विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंदपूर - (मुंबई इ.) काठेवाडमधील एक स्वतंत्र मांडलिक संस्थान. लोकसंख्या (१८८१) १४६२ येथील अनंतेश्वराचें किंवा अंतेश्वराचें देऊळ १०६८ त बांधलेलें आहे असें म्हणतात. आनंदपूरची नवीन वस्ती १६०८ च्या अलीकडील असून ती 'काठी' लोकांनी केलेली आहे. हें संस्थान थांगा टेकडयांच्या ओळींत असून त्याच्या आसपास उत्तम घोडे मिळतात (मुं. गॅ. ८-१८८४).