प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आदिलशाही - या घराण्याचा संस्थापक युसफ आदिलखान हा बहामनी राज्याचा कारभारी खाजे जहान गवानचा परममित्र असून याची त्यानें दौलताबादच्या सुभ्यावर नेमणूक केली होती. परंतु खाजेजहानाच्या मरणानंतर युसफ आदिलखानाची विजापुरास नेमणूक झाली. तेव्हां तेथे हा स्वतंत्र होऊन यानें इ.स. १४८९ त राजचिन्हें धारण केलीं. आदिलशाही घारण्याची पुढें दिलेली हकीकत इ.स. १६३१ पर्यंत बहुतेक मोडकांच्या फेरिस्ता बुसातिने, सलातीन व ब्रिग्जनें भाषांतर केलेला दुसरा एक फारसी ग्रंथ या आधारावर रचलेल्या आदिलशाही व निजामशाही घराण्याच्या इतिहासावरून घेतली असून त्यापुढील माहितीसाठीं ग्रांटडफमधील टीपा एकत्र केल्या आहेत. ही उत्तरार्धांतील हकीकत पुढें शहाजी व शिवाजी यांच्या चरित्रांत उपलब्ध ऐतिहासिक साधनांच्या आधारें देण्यांत येईल तींत तेव्हां ग्रांटडफच्या चुका पुढें येतीलच.

ग्रांटडफच्या माहितीचा इतर साधनांतील माहितीशीं आरंभीच जो विरोध दिसून येतो तो हा कीं, सोळाव्या शतकांत झालेल्या शहांची ग्रांटफडनें दिलेली यादी सेवेलच्या दक्षिण 'हिंदुस्थानांतील घराणी' या पुस्तकांतील यादीशीं किंवा मोडकांच्या यादीशीं कारकीर्दीच्या काळाच्या बाबतींत जमत नाहीं. ग्रांटडफच्या पुस्तकांतील यादी पुढें दिल्याप्रमाणें आहे.

(१) युसफ आदिलशहाः - हा इ.स. १४८९ त स्वतंत्र झाला व १५१० त. मरण पावला.
(२) इस्मायल आदिलशहाः - हा १५१० त आपल्या बापाच्या गादीवर बसला, व १५५४ त मरण पावला.
(३) मल्लू आदिलशहाः - पुढें मल्लू आदिलशहा यास त्याच्या बापाची गादी मिळाली व तो इ.स. १८५५ त पदच्युत झाला.
(४) इब्राहिम आदिलशहाः - हा आपल्या भावामागून राजा झाला व १५५७ त मरण पावला. सुलतान अली आदिलशहाः - इब्राहिमच्या पश्चात अली आदिलशहा हा आपल्या बापाच्या गादीवर बसला याचा इ.स. १५८० खून झाला.
(६) इब्राहिम आदिलशहाः - अली अदिलशहानंतर इब्राहिम आदिलशहा हा त्याचा मुलगा राजा झाला.

ग्रांटडफच्या यादींतील मुख्य फरक म्हटला म्हणजे त्यानें इस्मायल आदिशहाची कारकीर्द २० वर्षांनीं अधिक लांबविली असून त्याऐवजीं इब्राहिम आदिलशहाची कारकीर्द तितकीच कमी केली आहे.

का ल वि भा ग. - विजापूरचें आदिलशाही घराणें इ.स. १४८९ पासून १६८५ पर्यंत म्हणजे जवळ जवळ दोन शतकें टिकलें. या दोनशें वर्षांतील विजापूरच्या राजांच्या परराष्ट्रीय व्यवहारांचीं अमीर बेरिदाचा पाडाव, निजामशाहीशीं स्पर्धा, मोंगलाविरुद्ध निजामशाहीस मदत, मराठ्यांचा उदय आणि अवरंगजेबाविरुद्ध लढा या पांच भागांत साधारणपणें कालानुक्रमें वांटणी करतां येतें. (१) विजापूरची पहिलीं ४२ वर्षे म्हणजे इ.स. १५३१ पर्यंतचा काळ स्वातंत्र्य प्रस्थापनार्थ बहामनीराजास बाहुलें करून बसलेल्या अमीर बेरिदाशीं झगडून त्याचा पाडाव करण्यांत गेला. या अवधींत आदिलशहांनीं जीं जीं युद्धें केलीं मग ती विजयानगरच्य हिंदु राजाशीं झालेली असोत किंवा अहमदनगरच्या मुसुलमान राजाशीं झालेलीं असोत त्यांत बहुधा अमीर बेरिदाचेंच कारस्थान किंवा शत्रुपक्षास साहाय्य आढळून येईल. यापुढील ६३ वर्षांतील युद्धें अहमदनगरची निजामशाही व विजापूरची आदिलशाही यामध्यें राज्यवृद्धीसाठीं चाललेल्या स्पर्धेमुळें उत्पन्न झालीं. परंतु इ.स. १६९४ त दुसरा बुऱ्हाण निजामशहा मरण पावल्यावर अहमदनगरच्या राज्यांत घोंटाळें माजून तें राज्य जिंकण्याकरितां उत्तरेकडून मोंगलांनीं स्वारी केली. तेव्हां विजापूरच्या आदिलशहानें आपसांतील भांडणें बाजूस ठेवून इ.स. १६३६ त निजामशाहीचा अंत होईपर्यंत तीस व तिच्याप्रीत्यर्थ लढणाऱ्या शहाजीस यथाशक्ति मदत केली निजामशाही बुडाली तेव्हां आदिलशाहाच्या वाटयांस तिचा बराचसा भाग आला व यापुढें शहाजी विजापूरच्या चाकरीस राहिला व त्यानेहि आदिलशाहाकरितां कर्नाटकांत बरेंच विजय मिळविले. परंतु निजामशाहीच्या अंतकालाबरोबरच मराठयांच्या उदयास सुरवात झाली. व अफजलखानाच्या वधापासून त्यांच्याशीं प्रत्यक्ष तोंड लागून स्थूलमानानें इ.स. १६७५ पर्यंत म्हणजे दूसऱ्या अली आदिलशहाच्या मृत्यूनंतर तीन वषेंपर्यंत ती चालली. शिवाजीची कर्नाटकांतील मोहीम या नंतरची आहे. तरी आदिलशहीच्या जीवितास याचवेळीं शिवाजीपेक्षां मोंगलाचेंच अधिक भय असल्यामुळें व शिवाजीनें कर्नाटकांतील मोहिमींत जिंकलेला मुलूख अखेर आदिलशाहीस मोंगलाविरुद्ध मदत करुनच बक्षीस हाणून मागून घेतला असल्यामुळें यापुढील आदिलशाहीचा झगडा शिवाजीपेक्षां मोंगलाशींच अधिक होता असे म्हटलें पाहिजे. अली आदिलशहाच्या मृत्यूनंतर तख्तनशील राजा अल्पवयी असल्यामुळें दरबारच्या मंडळींत सत्तेकरिता झगडे लागून अवरंगजेबास विजापूर दरबारी आपलें कारस्थानाचें जाळें पसरण्यास फावलें, व त्यानें आदिलशाही जिंकून घेण्याकरिता एकावरएक सरदार पाठवून व शेवटीं स्वतः जातीनें येऊन इ.स. १६८६ मध्यें तें राज्य खालसा केलें.

आदिलशाहीच्या इतर राज्यांशीं झगड्यामध्यें कांहीं झगडे बरेच गुंतागुतींचे होते.  त्यांचा संबंध इतर राज्याशीं व मूळच्या बहामनी राज्याशीं येतात ते गुंतागुंतीचे झगडे घेण्यापूर्वी पोर्तुगीजांशी आलेला संबंध प्रथम देतों.

 

पो र्तु गी जां शीं झ ग डा. - आदिलशाहीच्या पहिल्या दीडशें वर्षांचा इतिहास देतांनां पोर्तुगीज व आदिलशाही यांच्या संबंधाविषयीं ग्रांटडफनें दिलेली हकीकत, ती त्यानें  'डी फारिआ' या युरोपीय साधनाच्या आधारें घेतली असल्यामुळें आपणांस विशेष महत्त्वाची आहे. पोर्तुगीज व आदिलशाही यांतील झगड्याची माहिती ग्रांटडफच्या इतिहासांत पुढें दिल्याप्रमाणें मिळतेः - ता. २७ फेब्रवारी सन १५१० रोजीं पोर्तुगीज लोकांनीं विजापूरच्या राजापासून गोवें घेतलें, परंतु तें विजापुरकरांच्या हातीं थोडयाच महिन्यांनी परत आल्यामुळें अलबुकर्क यानें ता. २५ नोव्हेंबर १५१० रोजीं पुन्हां जिंकून घेतलें इश. १५४८ त विजापूरच्या राज्यांतील, गोव्याच्या आसमंतातील भागापासून बाणकोटपर्यंत सर्व शहरें, पोर्तुगीज लोकांनीं जाळून टाकलीं व तेथील लोकांची कत्तल केली. एकदां तर इब्राहिम आदिलशहास पदच्युत करण्याकरितां त्यांची मदत मागण्यांत येऊन त्यांनां आदिशाहीच्या अंतर्गत राजकारणांत ढवळाढवळ करण्याचीहि संधि आली होती पुढें. इस. १५७१ त अली आदिलशहानें गोव्यास वेढा दिला, परंतु पोर्तुगीज लोकांनीं त्यास हाकून लाविलें. या पराभवानंतर विजापरूच्या राजांनीं पोर्तुगीजांपासून गोवें घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीं.

