विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंद तालुका - (मुंबई इलाखा) खेड जिल्ह्यांतील एक तालुका. २२' २६' आणि २२० ४४’ उत्तर अक्षांश; ७२० ५२' आणि ७३० १३ पूर्व रेखांश, क्षेत्रफळ २४४ चौरस मैल. या तहशिलींत उमरेठ, ओड आणि आनंद हीं गांवें व ८५ खेडीं आहेत. पूर्वेकडील थोडासा भाग सोडून दिल्यास बाकीचा प्रदेश सुपीक आहे. पाणीपुरवठा पुरेसा नाहीं. लोकसंख्या सुमारें दीड लाख आहे.