प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आंध्र - दक्षिणहिंदुस्थानांतील एक प्राचीन राष्ट्राचें नांव. यवतमाळ व चांदा जिल्ह्यांतील आंघ हेच आंध्र असावेत मौर्य व मेगॅस्थनीस यांच्या काळीं, सध्यां तेलगू भाषा बोलणारे लोक आंध्रराष्ट्र या नावानें संबोधिले जात असत. व ते गोदावरी व कृष्णा या दोन नद्यांमध्यें राहात असत असे व्ही. ए. स्मिथच्या 'अली हिस्टरी ऑफ इंडिया' या पुस्तकांत वर्णन आहे. कँप्बेलच्या तेलगु व्याकरणांत अथर्वणाचार्याच्या त्रिलिंगानुशासनम् मधील जो उतारा घेतलेला आहे त्यावरूच वरील वर्णन लिहिलें आहे असें दिसतें. त्या उताऱ्यांत असे वर्णन आहे की 'स्वयंभू मनूच्या वेळेस आंध्रांचा ईश्वर जो हरि, त्यानें काकुलम् येथें सुचंद्र राजाच्या उदरी जन्म घेतला. त्यानें श्रीशैलम् भीमेश्वरम्, कालेश्वरम व महेंद्रपर्वत यांस जोडणारी एक भिंत बांधली. तिला तीन महाद्वारें होतीं व त्यांत त्रिनेत्रधारि ईश्वर त्रिलिंगाच्या रूपानें रहात असे. आंध्रविष्णूनें निशुंभदानवाबरोबर तेरा युगें लढाई करून त्याला ठार मारिलें व तो गोदावरीच्या तीरावर राहूं लागला म्हणून त्या देशाला त्रिलिंगम् असें नांव पडलें' वरील उतारा आंध्रकौमुदीनें अथर्वणाचार्याच्या ग्रंथांतून घेतला व कँप्बेलेंन आंध्रकौमुदींतूत घेतला. आता अथर्वणाचार्याच्या उताऱ्याचा पुरावा इतिहासदृष्ट्या फोल आहे हें सहज दिसून येईल. त्यास प्राचीन आख्यायिका देणारा म्हणूनहि किंमत देतां येत नाहीं. सुचंद्र नांवाचा आंध्रराजा इतिहासांत मुळीं नाहींच पुराणांतील आंध्रघाराण्याचा पहिला राजा शिमुक हा होय. त्यालाच सिंधुक, शिशुक, शिप्रक अशीं नांवें आहेत, परंतु सुचंद्र असें नांव नाहीं. नंतर अथर्वणाचार्यानें, विष्णु, इंद्र, बृहस्पति, सोमचंद्र, कण्व, पुष्पदंत, धर्मराज, इत्यादि ग्रंथकर्त्यांचे आधार दिले आहेत. परंतु त्यांतील एकहि सांपडत नाहीं; तसेंच अथर्वण शिक्षोपनिषदाचा म्हणून जो उतारा अथर्वणाचार्यानें दिला आहे तो मूळ उपनिषदांत सांपडतच नाहीं. यावरून असें दिसतें कीं, अथर्वणाचार्य हा तेलगू भाषेचा पुरस्करर्ता असून, त्या वेळच्या शुद्ध भाषेच्या पुरस्कर्त्यानीं त्याला विरोध केल्यामुळें, त्यानें आपल्या ग्रंथांत स्वकपोलकल्पित उतारेच भरून दिले. याच ग्रंथकर्त्याची एक कारिका छापली गेली आहे. तींत दंडीच्या काव्यादर्शांतील पुष्कळ कविता आहेत. अथर्वणाचार्यानें वाल्मिकी सूत्रांतील उतारेहि दिले आहेत. हीं सूत्रें त्रिविक्रमानें १४ व्या शतकांत लिहिलीं. यावरून अर्थवणाचार्याचा काल १४ व्या शतकानंतरचा होय हें उघड आहे. “आंध्रविष्णु गोदावरी नदीचे तीरीं राहिला” ''या अथर्वणाच्या वाक्यावरून राजमहेंद्री हें शहर तेलगू राजांची राजधानी झाल्यानंतर पुष्कळ वर्षांनीं अथर्वणाचार्य होऊन गेला असें दिसतें.''