आ मी र बे रि दा चा पा डा व. - इ.स. १४८९ पासून १५३१ पर्यंतचा काळ म्हणजे आदिलशाहीच्या युसफ व इस्मायल या पहिल्या दोन राजांच्या जवळ जवळ सबंध कारकीर्दी अमीर बेरिदाशीं झगडून किंवा त्यानें रचलेल्या कारस्थानामुळें  उद्भवलेल्या. शत्रूस तोंड देऊन आपलें स्वातंत्र्य प्रस्थापण्यांत गेल्या. कासीम बेरीद हा सुलतान महंमद बहामनी यांस नामधारी राजा करून सर्व सत्ता बळकावून प्रबळ झाला होता व त्याच्या मनांत विजापूर प्रांत आपल्याकडे घ्यावयाचा होता. ही गोष्ट युसफ आदिलखानाचा नाश केल्याशिवाय घडून येणें शक्य नसल्यामुळें त्यानें आरंभींच दुसऱ्या तर्फेंतील कितीएक सुभेदारांस आदिलखानाविरुद्ध उठवून आपण स्वतः त्यावर चालून आला व विजयानगरच्या राजासहि  दक्षिणेकडून आदिलखानाच्या मुलुखावर स्वारी करून रायचूर व मुद्गल हे किल्ले हस्तगत करण्यास भर दिली; परंतु आदिलखानानें प्रथम विजयानगरच्या राजाशीं तह करून कासीम बेरीद वगैरे मंडळींचा समाचार घेतला व पुढें विजयानगरच्या राजानें त्याच्या मुलुखावर स्वारी केली तेव्हां त्याचाहि स्वतंत्रपणें पराभव केला (इ.स. १४९३). तथापि एवढयानें कासीम बेरिदाने लावलेल्या कलागतीचा समूळ नायनाट होणें शक्य नव्हतें. इ.स. १५१० मध्यें युसफ आदिलशहा मरण पावल्यावर त्याचा पुत्र अल्पवयी असल्यामुळें त्याच्या दरबारांतील सरदारांनी सत्ता बळकाविण्यासाठीं खटपट चालविली, तेव्हां विजयानगरच्या राजानें रायचूर दोआबांत स्वारी करून आदिलशाहीचा रायचूर किल्ला काबीज केला. यानंतर पुढें इ.स. १५१४ मध्यें अमीर, बेरिदानेंहि महंमदशहा बहामनीच्या नांवाखाली निजामशहा, कुतुबशहा यांची कुमक मागवून  आदिलशाहीवर स्वारी केली; पण इस्मायल आदिलशहानें त्याचें कांहीं चालू न दिल्यामुळें तो भग्नमनोरथ होऊन परत आला. या विजयानें हुरूप येऊन इस्मायल आदिलशहांनें विजयानगरपासून रायचूरमुद्गल घेण्याचा प्रयत्न केला; पण तो सफल झाला नाहीं. यापुढें आदिलशाहीविरुद्ध बेरिदाचें व निजामशहाचें सख्य जमण्यास एक नवीन कारण घडून आलें इस्मायल आदिलशहाची बहीण मुरियम सुलताना हिचें बुऱ्हाण निजामशाहीं लग्न होऊन आदिलशहानें निजामशहास सोलापूरचा किल्ला व त्याबरोबरचे साडेपांच परगणे देण्याचें कबूल केलें; पण आदिलशहानें हा करार न पाळल्यामुळें निजामशहानें बेरिदाच्या मदतीनें सोलापूर घेण्यासाठीं विजापूरच्या मुलुखांत दोनदां स्वारी केली; पण दोनहि वेळां त्यास अपयश येऊनच परत यावें लागलें. येणेंप्रमाणें बेरीदशहापासून आपणास वारंवार उपद्रव होतो, असें पाहून इस्मायल आदिलशहानें बेरिदावर स्वारी करून त्यास कैद करून बेदर शहर व किल्ला हस्तगत करून घेतला. तथापि इस्मायलनें उदार अंतःकरणानें त्यास मुक्त करून कल्याण व कंधार स्वाधीन करण्याच्या करारावर बेदर शहर अमीर बेंरिदास दिलें. यानंतर इस्मायलनें रायचूरमुद्गल घेण्याकरितां विजायानगरवर पुन्हां स्वारी केली व शेवटीं सतरा वर्षानंतर ते किल्ले एकदांचे पुन्हां काबीज केले. अमीर बेरिदानें कबूल केल्याप्रमाणें कल्याण व कंधार या किल्ल्यांच्या चाव्या स्वाधीन न केल्यामुळें इस्मायलनें इ.स. १५३१ मध्यें सरतेशेवटीं त्या किल्ल्यांस वेढा देऊन ते काबीज करण्याचा निश्चय केला. बेरिदानें बुऱ्हाण निजामशहास आपल्या मदतीला बोलाविलें; पण इस्मायलनें त्या दोघांनांहि पराभूत करून आपला मनोरथ पूर्ण केला. अमीर बेरिदाची ही बहुतेक शेवटचीच धडपड होती. यानंतर त्यानें आदिलशाहीविरुद्ध लढण्यांत फक्त एकदांच भाग घेतला. इस्मायलशहाच्या मृत्यू (इ.स. १५३४) नंतर त्याचा पुत्र इब्राहिम आदिलशहा याचें त्याच्य प्रधानाशीं वांकडें आलेलें ऐकून निजाशहा व बेरिदशहा यांनीं मिळून विजापूरच्या मुलुखवार पुन्हां एकदां स्वारी केली; पण याहि स्वारींत त्यांस अपयशच आलें व सोलापूरचा किल्ल्या आदिलशहाकडे कायमचा ठेवण्याचा ठराव करून निजामशहास परत यावें लागलें. यानंतर अमीर बेरिद मृत्यु पावल्यामुळें आदिलशाहीस त्याच्या कारस्थानामुळें होणारा त्रास कायमचा नष्ट झाला.

नि जा म श हा शीं स्पर्धा. - यापुढील काळांतील आदिलशाहीचा मुख्य शत्रू म्हणजे अहमदनगरचें निजामशाही घराणें होय. हीं दोनहि घराणीं आपआपल्यापरीं राज्यवृद्धीसाठीं प्रयत्न करीत असल्यामुळें त्यांचें एकमेकांशीं साहजिकच वैर आलें. आदिलशहाचें विजयानगरशीं युद्ध उपस्थित होण्यास जसें सरहद्दीवरील रायचूर, मुद्गल हे किल्ल्ये कारणीभूत होत आले, तसे निजामशाहीशीं युद्ध उपस्थित होण्यास सोलापूरचा किल्ला व त्याखालील साडेपांच परगणे कारण होऊं लागले. आतांपर्यंत बुऱ्हाण निजामशहानें ते आपल्या कबजांत घेण्याचा कित्येक वेळां प्रयत्न केला होता; पण तो सफळ झाला नाहीं. आदिलशहा व निजामशहा हे एकमेकांचे इतके कट्टे दुष्मन बनले होते कीं, एकमेकांचा नाश करण्यासाठीं ते दक्षिणेंतील प्रबल होत चाललेल्या विजयानगरच्या हिंदु राजासहि बिनदिक्कतपणें आपल्या मदतीस बोलावीत असत. इ.स. १५४३ सालीं बुऱ्हाण निजामशहा हा विजयानगरचा रामराय व गोवळकोंडयाच्या कुतुबशहा यांची मदत घेऊन विजापूरच्या मुलुखावर चालून आला, तेव्हां इब्राहिम आदिलशहाचा वृद्ध व इमानी प्रांत आसदखान यानें विजयानगरशीं तह करून व निजामशहास सोलापूर महाल देऊन मागें परतविलें व कुतबशहाशीं एकटयाशीं युद्ध करून त्याचा पूर्णपणें पराभव केला. यानंतर निजामशहानें पुन्हां उचल खाल्ली; परंतु आतां त्याचा एकटयाचा पराभव करणें आदिलशहास जड गेलें नाहीं; परंतु इब्राहिम आदिलशहाच्या दुर्वर्तनामुळें यापुढें मात्र विजयश्रीनें आदिलशाही घराण्यास सोडून निजामशाहीस माळ घातली. बुऱ्हाण निजामशहानें अवघ्या सहा महिन्यांत विजापूरच्या राज्यावर दोनदां स्वारी करून विजय संपादन केले. पुढें १५४९ सालीं आसदखान मरण पावला, तेव्हां तर बुऱ्हाण निजामशहास चांगलेंच फावलें. त्यानें विजयानगरच्या रामरायाशीं दोस्ती करून विजापूरच्या मुलुखावर स्वारी केली आणि स्वतःकरितां कल्याणी, व सोलापूर या विजयानगरकरितां रायचूर व मुद्गल हीं काबीज केलीं. पुढें इ.स. १५५३ मध्यें बुऱ्हाण निजामशहा मरण पावल्यावर त्याचा पुत्र हुसेन गादीवर आला, तेव्हां इब्राहिमानें कल्याणी व सोलापूर परत मिळविण्याच्या उद्देशानें हुसेनच्या प्रतिपक्ष्यास मदत करून त्यास अहमदनगरच्या गादीवर बसविण्याच घाट घातला; पण हुसेनकडून पराभव पावल्यामुळें त्यास नामोहरम होऊन परत यावें लागलें. यानंतर आदिलशहाच्या वाढत्या गैरवर्तणुकीमुळें त्याच्या स्वतःच्याच राज्यांत बंडें उपस्थित होऊन त्यास विजयानगरची कुमक घ्यावी लागली.

इब्राहिम आदिलशहा या दुःस्थितींत फार दिवस जगला नाहीं. इ.स. १५५७ मध्यें त्याला मृत्यु येऊन त्याचा पुत्र अली आदिलशहा गादीवर आला. यानें राज्यारूढ होतांच विजयानगरच्या रामरायाशीं दोस्ती केली व त्याच्या मदतीनें निजामशहावर स्वारी करून इ.स. १५५८ त त्याजकडून कल्याणीचा किल्ला परत घेतला. तेव्हां हुसेन निजामशहानें कुतुबशहास आपली मुलगी देऊन त्याच्याशीं सख्य केलें व त्याच्या मदतीनें विजापूरच्या मुलुखावर चाल करून येऊन कल्याणीस वेढा घातला. मागील स्वारीच्या वेळीं हिंदूंच्या उद्धटपणाचा कटु अनुभव अली आदिलशहास आला होता, तरी त्यानें या वेळीहि पुन्हां विजयानगरची मदत घेऊन कल्याणीचा वेढा उठविला. विजयनानगरच्या मदतीनें आदिलशहास आपला सोलापूरचा किल्लाहि निजामशहापासून सहज सोडवितां आला असता; पण हिंदूंच्या उद्धटपणाचा व अत्याचाराचा इतका कडेलोट झाला कीं, आदिलशहा घाबरून गेला व केवळ नळदुर्ग नामक एक कमी महत्त्वाचा किल्ला हस्तगत करून त्यानें विजयानगरच्या सैन्यास वाटेस लाविलें. वरील मोहिमींतील हिंदूंच्या वर्तनामुळें मुसुलमानांस चीड येऊन ते आपले खासगी द्वेष बाजूस ठेवून एकत्र झाले. इ.स. १५६४ त आपसांतील स्नेहबंधनें दृढ करण्यासाठीं चांदबीबी नांवाची आपली मुलगी व सोलापूरचा किल्ला हुसेन निजामशहानें आदिलशहा दिला व सर्व मुसुलमान राजांनीं एकजुटीनें विजयानगरच्या राज्यावर स्वारी करून इ.स. १५६५ मध्यें तालीकोटच्या लढाईंत त्या प्राचीन हिंदू राज्यास धुळीस मिळविलें.

तथापि मुसुलमानी राजांतील ही एकी विजयानगरचें राज्य नष्ट झाल्यावर क्षणभरहि टिकली नाहीं. त्याच वर्षीं अली आदिलशहा दक्षिणेंतील मोहिमींत गुंतला आहे, असें पाहून निजामशाही सैन्यानें विजापूरवर स्वारी केलीच, तेव्हां उलट निजामशाही तख्तावर बालराजा आल्यामुळें तेथील दरबारी घोंटाळे माजलेले पाहून. इ.स. १५६७ त अली आदिलशहानें निजामशाहीचा कांहीं मुलूख काबीज करून त्याच्या रक्षणार्थ धारूर नामक किल्ला बांधला; पण निजामशाही सैन्यानें हा मुलूख आदिलशहाकडे फार दिवस राहूं दिला नाहीं. यानंतर इ.स. १५६८ त अली आदिलशहानें दक्षिणेंत स्वारी करून अदनानीचा मजबूत किल्ला काबीज केला. व पुढें त्यानें मूर्तिजा निजामशहाची गांठ घेऊन त्यास वऱ्हाड काबीज करण्यास मुभा देऊन स्वतःला दक्षिणेंतील विजयानगरच्या मुलुखावर अम्मल बसविण्यास मोकळें करून घेतलें. त्याप्रमाणें अली आदिलशहानें इ.स. १५७३ त दक्षिणेंत मोहीम केली व तोरगळ, धारवाड, बंकापूर इत्यादि किल्ले काबीज करून व जेर, चंद्रगुंडी वगैरे ठिकाणच्या पाळेगारांपासून खंडण्या घेऊन सुमारें तीन वर्षांनीं तो विजापुरास परत आला.

