विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंदगांव - आनंद तालुक्याचें मुख्य ठिकाण. अहमदाबादच्या दक्षिणेस ४० मैलांवर हा गांव असून तेथें बी.बी.सी.आय. रेल्वे गोध्रा-रतलाम रेल्वे व पेटलाद रेल्वे मिळतात. इ.स. १८८९ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. उत्पन्न सुमारें दहा हजार; लोकसंख्या (१९२१) ११०२४. पावसाचें मान सरासरी ३५ इंच आहे. येथें एक सरकारी दवाखाना व मुक्तिफौजेचें इस्पितळ आहे. दोन डेअऱ्या व जिनिंगचें कांहीं कारखानें येथें चालतात. आनंद मिडलस्कूल व कॅथॉलिक कॉन्व्हेंट अँड आर्फनेज या दोन शिक्षणसंस्था आहेत.