विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंद कवि ( राजानक ) - हा काश्मीर देशांत राहणार असून शैव होता. यानें मम्मटाच्या काव्यप्रकाशावर काव्य प्रकाश निदर्शन नामक टीका लिहिली (१६६५) याशिवाय 'नैषधीय टीका' हा त्याचा ग्रंथ आहे असें आफ्रेट कोशावरून दिसते. 'विस्तारिका' टीकाकर्त्यांच्या (परमानंद चक्रवर्ती भट्टाचार्य ) उल्लेख या टीकेंत आहे. यावरून परमानंद चक्रवर्तीच्या मागून हा झाला असें ठरतें [ वि. वि. पुस्तक २२ अंक १-२. आफ्रेट-कॅटलॉंगस कॅगलोगोरुम ]