आंध्राविषयीं सर्वांत प्राचीन उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत आहे. त्यांत आंध्र, पुंड्रं, शबर आणि पुलिदं या चार (दस्यु) जाती विश्वामित्राच्या बहिष्कृत पुत्रांचे वंशज होत असें म्हटलें आहे. हे विंध्यपर्वताच्या आसमंतात रहात असावे. बहुतेक पुराणांतून आंध्रराष्ट्राचा उल्लेख सांपडतो. टॉलेमीकालापूर्वीच्या ''पेउटिंजेरियन टेबल्स'' मध्यें  'अॅड्री इंडी' असें नांव आढळतें. ७ व्या शतकांत लिहिलेल्या बाणकृत कादंबरींत, शाबरलोक विंध्यपर्वतावरील जंगलांत रहात' असा उल्लेख आहे. अशोकाचा शिलालेख नं. १३ यांत असें लिहिलें आहे कीं, आंध्र व पुलिंद लोक माझ्या राज्यांत राहतात, व माझ्या धर्माचें अनुकरण करतात. अशोकाच्या मागून आंध्र लोकांचा उत्कर्ष झाला. त्या वंशांतील पहिला राजा, राय शिमुक शातवाहन हा व्हि. ए. स्मिथच्या मतें ख्रि. पू. २२० वर्षे होऊन गेला. नानाघाट येथील लेण्यांत त्याचें व त्याच्या नंतरचा आंध्रराजा 'शिरी सातकानीं याचें नांव कोरलेलें आहे. त्याच्या नंतरचा राजा कृष्ण याची राजधानी नाशिक येथें असावी. यानंतर आंध्रराजांचा उल्लेख हत्तिगुंफा दरींतील कलिंग राजा खारवेला याच्या शिलालेखांत सांपडतो. तेथें 'ख्रि. पू. १६८ सालीं सातकानी राजा पश्चिमेकडील प्रांतच रक्षण करीत होता' असा उल्लेख आहे. हा सातकानी मत्स्यपुराणांतील तिसरा किंवा पांचवा आंध्रराजा असावा. यावरून आंध्र देश त्यावेळीं कलिंग देशाच्या पश्मिेस असावा. यानंतर ख्रि. पू. २ ऱ्या शतकांत लिहिलेल्या चाळिसगावानजीक पितळखोऱ्यातील शिलालेखांत प्रतिष्ठानचा किंवा पैठणच्या राजाचा उल्लेख आहे. यानंतर १७ वा आंध्रराजा हाल हा स्मिथच्यामतें इ.स. ६८ च्या सुमारास होऊन गेला. गुणाढयानें पैशाचलिपींत लिहिलेली बृहत्कथा याच राजाच्या पत्नीप्रीत्यर्थ लिहिली अशीं दंतकथा आहे. यावरून ही राज्ञी उत्तरेकडील राजकन्या असावी. जुन्या महाराष्ट्री भाषेंत लिहिलेलें सप्तशतीकाव्य हाल यानेंच लिहिलें. यावरून व आंध्र शिलालेख प्राकृत भाषेच्या रूपांत लिहिलेले आहेत यावरून आंध्रलोक महाराष्ट्री भाषेसारखीच भाषा बोलत असावे. सध्यां आंध्र शब्दाचा अर्थ तेलगू असा होतो, म्हणून पूर्वी देखील आंध्रलोक तेलगू भाषाच बोलत होते असें पुष्कळ इतिहासकार म्हणतात. सर वॉ. इलियट यानें तर कलिंग, टॉलेमीचें टिग्लिप्टन, ट्रिकलिंगम्, ट्रिलिंगम्, तेलगू व आंध्र यांची खिचडीच करून ठेवली आहे. जर प्राचीन आंध्र राजे तेलगू बोलत असते तर तेलगू साहित्याचा जन्म इ.सनाच्या ११ व्या शतकांत न होतां ख्रिस्ती शकापूर्वीच झाला असता.

 

यानंतर आंध्रदेशाचा उल्लेख प्लिनीच्या लेखांत (इ.स.७७) सांपडतो. सर्व हिंदुस्थानांतील तत्कालीन शिलालेखांत आंध्रांचा उल्लेख आहे. यावरून त्यावेळेस आंध्र राष्ट्र फार बलाढय असून त्याचें वर्चस्व सर्व हिंदुस्थानभर असावें. पेरिप्लसमधील वर्णनावरून आंध्र देशास दक्षिणापथ (दख्खन) नांव होतें असा प्रथमच स्पष्ट पुरावा मिळतो पेरिप्लसमध्यें कल्लिएना नामक शहराचा उल्लेख आहे. ते हल्लीचें कल्याण असावें. यावेळेस 'क्षहराट' वंशांतील शकसत्रप हे बलाढय होऊन कल्याण येथें आंध्रांचें बस्तान नीट बसेनासें झालें.

शक व आंध्र यांच्या नेहमीं लढाया होत व हळूहळू आंध्रलोक हिंदुस्थनाची पश्चिम बाजू सोडून पूर्व बाजूस घसरले. पुढें इ.स. १५० त दक्षिणापथाचा राजा पुलुमायी याचा शकसत्रप रुद्रदामन यानें खरपूस समाचार घेतला ('शात वाहन' पहा).

आंध्रनाणीं. - अतिप्राचीन आंध्र नाणीं दोन होतीं. यांवरहि शिलालेखांप्रमाणें प्राकृतभाषेंतीलच शब्द आहेत. १ ला व २ रा विलिवायकुर व शिवालयकुर (इ.स. ८४-१३८) यांच्या वेळचीं धनुर्बाणचिन्हांकित सर्व नाणीं कोल्हापुरास सांपडलेली आहेत. पुलुमायी व त्यानंतरचे राजे  ( इ.स. १३८-२२९) यांच्यावेळचीं नाणीं गोदावरी व कृष्णा यांच्या आसपास सांपडलीं. स्मिथच्या मतें या नाण्यांचे उत्तरेकडील व पश्चिमेकडील नाण्यांशीं सादृश्य आहे; दक्षिणकेडील नाण्याशीं नाहीं. यावरून व वरील विवेचनावरून असें स्पष्ट दिसतें कीं, आंध्रलोक हिंदुस्थानचे पूर्व किनाऱ्याकडील रहिवाशी नसून, ते मूळ विंध्यपर्वताच्या आसपास राहत होते असें विझगापट्टमचे पी.टी. श्रीनिवास अय्यंगार सिद्ध करितात (इं.अ.पु. ४२). रा. चिंतामणराव वैद्य यांच्या मतेंहि आंध्र म्हणजे पूर्व घाटावरचा देश होय (मध्ययुगीन भारत-भाग१). इ. सनाच्या तिसऱ्या शतकात आंध्रलोकांचा पश्चिमेकडील प्रदेश शकाच्या हातीं गेला. यांची राजधानी उज्जनी ही होती. त्याचा पूर्वेकडील मुलूख पल्लवांनीं घेतला. याला आंध्रपथ म्हणत असत. या प्रांताच्या सुभेदाराची राजधानी धनकद येथें होती. इ.स. ३४० त समुद्रगुप्तानें दिग्विजय केला तेव्हां पल्लवाच्या हस्तिवर्मा सुभेदाराचा त्यानें वेंगी (पदृवेगी किंवा आंध्रनगरम) येथें पराभव केला. यानंतर आंध्रलोकांचा कोठें पत्ता लागत नाहीं. दक्षिणेकडील प्रदेशास मात्र आंध्र हें नांव पडलें. ७ व्या शतकांतील हुएन्त्संग या चिनी प्रवाशाच्या वर्णनांत आंध्रदेशाचा उल्लेख आहे. पुढें ११ व्या शतकांतील तेलगू 'महाभारतम्' चा लेखक नानय्याभट्ट यानें तेलगू भाषेस आंध्र हें नांव दिलें.

व्हिन्सेंट स्मिथसारखे काहीं इतिहासकार आंध्रांनां द्राविडवंशीय लोक म्हणून मानतात तर मध्ययुगीन भारतकार त्यांना आर्य समजतात. पुढील उताऱ्यांत रा. वैद्य यांनीं सातवाहनाची ऊर्फ आंध्रांची जात निश्चित केली आहे.

सातवाहन कोणत्या जातीचे होते असा प्रश्न आहे. ते आर्य की अनार्य ? मराठे कीं द्रविड ? या प्रश्नाचा निर्णय करणें कठीण असलें तरी तें काम महत्त्वाचें आहे. अद्यापि या प्रश्नाचें उत्तर कोणीं निश्चित दिलेलें नाहीं. तथापि पूर्वीचा महाराष्ट्रांतील विरल वस्तीचा प्रश्न जसा रामायणाच्या साहाय्यानें सोडवितां आला, तसा इतर पुराणें व दुसरे प्राचीन लेख यांच्या आधारानें याहि प्रश्नाचा निर्णय करण्याचा आम्ही प्रयत्न करतों. सातवाहन ऊर्फ आंध्रमृत्य यांनां पुराणांत शूद्र म्हटलें आहे. सातवाहन ऊर्फ शालिवाहन हा ब्राह्मण स्त्रीपासून शेषाला ( नागाला ) झालेला पुत्र होय, अशी दंतकथा प्रचलित आहे. असल्या दंतकथा जरी वरकरणीं वेडेपणाच्या दिसल्या तरी त्यांत कांहीं तथ्यांशहि असतो. आंध्रलोक इतर द्रविड लोकांहून अगदीं निराळे दिसतात. द्रविडांपूर्वी पुष्कळ शतकें ते आर्यांच्या संस्कृतीशीं संबद्ध झालेले असल्यामुळे त्यांचा देश महाभारतांतील देशमानांच्या मालेंत उत्तरेकडील मिश्र-आर्य देशांत गणिलेला असून दक्षिणेकडील म्लेच्छ देशांत सांगितलेला नाहीं. मग हे आंध्र लोक नागवंशीय मानावे कीं काय ? आजमित्तीस आंध्र देशाच्या म्हणजे तैलंगणाच्या निकट असलेल्या नागपूर प्रांतांत नाग लोकांची पुष्कळच वस्ति आहे. तेलंगी ब्राह्मण निःसंशय आर्यवंशीय असून त्यांचे महाराष्ट्रब्राह्मणांशी अजून शरीरसंबंधहि होत आहेत; पण तेलंगी क्षत्रियांचे मात्र मराठा क्षत्रियांशीं विवाहसंबंध होत नाहींत. या सर्व गोष्टी लक्षांत घेतां सातवाहन घराणें नागवंशीय असून त्यानें इ.स. पूर्वी पहिल्या शतकाच्या मध्याच्या सुमारास पाटलिपुत्राचें राज्य जिंकून तेथें आपलें वर्चस्व स्थापिले व पुढें महाराष्ट्रावर स्वारी करून तेथेंहि आपला अंमल बसविला असें अनुमान करावयास हरकत नाहीं. त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथें असून ती पूर्वीहि महाराष्ट्राची राजधानी होती.

वर सांगितल्याप्रमाणें सातवाहन मूळचे नागवंशीय होत; पण पुढें त्याचें क्षत्रियांशी शरीरसंबंध होऊं लागले. नर्मदेच्या पलीकडे उज्जनी येथें शक नांवाचे मूळ परदेशस्थ पण त्यावेळीं सर्वथा हिंदु बनलेले राजे राज्य करीत होते; त्यांपैकी रुद्रदामन् राजाच्या कन्येशीं एका सातवाहन राजानें विवाह केल्याचें प्राचीन लेखांवरून दिसून येते व त्यांत कांहीं आश्चर्यहि नाहीं. पूर्वी चंद्रगुप्तानें एका यवनकन्येचें पाणिग्रहण केलें होतें. तो शूद्र होता, तथापि तसें करावयास क्षत्रिय राजांनां सुद्धां अडचण नव्हती. असो. सातवाहन या नागवंशीय राजांनां आर्य क्षत्रिय आपल्या मुली देत, हें जरा चमत्कारिक वाटतें. तथापि चमत्कारिक वाटलें तरी तें खरें आहे. या सातवाहनांच्या दानलेखांत राजांच्या नांवांनां गौतमीपुत्र, वासिष्ठीपुत्र इत्यादि जी विशेषणें लाविलेलीं आढळतात, त्यांवरून ही गोष्ट स्पष्ट होते. या शब्दांचा अर्थ गौतम किंवा वसिष्ठ या गोत्रांतील राजस्त्रियांचे पुत्र असा आहे हें उघड आहे; पण या स्त्रियांच्या गोत्रांचें महत्त्व काय? त्या जर ब्राह्मणांच्या मुली असत्या, तर त्यांच्या गोत्राचा निर्देश करण्याची तादृश्य आवश्यकता नव्हती. म्हणून यासंबंधानें आमचा तर्क असा आहे कीं, त्या दक्षिणेंतील सुप्रसिद्ध क्षत्रिय राजघराण्यांतील स्त्रिया होत्या. सातवाहनांचा सामाजिक दर्जा क्षत्रियांपेक्षां अर्थातच कमी प्रतीचा होता व त्यामुळें त्यांनां आपल्या मातृवंशांचे गोत्र मिरविण्यांत बहुमान वाटत असला पाहिजे. शिवाय मातृगोत्राचा आपल्या नांवांत निर्देश करण्याची चाल म्हणजे कांहीं नवी होती असेंहि नाहीं. बृहदारण्यकोपनिषदांत वंशकथनामध्यें पुष्कळांच्या मातृगोत्रांचा उल्लेख केलेला आहे. उदाहरणार्थ, त्या उपनिषदाच्या शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या ब्राह्मणांत पौतिमाषीपुत्र, कात्यायनीपुत्र, भारद्वाजीपुत्र, कौशिकीपुत्र, आत्रेयीपुत्र अशी अनेक नांवें सांगितलीं आहेत (बृ.६.५). अलीकडच्या काळीं सुद्धां रजपूत राजे आपल्या राण्यांनां राठोडणी, चोहानी इत्यादि पैतृक नावें बहुमानास्पद म्हणून देत आले आहेत. राजघराण्यांत जन्मलेल्या स्त्रीला परकी घराण्यांत लग्न होऊन गेल्यावर आपल्या पितृगोत्राचा निर्देश अवश्य वाटणें स्वाभाविकच आहे. म्हणून आम्हांला असें वाटतें कीं, सातवाहन राजांनीं क्षत्रिय कन्यांशी विवाह केल्यामुळें त्यांचे पुत्र आपल्या मातृगोत्राचा बहुमानानें उल्लेख करीत. यावरून आणखीहि एक गोष्ट दिसून येते ती अशी कीं दक्षिणेंतील मराठाक्षत्रिय घराण्यांत कांहीं विशिष्ट गोत्रें असून ती त्यावेळी सुद्धां काळजीपूर्वक संभाळून लक्षांत ठेविलेली होतीं. सातवाहनांच्य या विवाहसंबंधावरून मराठाक्षत्रियांमध्यें जी सूर्यवंश, सोमवंश व नागवंश अशी तीन वंशनामें चालत आलेली आहेत, त्यांना फार प्राचीन काळाचा म्हणून महत्त्वाचा आधार मिळतो. सातव्या शतकांतील मराठा क्षत्रियांमध्यें सुद्धां नागवंश चालू होता, हें पुढें दिसून येणार आहे. ( मध्ययुगीन भारत भा. १ पा. १६९-७२).'

वरील चिंतामणराव वैद्य यांच्या लेखांतील अवतरण आम्हांस सर्वस्वी मान्य नाहीं. तथापि त्याचें म्हणणें एक बाजू म्हणून दिलें आहे. 'नागाचा पुरुष व अन्य जातीची आई यांपासून आंध्र राजकुलाची उत्पत्ति झाली', हें विधान बरोबर असणें अशक्य नाहीं. तथापि आई ब्राह्मण नव्हतीं, असें दाखविण्यासाठीं रा. वैद्य यांनीं दिलेले पुरावे समाधानकारक नाहींत. शिवाय वैद्य व इतर लेखक याची राष्ट्रनिर्णायक पद्धतीच सदोष आहे. यापद्धतीनें एखाद्या कुलाचा उद्भव मात्र स्पष्ट करता येईल. मोठ्या जातीचा उद्भव या पद्धतीनें देण्याचा प्रयत्न करणेंच चुकीचें आहे. आंध्र, पौंड्र, कलिंग यांसारख्या नांवानीं प्रसिद्ध असलेलीं प्राचीन कालचीं राष्ट्रे कोणतीं होतीं, हें आजच्या अस्तित्वांत असलेल्या लोकांच्या जातिकुलनिर्देशानें सांगावयासाठीं राष्ट्रनिर्णायक पद्धतीविषयींच थोडेसे विवेचन करणें प्राप्त होतें. या विषयावर पद्धतशीर विचार केलेला दिसत नाहीं. याविषयीं संशोध करतांनां आपणांस प्रथम असें पाहिलें, पाहिजे कीं, विवेचनार्थ घेतलेलें '' राष्ट्र '' हें कुल होतें कीं, '' जाति ''  होतें. कां कीं, कुल किंवा जाति या दोन्ही प्रकारच्या समुच्च यांच्या नांवाला अनेकवचनी प्रत्यय लावून राष्ट्रार्थानें त्यांचा उपयोग करण्यांत येत असे व पुढें तो शब्द कालांतरानें अधिक व्यापक होई. कुलाच्या ताब्यांतील प्रदेशांतल्या लोकांवरहि कदाचित् कुलनाम लादलें जाई.  ' मौर्याः' म्हणजे मौर्य कुलांतील लोक किंवा मौर्यांच्या ताब्यांत असलेल्या प्रदेशांतील लोक असे दोन्ही अर्थ व्हावयाचें. राज्यसंस्थापना करून राष्ट्रनाम उत्पन्न करणारे लोक 'कुल' असत किंवा राष्ट्रहि असत. राज्यसंस्थापना कदाचित् भाडोत्री लोक घेऊन एखादें कुल किंवा व्यक्ति करी किंवा एखाद्या जातींचा पुढारी अपाल्या जातीच्या साहाय्यानें आपलें राज्य व त्या बरोबर आपल्या जातीचें राज्य इतरांवर लादी. ''आंध्रा'' हे कोण होते याचा विचार करूं लागलो म्हणजे आपण असा विचार करावा की, आपण आंध्र जातीविषयीं विचार करीत आहो का, राज्य करणार्‍या एखाद्या कुलाविषयीं करती आहों. कुलविषयक विचार फारसा महत्त्वाचा नाहीं; कां कीं, राजे लोकांचे अनेक लोकांबरोब संबंध होत आणि पुढे ज्या जातीचे राजे आपणांस म्हणवीत असतील त्या जातीचें रक्त त्या कुलांत फारच थोडकें असेल. अनेक मोंगल बादशहांच्या अंगांत ज्याप्रमाणें रजपुतांचें रक्त खेळत होतें, त्याप्रमाणें पांडय, चेर, केरल या दाक्षिणात्य राजकुलांमध्यें औदीच्य क्षत्रियांचेंहि रक्त खेळत होतें. आपणांस असें आढळेल कीं, आंध्रांच्या किंवा पांडयांच्या राजकुलांचे संबंध कोणाशीं होत होते, यावरून राजांच्या मूळ जातीवर प्रकाश पडणार नाहीं,  यांवरहि प्रकाश पडणार नाहीं. एवढेंच नव्हे तर ते आर्यन् होत किंवा द्रविडीयन होते, यांवरहि प्रकाश पडणार नाहीं. कारण आर्यन् किंव द्रविडीयन् या कल्पनाच त्या काळीं नव्हत्या व त्या विवाहसंबंधांत मुळींच येत नसत. स्वतःस सफेद आदमी व मद्रासेकडील लोकांस काला आदमी समजणाऱ्यांची आंध्रासारख्या विजयाशाली राष्ट्रास आपल्यांत ओढण्याची तडफडहि कांहीं अर्वाचीन लेखकांचे लेख सदोष करीत आहे.

आंध्रे ही जाति होती म्हणजे तो राष्ट्रस्वरूपीं अनेक लोकांचा जमाव होता, कुल नव्हतें. आंध्र जातीचे कांहीं राजे होऊन गेले. त्यांनीं आपली सत्ता वाढविली, निरनिराळ्या ठिकाणीं राज्य केलें, बायका अनेक ठिकाणच्या केल्या. असें झालें म्हणजे राजघराणें जातीपासून तुटतें. राजघराण्याची गणना क्षत्रियांत होऊं लागली म्हणजे जातीपासून निराळे होण्यास साहाय्य होतें, तें राजघराणें आणि इतर राजघराणीं मिळून एक साजाजिक वर्ग होतो आणि त्यांवर स्थानिक भाषेचा पगडा अधिक बसूं लागतो. समजा, गायकवाड रजपुतांशीं लग्नें करूं लागले म्हणजे गायकवडांचा मराठेपणा कमी होईल आणि पुढें कालांतरानें ते पूर्ण गुजराथी बनून जातील. एवंच आंध्र राजघराण्याची भाषा महाराष्ट्री नसली तरी महाराष्ट्री झाली असल्यास नवल नाही, आणि राजघराण्याच्या स्थितीवरून आंध्र महाराष्ट्रीय होते कीं, तैलंगे होते हा प्रश्न सुटत नाहीं.

जी जात राष्ट्रस्वरूपी असेल ती महत्त्वाच्या स्थानापासून भ्रष्ट झाली म्हणजे तिचा दुसऱ्या जातींशीं लग्नव्यवहार कमी होतो, तिच्याशीं लग्नव्यवहार करण्यास इतर उत्सुक नसतात. असें झालें म्हणजे ती केवळ जात बनते. अशा परिस्थितींत आपण असें पाहिलें पाहिजे कीं, ती जात अजून कांहीं निराळ्या नांवानें किंवा सदृश नांवानें शिल्लक आहे काय ? आंध्रांचें स्थान गोदावरीचा कांठ होता. ते महाराष्ट्रीय होते कीं, तैलंगे होते, याबद्दल वाद आहे. अशा परिस्थिींत त्याच प्रदेशांत असलेली आंध ही जात प्राचीन आंध्रांची अवशेष असावी असें वाटतें. ही जात यवतमाळपासून चांद्यापर्यंत पसरली आहे आणि या जातीचे कांहीं लोक मराठी बोलतात आणि कांहीं तैलंगी बोलतात. कांहीं आंध्र आज निराळ्या जातिनामानेंहि प्रसिद्ध असतील. एकंदरींत असे म्हणतां येईल कीं, प्राचीन आंध्रे हे जाति होते, त्यांचा वसतीचा प्रदेश गोदावरीचा कांठ होता आणि त्यांपैकीं कांहीं महाराष्ट्री बोलत असावेत व कांहीं तैलंगी बोलत असावेत.

हल्लींचे आंध्र म्हणजे तेलगु लोक. यांचें विवेचन 'तेलगु' या लेखांत सांपडेल.

शातवाहनांच्या अधिपत्याखाली आंध्रदेश मोठा भरभराटींत होता. त्याचें सैन्यबल चंद्रगुप्त मौर्यांच्या खालोखाल होतें. या राज्यांत तीस कोट असलेलीं शहरें, यांशिवाय असंख्य गांवें (ऐहोळच्या लेखान्वयें १२,०००) आणि १,००,००० पायदळ, २००० घोडदळ व १००० हत्तीदळ इतकें सैन्य होतें असें प्लिनी वर्णन करितो (नॅचरल हिस्ट्री पु. ६). शातवाहन घराण्याची आंध्रदेशावरील सत्ता इ.स. २०० च्या सुमारास नाहींशी झाली. नंतर वाकाटकांचें राज्य सुरू झालें. त्यांच्या प्रधानांनीं अजिंठ्याचीं लेणीं खोदलीं असें म्हणतात. वाकाटक ब्राह्मण होते पण त्यांचे प्रधान बौद्धधर्मीय दिसतात. इ.स. ५ व्या शतकांत ओरिसातील एक यवन घराणें आंध्रांत येऊन सत्ताधीश झालें. हें यवन घराणें इ.इ. ९६३ पर्यंत टिकलें. या यवनवर्चस्वाखालीं सुध्दां आंध्रांत पूर्वीप्रमाणेंच बौद्धधर्मांचे प्राबल्य होतें. मग मात्र शैवधर्म येथें प्रस्थापित झाला.

अकराव्या शतकांत आंध्रांचा ज्यांत समावेश होतो, त्या तैलंगण प्रांतावर 'नरपति' नांवाचे राजे राज्य करीत होते. १३०९ मध्ये मलीक काफरनें येथील राजास मुसुलमानांचे मांडलिक बनविलें. यानंतर गोवळकोंडयाच्या मुसुलमान राजानीं हा प्रांत कायमचा घेतला. १६८७ मध्यें कुतुबशाहीची समाप्ति होऊन मोंगल बादशहांकडे हा प्रांत गेला. त्यांच्याकडून हैद्राबादच्या निझामांकडे व शेवटीं इंग्रजांकडे अशी याची दास्यपरंपरा आहे.

आंध्रांनीं विद्येंत चांगला लौकिक संपादन केला आहे. त्यांचें म्हणजे आंध्रवाङ्मय ‘तेलगु वाङ्मय’ या सदराखालीं देण्यांत आलें आहे.

[ सं द र्भ ग्रं थ.- वैद्य - मध्ययुगीन भारत, भा.१;स्मिथअर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया. बाँबे ग्याझेटीयर, भा.२; इं. गॅ.पु.७ (बेरार) व पु. २३ (तेलंगण); काल्डवेल-कंपॅरिटिव्ह ग्रामर ऑफ द्रविडियन लॅग्वेजेस; कँप्बेल-ग्रामर ऑफ दि तेलगू लँग्वेज; सरदेसाई-मुसलमानी रियासत; पुराणें; प्लिनी-नॅचरल हिस्ट्री, इंडियन अँटिक्केरी पु. ४२ श्रीनिवास अय्यंगार यांचा लेख. ]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .