्वाकांक्षा असे, घरांत दुखण्यानें पडून रोगानें आंथरूणावर मरण येणें. हें एक अतिशय दुर्दैंव आहे असें ब्राह्मण व क्षत्रिय मानीत, 'अधर्मःसुमहानेष यच्छय्यामरणं गृहे । अरण्ये वा विमुच्येत संग्रामेवा तनुं नरः ॥ 'क्षत्रियाला मरणाची योग्य जागा म्हटली म्हणजे अरण्य किंवा संग्राम' असें गदायुद्धाच्या वेळीं पांडवांनीं 'तूं आम्हींस शरण ये' असें दुर्योधनास म्हटलें असतां त्यानें उत्तर दिलें. क्षत्रिायांस लढाईंत मरणें हें एक अतिशय आनंदायक व पुण्यकारक फळ वाटे. ब्राह्मणहि घरीं रोगांनें मरणें हें क्षत्रियाप्रमाणेंच दुर्दैव मानीत, व जे लोक धैर्यवान् असत ते देहत्याग महाप्रस्थानानें किंवा अग्निकाष्ठें भक्षण करून अर्थात चिता पेटवून त्यांत जाळून  घेऊन देहत्याग करीत असत. इतर लोक अरण्यांत जाऊन संन्याशी होत, व संन्यासवृत्तीनें राहून मरणाची मार्गप्रतीक्षा करीत, हीं वर्णनें आपल्यास कदाचित् असंभवनीय वाटत असतील; परंतु ग्रीक इतिहासकारनीं अशीं प्रत्यक्ष वर्णनें लिहून ठेवलेलीं आहेत कीं, दोन ब्राह्मण अथेन्स शहरीं अजारी पडले, त्या वेळेस त्यानी चिता प्रज्वलित करून तीवर आनंदानें आरोहण केलें. स्ट्रेवो ग्रंथकारानें शिकंदराबरोबर जो कलनस (कल्याण) नांवाचा योगी गेला होता, त्याच्या मरणाचें वर्णन असें केलें आहे.  ''पसरगादी या शहरीं जेव्हां तो अजारी पडला, तेव्हा त्याच्या आयुष्यांत हें पहिलेंच दुखणें असून त्यानें आपल्यां वयाच्या ७३ व्या वर्षी राजाच्या विनंतीला मान न देता आपल्या देहाचा अंत केला. एक चिता तयार करून तिच्या वर एक सुर्णाचा पर्यंक ठेवला आणि त्याच्यावर तो पाघरूण घेऊन स्वस्थपणें पडला आणि चितेस आग लावून दिली.'' कोणी असें म्हणतात कीं त्यानें एक लाकडाची खोली तयार करविली; त्यांत लतापत्रें भरलीं आणि त्यास आग लावून दिली. व मग तो समारंभानें वाजत गाजत तेथें गेला आणि त्यानें चितेंत उडी घेतली व लाकडाप्रमाणें तो जळून गेला. हिरोडोटसनें असें वर्णन केलें आहे कीं, ''जेव्हां कोणी एखादा योगी रोगानें ग्रस्त होतो तेव्हा तो अरण्यांत एकातीं जाऊन स्वस्थपणें पडतो. मग तो मेला किंवा जिवंत आहे याविषयीं कोणीच चवकशी करती नाहीं.'' अशा प्रकारचें निरनिराळे देहत्यागाचे प्रकार महाभारतांतहि वर्णन केलेले आहेत. इतकेंच नव्हे तर धर्मशास्त्रांतहि त्यांचे विधा सांगितले आहेत. महाप्रस्थानाचा विधि धर्मग्रंथांत व वैदिक वाङ्मयांत वर्णिलेला आहे. त्याचप्रमाणें चितारोहण करण्याचा विधि व नदींत जलसमाधि घेण्याचा विधि वर्णिलेला आहे. हिरोडोटसनें वर्णन केलेला प्रकार प्रायोपवेशनाचा होय हें उघडच आहे. प्रायोपवेशन म्हणजे श्वास कोंडून प्राण दणे हें  होय. अशा विधीनें प्राणत्याग केला असतां ती आत्महत्या होत नाहीं अशी समजूत त्या काळीं होती.

बौद्ध व जैनः - बुद्धानें देहदंडाच्या सर्व प्रकारांचा व त्याबरोबरच आत्महत्त्येचा निषेध केलेला आहे. जैन धर्मांत आत्महत्त्येला संमति दिली आहे इतकेंच नव्हे तर तसें करण्याबद्दल त्या धर्माचा उपदेश आहे. तथापि वाटेल त्यास आत्महत्त्या करण्यास परवानगी नसून फक्त परमावस्थेप्रत पोहोंचलेल्या संन्याशासच तसें करण्याची आज्ञा आहे. अशी आत्महत्त्या करण्याच मार्ग अन्नपाणी वर्ज करणें हा सांगितलेला असून असा नसल्लेखन प्रकारानें एक महिन्यांत मरण आल्याचें उल्लेख जैन ग्रंथात विपुल सापडतात. अशा प्रकारच्या आत्महत्त्येचा मार्ग अगदीं अलीकडील काळातहि लोकप्रिय असल्याचें दिसून येतें. ११७२ मध्यें हेमचंद्र या विद्वान मुत्सद्यानें कुमारपाल राजाच्या मृत्यूनंतर प्रायोपवेशानानें देह ठेविला. १९१२ मध्यें अहमदाबाद येथें एक चांगल्या सशक्त संन्याशानें ४१ दिवस अन्नपाणी वर्ज करून प्राण सोडला. तथापि आत्महत्त्या फक्त संन्याशानीं करावी असा जैन धर्माचा सक्त नियम आहे.
 
आ धु नि क हिं दु ध र्म. - धर्मसूत्रें व धर्मशास्त्रें यामध्यें याविषयीं जें विचारस्वरूप आढळतें, तेंच कालापर्यंत कायम होतें, मनूनें अशी परवानगी दिली आहे कीं, रोगानें किंवा मोठया संकटानें ग्रस्त झालेल्या इसमानें ईशान्य दिशेस प्रवासाला निघावें व फक्त पाणी व वायु भक्षण करून देह आळवावा. व मरून जावें. शिवाय जलसमाधि, अग्निकाष्ठभक्षण वगैरे जुन्या ॠषींच्या पद्धतीहि मनूनें ग्राह्य मानल्या आहेत. जीवात्मा परमात्म्यात विलीन करणें हें जुनें पारमार्थिक स्वरूप बदलून उपास्य सगुण दैवताशीं एकरूप होणें असा अर्थ धार्मिक आत्महत्त्येला अलीकडे प्राप्त झाला होता. प्रसिद्ध भक्त मिराबाई द्वारकेस श्रीकृष्णाच्या मूर्तींत एकरूप झाली अशी कथा आहे. जगन्नाथपुरीस जगन्नाथाच्या रथाच्या चाकाखालीं पडून आत्महत्त्या करणाऱ्या भक्तांची भावना याच प्रकारंची असते. ईश्वराशीं सारूप्य पावण्याच्या हेतूखेरीज ज्या तत्सम हेतूनें आत्महत्या होते तो हेतु म्हटला म्हणजे स्वर्गांत प्रियजनास भेटणें हा होय. या हेतूमुळेंहि आत्महत्या होतात. ब्रिटिश सत्ता हिंदुस्थात प्रस्थापित झाल्यापासून धार्मिक, सामाजिक वगैरे सर्व प्रकारच्या आत्महत्त्यांना कायद्यानें बंदी करण्यांत आलेली आहे. पातिव्रत्यरक्षणार्थ आत्महत्यांना आजहि जनता दोष देईल काय?

चीन. - चीनच्या इतिहासांत व वाङ्मयांत आलेल्या उताऱ्यावरून आत्महत्याचा प्रचार चीनमध्यें बराच होता असें दिसतें. विशेषतः एका चिनी कादंबरींत असें कथानक आहे कीं, ज्याला आपलें वाग्दान केलें आहे, अशा आपल्या प्रियकराच्या थडग्यावर, त्याच्या प्रतिस्पध्यांशीं ठरविलेलें आपलें लग्न टाळण्याकरतां नायिका आत्मदान करते व त्यावर तो प्रतिस्पर्धी आपल्या वधूचा स्वर्गांत ताबडतोब तलास लावण्याकरितां व त्यारोबरच तिच्या प्रियकरावर सूड उगवण्याकरितां आत्महत्या करून घेतो. युद्धांत पराजय पावल्यामुळें सेनापतींनीं, प्रजेच्या कोपामुळें ओढवणारा अनर्थ टाळण्याकरितां जुलमी राजांनीं, पदच्युत केलेल्या राजांनीं, ज्यांचा सल्ला त्याज्य मानला गेला अशा मुत्सद्यांनीं, हद्दपारीची शिक्षा झालेल्या अपराध्यांनी व निराश झालेल्या कैद्यांनीं, बादशहाची गैरमर्जीं झालेल्या मंत्र्यांनीं, कट उघडकीस आलेल्या बंडखोरांनीं लाज्यास्पद विवाहबंधन टाळण्याकरितां स्त्रियांनीं, फांशीची शिक्षा सुनावण्याचा वारंवार प्रसंग आलेल्या न्यायाधिशांनीं, स्वामिनिष्ठ सेवकांनीं, पुत्रशोक झालेल्या पितरांनीं वगैरे अनेक प्रकारच्या परिस्थितींतील इसमांनीं आत्महत्त्या केल्यांचीं उदाहरणें चरित्रात्मक ग्रंथांत आहेत. शिवाय आपद्ग्रस्त व रोगग्रस्त लोकांनीं आत्महत्या केल्याचीं उदाहरणेंहि चीनमध्यें पुष्कळ सांपडतात. तीव्र मनोविकारांनी बळी पडून आत्महत्त्या केल्याचीं उदाहरणे आहेत. गळफांस लावणें, विहीरींत उडी टाकणें, अफू खाणें हीं सामान्य साधनें चीनमध्यें आत्महत्त्या करण्याकरितां उपयोगांत आणतात. अद्यापहि चीनमध्यें आत्महत्त्येच्या संख्येला आळा पडलेला नाहीं.

ज पा न. - हा देश आत्महत्येच्या संख्यातिशयाबद्दल सर्व जगांत प्रसिद्ध आहे. १९१५ पर्यंतच्या आंकडयावरून पाहतां ही संख्या अद्यापहि कमी झालेली नाहीं. जपानी लोकांची आत्महत्त्या करण्याचीं साधनें येणेंप्रमाणें:-

हाराकिरी (पोट-फाडणें) - याला सेप्पु कु असेंहि म्हणतात. हा प्रकार वरिष्ठ दर्जाच्या, दरबारी व राजघारण्यांतील माणसांमध्यें प्रचलित असून जपानच्या फौजदारी कायद्यानें याला संमति दिलेली आहे. हाराकिरीचा प्रघात १२ व्या शतकापासून प्रचलित असून तो एक मोठा धार्मिक विधि आहे असे मानतात. या कृत्याकरतां घरापाठीमागील बागेंत पांढऱ्या कापडाचे पडदे लावून जागा तयार करतात. तेथें कोणी मित्र किंवा नातेवाईक साक्षीदार ठेवून आत्महत्त्या करणारा इसम एका लहानशा तरवारीनें आपलें पोट आडवें फाडतो. नंतर जवळचा माणूस त्याचे डोकें कापून त्याची यातनांतून सुटका करतो.

शिंजु, (प्रणयी स्त्रीपुरुषांनीं एकदम जीव देणें) एकमेकांवर प्रेम करणारे स्त्रीपुरुष ऐहिक त्रास चुकून परलोकांत सुखाने राहण्यास सापडावें म्हणून एकदम आत्महत्त्या करतात. याकरितां बहुधां हें जोडपें स्वतःस कळकट दोरानें एकत्र बांधून पाण्यांत बुडून जीव देतें. अलीकडे विष पिऊन किंवा आगगाडीखालीं चेंगरून  प्राण देण्याचा मार्ग अवलंबिण्यांत येतो. अशाहि आत्महत्यांची संख्या कमी नाहीं.

(३) जुंशी, म्हणजे स्वतःचा मालक किंवा स्वामी मरण पावल्यावर त्याच्या मागोमाग परलोकांत जाण्याकरतां सेवकांनीं करावयाची आत्महत्त्या. हा प्रकार इसवीसनापूर्वीं पासून जपानांत चालू आहे. १७४४ पासून या चालीला बंदी करण्यांत आलेली आहे. तरीपण अशा आत्महत्त्या अद्यापहि चालू आहेत. या प्रकारचें अलीकडील सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे जनरल नोगी व त्यांची पत्नी यांनीं १९१४ सालीं जपानचे मैजी बादशहा मरण पावल्यावेळीं केलेल्या आत्महत्त्यांचे होय.
 
मु सु ल मा नी दे श. - आत्महत्येचा निषेध करणारीं अशीं प्रत्यक्ष वाक्यें कुराणांत नाहींत. तथापि महंमद पैगंबराच्या उपदेशाचा एकंदर रोख आत्महत्त्यांच्या विरुद्ध आहे यांत संशय नाही. आत्महत्या करणे हें पाप आहे अशी समजूत मुसुलमानी समाजांत पुष्कळ शतकें चालत आलेली असून हल्लीहिं ती कायम आहे. इतकेंच नव्हे तर आत्महत्या करणाऱ्याच्या देहाचे औध्वंदेहिक विधीहि करूं नयेत असें महमदानें सांगितल्याची दंतकथा आहे, पण तो कायदा आहे असें हल्लींचें मुसुलमान लोक मानीत नाहींत. एकंदरीत सर्व मुसुलमानी देशात आत्महत्याचे प्रमाण फारच अल्प आहे, आणि साधारणपणें विचार करता असें आढळून येतें कीं, सामान्य परिस्थितीपेक्षां धर्मिक समजुतीच माणसांना आत्महत्त्या करण्यास अधिक प्रबृत्त करितात असें म्हणावें लागतें. मुसुलमान लोकांत आत्महत्यांची संख्या अत्यल्प असते याचें बरेंच श्रेय त्या संप्रदायाच्या पुढील उपदेशाला आहे.

जगांतील पारमार्थिक विचारांपैकी कित्येक आत्महत्येला अनुकूल आहेत तर क्रित्येक तीव्र विरोध करणारे आहेत आत्महत्त्येच्या समर्थनपर दिलेली निरनिराळ्या विचारांतील कारणें वरील देशवार दिलेल्या माहितीवरून लक्षांत येणारीं आहेत. त्यापैकी परलोकप्राप्ति, प्रियजनसहवास व पापविमोचन हीं प्रमुख होत. आत्महत्त्येचा निषेध करणारे धर्म एका विशिष्ट उच्च दर्जाच्या संस्कृतीचेच असतात असें नाहीं. कित्येक अगदीं असंस्कृत लोकांच्या धर्मांतहि आत्महत्त्या निषिद्ध मानल्याचें आढळतें. अशा निषेधाचें मुख्य कारण म्हणजे मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या पिशाचयोनीबद्दलची भीति हें होय. बौद्धधर्मासारख्या उच्च संस्कृतीच्या धर्मामध्यें आत्महत्त्येचा निषेध 'अहिंसा परमोधमः' या तत्वान्वयें केलेला आहे. परिणतस्वरूप पावलेल्या ज्यू धर्मांने आत्महत्येचा तीव्र निषेध केलेला आहे. ख्रिस्ती धर्माच्या 'ओल्ड टेस्टेमेट' या पवित्र ग्रंथात स्पष्ट निषेधपर असें एकहि वाक्य नाहीं;  त्याचप्रमाणें 'न्यू टेस्टॅमेट' नामक ख्रिस्ती धर्मग्रंथांतहि तशी वाक्यें नाहींत. ख्रिस्ताच्या सुप्रसिद्ध दहा आज्ञापैकीं सहाव्या आज्ञेचा अर्थ मात्र आत्महत्यानिषेधपर करतात. उत्तरकालीन ख्रिस्ती धर्मांत हें निषेधाचें तत्त्व हळूहळू पूर्णपणें प्रस्थापित झालेलें असून प्रॉटेस्टंट धर्मपंथातहि आत्महत्त्येचा जोरानें निषेध केलेला आहे. निरनिराळ्या देशांतील नीतिशास्त्रविषयक ग्रंथांत तद्देशीय धर्मग्रंथांतील मतेंच थोडयाथोडया फरकानें पुनरुद्भूत केलेलीं आढळतात. प्लेटो व अरिस्टाटल या दोघांच्या ग्रंथांत आत्महत्त्येचा निषेध आहे; व त्याचें एक कारण आत्महत्त्येनें दिग्दर्शित होणारा व्यक्तिगत भ्याडपणा हा नैतिक दुर्गुण आणि दुसरें कारण राष्ट्रीय हानि म्हणजे राष्ट्राला उपयोगी पडणारी एक व्यक्ति नाहीशीं होणें हें दिलेलें आहे. तथापि असाध्य रोग किंवा आत्यंतिक अपमान झाला असतां माणसानें आत्महत्त्या करावी हा अपवाद वरील दोघाहि तत्त्ववेत्त्यांनां मान्य होता. पुढें अथेन्सचे स्वातंत्र्य नष्ट झाल्यावर व्यक्तीचें राष्ट्रीय महत्त्व कमी होऊन व्यक्तीच्या खाजगी हिताहिताच्या दृष्टीनें आत्महत्त्या करणें योग्य आहे किंवा नाहीं असा वाद सुरू झाला आणि स्टोईकपंथाच्या तत्त्वेत्त्यांनी आत्महत्येचें समर्थनच नव्हें तर शिफारसहि केलेली आहे. अखिल ऐहिक आपत्तींतून मुक्त होण्याचें साधन म्हणून त्यांनीं आत्महत्त्येची प्रशंसा केलेली आहे. आधुनिक काळांत यूरोपांत आत्महत्त्येचें नैतिकदृष्ट्या महत्त्व कमी कमी होत गेलेलें असून वैद्यकशास्त्रांतील तज्ज्ञांनीं आत्महत्येचें कारण मेदूंतील विकृति होय अशा दृष्टीनें या प्रश्नाची चिकित्सा व संशोधन सुरू केलेलें आहे. ही दृष्टि अलीकडे बळावत असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादित्वाला धरून असल्यामुळें सदरहू प्रश्नाला सर्वस्वी योग्य व अभिनंदनीय असेंचं वळण लागलेलें आहे. तथापि मेंदू पूर्णपणें निरोगी असूनहि जे लोक आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त होतात त्यांच्या मनस्थितीसंबंधानें नैतिकदृष्टया कारणीमांसा करण्याचाहि प्रयत्न चालू असून अतींद्रिय कारणांचा या विषयांत अन्तर्भाव अलीकडील नीतिशास्त्रज्ञ करीत नाहींसे झालेले आहेत. यावरील अगदीं अलीकडील ह्यूमचें ''आत्महत्त्येसंबंधी विचार'' ह्या नांवाचें पुस्तक फार महत्त्वाचें आहे. शिवाय अलीकडे बळावलेला तत्त्वज्ञानांतील जो  'उपयुक्तता वाद' तो आत्महत्त्येला फारच अनुकूल आहे असें म्हणावें लागतें; कारण उपयुक्कतावादविषयक तत्त्वज्ञानग्रंथांत सत्कृत्य म्हणजे ज्याच्य योगानें मानवजातीच्या एकंदर सौख्याच्या बेरजेंत  [  या ठिकाणीं सौख्य म्हणजे विषयसुख असाच अर्थ आहे ] भर पडतें असी व्याख्या असल्यामुळें त्यावरून सरळ अनुमान असें निघतें कीं, जर एकाद्या माणसानें आत्महत्त्या केल्यास इतर कोणाहि माणसास यत्किंचितहि दुःख होण्याचा संभव नसून किंवा अल्प दुःख होण्याचा संभव व सुख मात्र पुष्काळांनां पुष्कळ होण्याचा संभव असल्यास त्यानें आत्महत्त्या करणें हें नैतिक दृटया सस्कृत्यच होय. तत्त्वज्ञानांतील अतींद्रियवादी जे पंथ आहेत ते आत्महत्त्येच्या कृत्याचा निषेधच करतात, त्यांतील कांट व शैपेनहार हे तत्त्ववेत्ते प्रमुख होत. तथापि अतींद्रियपंथी तत्त्वज्ञानावर विशेष विश्वास नसलेल्या सामान्य सुशिक्षित जनसमाजाला आत्महत्त्येची स्टोईकपंथानें केलेली आत्यंतिक स्तुति किंवा कांटप्रभृतींनी केलेली आत्यंतिक निंदा दोन्हीहि मान्य नसून या दोन्ही टोंकांना मध्यवर्ति असा एखादा मार्ग असावा असें वाटत आहे. स्वतःचा स्वतः घात करून घेणें हें कृत्य कांहीं विशेष प्रकारच्या परिस्थितीमध्येंच समर्थनीय आहे असें हल्लीं बहुतेकांचे मत आहे. अर्थात् ती विशिष्ट परिस्थिति अशाच असामान्य प्रकारची असली पाहिजे की, सदरहू  आत्महत्त्येचें कृत्य भ्याडपणाचें किंवा अनीतिमूलक आहे असें म्हणण्यास यत्किंचितहि जागा असतां कामा नये.

मुंबईलाख्यांत १९२२ मध्यें २७२ आत्महत्या झाल्या. प्रमाण दर दहालाखांत १४ म्हणजे आयर्लंडहून थोडेंसें कमी आहे. [ संदर्भग्रंथ.-वैद्य महाभारत-उपसंहार.ए.ब्रि. एन्. रिलिजन. अँड एथिक्स. एन्. सोशल रिफॉर्म्स. ]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .