विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आंत्रावरोध - आंतड्यांतील मळ ज्या रोगांत पुढें आपोआप नेहमींप्रमाणें ढकलला जात नाहीं, त्यास हें नाव असून त्याच्या निवृत्तीसाठीं शस्त्रवैद्याची मदत बहुधां घ्यावी लागते. या रोगाचीं अनेक कारणें आहेत. त्यापैकी आंत्रग्रीवानिरोध झालेला अंतर्गळ हें कारणांपैकीं एक मुख्य असतें व त्यामुळें आंतडें कुजूं लगून मलोत्सर्जन न झाल्यामुळें रक्तामध्यें विषशोषण होऊन मृत्यू येतो. याचे 'तीव्र' आणि 'दीर्घकालीन' असे दोन मुख्य भेद असून त्यांपैकीं तीव्र भेदाचीं कारणें लक्षणें व इतर विशेष माहिती पुढें दिली आहे. यापेक्षां विशेष माहितीसाठीं उदरांतील शरीररचनेचें चांगलें ज्ञान अगोदर वाचकांस पाहिजे म्हणून संक्षिप्त वर्णन फक्त पुढें दिलें आहे.
रो गां ची का र णें - (१) आंतडें उदरांतील एखाद्या छिद्रांतून सरकल्यामुळें आंतडयावर करकोचा पडेल इतका दाब बसतो. असाच दाब आंतडें उदरांतील अन्य भागास चिकटल्यामुळें अगर बंधनाच्यायोगें बद्ध झाल्यामुळें बसून आंत्रावरोध होतो. कारण आंतड्याच्या वेटोळ्यास बांध बसल्यामुळें त्यांतील मळ पुढें जाऊं शकत नाहीं. या प्रकारच्या रोगाचीं लक्षणें एकाएकी होऊं लागतात. रोग्यास एकाएकीं पोटांत भयंकर वेदना येऊं लागतात. व त्याबरोबर लवकरच त्याची अत्यंत निःशक्त स्थिति होते. ज्या ठिकाणीं वेदना होते, तेथेंच रोग असतो असा भरंवसा नसतो. कारण वेदना बहुधा बेंबीच्या आसपास असते वांति एकसारखी आरंभापासून सुरू असून दुसऱ्या ते नवव्या दिवसाच्या दरम्यान त्या वांतीस नरकाप्रमाणें दुर्गंधि येते. पोटांत रोगाची फुगीर गांठ दिसत नाहीं, शौचास मुळींच होत नाहीं. प्रथम हातास पोट मऊ लागतें; पण रोगनिवारण न झाल्यास आंत्रावरणदाह या रोगाच आरंभ होऊन त्यामुळें पोटास स्पर्शहि सहन न होऊं देण्याइतकी वेदना सुरू होते. अशा रोग्यांनां पूर्वीं आंत्रांवरणरोग बहुधा झालेला असतो. शस्त्र क्रियेनें रोगी बरा केला नाहीं तर तो पाचंव्यापासून सातव्यां दिवसांच्या आंत मरण पावतो. कारण त्याचा अतिशय शक्तिपात होतो किंवा आंत्रावरणरोगामुळें रक्तांत विष शोषण होऊन त्यामुळें रोगी मृत्यु पावतो. (२) आंतड्यास पीळ पडणें हें एक कारण या रोगाचें हें दुसरें आहे व तें आंतडें स्वतःच पिळवटलें गेल्यामुळें अगर एका आंतड्याचा दुसऱ्या आंतड्यास पीळ अगर वेढा पढल्यामुळें शक्य होतें. डाव्या कटिप्रदेशाच्या पुढील भागीं बहुधा असें होतें; पण क्वचितकाळीं उजव्या बाजूसहि हा रोगप्रकार होतो. रोग झाल्यास आंत्रावरणदाह होऊन चिकट लशीमुळें तें आंतडें चिकटतें व त्यास पोषण करणारा रक्ताचा पुरवठा रक्तवाहिन्यांतील अभिसरण बंद होऊन नाहींसा होतो. पुष्कळ दिवसांत शौचास मुळींच झालें नाहीं ही माहिती रोग्याकडून मिळते. वरील प्रकारच्या रोगप्रकाराप्रमाणेंच याहि रोगप्रकाराचीं लक्षणें एकाएकी सुरू होतात. परंतु वेदना मात्र अगदीं एकसारखी नसते. मात्र तीस सुरुवात फार लवकर होते व शौचक्रिया अगदीं निखालस बंद होते. पोटास वाताची फुगवटी फारच व अतित्वरित येऊन त्यामुळें रोगी घाबरा होतो. प्रथम रोगग्रंथि एकाच ठिकाणीं असते. शस्त्रक्रियेनें रोग बरा न केल्यास मृत्यु लवकर आल्यावांचून टळत नाही (३) आंतडयांत आंगतुक पदार्थ अडकणें हें एक या रोगाचें तिसरें कारण आहे. कधीं कधीं आंतडयांत पित्ताचा खडा अडकून त्यावर कीट जमून या पित्ताश्यरीच्य अडथळयामुळें मळच्या गतीस अंशतः अवरोध होतो. रोगलक्षणांनां आरंभ पोटशूळ व वांति यांमुळें होतो व वांतीस लवकरच नरकप्राय दुर्गेंधि येते. पोट मऊ लागतें पण हातानें नळामध्यें अडथळा कोठें आहे हें बहुधा समजत नाहीं. इतर लक्षणांत रोगाच्या स्थानाप्रमाणें पुष्कळ वैचित्र्य असतें. परंतु जितका रोग जठराच्या जवळ असेल तितकीं लक्षणें तीव्रतर असतात. चुकून मोठा पदार्थ गिळल्यास तोहि अडथळा करूं शकतो. परुंतु गारोडी लोक चाकू, गारगोटीचे दगड, नाणीं, चिलीम इत्यादि पदार्थ गिळून ते खरोखरीच गुदद्वारावाटे बाहेर पाडतात. असले पदार्थ अडलेच तर ते बाराबोटी धाकटें आंतडे व सीकम या आंतडयांत बहुधा अडकतात व त्यामुळें पीडा कित्येक आठवडयांनीं अगर महिन्यांनींहि होऊं लागतें व झाली तरी ती कांहीं दिवस टिकते; नंतर कांहीं काळ आराम वाटल्यानंतर पुन्हा पीडा होऊं लागते. अच्छेर टोचण्यांचा पुंजका अगर ७०० खारकांच्या बियांचा पुंजका आंतडयांत अडकलेले खरे नमुने विलायतेंतील आतुरालयदार्थसंग्रहालयांत आहेत. 'क्ष' किरणांचा शोध लागल्या पासून अशा आगंतुक पदार्थांचें निदान बरोबर करण्यास बरेंच सुलभ पडूं लागलें आहे. आंतडयांत पित्ताश्मरी अगर दुसऱ्या प्रकारचा खडा प्रथमलहान असून त्यावर मळ, आम, न पचलेले पदार्थ इत्यादिकांचीं पुटें व थर बसून त्याचा आकार वाढल्यामुळें तो पुढें मळाच्या गतीस पूर्ण अवरोध करतो. कृश मनुष्याच्या आंतडयांतील पदार्थांचें निदान पोट चाचपून करितां येतें. (४) आंतडयामध्यें दुमड पडणें हें अवरोधित अंतर्गळाच्या खालोखाल प्रमुख कारण आहे ज्या लहान मुलांनां अशा प्रकारचा रोग होतो त्यापैकीं निम्या मुलांनां हा रोग बहुधां दहा वर्षांच्या आतील वयांत होतो व यांतील निम्या मुलांनां एक वर्षाच्या आंत म्हणजे अगदीं शैशवावस्थेंत तो होतो व त्यांत मुलींपेक्षां मुलाचें प्रमाण अधिक असतें. आतडयासारख्या पोकळ वळीचा वरील भाग खालच्या भागामध्यें बळें घुसविला असतां आंतडयास घडया पडून एकेबाजूस तीन पदरी व दुसऱ्या बाजूस तशांच दुमडलेली घडी पडते. निवळ यामुळें इजा झालेली नसते पण आंतडयाचा भाग जो खालील भागांत घुसतो त्या बरोबर आंत्ररक्तवाहिन्यावरणानामक जाड पडदाहि घुसला गेल्यामुळें त्यातील रक्ताभिसरणक्रियेस प्रथम त्या दाबामुळें प्रतिबंध होतो व मागाहून तर ती क्रिया त्या दाबामुळें बंद पडते. व आन्न कुजण्याची अगर फुटण्याची भीति असते. 'आंन्नावरणदाह' रोगास आरंभ होतोच व त्यामुळें चिकट लस स्त्रवून त्या लशीमुळें वरील एकांत एक आंतडें घुसून उत्पन्न झालेले आंतडयाचे पदर एकमेकांस चिकटतात व ते पदर सोडविणें उत्तरोत्तर कठिण होतें. क्वचित हे घुसणें आपोआप नीट होतें अगर त्यामुळें फक्त आंतडयाचा मार्ग आकुंचित होऊन मळाच्या गतीस आडथळा होत नाहीं; पण वर सांगितल्याप्रमाणें तें कुजल्यास त्यास छिद्र पडून फुटतें. ते न फुटलें तर क्वचितप्रसंगी कुजलेला भाग तुकडे होऊन गुदद्वारावाटें पडून जातो व आंतडयाच्या खालील आणि वरील भाग आपोआप सांधतात. आंतडें दुखण्याचीं कारणें मळ पुढें ढकलणाऱ्या आतडयाची क्रिया कोणत्याहि कारणामुळें फाजील जोरानें होणें, व आंतडयांत होणाऱ्या लघुग्रीवाग्रंथीचा जंतांचा किंवा दाहोत्पादक न पचलेल्या अन्नाचा समूह हीं होत. काहींचें मत सीकम नामक आंतडयाचा भाग लहानमुलामध्यें सुटा फिरता असतो व मोठया माणसांत तो पुढें बद्ध होतो, म्हणून सीकम या आंतडयांची अबद्धस्थिति हें एक मोठें कारण आहे. या रोगाचे स्थानपरत्वे भेद असून तीव्र व दीर्घकालीन हे ते भेद होत. तीव्र भेद फार करून मुलामध्यें बराच पाहण्यांत येतो. प्रथम राहून राहून व नंतर एकसारखीं पोटांत कळ, मुरडा होऊन रक्त व आंव पडून अतिसार होणें, हीं मुख्य लक्षणें होत. पूर्वीं सांगितलेल्या रोगकारणामुळें जितका वांतीस लवकर आरंभ होतो तितका यामध्यें होत नाहीं. शौचाच्या वेळीं फार कुंथावें लागतें व नंतर पूर्ण शक्तिपातास आरंभ होतो, बहुतेक रोग्यांनां पोटास फुगवटी येतें व रोगाची गांठ काहीजणांमध्यें पोट चाचपून हातास लागते व कांहींजणांच्या गुदद्वराशीं ती दिसते अगर हातास लागते. दीर्घकालीन भेद मोठ्या माणसामध्यें आढळतो; लक्षणें एकसारखीं चलूं नसतात; रोगनिदान बरोबर होण्यास अडचण पडते, कारण जुनाट संग्रहणीप्रमाणें लक्षणें असतात. शेवटीं रोगाचें तीव्र स्वरूप एकाएकीं प्रगट होऊन रोग्यास जुलाब, वाति व रक्तातिसार होऊन शक्तिपातामुळें रोगीं मरण पावतो. तेव्हां हा रोग असावा असें वैद्यास कळतें. (५) वरील रोगकारण व आगंतुक पदार्थादि कारणें दीर्घकाल टिकणाऱ्या स्वरूपांत आढळतात. पण वर सांगितल्याप्रमाणें कधीं त्यास तीव्ररूप प्राप्त होऊन रोगी मरतो.(६) पूर्वींच्या रोगामुळें उत्पन्न झालेल्या एखाद्या बंधनाचा वेढा आतडयास पडून त्यामुळें अकस्मात मळाच्या गतीस विरोध होतो. (७) उपजतच आतडयांची रचना आंन्नाविरोधास अनकूल असणें हेंहि एक मोठें कारण आहे. धाकटया आंतडयास छिद्र नसून मोठया आतडयांशी त्याचा संबंध नाहीं असा प्रकार आढळतो. आतडयांची पोकळी उपजतच अरुंद असल्यामुळें त्यांत मळाची गाठ अगर फळांच्या बियासारखे पदार्थ अडकेपर्यंत रोग लक्षात येत नाही. उपजलेल्या मुलांस गुदद्वाराचें छिद्र कधीं कधीं नसतें. पण तें लवकर लक्षांत येतें.
उ प चा र. - यास योग्य उपचार होण्यास त्याचें निदान लवकर होऊन शस्त्रक्रिया जितकी अगोदर होईल तितकी इष्ट आहे. कुजलेल्या आंतडयांच्या विशोषाणास आरंभ झालेल्या रोग्यावर शस्त्रक्रिया करणें म्हणजे ती फार उशीरां होय. रेचकामुळें उपयोग होत नाहींच पण अपाय मात्र खास होतो. या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यातं वाकबगार असलेले सर फ्रेडरिक ट्रीव्हस् यांच्या मतें पोट चोळणें व हस्तसंकेतानें रोगग्रंथि बरीं करणें, हे एकेकावेळीं प्रचलित असलेले उपाय सध्यां निरुपयोगी ठरले आहेत, कारण अगदीं मृतप्रायस्थितींत असलेलें आतडें फुटेल न फुटेल अशा संशयित स्थितींत असल्यास या उपायांनीं तें खास फुटतें मात्र शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यास अगर तीस मुळीच फांटा देण्यासाठीं काहींतरी सबब हवी असल्यास हें निमित्त उपयोगीं पडतें. शस्त्रक्रियेमध्यें फुगलेलें आंतडें कांपून त्यांतील घाण काढून टाकणें व जो अडथळा असेल तोहि काढणें हीं कार्यें करावयाचीं असतात. या रोगाचे दीर्घकालीन भेद असतात त्यांचीं संक्षिप्त कारणें व इतर माहिती पुढें दिली आहे.
रो गा चे भे द. - (१) आगंतुक पदार्थ अगर मळाच्या मोठया गांठी आंतडयांत अडकून बसणें. यांपैकीं दुसरें कारण बद्धकोष्ठाचीं खोडी असलेल्या वृद्ध स्त्रियांत आढळून येतें व त्यामुळें पोट चांचपून हातास लागेल येवढी, कणकेच्या गोळयाप्रमाणें मऊ व कांहीं भागीं कठीण अशी गांठ लागते. इतका मळ मोठ्या आंतडयांत मावण्याचें कारण मूळव्याध, गुदव्रण व या सारखे दुःखदायक रोग असल्यामुळें व मळविसर्जनाच्या कामीं उदराच्या स्नायूंमध्यें स्वाभाविक अगर मागाहून आलेली दुर्बलता हें होय. रोग प्रगट होण्यापूर्वीं कांहीं काळ रोग्यास बरें वाटेनासें होऊन जिभेस बुरशी, मुखास दुर्गंधि व मलसंचयविषयशोषणामुळें थोडा ज्वर हीं लक्षणें होतात. ही स्थिति सुधारण्यासाठीं पोटांत क्यालोमेल हे औषध बोलडोनाशी मिश्र करून डाक्टरी सल्यानें घ्यावें व पुष्कळ पाण्याचा बस्ति देत जावा. गांठी फार मोठया असल्यास चमच्यासारख्या शस्त्राने त्यांचे तुकडे करतात. (२) आंतडयांची पोकळी क्यान्सर व इतर प्रकारच्या रोगग्रंथींमुळें अरुंद होणें, अगर पूर्वीं अंतरावरण झाल्यामुळें ती काहीं जागीं चिकटून अरुंद होणे किंवा आंतरक्तवाहिन्यावरणांतील रसग्रंथींत रोग होऊन त्यामुळें आंतडयास वेढा पडून पोकळी अरुंद होणें या रोगांस आंत्राघात म्हणतात; व ती शस्त्रक्रियेनें सुधारण्यासाठीं विकृत आंतडयाशेजारी चांगलें आंतडें आणून त्यांचा जोड करून वरील मळाचा प्रवाह पुढें सरेल असें करितात. आन्न घात होण्यास आमातिसार व क्षयजंतुन्यातिसार हांहि कारणें असतात. साधल्यास क्यान्सर व इतर रोगग्रंथीहि त्यावेळी कापून काढतात. क्यान्सर रोग मध्यम व उतार वयाच्या माणसांनां होतो व त्याची लक्षणें फारच सावकाशपणें प्रगट होतात. (३) आंतडयांस जुनाट दुमड असणें हें एक कारण आहे व तें लवकर न ओळखतां आल्यामुळें क्यान्सर रोग, क्षयजंतुजन्य आंन्नावरणदाह अगर गुदांतील पोकळीच्या आकाराचा ग्रंथिरोग यापैकीं रोग असल्याचा संदेह पडतो. शस्त्रवैद्यास साधेल तर त्यानें त्या आंतडयांत पंपानें वारा भरून दुमडलेली घडी सोडवावी. पण त्या घडया प्रायःचिकटलेल्या असल्यामुळें उदर चिरून तो रोग कापून काढणें हें योग्य आहे व अशा शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची बरीच माहिती आहे. (४) एखाद्या बाह्यग्रंथिरोगाचा अगर बंधनाचा दाब बसून मळाची गति कुंठित होते अशी उदाहरणें कधीं कधीं पहाण्यात येतात. त्यावेळी रोगनिदानासाठीं उदर चिरून रोगस्थिति जशी आढळेल त्याप्रमाणें ती दाब पाडणारी गाठ कापणें अगर आतडयाचीं चिकटलेली स्थिति दुरुस्त करणें या शस्त्रक्रिया त्यावेळीं उरकून घ्याव्या. जर पूर्वीच्या आंन्नावरणदाहरोगामुळें आतडयाची एकमेकांत फारच गुंतागुंत झाली असेल तर रोगट भाग वगळून वरील आंतडयाचा खालील आतडयाशीं संबंध जोडता येतो व या शस्त्रक्रियेमुळें मळाच्या प्रगतीस येणारा अडथळा दूर होतो. आंतडयाच्या रचनेमध्यें मळ पुढें ढकल्यण्यास समर्थ असा व आतडयाचें आकुंचन करणारा मांसल थर असतो, त्यांत स्तंभत्व अगर शैथिल्य येऊन मळाची गति काहीं रोग्याची बंद होते असें म्हणतात. पण त्याविषयी वाद चालू अहेत.