येणेंप्रमाणें राज्याच्या अभिवृद्धीसाठीं इष्ट असलेली शांतता आदिलशाहीस चांगली दहा बारा वर्षे लाभली. अली आदिलशहाच्या मरणापूर्वी विजयापूरच्या राज्याच्या चतुःसीमा ग्रांटडफनें येणेंप्रमाणें दिल्या आहेत. उत्तर-नीरा नदी, अक्कलकोट, नळदुर्ग व कल्याण हे सरहद्दीवरील जिल्हे होते. पश्चिम-कांहीं अपवाद सोडून बाणकोटपासून रामास भूशिरापर्यंत समुद्रकिनारा. दक्षिण-तुंगभद्रा नदी. या नदीच्या दक्षिणेस असलेला अदवानी जिल्हा व कदाचित् नंधील (?) जिल्हा विजापूरकरांकडेच होता. पूर्व-रायचूर, यादगीर, मूळखेड व बेदर या आदिलशाही जिल्ह्यांची सरहद्द.

पुढें १५८० मध्यें अली आदिलशहाचा वध होऊन त्याचा पुतण्या इब्राहिम हा अल्पवयी राजा गादीवर आला, तेव्हां मूर्तिजा निजामशहानें आदिलशाही मुलुखावर स्वारी करून जुनें वैर उकरून काढलें. तथापि त्यास पराभव पावून परत यावें लागलें. पुढें त्यानें कुबशहाच्या मदतीनें आदिलशाहीवर पुन्हां स्वारी केली; पण विजापूरच्या दरबारांतील अबदुल हसन नामक सरदाराच्या परिश्रमानें याहि वेळीं आदिलशाही राज्य संकटांतून बचावलें. यानंतर कांहीं काळानें मूर्तिजा निजामशहाचा मुलगा मिरान हुसेन व इब्राहिम आदिलशहाची बहीण खुदीजा सुलताना यांमध्यें शरीरसंबंध होऊन दोन्ही राजांत पुन्हां नवीन नातें उत्पन्न झालें; पण मूर्तिजा निजामशहा व मिरान हुसेन या दोघांचेहि पुढें लवकरच एका वर्षाच्या अंतरानें वध होऊन जमालखान नामक सरदारानें सत्ता बळकाविल्यामुळें इब्राहिम आदिलशहानें इ.स. १५८८ मध्यें अहमदनगरावर स्वारी करून आपल्या बहिणीस विजापुरीं परत आणलें व नंतर जमालखानाचा पाडाव करण्याच्या कामीं मूर्तिजाचा भाऊ बुऱ्हाण यास कुमक पाठविली; पण बुऱ्हाण निजामशहास या उपकारांची आठवण फार दिवस राहिली नाहीं. आदिलशहाचा बंडखोर सरदार दिलावरखान यास आश्रय देऊन त्याच्या चिथावणीनें त्यानें इ.स. १५९२ मध्यें विजापूरच्या मुलुखावर स्वारी केली व तींत अपयश आलें, तेव्हां पुन्हां दोन वर्षांनीं तो इब्राहिम आदिलशहास पदच्युत करण्याच्या कटांत सामील झाला. तथापि इब्राहिमाच्या मुत्सद्दीपणापुढें हार खाऊन त्यास स्वस्थच बसावें लागलें.

मों ग लां वि रु द्ध नि जा म शा ही स म द त. - दुसरा इब्राहिम आदिलशहा हा विचारी व उदार अंतःकरणाचा राजा होता त्याच्या हातीं सत्ता आल्यापासून त्यानें निजामशाही विरुद्ध लाढाईचें धोरण कधींच स्वीकारलें नाहीं. निजामशाही विरुद्ध त्याला ज्या ज्या लढाया कराव्या लागल्या त्या बहुतेक बुऱ्हाणनिजामशहाच्या अविचारानेच उपस्थित झाल्या होत्या. इ.स. १५९४ मध्यें बुऱ्हाण निजामशहा मृत्यु पावून निजामशाही राज्यांत अव्यवस्था झाली तेव्हां इब्राहिमाच्या सल्लागारांनीं त्यास या संधीचा फायदा घेण्याचा उपदेश केला; पण त्यानें तो ऐकला नाहीं. इतकेंच नव्हे तर पुढें निजामशाहींतील घोंटाळयांचा फायदा घेऊन ती घशांत घालण्याकरितां अकबरानें दक्षिणेंत फौज पाठविली, तेव्हां अहमदनगरचें रक्षण करण्यासाठीं आदिलशहानें निजामशाही घराण्यांतील आपली चुलती चांदबीबी हिला यथाशक्ति मदत केली. अहमदनगरास मोंगलांच्या प्रचंड सैन्याचा वेढा पडून निजामशाही सैन्याचा पराभव होत असल्याचें त्यास कळतांच त्यानें सोहलखानास पंचवीस हजार स्वारांनिशीं सरहद्दीकडे निजामशाही सैन्यास मदत करण्यासाठीं रवाना केलें. नंतर वऱ्हाडप्रांत देऊन मोंगलाशीं तह झाल्यावर मिआनमंजू नामक सरदारानें चांदबीबीनें पुरस्कार केलेल्या बहादूर नामक राजपुत्राविरुद्ध अहंमद नांवाच्या एका तोत यास तख्तावर बसविण्याचा हट्ट धरला. तेव्हां इब्राहिम आदिलशहानें मिआनमंजुची समजूत घालून तोतयास नेमणूक करून दिली व मिआनमंजूस आपल्या पदरीं सरदारी दिली. अशाच प्रकारें महंमदखान नामक दुसऱ्या एका निजामशाही सरदारानें पुंडाई आरंभली तेव्हां आदिलशहानें चांद सुलतानाच्या सहाय्यास आपली फौज पाठविली. यानंतर मोंगल वऱ्हाडप्रांताबाहेर पाय पसरीत आहे असें आढळून आल्यावरून इ.स. १५९७ मध्यें त्याच्या सैन्यानें निजामशाहीबरोबर मोंगलाशीं मोठी लाढाई दिली. दुसरा मूर्तिजा निजामशहा तख्तनशीन झाल्यावर इ.स. १६१० सालीं त्याच्या उपद्व्यापास कंटाळून त्यास पदभ्रष्ट करण्याचें मलिकंबराच्या मनांत आलें तेव्हां इब्राहिम आदिलशहानेंच मलिकंबरांस उपदेश करून पुन्हां आपल्या धन्यास मान द्यावयास लाविलें. पण पुढें इ.स. १६१७ (१६१५?) सालीं मात्र आदिलशहानें आपण स्वतः तटस्थ राहून मलिकंबरास शरण आणण्याच्या कामीं शहाजहानास मदत केली. पुढें थोडयाच वर्षांनीं (इ.स. १६१९ मध्यें) आदिलशहानें अमीर बेरिदावर स्वारी केली व बरीदशाही बुडवून बेदरचा किल्ला आपल्या राज्यांत समाविष्ट केला. इ.स. १६२१ मध्यें आदिलशाही फौज दक्षिणेस बंडखोराच्या पारिपत्यास गेलीं असतां तिकडे तिनें कर्नूळचा किल्ला घेतला. वर सांगितलेल्या आदिलशहाच्या तटस्थपणामुळें असो किंवा दुसऱ्या कांहीं कारणामुळें असो मलिकंबर यापुढें आदिलशहाशीं व त्याचप्रमाणें आपल्या धन्याशीहि बेपर्वाईनें वागूं लागला. आदिलशहास हें सहन झालें नाहीं. त्यानें मोंगलांचे साहाय्य घेऊन इ.स. १६२३ मध्यें अहमदनगरास चाल केली. परंतु मलिकंबरानें या सैन्याचा भातोडी येथें धुव्वा उडवून आदिलशहाकडील कित्येक चांगले चांगले सरदार कैद केले, इतकेंच नव्हे तर पुढच्या वर्षी उलट तोच स्वतः विजापूरवर चाल करून गेला व त्या शहराची नासाडी करून आदिलशाहाचा बराचसा मुलूखहि त्यानें हाताखालीं घातला.

इ.स. १६२६ मध्यें इब्राहिम आदिलशहा मरण पावला. त्याची विजापूर येथें असलेली भव्य व सुंदर कबर ही फार प्रेक्षणीय इमारत आहे. एकंदरींत हा फार चांगला राजा होता असें दिसतें. हा मेला तेव्हां त्याच्या खजीन्यांत विपुल पैसा असून देशाची भरभराट होती. याच्या सैन्यांत ८०,००० घोडेस्वार व दोन लक्ष पायदळ होतें असें जें विजापूरच्या बखरींत म्हटलें आहे त्यांत कांहीं अतिशयोक्ति असली पाहिजे हें उघड असलें तरी त्याची सेना बरीच मोठी होती एवढें यावरून अनुमान काढण्यास कांहीं हरकत नाहीं. असें ग्रांट डफ म्हणतो.

इब्राहिमच्या मागून त्याचा पुत्र महंमद गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीचेंहि अहमदनगरविषयक धोरण एकंदरींत त्याच्या बापासारखेंच सुज्ञपणाचें होतें. इकडे इब्राहिम आदिलशहा मरण पावला त्याच सुमारास तिकडे मलिकंबरासहि मृत्यु येऊन निजामशाही राज्यांत पुन्हां बखेडे सुरू झाले व मोंगल पुन्हां स्वारी करून निजामशाही बुडवितात कीं काय अशी धास्ती वाटूं लागली. महमद आदिलशहास निजामशहा व मोंगल यांमधील युद्धांत पडण्यास काय कारण झालें याची हकीगत ग्रांटडफ देतो ती अशीः-

शहाजहान बादशहाचा सेनापति अजिमखान यानें अहमदनगरपासून धारूरचा किल्ला घेतला तेव्हां महमद आदिलशहा यानें आपला सेनापति रणदुल्लाखान यास पाठवून, मोंगल व विजापूरकर यांच्यामध्यें मलिकंबराच्या वेळीं झालेल्या एका गुप्त तहानुसार तो किल्ला आपल्या स्वाधीन करण्यांत यावा अशी अजिमखानास विनंती केली. यावर विजापूरकरांनी कराराप्रमाणें अहमदनगराचें राज्य घेण्याच्या कामीं मोंगल बादशहास मदत केली नसल्यामुलें या किल्ल्यावर त्यांचा हक्का पोहोंचत नाहीं असें अजिमखानानें उत्तर दिलें. याच वेळीं निजामशहानें आदिलशहास सोलापूरचा किल्ला परत करुन मोंगलापासून संरक्षण करण्याकरितां त्याची दोस्ती संपादन केली. परंतु त्यांचें कारस्थान परिवक्कदशेस येण्यापूर्वींच रणदुल्लाखान व मोंगल सैन्य यांमध्यें लढाई होऊन तींत विजापूरच्या सैन्याचा पराभव झाला (१६३१).

आदिलशहा व मोंगल यांमध्यें कलह उत्पन्न होतांच शहाजहान बादशहानें असफखान याच्या हाताखालीं दक्षिणेंत मोठें सैन्य पाठविलें. असफखानानें त्याच वर्षी म्हणजे इ.स. १६३१ तच विजापुरास वेढाहि दिला होता. परंतु विजापूरकरांनीं मोंगल सैन्यास दाणावैरण वगैरे कांहीं मिळूं न दिल्यामुळें आसफखानानें वेढा उठविला व पश्चिमेकडे मिरजेपावेतों मुलुख लुटीत व उध्वस्त करीत तो परत गेला.

निजामशाही दरबारांत सध्यां मलिकंबराचा पुत्र फत्तेखान हाच सर्व सत्ता बळकावून बसला असून, शहाजी हा आपला सासरा जाधवराव याचा खून झाल्यामुळें अहमदनगर सोडून निघाला होता. दौलताबाद किलल्यांतील शिबंदीची अव्यवस्था व निजामशाहींतील असंतोष या दोन कारणांमुळें दौलताबाद किल्ला सहज हस्तगत करतां येईल असें शहाजींनें आदिलशहाच्या नजरेस आणल्यावरून, आदिलशहानें तो किल्ला घेण्याकरितां फौज पाठविली. हें वर्तमान कळतांच निजामशाहीतील कारभारी फत्तेखान यानें मोंगलाचा दक्षिणचा सुभेदार मोहबतखान याची मदत मागितली. परंतु तो दौलताबादच्या किल्याजवळ आल्यावर विजापूरकरांनीं फत्तेखानास आपल्याकडे वळवून घेतलें व किल्यांतून फत्तेखानानें व बाहेरून विजापूरकरांनीं मोहबतखानाच्या सैन्यावर तोफांचा भडिमार करण्यास सुरवात केली. तेव्हां मोहबत खानास त्वेष येऊन त्यानें किल्यास वेडा देऊन तो हस्तगत केला व खान डौरान यास किल्याच्या संरक्षणार्थ ठेवून आपण स्वतः विजापूरच्या सैन्याचा पाठलाग कण्यासाठीं निघाला (१६३३). विजापूरचें सैन्य मागें हटत असतां दोन्ही सैन्यांत कित्येक चकमकी झाल्या. मोहबत्तखान विजयापूरच्या राज्यांत बराच दूरवर आल्यावर, महमद आदिशहाचा कारभारी मुरारपंत यानें त्यास तहाच्या बोलण्यास गुंतवून, सैन्याच्या एका तुकडीस दौलताबादेवर अचानक हल्ला करण्याकरितां पाठविलें, परंतु तिला तो किल्ला घेतां आला नाहीं. पुढें मोंगल सैन्यानें परांडा किल्ल्यास वेढा दिला. पण तो किल्ला स्वाधीन न झाल्यांमुळें त्या सैन्यास वेढा उठवावा लागला इतकेंच नव्हें तर मागें हटत हटत बऱ्हाणपूरपर्यंत परत जावें लागलें (१६३४).

इ.स. १६३५ मध्यें शहाजहान बादशहानें विजापूरकर व शहाजी यांवर एक मोठया सैन्याची योजना केली. या सैन्यानें शहाजी व विजापुरकर यांचे एकामागून एक असे कित्येक किल्ले घेतले. परंतु शहाजीनें मधून मधून मोंगल सैन्यावर हल्ले करावे व ते पाठलाग करण्याकरितां आलें कीं त्याला चुकांडी द्यावी हा मार्ग स्वीकारला होता व इकडे महमद आदिलशहानेंहि विजापुरच्या तटबंदीबाहेरील तळीं  व विहिरी कोरडया करून टाकल्यामुळें, विजापुरला वेढा देणें अशक्य झालें होतें. तेव्हां मोंगल सैन्यानें शत्रूच्या मुलुखांत जिकडे तिकडे लुटालुट व जाळपोळ करून तो उध्वस्त करून टाकण्यास सुरूवात केली, व अशा रीतीनें आदिलशहास तहाचें बोलणें लावण्यास भाग पडलें (१६३६). या तहानें परांड व सोलापूर हे दोन किल्ले व त्यांच्या खालील प्रदेश, सोलापूरच्या पूर्वेस असलेले नळदुर्ग, बेदर व कल्याणी हे जिल्हे आणि उत्तरेस वसईनदीपावेतोंचा व भीमा व निरा या नद्यांमधील निजामशाहीचा मुलूख एवढें विजापुराकरांकडे ठेवण्यांत येऊन, त्यांनीं मोंगल बादशहास सालीना वीस लक्ष होन खंडणी द्यावी, व शहाजी शरण येऊन त्यानें आपले सर्व किल्ले सोडले नाहींत तर महमद आदिलशहानें त्यास कोणत्याहि प्रकारची मदत करूं नये असें ठरलें.

म रा ठ्यां चा उ द य. - आदिलशाहींत आरंभापासूनच मरांठ्याच्या कर्तृत्वास अनुकूल अशी परिस्थिति होती. आलिदशाहीचा संस्थापक युसफ आदिलशहा मुसुलमान होता तरी त्याचा मराठ्यांवर मुळींच कटाक्ष नव्हता. इब्राहिम आदिलशहा सिंहासनारूढ झाल्यावर (ग्रांटडफप्रमाणेंम इ.स. १५५५ त) त्यानें तर सरकारी हिशेबाच्या कामीं फारशीच्या जागीं मराठी भाषा उपयोगांत आणली. महत्त्वाच्या सनदा मात्र दोन्ही भाषांत लिहिल्या जात होत्या. या योगानें महाराष्ट्र ब्राह्मणांच्या हातीं अधिकाधिक सत्ता येऊं लागली. त्यानें आपल्या सैन्यांतील बरेचसे परदेशी शिपाई काढून टाकून त्याऐवजी तीस हजार दक्षणीं घोडेस्वारांची फौज ठेवली व कित्येक सरदाऱ्याहि महाराष्ट्रीय लोकांस दिल्या. बारगीर ठेवण्याची पद्धतीहि यानेंच प्रचारांत आणली. सोळाव्या शतकांत विजापूरच्या चाकरींत असलेले मराठे सरदार अनेक होते. चंद्रराव मोरे, रावनाईक निंबाळकर उर्फ फलटणराव, झुंजारराव घाटगे, माने, घोरपडे, डफळे, वाडीचे सावंत, इत्यादि अनेक नांवें उदाहरणादाखल देतां येतील. आदिलशहांचे बरेचसे विजय मराठे लोकांच्या मदतीनेंच मिळविलेले होते. तथापि त्यांस राज्यविस्तार करीत असतांना मराठ्यांविरूद्ध मुळींच झगडावें लागलें नव्हतें असें मात्र नाहीं. इ.स. १५७८ ते अली आदिलशहानें कर्नाटकांतील बर्गीं सरदारांचा पुंडावा मोडण्याकरितां आपली फौज पाठविली होती. परंतु तिचें मराठे घोडेस्वारांपुढें कांहीं न चालल्यामुळें शेवटीं अली आदिलशहानें कारस्थान रचून या सरदांराचा विश्वासघातानें जीव घेतला असें फेरिस्ता म्हणतो. तथापि मराठ्यांनां पुढें आणण्याचें खरें श्रेय बर्गीसारख्या पुंड टोळयांनां नसून जो निजामशाहीच्या राजकारणांत कित्येक वर्षे मुरला होता व त्यानें मोगल बादशाहीस कित्येक वर्षे झुंलविलें त्या राजकारणपटु शहाजीसच दिलें पाहिजे. हें कार्य आपण स्वतः पडद्याआड राहून साधण्यास आलिदशाहींत प्रवेश झाल्यावर शहाजीस चांगली संधि मिळाली.

शहाजीच्या जहांगिरीचा विस्तारः - इ. स. १६३७ त मुरारपंताच्या शिफारशीवरून महमद आदिलशहानें शहाजीस आपल्या पदरीं चाकरीस ठवूने त्यास पुणें व सुपे हे दोन परगणे जहागीर दिले. यानंतर लवकरच रणदुल्लाखान नांवाच्या आपल्या सेनापतीबरोबर शहाजीस देऊन त्या दोघांची महमद आदिलशहानें कर्नाटकच्या स्वारीवर रवानगी केली. कर्नाटकांत शहाजीनें बजावलेल्या कामगिरीमुळें खूष होऊन विजापूरदरबारानें त्यास कर्नाटकांत हेसकोटें, बाळापूर, शिरें, बंगलोर व कोल्हार हे जिल्हे व महाराष्ट्रांतील इंदापूर व बारामती हे दोन परगणे जहागीर करून दिले, व कऱ्हाड जिल्ह्यांतील २२ परगण्यांच्या देशमुखीची त्यास सनद करून दिली.

महमद आदिलशहा स्वतःशूर माणूस नव्हता. तो विजापूर सोडून क्वचितच बाहेर जात असे. आपली फौज सेनापतीच्या स्वाधीन करून तो स्वतः विजापुरांत नगरसुधरणा करण्यांत गर्क झाला होता. यामुळें शहाजीस मुकाटयानें आपली सत्ता वाढविण्यास चांगलेंच फावलें. त्यानें आपली स्त्री जीजाबाई व मुलगा शिवाजी यांच्या स्वाधीन आपली महाराष्ट्रांतील जहागीर करून व त्यांच्या मदतीस आपलीं विश्वासू माणसें ठेवून तो स्वतः कर्नाटकांत वेगळा राहूं लागला.

शिवाजींचा उद्योग व शहाजीस कैदः - इ.स. १६४६-४७ या दोन वर्षांच्या अवधींत शिवाजीनें तोरणा, चाकण, कोंडाणें, व पुरंदर हे किल्ले हस्तगत करून रक्तपात वगैरे कांहीं एक न करतां चाकणपासून नीरा नदीपावेतों मुलूख आपल्या कबजांत घेतला, व मोखध टेकडीवर राजगड नांवाचा एक नवीन किल्ला बांधला. महमदशहास या सर्व गोष्टी समजल्या असल्या तरी, जोंपावेतों स्वतः शहाजी आपल्या ताब्यांत आहे तोंपर्यंत आपणांस असल्या गोष्टीं विषयीं काळजी करण्याचें कांहीं कारण नाहीं असे त्यास वाटलें असावें. पण पुढें इ.स. १६४८ मध्यें शिवाजीनें कल्याणहून विजापूरकडे जाणारा खजीना लुटून कल्याण व त्याच्या आसपासचे किल्ले घेतले, व लोहगड, राजमाची, भूरप, तिकोना, कांगोरी, कोआरी [?] तळें, घोंसाळे व रायरी हीं एकामागून एक आपल्या ताब्यांत घेतलीं, तेव्हां विजापूरदरबारास फार काळजी वाटूं लागली. शिवाजीस त्याच्या वडिलांकडूनच उत्तेजन मिळत असलें पाहिजे अशी महमद आदिलशहाची समजूत असल्यामुळें फौज पाठवून शिवाजीचा बंदोबस्त करण्यास तो कचरत होता. त्यानें मुधोळच्या बाजी घोरपडयास गुप्त संदेश पाठवून त्याच्याकडून शहाजीस कैद करविलें, व दिलेल्या मुदतींत शिवाजी शरण आला नाहीं तर त्याच्या दगडी तुरुंगास ठेविलेलें एक भोंकहि कायमचें बंद करून त्याचा जीव घेण्याचा धाक घातला (१६४९).

शिवाजीचा बंदोबस्त करण्यास अडचणीः - परंतु शिवाजीनें शहाजहान बादशहास अर्ज करून आपल्या वडिलांची तुरुंगांतून सुटका करून घेतली. यानंतर चार वर्षेंपर्यंत शहाजीस विजापूर सोडून जाण्याची आदिलशहानें परवानगी दिली नव्हती; पण इ.स. १६५३ त कर्नाटकांत बरीच गडबड माजली असल्याविषयीं दरबारांत बातम्या येऊं लागल्या, तेव्हां मात्र शहाजीस बंदोबस्त करण्यासाठीं कर्नाटकांत जाऊं देणें आदिलशहास भाग पडलें. शहाजी विजापुरांत असतांना शिवाजीवर फौज पाठवावी, तर महंमद आदिलशहास अशी भीति वाटत होती कीं, तसें केलें असतां शिवाजी नुकताच घेतलेला कल्याणसभोंवतालचा प्रदेश मोंगल बादशहाच्या स्वाधीन करील, व मग आपण त्या प्रदेशास कायमचेंच मुकूं. कारण विजापुराकडील खंडणी तुंबलीं असल्यामुळें शहाजहान बादशहास तो मुलूख आपल्या ताब्यांत घेण्यास ह चांगलीच सबब होती. मध्यंतरीं बाजी शामराजाकडून शिवाजीस पकडण्याचा आदिलशहानें प्रयत्न केला पण तो सफल झाला नाहीं (१६५१-५२).

महमद आदिलशहा ता. ४ नोव्हेंबर सन १६५६ रोजीं विजापूर येथें मरण पावला. महंमद आदिलशहानें मोंगलांची खंडणी नियमितपणे अशी कधींच दिली नव्हती. परंतु त्यानें दाराच्या मार्फत मोंगलाच्या दरबारीं वशीला लावून शहाजहानाशीं सख्य ठेविले होतें. अवरंगजेबाच्या मनांत दक्षिणदेश पादाक्रांत करून घेण्याचे विचार कित्येक दिवसांपासून घोळत होते. परंतु त्यांतहि महमद आदिलशहाच्या दारांशी असलेल्या या संबंधांमुळें त्याचा विजापुरावरच विशेषच दांत होता. महमद आदिलशहाच्या निधनानंतर त्याचा पुत्र अली आदिलशहा सिंहसनारूढ झाला. तेव्हां त्याचें वय एकेणवीस वर्षाचें होतें. त्याच्या राज्याचें उत्पन्न अजूनहि बरेंच होतें, खजीन्यांत विपुल पैसा होता व देश सुपीक होता. त्याचें सैन्य बरेंच मोठें होतें तरी तें या वेळीं कर्नाटकांतील बंडखोर जमीदारांस हुकुमतींत आणण्यांत गुंतलें असल्यामुळें विभागलेलें होतें.

मोंगलाची कुरापतः - अली आदिलशहा तख्तनशीन झाला तेव्हां त्यानें शहाजहान बादशहाच्या अपेक्षेप्रमाणें त्यास सम्राट, म्हणून नजराणा पाठविला नाहीं किंवा गादीवर बसण्यास त्याची परवानगी देखील घेतली नाहीं, ही गोष्ट शहाजहानास न आवडून त्यानें असें जाहीर केलें कीं,  ''अली आदिलशहा हा माजी सुलतानाचा खरा मुलगा नसल्यामुळें विजापूरच्या गादीस वारस नेमण्याचा हक्क मोंगल बादशहास आहे.'' याप्रमाणें विजापूरकरांशीं युद्ध करण्यासाठी कांहीं तरी कारण उकरून काढून शहाजहानानें मीरजुमला व अवरंगजेब यांची विजापूरच्या स्वारीवर नेमणूक केली. इ.स. १६५७ च्या मार्च महिन्यांत आपली सर्व तयारी पूर्ण करून अवरंगजेब व मीरजुमला हे विजापूरच्या मुलखांत चालून आले. कल्याण, बेदर व कुलबुर्गा हे तीनहि किल्ले एकामागून एक त्यांच्या हातीं पडले व ते बिलकुल वेळ न गमावितां विजापूरच्या रोखानें जाऊं लागले. मध्यंतरी विजापूरच्या फौजेनें मोंगल सैन्यावर वारंवार हल्ले करून त्यांनां अगदीं सतावून सोडलें होतें; परंतु लवकरच अवरंगजेबानें विजापूरचा कारभारी व सेनापति खान महमद यास लांच देऊन फितूर केल्यामुळें त्यानें मोंगलांच्या सैन्यास अडवून धरण्यांत कुचराई केली. विजापूरकरांकडील दुसरे सरदार शत्रूच्या सैन्याच्या मार्गात विघ्नें आणण्याकरितां आपणाकडून धडपड करीत होते; परंतु त्यांनां मुख्य सेनापतीची मदत न राहिल्यामुळें. विजापूरच्या लोकांनी त्यांच्या मेहंमींच्या वहिवाटीप्रमाणें शहराबाहेरील पाणी व दाणावैरण नाहींसें करण्यापूर्वीच अवरंगजेबाच्या सैन्याचा विजापुरास वेढा पडला. या वेळीं विजापूर काबीज करणें फारसें कठिण काम नव्हतें; परंतु याच सुमारास अवरंगजेबास आपला बाप अत्यवस्थ असल्याची बातमी समजल्यामुळें त्यानें आदिलशहानें लाविलेलें तहाचें बोलणें मान्य केलें. व त्याच्यापासून बराच नगदी पैसा घेऊन तो घाईघाईनें उत्तरेस निघून गेला.

इ.स. १६५८ त आदिलशहानें आपला कारभारी खान महमद यास त्याच्या विश्वासघाताबद्दल प्रायश्चित म्हणून मारेकर घालून मारविलें; परंतु त्याची मालमत्ता जप्त न करतां ती त्याचा मुलगा खवासखान यासच देण्यांत आली.

शिवाजीवर अफजलखानाची नेमणूक व त्याचा वधः - शिवाजीचा आदिलशाहीविरुद्ध प्रयत्न यापूर्वीच उघड झाला होता तरी इ.स. १६५९ पर्यंत आदिलशहास त्याच्या पारिपत्यार्थ सैन्य पाठविण्यास सवड झाली नाहीं. त्या सालच्या सपटंबर महिन्यांत विजापूरदरबारानें शिवाजीच्या पारिपंत्याकरितां ५००० फौज ७००० निवडक लोकांचें पायदळ, भर भक्कम तोफखाना, आणि उंटावरील जेजाला वगैरे भरूपूर साहित्य बरोबर देऊन अफजलखान नांवाच्या सरदाराची योजना केली. परंतु तो प्रतापगडाखाली शिवाजीच्या मुलाखतीस आला असतां शिवाजीनें त्याच्या पोटांत वाघनखें खुपसून त्याचा प्राण घेतला, व त्याच्या बेसावध फौजेवर छापा घालून तिची धूळधाण केली. या प्रसंगीं विजापूरकरांचे ४००० घोडे व खजीन्यासुद्ध छावणींचे सर्व सामान शत्रूच्या हातीं सांपडले.

शिवाजीची पुंडाईः - अफजलखानाच्या वधानंतर इ.स. १६५९ तच शिवाजीनें पन्हाळा, पारनगड, वसंतगड, रांगणा, खेळणा व सह्याद्रीच्या घांटमाथ्यावरील व खालील पन्हाळ्याच्या आसपासचे इतर सर्व किल्ले घेतले. त्यानें कृष्णानदीच्या कांठानें खंडणी वसूल करीत जाऊन बत्तीससेराळच्या गलीत ठाणेंहि घातलें होतें. शिवाजीच्या या कृत्यास आळा घालण्याकरितां त्याच सालच्या दिसेंबर महिन्यांत मिरज येथील रुस्तुमजमान नांवाच्या सरदाराची योजना झाली. पण शिवाजीनें त्याच्या फौजेचा धुव्वा उडवून त्यास कृष्णेपार घालवून दिलें, व अगदी विजापूरच्या जवळपासपर्यंत खेडीं लुटीत व गावोंगांवाहून खंडण्या गोळा करीत जाऊन तो त्वरेनें खेळण्यास (विशाळगड) परत आला. यानंतर (जानेवारी १६६०) त्यानें राजापूरापासून खंडणी गोळा केली, व दाभोळ व त्याखालील प्रदेश काबीज केला.

शिद्दी जोहाराकडून पन्हाळा काबीजः - शिवाजीनें एकामागून एक मिळविलेल्या विजयामुळें विजापुरकर इतके घाबरून गेले कीं, दरबारांतील सरदारांनीं आपसांतील भांडणें घटकाभर बाजूस ठेऊन कर्नूळच्या शिद्दी  जोहाराची, बरीच मोठी सेना बरोबर देऊन शिवाजीवर रवानगी केली, व त्याच वेळी जंजीऱ्याच्या फत्तेखानानें व वाडीच्या सावंतांनीं शिवाजीच्या मुलखावर हल्ला करावा असें ठरलें. पन्हाळ्याचें रक्षण करण्याकरितां स्वतः शिवाजीच त्या किल्ल्यांत येऊन राहिला असल्यामुळें शिद्दी जोहारानें प्रथम त्याच किल्ल्यास वेढा दिला ( मे १६६० ). हा वेढा चार महिनेपर्यंत बसला होता. शिवाजीनें तो किल्ला आणखीहि कित्येक दिवसपर्यंत झुंजविला असतां, परंतु किल्याशीं बाहेरचें दळणवळण अगदी बंद पडल्यामुळें  आपले लोक इतर ठिकाणी काय करीत आहेत हें शिवाजीस कळण्यास मार्ग राहिला नाहीं. म्हणून त्यानें किल्ला स्वाधीन करण्यासंबंधीं शिद्दी जोहराशीं बोलणें लावून, त्याचे लोक गाफिल झाले असतां एके रात्रीं तो काहीं निवडक मावळयांसह गुप्तपणें बाहेर पडला. पाठलाग करणाऱ्या सिद्दी जोहराच्या लोकांनीं त्यास दुसऱ्या दिवशीं सकाळीं गांठलें, तेव्हां त्यांनां अडवण्यास बाजी प्रभूस मागें ठेवून तो तेथून सहा मैल असलेल्या रांगणा (?) किल्ल्यावर सुखरूप जाऊन पोंचला ( सपटंबर १६६०).

आदिलशहाचें स्वारींत जातीनें आगमनः - शिवाजी निसटल्याचें वर्तमान ऐकून शिद्दीजोहाराला शिवाजीकडून लांच मिळाली असली पाहिजे अशी आदिलशहास शंका आली, व म्हणून त्यानें शिद्दीजोहारास काढून स्वरीचें आधिपत्य अपाल्या स्वतःकडे घेतलें ( जाने. १६६१ ). पावसाळ्यास सुरुवात होण्यापूर्वीं आदिलशहानें रांगणा व विशाळगड हे दोन किल्ले खेरीज करून पन्हाळा व पन्हाळयाच्या आसपासचे सर्व किल्ले शिवाजीपासून परत घेतले. शिवाजीहि इकडे कांहीं स्वस्थ बसला नव्हता. त्यानें देखील राजापूर व शृंगारपूरकर दळव्यांचा सर्व मुलूख आपल्या ताब्यांत घेतला होता व त्याच सालच्या पावसाळ्यांत त्यानें जंजीऱ्याच्या शिद्दयापासून दंडाराजपूरहि घेतलें.

कर्नाटकांतील बंडें: - पावसाळा संपल्यावर आदिलशहास महाराष्ट्रांतील मोहीम सोडून कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं जावें लागलें. रायचूर व तोरगळ यांवर निकराचे हल्ले करून आदिलशहानें त्यांत आपलें बरेंच शौर्य दाखविलें. परंतु ती स्थळे त्याच्या हातीं आलीं नाहींत (१६६२). त्याच वर्षीं त्यानें शिद्दी जोहाराचा पराभव केला. पुढें शिद्दी जोहाराच्याच लोकांनीं आदिलशहाची क्षमा मिळविण्याकरिता आपल्या धन्याचा वध केल्यामुळें त्याचा कांटा मार्गांतून कायमचाच नाहीसा झाला. बंडे मोडण्यांत दोन वर्षे कर्नाटकांत घालविल्यावर शेवटी सोंध्याच्या राजापासून खंडणी घेऊन आदिलशहा विजापुरास परत आला. परंतु एवढी खटपट करूनहि आदिलशहास त्या प्रांतांतील बंडाचा पूर्ण उपशमं करतां आला नाहींच.

शिवाजीशीं सलोखा - आदिलशहा कर्नाटकांत गेल्यावर इकडे शिवाजीनें मागील मोहिमींत गमावलेला सर्व मुलूख आपल्या ताब्यांत घेतला, व वाडीच्या सावंतांचा देश पादाक्रांत करून त्यांनां आपलें अंकित केलें. शेंवटीं आदिलशहानें इब्राहिमखानाच्या जागीं नेमलेला आपला कारभारी जो अबदुल महमद त्याच्या सल्ल्यावरून शहाजीच्या मध्यस्तीनें शिवाजीशीं सलूख केला ( १६६२). पण इ.स. १६६४ त शिवाजी मोंगलांच्या मुलखांत लुटालूट करण्यांत गुंतला असतां पन्हाळ्यास ठेवलेल्या विजापूरच्या सरदारांनीं तह मोडून कोंकण प्रांत परत मिळविण्याचा नेटाचा प्रयत्न केला. परंतु शिवाजी मोठें सैन्य बरोबर घेऊन त्याच्यावर चालून आला, व आक्टोबर महिन्यांत एका लढाईंत त्यांचा पूर्ण पराभव केला. व लढाईंत विजापूराकडील ६००० लोक मारले गेले असें कारवार व राजापूर येथील इंग्रज वखारवाल्यांनीं लिहून ठेविलें आहे. पुढें इ.स. १६६५ च्या आरंभाला शिवाजीनें आपली कांहीं फौज विचारपूरकरांच्या कृष्णेच्या दक्षिणेकडील मुलखांत लूट करण्यास पाठविली होती असें दिसतें. त्याच सालच्या फेब्रुवारी महिन्यांत त्यानें बार्सेलोराहून बरीच लूट नेली व गोकर्णाच्या आसमंतांतींल मुलुखांत लुटालुट करून कारवारपासून खंडणी घेतली. वर सांगितल्या प्रमाणें विजापूरकरांनी जरी शहाजीच्या मध्यस्थीनें शिवाजीशीं केलेला तह आपण होऊन मोडला होता तरी शिवाजी बरेच दिवसपर्यंत विजापूरकरांच्या फारसा कधीं वाटेस गेला नाहीं. पण इ.स. १६६५ मध्यें त्याचा जयसिंहाशीं जो तह झाला त्या तहानें त्याला विजयापूकरांविरुद्ध मोंगलास मदत करणें भाग पडलें.

पुन्हा मोंगलांची स्वारीः - त्या सालच्या नवंबर महिन्यांत मोंगलाचे सरदार जयसिंह व दिल्लिरखान शिवाजीस आपल्या मदतीस घेऊन विजापूरच्या मोहिमीस आलें. विजापूरकरांच्या अंगांत खंडणी देण्याचें आतां सामर्थ्य न राहिल्यामुळें त्यांची खंडणी नेहमीं तुंबून रहात असे, व म्हणून अवरंगजेबच्या मनांत विजापुरावर केव्हांहि स्वारी करावयाची असली कीं, त्याला खंडणी ही एक चांगलीच सबब होऊन राहिली होती. या संयुक्त सैन्यानें विजापूरच्या निंबाळकर जहागिरदाराचें फलटण व तत्तोऱ्याचा किल्ला घेतला व मार्गांतील तटबंदीची ठिकाणें काबीज करीत ते पुढें चालले. आदिलशहानें मोंगलाशीं युद्ध करण्याची तयारी चालविली होती, तरी तो खंडणी चुकती करण्याचें अभिवचन देऊन स्वारी टाळण्याचा प्रयत्नहि करीत होता. परंतु जयसिंहानें मोहीम तहकूब न केल्यामुळें मंगळवेढयाजवळ विजापूरच्या सैन्यानें मोंगलास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. विजापूरच्या कारभारी अबदुल महमद हा आदिलशहाच्या सैन्याचा यावेळीं सेनापति होता. विजापूरच्या सैन्यानें यावेळीं बरेंच शौर्य दाखविलें. पण त्याचा तादृश उपयोग झाला नाहीं.

पुन्हां विजापुरास वेढा व तह:- इ.स.१६६६ त जयसिंहाने विजापुरास वेढा दिला. परंतु त्याला शत्रुच्या घोडेस्वाराकडून फारच त्रास होऊं लागला. आधल्या वर्षी पाऊस फारच थोडा पडला  अडल्यामुळें जयसिंहाच्या छावणींत पाण्याचा तुटवडा पडला होता व त्याच्या सैन्यांत आजारहि वाढत्याप्रमाणांत होता. त्यांत आणखी शत्रूच्या घोडेस्वरांनी जयसिंहाच्या छावणींत येणारी रसद मारुन नेण्याचा क्रम चालू ठेविला व गोंवळकोंड्याच्या राजानेंहि आदिलशाहाच्या मदतीस कांही फौज पाठविली. अवरंगजेबानें शिवाजीस आपल्या दरबारी बोलविल्यामुळें तो तर मागील सालच्या अखेरीसच त्याला सोडून गेला होता. अशा स्थितीत अवरंगजेबाकडून मदत मिळण्याच्या बाबतींत निराशा झाली. तेव्हां जयसिंहानें अवरंगाबादेस आपलें सैन्य परत नेलें. इ.स. १६६८ त मोंगल व विजापूरकर यांच्यामध्यें आग्रा येथें तह होऊन विजापूर दरबारमार्फत शहा अबदुल हुसेन यानें मोगलांनी विजापूरच्या मुलखास उदद्रव देऊं नये म्हणून सोलापूरचा किल्ला व १,८०,००० होन उत्पन्नाचा मुलूख मोंगलास दिला.

शिवाजीस खंडणी: - विजापूरच्या मुलुखांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा शिवाजीचा बेत आहे ही गोष्ट आदिलशहाचा कारभारी अबदुल महंमद यास  समजतांत त्यानें दरसाल तीन लक्ष रुपये शिवाजीस देण्याचें कबूल करुन त्याच्याशीं सलूख केला (१६६८) हिंदूस खंडणी देणें ही गोष्ट मुसुलमान लोकांस फार अपमानाची वाटत असल्यामुळें हा व अशाच प्रकारचें दुसरे करार नेहमी गुप्त ठेवण्यांत येत होते.

अली आदिलशहाचा मृत्यु व दरबारांतील बजबजपुपी: - ता. १५ डिसेंबर सन १६७२ रोजी विजापूरच्या अली आदिलशहास पक्षघाताच्या विकारानें पछाडलें व लवकरच तो कांहीं दिवसांनी मृत्यु पावला. यावेळीं त्याचा मुलगा सुलतान सिकंदर यास पाचवें वर्ष होतें व अबदुल महंमदाखेरीज करुन विजापूर दरबारांतील सर्व सरदार आपला तळीराम गार करुन घेण्याकरितां धडपडत होते. अबदुल महंमदामध्यें हो दोष नव्हता, परंतु या बंडखोर सरदारांवर वचक ठेवण्याइतकी त्याच्या अंगी धमकहि नव्हती. राजपुत्र वयांत येईपावेतों सर्व राज्यकारभार खवासखानानें चालवावा व आपण व दुसरे दोघे  सरदार यांच्याकडे राज्याच्या निरनिराळ्या भागांचा अधिकार सोंपविण्यांत यावा अशी त्यानें- अली आदिलशहाजवळ शिफारस केली. स्वत: बादशहास ही व्यवस्था  पसंद नव्हती, परंतु  तिला संमति देण्याशिवाय आता गत्यंतरच नव्हतें. राज्यकारभार हातीं आल्यावर खवासखानानें कबुलीप्रमाणें मुजफरखानास कर्नाटकांत पाठविले; परंतु अबदुलकरीमास सेनेचें आधिपत्य देऊन व अबदुस महंमदाचा बाह्यात: सर्व प्रकारें मानमरातब ठेवून त्यांचें समाधान करण्याचा त्यानें प्रयत्न चालविला.

शिवाजीची उचलः - सिकंदर आदिलशहा गादीवर येताच शिवाजींने पुन्हां विजापुरविरुद्ध उचल केली. या सरदारांच्या हाताखालीं असलेल्या ब्राह्मण नोकरांकडून शिवाजीस विजापूर दरबारची बित्तंबातमी लागत असल्यामुळें त्यानें विजापुरांत माजलेल्या बजबजपुरीचा शक्य तितका फायदा घेण्याचा निश्चय केला. त्यानें इ.स. १६७३ च्या मार्च महिन्याच्या सुमारास पन्हाळा घेतला व हुबळी शहर लुटून तेथून अपरंपार संपत्ति नेली. शिवाजीच्या हातून हुबळी शहरांतील जें कांहीं सुटलें होतें त्यावर तेथेंच ठेवलेल्या विजापूरच्या सैन्यानें हात मारून आपली तुंबडी भरून घेतली!

युद्ध - इ.स. १६७३ त शिवाजीनें कारवार, अंकोला वगैरे समुद्रकिनाऱ्यावरील स्थळें घेण्यास आपलें आरमार पाठविलें व इकडे परळी, सातारा, चंदन, वंदन, पांडवगड, नंदगिरि व तत्तोरा हे सर्व किल्ले हस्तगत करून घेतले. तेव्हां विजापूरदरबाराकडून अबदुल करीम याची शिवाजीवर रवानगी झाली. त्यानें पन्हाळ्याच्या आसपासचा मैदानांतील मुलूख शिवाजीपासून घेतला; परंतु इकडे प्रतापराव गुजरानें विजापुराजवळ बिनहरकत लुटालूट करण्यास आरंभ केल्यामुळें अबदुल करीमास परत बोलविण्यांत आलें. प्रतापरावानें मिरज व विजापूर यांच्या दरम्यानच विजापूरच्या सेनापतीस आडविलें व त्यास इतकें सतावून सोडलें की युद्ध तहकूब करण्याविषयीं प्रतापरावास विनंति करणें त्याला भाग पडलें. प्रतापरावानें त्यास विजापूरला सुरक्षित जाऊं दिलें; परंतु कांहीं दिवसांनीं शिवाजी फोंड्यास वेढा देऊन अडकून पडला आहे व प्रतापरावहि दूर वऱ्हाड पैनघाटांत स्वाऱ्या करण्यास गेला आहे अशी संधि साधून अबदुलकरीम पन्हाळां घेण्याच्या उद्देशानें जंगीं तयारी करून विजापूराहून निघाल व प्रतापराव परत येईपर्यंत तो अगदीं पन्हाळ्याजवळ येऊन पोहोचला (१६७४). प्रतापराव गुजर विजापुरच्या सर्व सैन्यावर मागचा पुढचा कांहीं एक विचार न करतां एकदम तुटून पडला. तेव्हां अबदुलकरीमानें त्याच्या सुध्दां त्याच्या कित्येक लोकांची कत्तर करून मुख्य सैन्याची दाणादाण केली. परंतु विजापुरच्या सैन्याची पराभूत झालेल्या लोकांचा पाठलाग करण्यांत फांकाफांक झाली आहे असें पाहून हंसाजी मोहित्याच्या हाताखाली असलेल्या शिलकी फौजेने आदिलशहाच्या सैन्यावर हल्ला केला, व त्याचा पराभव करून अबदुलकरीमास नामोहरण होऊन पुन्हां विजापूरला जावयास लाविलें.

इ.स. १६७५ त शिवाजींने पन्हाळा व तत्तोरा यांच्यामधील सर्व ठाणीं घेऊन फोंड्याचा किल्ला सर केला; परंतु शिवाजी कोंकणांत गेला आहे, अशी संधि साधून विजापूरकराकडील सरदार निंबाळकर व घाडगे यांनीं पन्हाळा व  तत्तोरा यांच्यामधील शिवाजीनें घेतलेली सर्व ठाणीं परत हस्तगत करून घेतलीं. हें पाहून शिवाजीनें जिंकलेल्या मुलुखाचा पक्का बंदोबस्त होऊन तो पुन्हां शत्रूच्या हातीं जाणार नाहीं, अशी व्यवस्था करण्याचें ठरविलें. त्याचें पुढील वर्ष राज्याचा अंतर्गत बंदोबस्त करण्यातच गेलें. त्याच्या पुढील वर्षी त्यानें कर्नाटकांत मोहीम केली, तेव्हां विजापूरचा कांहीं मुलूख घेतला; पण ज्याप्रमाणें इ.स. १५९४ त निजामशाही राज्यांत अंदाधुंदी माजून त्यावर मोंगलाची स्वारी आली तेव्हां आदिलशहानें आपली स्पर्धा सोडून निजामशाहीस साह्यच केलें, त्याचप्रमाणें आदिलशाही दरबारांत घोंटाळे माजलेले पाहून मोंगल विजापूरचें राज्य गिळंकृत करण्याकरिता पुढे आलेले पाहून शिवाजीहि आपल्या मोहिमा टाकून त्याच्या मदतीस धावून आला.

अ व रं ग जे बा वि रु द्ध ल ढा, खवासखानाचा वधः - अकबराच्या वेळेपासून मोंगलांनी दक्षिणेंतील राज्ये आपल्या साम्राज्यात अंतर्भूत करण्याचा प्रयत्न चालविला होता; परंतु आतापर्यंत विजापूरचें राज्य त्यांच्या कचाट्यांत सापडलें नव्हतें; परंतु आता विजापूरच्या मसनदीवर अल्पवयी राजा येऊन दरबारात कलह माजल्यामुळें मोंगलांस आपला हेतु सिद्धीस नेण्यास चांगलेंच फावलें. खवासखानाचें लक्ष्य आपल्या राजाचें हित साधण्यापेक्षां स्वतःचा फायदा करून घेण्याकडेच विशेष होतें. त्यानें मोंगलांचा दक्षिणचा सुभेदार जो खानजहान त्याचजवळ विजापूरवरील मोंगलांचे सार्वभौमत्व कबूल करून आपल्या बालवयी राजाची बहीण पादशहा बिबी हिला अवरंगजेबाच्या मुलास देण्याबद्दल अभिवचन दिलें. ही गोष्ट विजापूर दरबारातील इतर सरदारांस माहीत होतीच. अबदुल करीमप्रभृति मंडळींनीं खवासखानाचा वध करविला. राजाच्या बहिणीबद्दल विजापूरच्या लोकांस विशेष अभिमान वाटत असल्यामुळें खवासखानाच्या वधामुळें कोणासहि दुःख झालें नाहीं आणि म्हणून खानजहान विजापूरच्या सरहद्दीवर चालून आल्याबरोबर सर्व लोक आपल्या राज्याचें रक्षण करण्याकरितां अबदुल करीमाच्या हाताखालीं लढण्यास तयार झाले. मोंगल व विजापूरकर यांच्यामध्यें झालेल्या लढायांत विजापूरकरासच यश येत गेलें व दिल्लिरखान व अबदुलकरीम हे धर्मबांधवच असल्यामुळें पुढें लवकरच दिल्लिरखानाच्या मध्यस्तीनें मोंगल व विजापूकर यांच्यामध्यें सलूख करण्यांत आला (१६७५).

अवरंगजेबाची भेदनीतिः - अवरंगजेब बादशहानें मलिक बरखुदार नांवाचा आपला एक वकील विजापूरच्या दरबारी पाठविला होता. हा वरपांगी अबदुलकरीमाशीं अगदीं सभ्यपणाचें वर्तन ठेवीत असे; परंतु आंतून मात्र विजापूर दरबारांत दोन तट पाडून त्यांतील एक पक्ष आपल्याकडे वळवून घेण्याची त्याची खटपट चालली आहे. विजापुरांत मोंगल व अफगाण असे दोन तट उद्भवले होते व अबदुलकरीमानें खवासखानाचा वध करविला असल्यामुळें दिल्लिरखानाच्या मध्यस्थीनें मोंगलांशीं झालेलें सख्य फार दिवस टिकणें दुरापास्त होतें. अबदुलकरीम हा राजाचें हित तेंच आपलें हित असें मानीत असल्यानें त्यानें शिवाजीस मिळणेंच अधिक नैसर्गिंक होतें. व दिल्लिरखान व मोंगलांच्या सैन्यांतील इतर अफगाण लोक यांच्याशीं असलेला त्याचा संबंध नसता तर त्यानें तसेंच केलेंहि असतें (१६७६).

शिवाजीची कर्नाटकांत स्वारीः - इ.स. १६७७ त शिवाजीनें कुतुबशहाशीं दोस्ती करून व त्याच्याजवळून तोफखाना व पैसा घेऊन कर्नाटकांतील विजापूरकरांच्या मुलुखावर स्वारी केली. आदिलशाहींतील अंतर्गत बखेड्यामुळें हा मुलूख वस्तुतः आतं केवळ नांवालाच त्या राजाच्या सत्ते खालीं राहिला होता. जिंजीचा किल्ला तेथील मुसुलमान किल्लेदारानेंच शिवाजीच्या स्वाधीन केला व बेलोरचा मजबूत किल्ला त्याच्या सैन्यानें सप्टंबरच्या अखेरीस सर करून घेतला. यानंतर शिवाजीनें कर्नाटकगड व आणखी दोन किल्ले (जगदेवगड व महाराजगड) काबीज केले. शिवाजी कर्नाटकांत गेला असतां विजापूरचा कारभारी अबदुलकरीम व मोंगल सरदार दिल्लिरखान यांनीं मिळून गोवळकोंडयावर स्वारी केली; परंतु मादण्णापंतानें अगोदरपासूनच चांगली तयारी करून ठेविली असल्यामुळें त्याने या संयुक्त सैन्यास परतून लाविलें. विजापूरच्या सैन्यास पगार न मिळाल्यामुळें त्याची अगदीं दुर्दशा झाली होती व याच वेळीं अबदूल करीमहि आजारी पडून तो पुढील ( १६७८ ) सालच्या जानेवारी महिन्यांत मरण पावल्यामुळें विजापूरच्या दरबारीं सर्वच अव्यवस्था झाली.

विजापूर दरबारांतील मसूदखान नांवाच्या एका सरदाराजवळ खासगी संपत्ति विपुल असल्यानें आपलें कर्ज वारून विजापूरच्या सैन्याचा पगार चुकता करण्याचा व मागें खवासखानानें केलेल्या तहाच्या अटी पाळण्याच्या करारावर दिल्लिरखानानें त्यास कारभारी केलें.  (१६७८); परंतु विजापूरला येतांच मसूदखानानें आपल्या फौजेस रजा दिली व लोकांचीं मनें संतुष्ट राखण्याकरिता त्यानें पादशहाबीबीहि मोंगलाच्या स्वाधीन करण्याचें नाकारलें

इकडे शिवाजीनें बल्लारी, कोपळ व बहादुरबेंडा व त्याच्या आसमंतांतील प्रदेश घेतल्याचें ऐकून विजापूरकरांचें सैन्य कृष्णा व तुंगभद्रा यांच्या दोआबांत आलें होतें; पण हंबीरराव व जानार्दनपंत यांनीं या सैन्यावर हल्ला करून त्याचा पूर्ण मोड केला व ५०० घोडें, ५ हत्ती व त्या लष्कराचा सेनापति यांनां धरून नेलें  ( १६७८ ). यानंतर त्यांनीं सर्व दोआब प्रांत आक्रमण करून कोपळ व बल्लारी यांच्या आसमंतातील विजापूरच्या राज्यांतील बंडखोर देशमुखास हुकमतात आणलें. पावसाळ्यास आरंभ होऊन नद्यांनां पूर आल्याकारणानें मसूदखानास मराठ्यांचा प्रतिकार करतां आला नाहीं.

मोंगलाविरुद्ध शिवाजीची मदत व त्यास कर्नाटकांतील मुलूख बक्षीसः-इ.स. १६७८ तच मोंगलांचा विजापूर दरबारांतील वकील वरखुदारकान यानें पादशहाबीबीची मागणी केली. मसूदखान तिला मोंगलांच्या स्वाधीन करण्यास तयार नसल्यानें शहराच्या रस्त्यांत मोंगल व विजापूरकर यांच्यामध्यें लढाई होण्याचा प्रसंग आला होता; पण स्वतः बादशहाबीबी त्या ठिकाणीं गेली व भावाचें व त्याच्या राज्याचें रक्षण करण्यासाठीं आपण होऊन मोंगलांच्या छावणींत जाण्याचा तिनें आपला निश्चय जाहीर केल्याकारणानें तो प्रसंग टळला. दिल्लिरखानानें लवाजमा देऊन बाशहाबीबीची अवरंगाबादेस रवानगी केली; परंतु आपण स्वतः विजापुरावर चालून आलाच ( १६७९ ). तेव्हां मसुदखानानें शिवाजीची मदत मागितली. विजापूरला वेढा घालण्याच्या निश्चयापासून दिल्लिरखानास परावृत्त करण्याकरितां शिवाजीनें भीमेपासून गोदावरीपर्यंत मोगलांचा मुलूख लुटून उध्वस्त केला व गोदावरी ओलांडून जालना देखील लुटला, तरी सुद्धां दिल्लिरखानानें आपलें वेढयाचें काम तसेंच पुढें चालू ठेविलें होतें. शेवटीं वेढा देणारें सैन्य शहाराच्या कोटापावेतों येऊन पोहोंचलें. तेव्हां विजापुराकडे त्वरित येण्याविषयीं मसूदखानानें शिवाजीस निरोप पाठविला. मसुदखान आपल्या लोकांस उत्तेजन देत असल्यामुळें त्यांनीं आपल्या शहराच्या रक्षणाचें काम मोठया निश्चयानें चालविलें होतें. इकडे शिवाजीकडून हंबरिरावाच्या नेतृत्त्वाखालीं आलेल्या फौजेनेंहि दिल्लरिखानाच्या सैन्याभोंवती घिरटया घालून त्याची रसद बंद पाडली होती, यामुळें  पावसाळा संपतांच दिल्लिरखानानें वेढा उठवून हटनी लुटली व कृष्णा आलोंडून कर्नाटक प्रांतीं लुटालुटीस आरंभ केला; पण तेथें शिवाजीच्या सैन्यानें त्याच्याशीं लढाई देऊन त्याचा पूर्ण पराभव केल्यामुळें दिल्लिरखानास परत जाणें भाग पडलें (१६७९). विजापूरला मदत केल्याबद्दल मोबदला म्हणून शिवाजीनें कोपळ व बल्लारी यांच्या आसमंतांतील प्रदेश विजापूरकरांकडून मागून घेतला आणि कर्नाटकांतील आपली जहागीर व द्रविड प्रांतांतील त्यानें नुकताच जिंकून घेतलेला मुलूख यांच्या वरील स्वामितत्त्वाची सोडचिठ्ठी देण्यासहि त्यांना भाग पाडलें. (१६८०).

विजापूर दरबारची स्थितीः - मसुदखानानें विजापूरच्या फौजेंतील बहुतेकांस पूर्वीच काढून टाकलें असल्यामुळें आतां विजापूरकरांजवळ मराठे मनसबदरांच्या फौजेशिवाय फारच थोडें घोडदळ राहिलें होतें. या वेळीं विजापूर दरबारांत सर्जेखान हाच काय तो एक चांगला सरदार होता; परंतु याच्या हाताखालील सैन्य घोडेस्वारांचेंच असल्यामुळे मसूदखानाचें घोडदळास रजा देण्याचें धोरण याला न आवडून या दोघांत साहजिकच वितुष्ट आलें व म्हणून मसूदखानानें इ.स. १६८१ च्या सुमारास राज्यकारभारांतून आपलें आंग काढून तो अदवानीस गेला. मुसुलमान सरदारांत दुही माजविण्याकरितां अवरंगजेबाचा वकील म्हणून विगापूरदरबारीं ठेवलेला जो मलिक बरखुदार नांवाचा गृहस्थ होता त्याचेच हे खेळ होते. त्यानें विजापूरच्या लोकांस असें भासविलें कीं मराठ्यांशीं नुकताच जो तुम्हीं तह केला आहे त्यामुळें अवरंगजेबाची तुमच्यावर फार खप्पा मर्जी झालेली आहे. यामुळें मसूदखान जातो न जातो तोंच विजापूरकरांनीं अवरंगजेबास खूष करण्याकरितां पुढचा मागचा विचार न करितां मराठ्यांपासून मिरज परत घेतले व त्यांच्याशीं कायमचें वैर संपादन केलें. यावेळीं विजापूरदरबारची स्थिति फार चमत्कारिक झाली होती. जहागीर गमावण्याच्या भीतीनें सर्व मराठे मनसबदार स्वतःला विजापूरकराचे चाकर म्हणवीत होते; परंतु त्यांचे कांहीं नातेवाईक मात्र उघड उघड संभाजीच्या चाकीरस जाऊन राहिले होते. दक्षिणेंतील या लोकांममध्यें भाऊबंदकी तर इतकी मातली होती कीं प्रतिपक्षाचा सूड घेण्याकरितां हे लोक स्वारी करून येणाऱ्या शत्रूस जाऊन मिळत एवढेंच नाही तर स्वहित साधलें नाहीं तरी केवळ विरूद्ध बाजुचें नुकसान करितां यावें म्हणून आपला धर्म सोडून मुसुलमान झाल्याचीं उदाहरणें कांहीं. थोडीं आढळून येत नाहींत.

अवरंगजेबाची विजापुरावर मोहीमः - अवरंगजेबानें दक्षिणेंत आल्यावर विजापुरच्या मोहिमेवर राजपुत्र आजिमशहा याची योजना केली ( १६८४). कित्येक दिवसपर्यंत विजापूरकरांशीं लढण्यांत आजिमशहास म्हणण्यासारखें यश आलें नाहीं, परंतु पुढे त्याचसालीं त्यानें सोलापूरास वेढा घालून पुढील वर्षी तो सर केला (१६८५).

इ.स. १६८५ सालचा पावसाळा संपून लढाईचा मोसम सुरू होतांच अवरंगजेबानें रोहउल्लाखान याला विजापुरास वेढा देण्याकरितां जाण्याविषयीं हुकूम केला, व त्याच सालच्या अखेरीस स्वतः अजिमशाहाहि विजापुराकडे यावयास निघाला. या सालीं अवर्षण पडल्यामुळें विजापूरच्या आसपास दुष्काळ पडला असून त्या भागांत जें काय थोडें बहुत धान्य झालें होतें तेंहि किल्यामध्यें सांठवून ठेवण्यांत आलें होतें. म्हणून विजापूरच्या फौजेनें अजिमशहास अगोदर विजापुरजवळ येऊं दिलें व नंतर सोलापूर येथील बादशहाच्या छावणीशीं त्याचें असलेलें दळणवळण बंद पडून त्याला त्रास द्यावयास सुरुवात केली. या वेळी अजिमशहाच्या सर्व सैन्याचा नाशच व्हावयाचा. परंतु ऐन वेळेस बादशहानें पाठविलेल्या धान्याच्या २०,००० गोण्या त्याला मिळाल्यामुळें तो या आणीबाणीच्या प्रसंगांतून वांचला ( १६८६ ).

वि जा पू र का बी ज. - यानंतर बादशहानें स्वतः विजापुरास येऊन त्या शहराला वेढा दिला. किल्यांत शिबंदी थोडी अशून शिपायांचा पगार तुंबलेला होता. तरी शहरांतील लोकांनीं मोठ्या शौर्यानें किल्ला लढविण्याचें काम चालूं ठेविलें होतें. शेवटीं अवरंगजेबाच्या तोफांनीं शहाराच्या तटबंदीस भगदाड पाडलें; परंतु बादशहानें हल्ला न करतां वेढा तसाच कायम ठेवण्याचें ठरविलें. शहारांत अन्नाचा तुटवडा पडून आंतील लोकांची अगदीं असहाय स्थिति झाली होती. या सर्व गोष्टीं नेहमी डोळयापुढें दिसत असल्यामुळें इ.स. १६८६ च्या आक्टोबर महिन्यांतील १५ व्या तारखेच्या सुमारास अखेरीस विजापूरचे लोक बादशहास शरण आले. तेव्हां बादशहानें विजापूरच्या मुख्य सरदारांस आपल्या चाकरींत घेतलें, व राजपुत्र सिकंदरशहास आपल्या छावणींत कैदेंत ठेविलें. येथेंच तो पुढें तीन वर्षांनीं (१६८९) मरण पावला. याला अवरंगजेबानें विषप्रयोग करून मारलें असावें अशी तत्कालीन कित्येक लोकांस शंका होती.

स मा लो च न. - आदिलशाहीचा एकंदर इतिहास वाचला असतां असें दिसून येतें कीं इ.स. १६५९ मध्यें शिवाजीवर मोहीम पाठवून त्याच्याशीं समोरासमोर लढण्याचा संबंध येईपर्यंत आदिलशाही राजांचा सर्व काळ सत्तावर्धनांतच गेला होता. आरंभीं बेदरप्रभृति सरदारांशीं लढावें लागलें ते मूळ स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठींच होय. त्यानंतर निजामशाहीशीं झगडा सुरू झाला. पण तो झगडा स्वतःच्या राज्याची मर्यादा वाढविण्याकरितांच असून त्या वेळेस आदिलशहांनां दक्षिणेंतील विजयानगरच्या मुलुखावर चांगलाच हात मारावयास मिळाला. यानंतर मराठ्यांच्या उदयाचा काळ आला. पण त्यांतहि आरंभीं आरंभीं शहाजी सारख्या बलिष्ठ मराठे सरदारांकडून विजापूरच्या राजास दक्षिणेंत राज्यविस्तार करण्यास मदतच होत गेली. सारांश आदिलशाहीचा ऱ्हास झाला तो अखेरच्या अवघ्या पाव शतकांतच होय. येणेंप्रमाणें आदिलशाहीचीं पावणेंदोन शतकें वर्धिष्णु स्थितींत गेल्यामुळें व या अवधींत तीस जे राजे लाभले तेहि बहुतेक गुणग्राहकच निघाल्यामुलें तिचें वैभव अपरंपार वाढलें. आलिदशाहींत जींक कांहीं ठळक ठळक शिल्पकामें झालीं त्यांच्या यादीकडे जरी नुसती नजर फेकलीं तरी देखील आदिलशाहीतील संपत्तीचा व तिचा कलाकौशल्याच्या उत्तेजनाच्या कामीं कसा विनियोग झाला याची सहज कल्पना करतां येते. आदिलशाहीचा संस्थापक युसफ यानें खुद्द विजापूर शहराची स्थापनां करून, कित्येक बाजार व व्यापीर पेठा बसवून व अनेक अजस्त्र तट बांधून शहरास शोभा आणली. सोलापूर, परांडा, मिरज इत्यादि किल्ल्यांचीं विशाल व मजबूत कामें या कारकीर्दीतच झालीं. याच्या मागून इस्मायल आदिलशहा गादीवर आला. त्यानें चंपामहाल व मुद्गल हे किल्ले बांधले. त्याचा पुत्र इब्राहिम आदिलशहा याच्या कारकीर्दीत अर्क किल्यास उत्तम दगडी कोट बांधून इब्राहीमपूर शहर वसविण्यांत आलें. पुढें अली आदिलशहानें गगनमहाल, जम्मामशांद, शहाबुरूज, महाबुरूज यांसारखीं सुंदर कामें उठविली. नंतर इब्राहिम आदिलशहा तख्तनशीन झाला. त्यानें तर नवरसपूर, नवरसमहाल, सात मजली माडी, आनंदमहाल, आरसेमहाल अशी सुंदर व रम्य स्थळें बांधून आपल्या पूर्वजांवर ताणच केली. याचा अनुगामी महंमद यानें बोलघुमटासारख्या उत्तम इमारती तयार करविल्या. याच्यापुढें नवरत्नखचित शिरपेंच लटकलेले हाजारों मानकरी, सरदार, अमीरउमराव आणि बडे लोक लीनतेनें उभे असत; रत्नभुषणांनीं शृंगारिलेले शेकडों हत्ती सज्ज असत. हा नुसता शहरांत फिरावयास गेला तरी ह्यावर लोक सोन्यारुप्याची फुलें उधळीत असें म्हणतात. याच्या जिलबीच्या हजारों घोडयांच्या जिनांस हिरे, मोत्यें, पाच, माणके वगैरे लटकलेलीं असत असे याच्या वैभवाचें वर्णन आढळतें. याची औदार्यबद्दलहि बरीच ख्याति होती. वारंवार द्रव्याची तुळा करून तें तो गोरगरीब व फकीर यांस वाटी. याचा पुत्र दुसरा अली आदिलशहा याच्या कारकीर्दीतहि विजापूर प्रातांतून सोन्याच धूर निघत होता. तथापि याच्या कारकीर्दीत आदिलशाहीच्या अननतीस सुरुवात झाली व ती लागलीच पुढच्या शहाच्या आमदानींत रसातळास गेली.

[ सं द र्भ ग्रं थ -महंमद कासीन फेरिस्ता या फारसी इतिहासकाराच्या ग्रंथांत इ.स. १५९६ मध्यें तो मरण पावला तेथपर्यंत हकीकत आहे. ब्रिग यानें फेरिस्ताच्या इतिहासाच्या भाषांतरांत दुसऱ्या एका फारसी ग्रंथाचें भाषांतर दिलें आहे पण त्यांतील हकीकतहि अशीच अपुरी आहे. 'बुसातिने सलातीन' या नांवाच्या फारसी ग्रंथांत मात्र समग्र इतिहास आढळतो. याशिवाय उत्तरकालीन आंग्ल इतिहासकार एलफिस्टन, टेलर, ग्रांटडफ वगैरेंच्या ग्रंथांतूनहि आदिलशाहीचा त्रोटक इतिहास पहावयास मिळतो. ]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .