विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंदपुर -(बंगाल इलाखा). ओरीसामधील केवनझार संस्थानांतील एक खेडें; हें वैतरणी नदीच्या वामतीरावर वसलेलें आहे. २१०१३' उत्तर अक्षांश. ८६० ७' पूर्व रेखांश. लोकसंख्या (१९०१) २९४५. बंगाल-नागपूर रेलवेच्या भद्रख स्टेशनापासून या गांवास जाण्यास चांगला रस्ता आहे. येथें जंगलांतील पदार्थांचा बराच व्यापार चालतो. [इं.गॅ.५-१९०८]