विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आंध्र कालिदास - या कृष्णातीरवासी तेलंगी ब्राह्मण कवीचा उदय शके ९०४ मध्यें झाला. लहानपणींच तेलंगी व संस्कृत भाषेचा अभ्यास केल्यामुळें हा मोठा रसिक कवि झाला. यानें, निरनिराळ्या प्रातांत प्रवास केला. 'स्मार्तविजय' नामक एका ग्रंथाचें तेंलगी भाषेमध्यें भाषांतर यानें केलें तें अजून सर्व तेलगू देशांत प्रसिद्ध आहे. कालिदास नामक जो प्रख्यात संस्कृत कवि, त्याच्या व याच्या नांवांत फरक असावा म्हणून याच्या नांवामागें आंध्र ( तेलगू ) हें उपपद लावण्यांत आलें [ तेलगू वाड्मय, शंकर सायन्ना परशाकृत, मुंबई. १९१२ ]