प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आदिग्रंथ - शीख लोक आपल्या धर्मलिखाणाला ''ग्रंथ'' हा शब्द योजितात. या पवित्र लिखाणाचे दोन मुख्य भाग आहेत. (१) आदिग्रंथ; हा शीखांचा पांचवा गुरु जो अर्जुन त्यानें बाबा नानक व इतर अनेक धर्मसुधारक यांच्या लेखांचें संकलन करून तयार केला; आणि (२) दसम पादशाही (संक्षिप्त रूप ''दसम ग्रंथ''); म्हणजे दहावा बादशहा जो गुरु गोविंदसिंग याचा ग्रंथ. सर्व शीख लोक पहिल्या ग्रंथाला प्रमाणभूत मानतात; व कांहीं थोडे शीख समाजांतील जहाल लोक दुसऱ्यां ग्रंथाला महत्त्व देतात. या आदिग्रंथाचें विवेचन करणाऱ्याला ''ग्रंथी'' असें नांव आहे.

क र्तृ त्व. - हल्लींच्या स्वरूपांत असलेला आदिग्रंथ गुरु अर्जुन (१५८१-१६०६) यानें रचिला, पण त्याच्या कालानंतर कांहीं तेघबहादुराचीं पदें व गुरुगोविंदसिंगाचा एक दोहोरा, या ग्रंथांत समाविष्ट करण्यातं आला. या संहितेतं कोणकोणाचीं पदें आहेत हें खालील वर्गवारीवरून दिसून येईलः-

(अ) शीखगुरु. - बाबा नानक, अंगद, अमरदास, रामदास, अर्जुन, तेघबहादुर, गोविंदसिंग.
(आ) भगत. - बेणी, भीकन, घन्ना, फरीद (शेख), जयदेव, कबीर, नामदेव, पीपा, रामानंद, रवि-दास सधना, सैणु सूरदास, त्रिलोचन.
(इ) भट्ट. - भलहउ, भिका, दास, गंगा, हरिबंश, जलन, जालप, कल (कलु, कल्हु), कलसु, कलसहार, कीरतु, मथुरा, नल, रड, सल.

यांतील नामदेव हा पहिला मराठी अभंगकवि असून तोच या ग्रंथांतील सर्वांत प्राचीन लेखक दिसतो. कबीराचे दोहरे सर्वांच्या माहितीचे आहेत, ते या ग्रंथांत फारच उठावदार दिसतात. त्याचप्रमाणें गीतगोविंदाचा कर्ता जयदेव, अद्वैताकडे वळलेला रामानुजसंप्रदायी रामानंद व प्रख्यात् संत सूरदास यांचीं परमार्थपर पदेंहि आदिग्रंथांत गोंविलीं आहेत. तेव्हां हा ग्रंथ शीखेतर हिंदूंना परका वाटणार नाहीं. एका दृष्टीनें पाहिलें तर शीखपंथ आणि महाराष्ट्रांतील भागवतपंथ यांचा निकट संबंध आहे. ज्ञानेश्वराचा बाप विठ्ठल, कबीर व नानक हे तिघेहि रामनंदाचे शिष्य या नात्यानें गुरुबंधु होते. नामदेव हा त्यांचा आदि कवि तर महाराष्ट्रांतील भागवत संप्रदायांतील हा अत्यंत जुन्या पुरुषांपैकीं एक होता.

वि भा ग. - आदिग्रंथांत पुढीलप्रमाणें विभाग आहेतः-

(१) जप किंवा जपजीः - नानकाची प्रस्तावना.
(२) सोदरुः - आस व गूजरी रागांतील सायंप्रार्थना.
(३) सो पुरखुः - आस रागांतील सायंप्रार्थना.
(४) सोहिलाः - गौरी, आस व धनासरी रागांतील निजण्यापूर्वी म्हणण्याची प्रार्थना.

वरील चार भाग उपासनेकरितां लागत असल्यामुळें ग्रंथारंभीं घातले आहेत. या नंतरः -

(५)  रागः - हा ग्रंथाचा मुख्य भाग. हे राग ३१ असून त्यांत निरनिराळ्या गुरूंची पदें  अव्यवस्थितपणें घातलीं आहेत. रागांच्या नांवांवरून आंतील विषयांचा बोध होत नाहीं. प्रत्येक रागाच्या शेवटीं भगतांचीं वचनें कशीं तरी जोडून दिलेलीं दिसतात. पहिल्या चार रागांत महत्त्वाचा विषय गोंवला आहे व पुढील किरकोळ रागांतून जे विषय मांडले आहेत ते केवळ ग्रंथाचा व्याप वाढविण्याकरितांच होत. जें हाताला सांपडेल तें घुसडून देण्याच्या क्रियेमुळें आदिग्रथ मोठा कंटाळवाणा व असंबद्ध असा झाला असून त्यांतील रुमझुमणाऱ्या शब्दसागरांत विचाररत्नें फार थोडींच आढळतात.

(६) भोगः - म्हणजे ग्रंथपरिणति; यांत निरनिराळया गुरूंचे व भगतांचे श्लोक व पदें आली आहेत.

 

ग्रंथांतील माल निरनिराळया ठिकाणांहून घेतला असल्यानें, लिखाण एका भाषेंत लिहिलेलें नसून, अर्वाचीन हिंदुस्थानांतील विविध भाषांत लिहिलें गेलें आहे. उदाहरणार्थ नामदेवानें जुन्या मराठींत रचना केली; व त्रिलोचन ब्राह्मणानें नमादेवाचेंच अनुकरण केलें. जयदेवानें संस्कृत व अर्वाचीन भाषां यांचें विचित्र  मिश्रण उपयोगांत आणिलें, तर रामानंदानें कबीर व त्याचे शिष्य यांच्याप्रमाणें जुन्या हिंदींत आपलीं वचनें गोंविली. नानक व त्याच्या पुढचे गुरू हें पंजाबात राहणारे असूनहि त्यांनीं हिंदीसदृश भाषा वापरावी हें चमत्कारिक वाटतें; पण ज्याप्रमाणें कबीर व इतर भगत यांची धार्मिक शिकवण त्यांनीं उचलली, त्याचप्रमाणें भाषाहि उचलली यांत नवल नाहीं. पण परिणाम असा झाली कीं, ग्रंथांतील बराचसा भाग अर्वाचीन शीखांनां दुर्बोध झाला आहे.  [ नानाक; नामदेव; शीख; ] पाहा.

ग्रंथांतील छंद जुन्या प्राकृतांतील किंवा नवीन बनविलेले दिसतात. छंदांमध्यें दोंहरा, दुपदा, त्रिपदा, चौपदा, पंचपदा, अष्टपदी, श्लोक, डखणा, छंट, पउरी, सवाईआ व गाथा हीं वृत्तें आढळतात. सर्व ग्रंथ छंदोबद्ध आहे हें सांगणें नकोच.

आ दि ग्रं थां ती ल भा षे चा न मु ना. - मासल्याकरितां कांहीं गीतें खालीं उध्दृत केलीं आहेत.

श्लोकः-

कतंच माता कतंच पिता कंतच बनिता बिनोद सुतह ॥
कतंच भ्रात मीत हित बंधव कतंच मोहु कुटुंब तें ॥
कतंच चपल मोहनी रूपं पेखंते त्यागं करोती ॥
रहंत संग भगवान सिमरन नानक लब्ध्यं अच्चुत तनह ॥

अष्टपदीः-
हउ मै करम कमावदे जम डंडु लगै तिन आइ ॥
जि सति गुरु सेवानिसे उबरे । हरिसेती लिव लाइ ॥ १
मन रे गुरमुखि नामु धिआइ ॥
धुरि पूरवि करतै लिखिआ तिना गुरमति नामि सनाइ ।
रहाउ ॥
विणु सचि गुर परतीति न आवई नामि न लागो भाउ ॥
सुपनै सुख्खु न पावई दुख महि सवै समाइ ॥ २

सवाईआः -
गावउ गुन परम गुरु मुख सागर दुरत निवारण सब्देर ॥
गावहि गंभीर धीरमति सागर जोगी जंगम जंगम ध्यानु धरे ॥
गावहि इंद्रादि भगत प्राहिलादिक आतम रसु जिनि
जाणिओ ॥
कबि कलसुजसु गावउ गुर नानक राज जोगु जिनि
माणिओ ॥

गाथाः-
कर्पूर पुहप सुगंधा षरस मानुख्य देहं मलीणं ॥
मज्जा रुधिर दुरगंधा नानक अत्थि गरबेण अग्यानणो ।.

दोहराः -
बल छुट किओ बदन परे कछू न होत उपाइ ॥
कहु नानक अब ओट हरि गज जिउ होहु सहाइ ॥
संगि सखा सभि तजि गए कोऊ न निबहिओ साथ ॥
कहु नानक इह बिपत्ति मै टेक एक रघुनाथ ॥

आ दि ग्रं था ती ल कां हीं वि ष य. - प्रणयिनी व प्रियकर यांमधीलं प्रेमाची ईश्वरप्रेमास उपमाः-

(१)

(१) अरेरे! काय नावडत्या स्त्रीचें जीवित, संसाराच्या आसक्तीमुळें तिचा नाश झाला. लोणा आलेली भिंत ज्याप्रमाणें रात्रंदिवस पडते झडते त्याप्रमाणें (तिचा नाश होतो) शब्दां (नामा) शिवाय सौख्य उत्पन्न होत नाहीं, प्रियतमाच्या प्राप्तीशिवाय दुःख नाहीसें होत नहीं (विश्रांति) हे सुंदर तरुणस्त्रियेः प्रियतमाशिवाय शृंगार कसला! घरांत जावयास तुला देवडीवर परवानगी मिळत नाहीं, उंबऱ्यांतील लबाड मनुष्य कुचकामाचा आहे.

(२) तोच स्वतः शहाणा. तोच चुकला नाहीं, तोच खरा व थोर शेतकरी होय ( कीं जो) पहिल्यानें जमीन तयार करून घेऊन तींत नामरूपीं बीं पेरतो. नशीबाच्या ओघाप्रमाणें एका नामापासून नऊ भांडारें उत्पन्न झालीं आहेत.

(३) जो गुरूला जाणीत नाहीं असा शहाणा, कसलें त्याचें शहाणपण आणि कसलें त्याचें सद्ववर्तन; त्या आंधळ्यास नामाचा विसर पडतो, स्वच्छंदी मनुष्याच्या मनांत गाठ काळोख असतो. त्याचे (जन्ममरणाचे) फेरे थांबत नाहींत, मेल्यावर तो पुनः जन्मतो व दुःख पावतो.

(४) चंदन विकत आणलें, तेंच कुंकु व केसांच्या भांगाकरितां शेंदूर, पुष्कळ उटी, पानासुपारी व कापूर (वगैरे साहित्य) पण जर ती स्त्री हृदयेशाला खुष करणार नाहीं तर हें सर्व साहित्य व्यर्थ होय.

(५) सर्व सुखांचा उपभोग व्यर्थ होय, सर्व दागिने अप्रस्तुत वस्तू होत, जोपर्यंत ती (गुरुच्या) शब्दानें पूर्ण विद्ध झाली नाहीं (तोपर्यंत) गुरूच्या द्वारीं तिला मान कसा मिळेल! हें नानका ! त्याच आवडत्या स्त्रिया भाग्यवान होत कीं ज्यांचें नवऱ्यावर प्रेम असतें.  [आदि १३ कर्ता नानक] .

(१) विषयी मनाचा मनुष्य जी कामें करतो ती नावडत्या स्त्रीच्या आंगावरील दागिन्याप्रमाणें असतात. शेजेचा पति येत नाहीं, एकसारखी ती दुःखी असते. प्रियतमाचा राजवाडा तिला प्राप्त होत नाहीं, त्याचे घरदार (तिच्या) दृष्टीस पडत नाहीं. (विश्रांति) बंधो, त्या नामाच्या ठिकाणीं मन एकाग्र करून ध्यान कर. संतमंडळाशीं जो संबंध ठेवितो, तो मनातल्यामनांत रामनामाचा जप करून आनंद पावतो.

(२) ती शिष्या नेहमीं प्रिय स्त्री असते ( कीं जीं) प्रियतमास हृदयांत धारण करते; ती मधुर भाषण करते, नम्रपणें चालते, तिचा पती शय्येवर तिजशीं विलास करतो. त्या प्रिय स्त्रिया सौंदर्ययुक्त असतात कीं, ज्यांच्या मनांत गुरू विषयीं अमित प्रेम असतें.

(३) भाग्याचा उदय होऊं लागतो तेव्हां पूर्ण भाग्योदयानें सद्गुरूची प्राप्ति होते अंतःकरणांतील दुःख व भ्राति काढून टाकली जाते व सौख्याची प्राप्ति होते. गुरूच्या इच्छेस अनुसरून जी चालते तिला लेशमात्र दुःख होणार नाहीं.

(४) गुरूच्या आज्ञेंत अमृत आहे; तें कोणालाहि सहज प्राप्त होतें. ज्यांनां तें मिळालें त्यांनीं ते अंतःकरणांतील अहंकार काढून टाकून प्राशन केलें. हे नानक, शिष्यानें नामाचें चिंतन केलें तर तो सत्स्वरूपाशीं एकरूप होता ( आदि. १३. ४४; कर्ता अमरदास.)

(१) जेव्हां ती स्वतःच्या प्रियतमास जाणते तेव्हां ती त्यास आत्म्यासह शरीर अर्पण करते. आवडत्या स्त्रिया जीं कामें करतात तीं ती करते, त्यामुळें सहजच सत्स्वरूपाशीं तिची एकतानता होते व तें सत्स्वरूप (तिला) मोठेपणा देतें (विश्रांति) हे बंधो, गुरूशिवाय भक्ती करतां येणें शक्य नाहीं. जर प्रत्येकास भक्तीची इच्छा असली तरी ती त्यास गुरूशिवाय प्राप्त होत नाहीं.

(२) (ईश्वराव्यतिरिक्त) प्रेमामुळें चौऱ्यायशी लक्षां (जन्मां) ची संख्या या मोहक स्त्रियेच्या वांटणीस आली आहे. गुरूखेरीज तिला. निद्रा मिळत नाहीं, तिची सर्व रात्र दुःखांत जाते (गुरूच्या) शब्दाशिवाय प्रियकराची प्राप्ति होत नाहीं, ती आपल्या जीविताचा व्यर्थ नाश करते.

(३) अहंभावानें ती जगांत वागते (पण) तिच्या वांट्यास संपत्ति नसते व अभ्युदयहि नसतो. नामाचें चिंतन न करणारा प्रत्येक अंध हा यमाच्या पाशांनीं बद्ध होतो. सद्गुरूची प्राप्ति होतांच अंतःकरणांत हरिनामाचें स्मरण होऊन संपन्नावस्था प्राप्त होते.

(४) ज्याची नामाच्या ठिकाणीं आसक्ति आहे तो गुरूच्या सहज प्रकृतीनें शुद्ध होतो. ( त्याचें) हृदय व देह हीं रंगानें रंगून जातात, त्यची जिव्हा मधुर रसाचें पान करते हे नानक! तो रंग नाहींसा होत नाहीं (कारण) हरीनें तो प्रथमच लाविलेला असतो ( आदि. १४.४७ कर्ता अमरदास)

(१) हे अभिनव तारुण्ययुक्त स्त्रिये, आनंदकारी राम हा माझा प्रियकर होय; जिचें आपल्या प्रियकरावर प्रेम व आसक्ति असते (तिच्यावर) रामाची कृपादृष्टि असते. जर ईश्वर स्वतः तिजवर कृपा करील तर ती आपल्या प्रियकरास भेटेल. प्रियकराच्या सांन्निध्यांत तिची शय्या सुखदायक होते, सप्तपुष्करिणीं अमृतानें भरून जातात. दयासागरा, (मजवर) दया व करुणा कर, (म्हणजे गुरूच्या) सद्वचनास अनुसरून मी तुझें श्रेष्ठगुण गात राहीन. नानक (म्हणतो) स्वतःच्या पतीला-हरीला पाहून ती स्त्री सुखी होत व (तिचें) मन आनंदपूर्ण होतें.

(२) हे तरुण व निसर्गरमणीय स्त्रिये, रामाचें अनन्य प्रेम हेंच (माझें) स्तवन (होय.) माझ्या चित्तास व शरीरास हरि सौख्यदायक आहे, मला भगवान रामाच्या भेटीची आवड आहे. ईश्वरविषयक प्रेमानें जी व्याप्त होते,  'हरी' हीच जिची विनवणी, ती हरीच्या नामांत सौख्यानें वास करते. मग तिची सद्गुणांशीं ओळख होते, मग तिला ईश्वराची जाणीव होते, तिचे अपराध लुप्त होतात, तिचे दुर्गुण नाश पावतात. तुझ्याशिवाय माझ्यानें एक क्षणभर राहावत नाहीं, सांगण्यानें किंवा ऐकण्यानें धीर धरवत नाहीं. हे नानक, प्रियतमा, प्रियतमा, म्हणून जी आक्रोश करते तिच्या जिव्हेस त्याचा आस्वाद मिळून तिचें मन आनंद पावतें.

(३) हे सख्या, हे सहचरा, तो व्यापारी राम माझा प्रियतम आहे. हरीचें नांव विक्रयार्थ घेतलें आहे व राम हा अनंतपट गोड व अमोलिक आहे. जर तो अमोलिक, सत्स्वरूप व प्रिय परमेश्वर घरांत मान्य समजला जात असेल तर ती तरुण स्त्री बरी असते. कांहींजण हरीच्या सान्निध्यांत सुखानुभव घेतात. मी दाराशीं उभा राहून आक्रोश करतो. कारणांचें सामर्थ्यवान कारण, तो भाग्यदायी (विष्णू) स्वतः (माझें) काम शेंवटास नेतो. नानक (म्हणतोः)  (  जिच्यावर त्याची ) कृपादृष्टि असेल ती भाग्यवती व आवडती स्त्री, ती ( आपल्या हृदयांत (गुरूचें) वचन धारण करते.

(४) माझ्या घरांत खरा आनंद भरला आहे, तो इश्वर, तो रामसखा आला आहे. प्रेमानें ओथंबून जाऊन तो माझा उपभोग घेत आहे, ( माझें ) मन काढून नेऊन रामास दिलें आहे. ( माझे ) स्वत:चें मन  ( त्याला ) दिलें आहे. हरि हा नवरदेव मिळविण्यांत आला आहे, आपल्या मर्जींप्रमाणें तो ( माझा ) उपभोग घेत आहे. ( जिचें ) शरीर व अंत:करण प्रियकरास अर्पण केलें जाते ती ( गुरुच्या ) मंगल आशिर्वचनाने स्वगृहीं अमृतफल प्राप्त करुन घेते. बुद्धिमत्तेने, ग्रंथावलोकनानें व मोठया शहाणपणाच्या जोरावर त्याची प्राप्ति होत नाहीं, जे त्याच्या अंत:करणास रिझवितात त्यांनां तो प्रेमामुळेंच भेटतो. नानक ( म्हणतो ) ईश्वर आमचा सखा आहे. आम्ही या जगांतील नाहीं आहों ( आदि. १ कर्ता नानक).

(१) सांवरीचा वृक्ष सरळ असतो, पुष्कळ लांब व पुष्कळ रुंद असतो. जे (त्याच्या जवळ) आशेनें येतात  ते( त्याजपासून ) निराशेनें परत कां जातात? (त्याचीं) फळें बेचव असतात, (त्याचीं) फुलें घाणेरडीं असतात, (त्याचीं) पानें निरुपयोगी असतात, (त्याचींच) गोडी विशेष, हे नानका, कीं ज्यामध्यें चांगलेपणा व सत्य हेंच वैशिष्टय आहे. प्रत्येकजण स्वतःस नमस्कार करतो, दुसऱ्यास कोणीहि करीत नाही. ताजव्यांत घालून वजन केलें असतां जो खालीं जातो तोच जड होय. हरणास मारणारा पातकी दुप्पट खोल बुडून जातो. अशुद्ध अंतःकरण घेऊन (परत) जाणाऱ्याच्या (पूजेच्या प्रसंगीं) नम्र केलेल्या मस्तकाचा काय उपयोग ?

(२) तो ग्रंथाध्ययन करतो, व संध्यापाठ म्हणतो. तो पाषणाची पूजा करतो, त्याचें ध्यान बगळयाप्रमाणें असतें. (त्याच्या) मुखांत असत्य असतें, (बाहेरून मात्र) शृंगार अत्युत्कृष्ट केला असतो. तो (दिवसांतून) तीन वेळ गायत्रीचे चिंतन करतो, गळयांत माळ असून त्याच्या कपाळीं टिळा असतो, त्याचीं दोन दोन धोतरें व रेशमीं वस्त्रें असतात. (हींच) ब्राह्मणाचीं कतर्वव्यें असें जर त्याला वाटत असेल तर खरोखर हे सर्व उद्योग म्हणजे शुद्ध गदळ होत. नानक म्हणतो व त्याचें म्हणणें योग्यच आहे कीं, सद्गुरूखेरीज त्याला (खरा) मार्ग सांपडत नाही. (त्याचा) पोशाख व स्वरूप (पवरी) रम्य आहे, तो जग सोडून (यमाच्या दरबारांत) जात आहे. त्यानें स्वतः ज्या बऱ्या वाईट गोष्टी केल्या त्याचें माप तो पदरांत घेत आहे. हरीच्या इच्छेस अनुसरून हुकूम सुटले आहेत कीं अरुंद रस्त्यानें त्यानें पुढें गेलें पाहिजे नग्नावस्थेंत तो नरकांत जातो, तेथें घोर दृश्य दृष्टीस पडतें. इहलोकीं गुण उधळून तो ( आतां) पश्चात्ताप करीत आहे.   [ आदि. १४.२ कर्ता नानक ] .

ई श्व रा चें ए क त्व सि द्ध क र णा रा उ ता रा. -

(१)  ''माया ही द्वितीय होय'' असें जग समजतें. काम, क्रोध व लोभ हे अधःपात होत ( विश्रांति ). मी द्वितीय कोणास म्हणूं? असा कोणीच नाहीं. सर्वांतर्यामीं तो एक सर्वश्रेष्ठ आहे.

(२) द्वैताविषयीं बोलणाऱ्या मूर्खांनां ( ती ) द्वितीय ( आहे). तो येतो व जातो, मरून तो (पुनः) द्वितीय होतो.

(३) पृथ्वी आणि आकाश यांच्याकडे मी द्वैतभावानें पहात नाहीं. सर्वच लोक नर व नारी होत.

(४) सूर्य व चंद्र हे तेजस्वी दीप मी पाहातो. सर्वांमध्ये तो परमप्रिय तरुण (हरी) सलग भरून राहिला आहे.

(५) दयायुक्त होऊन त्यानें माझें मन (एकत्वाकडे) वळविलें आहे. सद्गुरूनें मला एकेश्वराचें ज्ञान करून दिलें आहे.

(६) तो एक सर्वश्रेष्ठ शिष्यास माहीत झाला आहे. द्वैताचा नाश केल्यानंतर गुरूच्या वचनानें त्यानें त्याचा उमज करून घेतला आहे.

(७) त्या एकाची सत्ता सर्व जगांतून अव्याहत चालू आहे. त्या एकापासून सर्व सृष्टि उत्पन्न झाली आहे.

(८) मार्ग दोनः एक हिंदुधर्म व दुसरा मुसुलमान धर्म. (पण) ईश्वर एकच आहे याचें ज्ञान करून घ्या. गुरुवचनाच्या द्वारें त्याची आज्ञा समजून घ्या.

(९) सर्व प्रकारचीं रूपें व रंग (त्याच्या) मनांत आहेत, असें एकाची स्तुती करणारा नानक म्हणतो ( आदि.पा.३२०० कर्ता नानक).

ई श्व रा चें स  र्व व्या पि त्व दा ख वि णा रा उ ता राः -

(१) एक कळशी घेतली व ती पाण्यानें भरली, (अशा करितां कीं) मी ईश्वरास स्नान घालीन. बेचाळीस लक्ष जीवजंतू त्या पाण्यांत उत्पन्न झाले. बंधो, मी विठ्ठलास काय करूं (विश्रांति). हे बंधो, मी जेथें जातो तेथें विठ्ठल आहेच. तो अत्यंत उल्हासी व सदा खेळकर आहे.

(२) फुलें आणलीं, हार तयार केला, मी प्रभूची पूजा करतो. ( पण ) कृष्णभ्रमरांनीं त्यांचा सुवास आधींच लुटून नेला, हे बंधो, मी विठ्ठलास काय करूं ?

(३) दूध आणलें व खीर तयार केली, कीं, मी ईश्वरास नैवेद्य समर्पण करावा. (पण) वासरानें प्रथमच दूध उष्टें करून टाकलें, हें बंधो, मी विठ्ठलास काय करू ?

(४) येथें विठ्ठल आहे, तेथें विठ्ठल आहे, विठ्ठलाखेरीज जग नाहीं. नामा म्हणतो, प्रत्येक स्थलाचे ठायीं, प्रत्येक वस्तूंत तूं भरून राहिला आहेस ( आदि. पा. ६६५ कर्ता नामदेव).

हिं दु व तु र्क यां ची ए की क र ण्या ब द्द ल चा उ ता रा.-

(१) हिंदु व तुर्क कोठून आले? हे कोणीं निर्माण केले? (आपल्या) मनांत शोध करून व विचार करून (मला) सांग नंदनवन व नरक कोणी निर्माण केला? (विश्रांति) काझीसाहेब, आपण कोणत्या ग्रंथाचें विवरण करितां? (ग्रंथ) वाचणारे व (त्यावर) विचार करणारे सर्व मेले, कोणाहि एकाला ( खरें) ज्ञान झालें नाहीं.

(२) हे बंधो! बळजबरीनें व प्रेमानें सुंता करण्यांत आली, मी त्याला मान्यता देणार नाहीं. जर ईश्वर मला तुर्क बनवील तर तोच स्वतः माझी सुंता करील.

(३) जर एखादा सुंता करण्यानेंच तुर्क बनेल, तर एखाद्या बाईचें काय करावे? ज्या अर्थीं त्या बाईला अपला अर्धांगीपणा सोडतां येत नाहीं त्याअर्थी तिनें हिंदूच राहिलें पाहिजे.

(४) (कुराण) ग्रंथ टाकून देऊन रामाला भज, अरे मूर्खा! तूं मोठा जुलूम करीत आहेस. कबीर रामावर विश्वास टाकतो, तुर्कोंचा पराभव व नाश झाला [ आदि. पा. ६५५ कर्ता कबीर ] .

[ सं द र्भ ग्रं थ. - आदिग्रंथाच्या आवृत्या अनेक आहेत. मराठींत भाषातर, नामदेवाचे अभंग भ्रष्टस्वरूपांत आहेत. इंग्रजीभाषांतर ट्रंप यानें केलें आहे.  'ग्रंथावर एनसायक्लोपीडिआ ऑफरिलजन अँड एथिक्स' मध्यें एक लेख आहे. ट्रंपची प्रस्तावना महत्वाची आहे. ]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .