प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आनंदराव गायकवाड , (१८००-१८१९) रा व जी स दि वा ण गि री ची प्रा प्ति.-गोविंदराव गायकवाडानंतर बडोद्याच्या गादीवर आलेला पुरुष [ याच्या कारकीर्दीसंबंधीं कांहीं पुरवणी माहिती गायकवाड घराण्याच्या इतिहासांत आली असून पुढें दिलेल्या हकीकतीस मुख्यतःग्रांटडफचा आधार आहे. ]  गोविंदराव गायकवाड मरण पावला तेव्हां त्याच्या मागें त्याचे ४ औरस पुत्र, साद दासीपुत्र व शिवाय कांहीं मुली एवढा मोठा परिवार होता. औरसपुत्रांमध्यें आनंदराव हा सर्वांत वडील असून संस्थानांतील प्रमुख अधिकार्‍यांनीं त्यालाच जहागिंरीचा खरा वारस ठरविलें होतें. परंतु आनंदराव स्वतः मंदबुद्धीचा असल्यामुळें संस्थानांत निरनिराळे पक्ष उद्भवून ते आपल्या तंत्रानें कारभार चालविण्यासाठीं धडपड करीत होते. कान्होजीराव नांवाचा गोविंदरावाचा एक दासीपुत्र होता दासीपुत्रांमध्यें तोच सर्वांत वडील असून फार धीट व महत्त्वाकांक्षी माणूस होता. त्याला त्याच्या बंडखोर वर्तनामुळें गोविंदराव मरण्याच्या अगोदरच अटकेंत ठेवण्यांत आलें होतें. परंतु गोविंदरावाचें देहावसान होतांच त्यानें आनंदरावावर आपलें फार प्रेम असल्याचें दाखवून स्वतःची सुटका करून घेतली व नांवाला केवळ दिवाणाचा मुतालिक होऊन कांहीं महिने जाहगिरीचा सर्व कारभार, त्यानें आपल्या इच्छेप्रमाणें चालविला. परंतु त्यानें पैशासाठीं राजघराण्यांतील स्त्रियांवर जो जुलूम केला त्यामुळें तो लवकरच सर्वांस अप्रिय झाला व इतकेंहि करून अरब शिपायांचा रोजमुरा देण्यास लागणार्‍या पैशाची त्यास सोय  करतां न आल्यामुळें तेहि त्याच्याविरुद्ध उठण्यास तयार झाले. सरतेशेवटीं एके रात्रीं (२९ जानेवारी १८०१) अरबी शिपायांनी कान्होजीच्या घरास वेढा घातला व त्यास कैद करून आनंदरावापुढें उभें केलें. आनंदरावानें कान्होजीची त्याच्या अत्याचाराबद्दल चांगली कानउघाडणी केली व त्यास रामपूरच्या तुरुंगांत अटकेंत ठेवण्याचा हुकूम केला.

इं ग्र जां च्या कु म के ची या च ना. - येणेंप्रमाणें पूर्वीचा दिवाण रावजी आप्पा यांस पुन्हा दिवाणगिरीचा अधिकार प्राप्त झाला. पण कान्होजीप्रमाणें त्यासहि पैशाची अडचण भासूं लागली. इकडे कान्होजीची आई गजराबाई ही सुरतेस होती तिनेंहि कडीचा जहागीरदार खंडेरावाचा मुलगा मल्हारराव यास रावजी आप्पाविरुद्ध उचल करण्यास चिथविलें. दोन्हीहि पक्षांनीं इंग्रजांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. रावजीनें इंग्रजास असें आश्वासन दिलें कीं, मी तुम्हास गोविंदरावानें देऊं केलेला चौऱ्याशीं परगणा व सुरतची चौथ तुमच्या स्वाधीन करीन. उलट कान्होजीच्या पक्षानें हा मुलूख त्यांच्याकडे ठेवून शिवाय चिखली परगणा देण्याचें आमिष दाखविलें. मल्हाररावांचें म्हणणें कीं आपणांस गायकवाडाच्या कुटुंबास परकीयांच्या प्रबिंधांतून मुक्त करण्याकरितां मदत पाहिजे, तर उलट रावजीचें म्हणणें कीं, आपण आनंदरावाच्या हुकुमानेंच मल्हाररावाविरुद्ध मदत मागावयास आलों आहे. रावजीचा भाऊ बाबाजी हा बडोद्याच्या फौजेवरील मुख्य होता. त्याचा रावजीस आधार असून बडोद्याच्या शिबंदींतील अरब लोकांच्य ७००० भाडोत्री पायदळांतील बरेचसे लोकहि त्याच्याच पक्षाचे होते. तथापि त्याचें या शिपायावर वजन असें मुळींच नव्हतें. पेशवाईंत शिपायांचा पगार दरमहाच्या दरमहा सरकारांतून क्कचितच मिळत असल्यामुळें त्यांचें त्यांच्या सैन्याबरोबर असलेल्या एखाद्या मोठ्या सावकाराच्या गुमास्त्याकडे उधारीचें खातें असे. हे सावकार केवळ शिपायांसच नव्हे तर संस्थानिकांसहि जबर व्याज घेऊन रकमा पुरवीत असत. त्यामुळें त्यांचेंच खरें शिपाई लोकांवर वजन असे. बडोद्यांत अशा प्रकारचे मंगल पारिख व शामळ बेचर असे दोन मोठे संपत्तिमान सावकार होते. ह्या दोघांचाहि रावजीस पाठिंबा असल्यामुळें यावेळीं बडोद्यांत त्याचाच पक्ष फार प्रबळ होता. उलटपक्षीं कान्होजीचा पक्ष ज्यानें उचलला होता तो मल्हारराव फार बुद्धिमान व धाडसी माणूस होता. अगोदर हा कान्होजीस पदच्युत करण्यास तयार झाला होता; पण आतां कान्होजीच्या वतीनें त्यास बडोदें सरकारास द्यावी लागत असलेली पेशकषीची रक्कम मागील बाकीसह माफ करण्याचा करार करण्यांत आल्यामुळें बरीच मोठी सेना गोळा करून तो कान्होजींच्या बाजूने लढावयास  आला व आंदरावाचीं ठाणीं १८०१ च्या अखेरीस काबीज करूं लागला. तेव्हां रावजीनें इंग्रजांशीं बोलणें लावून मल्हाररावाविरुद्ध आपणांस मदत केल्यास इंग्रजांच्या पांच पलटणी चाकरीस ठेवण्यास आपली तयारी आहे असें मुंबई सरकारास कळविले.

 

क डी च्या ज हा गि र दा रा वि रु द्ध मो ही म. - ही विनंती ऐकून मुंबई सरकाराचा मोह अनावार झाला व गव्हर्नर जनरलकडून परवानगी आली नव्हती, तरी त्यांनीं मेजर अलेक्झांडर वाकर यांच्याबरोबर रावजीच्या मदतीस १६०० लोक पाठविले. वाकरची तुकडी १८०२ सालच्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस बाबाजीच्या हाताखालीं असलेल्या गायकवाडाच्या सैन्यास येऊन मिळाली व त्यानंतर गायकवाड व बाबाजी यांचे संयुक्त सैन्य मल्हाररावाच्या कडी व गावावर चाल करून जाऊं लागलें. तेव्हां झाल्या गोष्टीबद्दल मल्हाररावानें दिलगिरी प्रदर्शित करून तो घेतलेलीं सर्व ठाणीं परत करण्यास तयार झाला. तथापि लवकरच या वाटाघाटींत मल्हाररावाची लबाडी आहे असें दिसून आल्यावरून इंग्रजांचें सैन्य थबकून राहिलें होतें तें पुन्हां पुढें येऊं लागलें. मल्हाररावानें अद्यापहि तहाची वाटाघाट चालू ठेवली होती. अशा रीतीनें वाटाघाट चालू असतां मल्हाररावानें ता. १७ मार्च रोजीं शत्रूच्या सैन्यावर अचानक हल्ला केला; पण तो परतवून लावण्यांत आला. या हल्ल्यांत इंग्रजांचे सुमारें ६० लोक ठार झाले असतील.

याप्रमाणें मल्हाररावाच्या सैन्यास मागें हटावें लागलें खरें; तथापि त्यानें विरुद्ध पक्षांतील गायकवाडाच्या सैन्यांत फितूर करून ठेवला असल्याचें पुढें लवकरच आढळून येऊन वाकर यास आपण शत्रूच्या पूर्णपणें कचाट्यांत सांपडलों आहों असे उघड उघड दिसून आलें वाकर यानें वरिष्ठांस आपली परिस्थिति निवेदन करतांच त्यांनीं मुंबई येथून जेवढें सैन्य पाठवितां येण्यासारखें होतें. तें सर्व कर्नल सर विल्यम क्लार्क याच्या हाताखालीं देऊन रवाना केलें. हें सैन्य खंबायतेस एप्रिलच्या १२ व्या तारखेस येऊन पोंचलें व त्यानंतर दोन दिवसांनी तें कडी येथें वाकर आपल्या तुकडीचें शत्रूपासून रक्षण करीत मदतीची वाट पहात बसला होता त्याच्यकडे निघून गेलें. मल्हाररावाचें सैन्य कडी शहराच्या आश्रयानें एक चांगला मजबूत खंदक खणून राहिलें होतें. क्लार्क यानें कडीस येतांच विलंब न लावतां प्रथम तें शहर काबीज करण्याचें ठरविलें. त्याप्रमाणें एप्रिल महिन्याच्या ३० व्या तारखेस पहाटेस शत्रूवर हल्ला चढविण्यांत येऊन खंदक सर करण्यांत आला. या हल्ल्यांत इंग्रजांकडील १६३ माणसें जखमी व ठार मिळून कामास आलीं. यानंतर पुढें लवकरच मल्हारराव इंग्रजास शरण आला (३मे १८०२) व कडी शहर बडोदें सरकारच्या हवालीं करण्यांत आलें. तथापि इंग्रजांनीं आपल्या पायदळाच्य दोन तुकड्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हाताखालीं कडी येथें शिबंदी म्हणून ठेवल्या व थोडेसे सैन्य क्लार्कबरोबर मुंबईस रवाना करून बाकीचें बहुतेक सर्व सैन्य कर्नल वुडिंग्टन यांच्य हाताखालीं गायकवाड दरबारचा नवीन पोलिटिकल रेसिडेंट मेजर वाकर याच्या मदतीस ठेविलें

कडी शहर काबीज होऊन मल्हारराव शरण आल्यानें गायकवाड घराण्याच्य दोन्ही शाखा पुन्हां एकत्र होऊन त्यांचा मुलूख एका सत्तेखालीं आला. मल्हाररावास राहण्याकरितां नडियाद हा गाव नेमून देण्यांत आला व त्या जिल्ह्याच्या उत्पन्नांतील सवालक्ष रुपये त्याच्या खर्चासाठीं वेगळे काढून ठेवण्यांत येऊं लागले. मोहीम संपताच इंग्रजानींहि आपलें बक्षीस सव्याज पदरांत पाडून घेतलें. चौऱ्याशीं परगणा व सुरतच्या चौथीचा गायकवाडाचा हिस्सा मोहिमीपूर्वीच देण्यांत आला होता. शिवाय आतां गायकवाडानें दोन हप्त्यांनीं मोहिमीचा खर्चाहि सव्याज इंग्रजांच्या पदरांत घालण्याचें कबूल करून त्याच्या तारणादाखल सुरत अठ्ठाविशी इंग्राजाकडे ठेविली. याचवेळीं त्यानें गुप्तपणें दरमहा ६५००० खर्चाचें इंग्रजांचें २००० शिपायांचें यूरोपियन तोफखाना असलेलें कुमकी सैन्यहि आपल्या पदरीं ठेविलें. ४ जून १८०२ रोजीं चिखली परगणा इंग्राजांच्या हवाली स. १८५९ पासून बक्षीस म्हणून करण्यांत आला. यासोबत (५ मे १८०३) कैऱ्याचा किल्ला व जहागीर देण्यांत आली.

स ण खे डा का बी ज. - बडोद्याजवळ सणखेडा म्हणून एक गांव आहे तेथें गणपतराव नांवाचा गायकवाड घराण्यांतील एक पुरुष मामलतदार होता. त्यानें आपण मल्हाररावाच्या पक्षाचे आहोंत असें जाहीर केलें असून त्या गांवचा कारभारहि तो त्याच्याच नांवानें चालवीत होता. गोविंदरावाच्या दासीपुत्रांपैकी. मुरारराव नांवाचा एक पुत्रहि त्याला येऊन मिळाला होता. रावजी आप्पानें इंग्रजांच्या कुमकी सैन्याची एक तुकडी पाठवून सणखेडा काबीज करून घेतला (७.७.१८०२;) परंतु गणपतराव व मुरारराव हे त्याच्या हातीं लागले नाहींत. ते तेथून जे निसटले ते धारच्या पवारांकडे जाऊन त्यांच्या आश्रयास राहिले.

अ र ब सै न्या स र जा. - कांहीं दिवसांपासून बडोद्यांत अरब शिपायांचेंच साम्राज्य होतें असें म्हटलें तरी चालेल. त्यामुळें रावजी आप्पा व त्याचे सल्लागार इंग्रज यांनीं बडोद्याचें लष्कर कमी करण्याचें काम हातीं घेतले तेव्हां अरब शिपायांस ती गोष्ट मुळीच आवडली नाहीं. त्यांनी आपल्या तुंबून राहिलेल्या पगाराची रक्काम अवाच्या सव्वा फुगवून तिची फेड करण्याचा तगादा लाविला, व गायकवाडास कैद करून आपल्या बाकीची फेड झाल्याशिवाय त्याला मुक्त करण्यास आपण तयार नाहीं असें जाहीर केलें. त्यांनीं कान्होजीरावास निसटून जाऊं दिलें. याच सुमारास मल्हाररावहि नाहींसा झाला. कांहीं उद्योग नसलेल्या शिपायांचा गुजराथेंत नेहमीं पुष्कळसा भरणा असतो. त्यांतल्यात्यांत मल्हाररावाच्या सैन्यास नुकतीच रजा देण्यांत आली असल्यामुळें या वेळीं तर त्याच्या योगानें देशांत कांहीं बंडाळी उपस्थित होण्याची भीति विशेष होती. प्रथम वाकर यानें गोडीगुलाबीनें समेट घडवून आणतां येत असल्यास पहावा या विचारानें तसा प्रयत्न करून पाहिला. तो निष्फळ झाल्यावर मुंबईहून एक यूरोपियन पलटण मागविण्यांत आली, व गायकवाडाच्या कुमकी सैन्यास ती येऊन मिळाल्यावर कर्नल वुडिंग्टन यानें बडोदें शहरास १८०२ सालीं दिसेंबरच्या १८ तारखेस वेढा दिला. हा वेढा ता. २६ पर्यंत चालू होता. या अवधींत अरब लोकांनीं शहराच्या तटबंदीच्या व घरांच्या आसऱ्यानें शत्रूच्या सैन्यांतील अनेक अंमलदार नेम धरून ठार केले. या वेढ्यांत हल्ला करणाऱ्या लोकांपैकीं दुसरेहि बरेच लोक कामास आलें. परंतु शेवटीं तटबंदीस भगदाड पडणार असें दिसून येतांच अरब लोक शत्रूस शरण आले. या वेळीं असें ठरविण्यांत आलें कीं बडादें सरकारानें शिपायांची जी काय योग्य बाकी देणे निघेल तिची फेड करावी व ती हातीं पडतांच अरब लोकांनीं गुजराथ सोडून निघून जावें. त्याप्रमाणें बडोदें सरकारांनीं शिपायांचें एकंदर १७॥ लाख रुपये देणें निघालें तें सर्व फेडून टाकिलें. तेव्हां अरब सैन्यांतील बहुतके मुख्य मुख्य लोकांनीं निमूटपणें निघून जाऊन आपलें वचन पूर्ण केलें. परंतु अबूद जमादारप्रभृति कांहीं लोक बरेचसे शिपाई बरोबर घेऊन ठरल्या दिशेनें न जाता कान्होजीस मिळण्याच्या उद्देशानें अगदीं उलट दिशेनें चालते झाले. तेव्हां त्यांचा पाठलाग करण्याकरितां वुडिंग्टन यास पाठविण्यांत आलें होतें व त्यानें या लोकांच्या छावणीवर छापा घालून त्यांनां उधळून लाविलें. तथापि ते लोक पुन्हां एकत्र होऊन कान्होजीस जाऊन मिळाले.

का न्हो जी ची उ च ल व त्या चा पा ठ ला ग. - वर सांगितल्याप्रमाणें कान्होजी हा बडोद्याहून निघाला तो प्रथम महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर राजपिंपळी म्हणून एक डोंगराळ मुलूख आहे तेथें गेला; व तेथें बरेचसे लोक जमवून बडोदें शहारास वेढा पडला होता त्या सुमरासा परत गुजराथेंत आला. त्यानें बाबाजीच्या फौजेवर हल्ला करून तिची दाणादाण केली. नंतर पुन्हां तो बडोद्याकडे चालून येऊं लागला.

बडोदें हस्तगत झाल्यानंतर पांच दिवसांनीं मेजर होम्स याच्या हाताखालीं एक रेजिमेंट व एक पलटण देऊन त्याला कान्होजीचा पाठलाग करण्यासाठीं रवाना करण्यांत आलें. (१ जानेवारी १८०३). कान्होजी हा फौज जमवीत, गांवोगांव खंडण्या घेत इकडून तिकडे फिरत होता. बडोद्यांत आपल्यास अनुकूल असलेला एक पक्ष उत्पन्न करण्याचीहि त्याची खटपट चालली होती. इंग्रजांच्या तुकडींनें एक महिनाभर कान्होजीचा पाठलाग करण्यांत घालविल्यावर तिच्या मदतीस २५० यूरोपीयन व ३०० हिंदी शिपाई आणखी पाठविण्यांत आले. एकदां कान्होजी हा सौरी गांवापासून चार पांच मैलांच्या अंतरांत एका घळीमध्यें आपल्या लोकांसह दबा धरून बसला असतां होम्स याचें बिनीचें सैन्य तेथें आलें. तें सर्व आंत येईपर्यंत कान्होजीच्या लोकांनी बिलकुल हालचाल केली नाहीं. पण ते आंत येतांच एकदम गोळयांचा वर्षाव सुरू झाला, व  त्यायोगें शत्रुपक्षाचें सैन्य अस्ताव्यस्त होतांच अरब लोक तरवारी हातांत घेऊन त्यावर मोठ्या उत्साहानें नेट धरून चाल करून गेले व बिनीच्या लोकांची दाणादाण करून ते तसेच पुढें घुसलें. हें पाहून मेजर होम्स आपल्या घोड्यावरून खालीं उतरला, आपण स्वतः पुढें होऊन त्यानें आपल्या सर्व सैन्यास शत्रूवर घातलें, व मोठ्या शौर्यानें लढून विपक्षीय लोकांस रणक्षेत्रांतून हांकून लाविलें (फेब्रुवारी ६) या प्रसंगीं इंग्रजांचे पाच अंमलदार धरून एकंदर १०० लोक जखमी व ठार झाले. या पराभवानंतर आणखीं सुमारें एक महिना कान्होजी गुजराथेंत होता. शेवटीं कपडवंजाजवळ त्यानें इंग्रजांशी लढण्याचा अखेरचा एक प्रयत्न केला. त्यावेळी मेजर होम्स यानें त्याची छावणी हल्ला करून घेतल्यामुळें त्याच्या सर्व लोकांची वाताहत झाली. यानंतर कान्होजी उज्जनीस पळून गेला.

इं ग्र जां चा ब डो दे स र का र व र प ग डा. - काठेवाडमधून खंडणी गोळा करण्याकरितां दरवर्षी बडोद्याहून बरेंच सैन्य रवाना करावें लागत असे. गायकवाडाच्या सेनेबरोबर इंग्राजांच्या रेसिडेंटानेहि ब्रिटिश सैन्य बरोबर घेऊन प्रत्येक वेळीं जावें. यामुळें देशांत शांतता प्रस्थापित होऊन वसुलांची वाढ झाली. अशा रीतीनें इंग्रजांनी लवकरच बडोदें सरकारवर आपला पगडा बसविला व अतःपर त्या राज्यांतील महत्त्वाच्या सर्व गोष्टी ब्रिटिश रेसिडेंट ले.क. वाकर याच्या तंत्रानें होऊं लागल्या.

बडोद्याच्या कारभारी मंडळांत बहुतेक परभू लोकांचाच विशेष भरणा असून इंग्रजांना घरात घेणारा रावजी आप्पाजी हा त्यांत प्रमुख होता पण तो १८०३ च्या जुलईमध्यें मरण पावला. त्यानें आपल्या मरणापूर्वी सीताराम रावजी नामक आपल्या एका पुतण्यास दत्तक घेतलें असल्यामुळें रावजी मेल्यावर रेसिडेंटाच्या संमतीनें या सीताराम रावजीसच मुख्य कारभाऱ्याची जागा देण्यांत आली. बरेच दिवस त्याचें काम पाहिल्यावर जेव्हां तो त्या कामास नालायक असल्याचें दिसून आलें तेव्हां इतके दिवस गायकवाडाच्या सेनाधिपतीचें काम करीत असलेला त्याचा चुलता बाबाजी यास सीतारामास मदत करण्याविषयीं इंग्रजांनीं पाचारण केलें. परंतु सीताराम काम करण्यास नालायक म्हणून नको होता तर बाबजीस त्याच्या हातीं सर्व सत्ता राहिल्यास तो डोईजड होईल म्हणून इंग्रज भीत होते म्हणून ते दिवाणाची सत्ता कमी करण्याची कांहीं युक्ति पाहूं लागले. गायकवाडाचा भाऊ व त्याच्या जहागिरीचा वारस जो फत्तेसिंह त्यास १८०३ सालीं होळकराचा एक सेनापति पुण्याहून आपल्याबरोबर घेऊन गेला होता. शिवाय होळकरानें गायकवाडाच्या घराण्यांतील या एका वारस पुरुषास सैन्य देऊन गुजराथेंत पाठविलें. तर नसती भानगड उपस्थित होईल अशी इंग्रजांस भीति होतीच. तेव्हां त्यांनीं फत्तेसिंहाबद्दल पैसे भरून त्याला होळकरापासून सोडविले व १८०६ पासून तो राजप्रतिनिधि म्हणून बडोद्याचा कारभार पाहूं लागला. फत्तेसिंहानें गंगाधरशास्त्री नामक एका इसमाची आपल्या चिणिसाच्या जागेवर नेमणूक केली. या गंगाधरशास्त्रावर लवकरच पुढें रेसिडेंटाचा विश्वास बसल्यामुळें बाबाजी मरण पावल्यावर व सीतारामाच्या हातून दुर्वर्तन घडल्यावर फत्तेसिंह व रेसिडेंट यांच्या मदतीनें एक नांव खेरीज करून बाकी सर्व मुख्य कारभाऱ्याचे अधिकार गंगाधरशास्त्र्याच्या हाती आले.

इं ग्र ज व गा य क वा ड यां म धी ल न वी न त ह. - १८०२ सालच्या मार्च, जून व जुलै महिन्यांत इंग्रजांचे गायकवाडाशीं जे तीन निरनिराळे करारमदार झाले होते त्यांत कांहीं फरक करून व कांहीं नवीन कलमें घालून ते पक्कें करून घेण्याकरितां इंग्रज व गायकवाड यांच्या दरम्यान तारीख २१ एप्रिल सन १८०५ रोजीं एक नवीन तह झाला. याच्यापूर्वी गायकवाडानें २००० शिपायांचें कुमकी सैन्य स्वतःच्या पदरा ठेवून घेतलें. होतें, परंतु आतां त्यानें ३००० पायदळ व तोफखान्याची एक कंपनी ठेवण्याचें कबूल केलें. हें सैन्य गायकवाडाच्या मुलुखांतच ठेवलें जावें, परंतु काहीं महत्त्वाच्या प्रसंगीच त्याचा उपयोग करण्यांत यावा असें ठरविण्यांत आले. हें सैन्य पोसण्याकरितां गायकवाडानें धोलका, नाडियाद, बीजापूर, माहतूर, मुंडा, करीचा कप्पा व खीमकटोद्रा हे १०,७०,००० रुपेय उत्पन्नाचे ७ जिल्हे तोडून देऊन काठेवाडावर एक लक्षाच्या वराता दिल्या, चौऱ्याशीं, चिखली व कैरा हे परगणे व सुरतच्या चौथेमधील गायकवाडाचा हिस्सा हे अगोदरच इंग्रजांना अर्पण करण्यांत आले होते. इंग्रजांचे गायकवाडाकडे एकंदर ४१ १/२ सालीना अजमासें १४ लक्ष उत्पन्नाच्या मुलुखाचा वसूल इंग्राजांनीं त्या कर्जाच्या फेडीकरितां आपल्याकडे लावून घेतला. गायकवाड व पेशवे यांच्या देण्याघेण्याचा हिशोब इंग्राजापुढें ठेवण्याचें गायकवाडानें कबूल करून आपल्या पदरीं कोणीहि यूरोपीय माणूस चाकरीस न ठेवण्याचा व ब्रिटिशांच्या अनुमतीशिवाय कोणत्याहि परक्या संस्थाननिकाशीं कलागत उपस्थि न करण्याचा करार केला.

सु रा ज्या ची स्था प न. - गोविंदारावाच्या हातीं जहांगीर आल्यापासून पेशवे व गायकवाड यांनीं परस्परांच्या देण्याघेण्यासंबंधी अद्यापपर्यंत कांहीं हिशोब केलेला नव्हता. आबा शेलूकराचें बंड मोडल्यावर बडोदें सरकारानीं अहमदाबादची इजाऱ्याची रक्कम, काटेवाड, पिटलावद, नापार, कवडाराणपूर धंडूका, गोगो, यांची खंडणी व खंबायत मधील कांहीं हक्का या सर्वांबद्दल पेशव्यांस दरसाल पांच लाख रुपये देण्याचें कबूल केलें होतें. जेव्हां मुंबईकर इंग्रजांनीं रावजी आप्पाजीच्या पक्षास कुमक करण्यासाठीं बडोद्यास आपलें सैन्य रवाना केलें तेव्हां बडोदें संस्थानचा, वसूल ५५ लक्ष तर खर्च ८२ लक्ष अशी स्थिति होती. राज्यांतील सर्व सत्ता अरब शिपयांच्या हातीं आली. असून, गायकवाडाच्या कुटुंबांतील माणसांत कलह माजून फूट पडली. असल्यामुळें कोणत्याहि धाडशी माणसास आपला तळीराम गार करून घेण्यास ती उत्तम संधि होती. पेशव्यांचें घेणें शिवाय करून बडोदें सरकारास दुसरें जें कर्ज होतें. त्या सर्वांचा फडशा सुमारें ४२ लक्ष रकमेवर करण्याचें ठरलें असून ती रक्कम कांही स्वतः इंग्रजांकडून व कांहीं त्यांच्या जमानतीवर घेऊन उभी करण्यांत आली होती. ज्याच्या बंडामुळें इंग्रजांनी बडोद्याच्या राज्यांत आपलें कायमचें ठाणें देण्यास अवसर मिळाला तो मल्हारराव गायकवाड बडोद्यांत पूर्वी अरब लोक वेढले गेले होते त्याच वेळेस नाडियादहून चालता झाला होता. हा पुढें कांहीं दिवसांनीं अगदीं उपासमार होत असलेल्या स्थितींत गायकवाडाचा सेनापति बाबाजी याच्या हातीं लागला. बाबीजीनें त्याला इंग्राजांच्या हवालीं केलें व इंग्राजांनीं त्यास मुंबईच्या किल्ल्यात व त्याच्या आसमंत भागांत साध्या नजर कैदेखालीं ठेविलें. या ठिकाणीं तो बरेच दिवस होता व शेवटीं याच स्थितींत त्याचें देहावसानहि झालें. १८०८ सालीं कान्होजी शरण आला. त्याला प्रथम कांहीं नेमणूक करून देऊन मोकळेंच बडोद्याजवळ पाद्रा येथे ठेविले होतें. परंतु फार दिवस त्याच्यानें स्वस्थ बसवलें गेलें नाहीं. इ.स. १८१२ सालीं त्यानें कारभाऱ्यांविरुद्ध कारस्थान रचल्यामुळें त्याला कैद करून मद्रासेस नेऊन तेथें राजकीय कैदी म्हणून ठेवण्यांत आलें.

गं गा ध र शा स्त्रा चा खू न. - पेशवे व गायकवाड यांच्या दरम्यान सध्या दोन भानगडीचे प्रश्न होते. एक पेशव्यांचें गायकवाडांकडे साचले घेणें व दुसरा अहमदाबाद व त्याखालील दुसऱ्या कांहीं पेशव्यांच्या मुलखाचा गायकवाडांकडे असलेला इजारा. प्रथमतः या भानगडीच्या प्रश्नांचा निकाल लावण्यासाठीं गायकवाडांनीं बापू मैराळ नांवाचा अपाला एक वकील पुण्यास पाठविला. पेशव्यांच्या हिशोबानें त्यांचें गायकवाडांकडे जवळ जवळ एक कोट रुपयें घेणें निघत होतें. तथापि गायकवाडाच्या घराण्यानें आपल्या वडिलांचा पक्ष घेतल्यामुळेंच त्यावर अनेक संकटे आलीं होतीं, हें जाणून बाजीराव या घेण्यांपैकीं ६० लक्ष रुपयांची गायकवाडास सूट देण्यास तयार होता. उलटपक्षीं गायकवाडांचें असें म्हणणें होतें कीं, 'पेशव्यांच्या कारभाऱ्यांनी पुरंदरच्या तहाच्या वेळी आमच्याकडे असलेलें भडोच अन्यायानें इंग्रजांस दिल्यामुळें आमचें आतांपर्यंत जें नुकसान झालें आहे तें त्यांनीं भरून द्यावें आणि आबा शेलूकरांचें बंड मोडण्याच्या व गुजारथेंतील पेशव्यांच्या व आमच्या मुलुखाच्या संरक्षणाच्या प्रीत्यर्थ आलेला खर्च पेशव्यांनी आपणांस द्यावा.' बाजीरावाने प्रथम गायकवाडांनीं बापू मैराळाच्याऐवजीं दुसरा कोणी तरी इसम पाठवावा, हट्ट धरला व जेव्हां गायकवाडांकडून बापू मैराळाच्या जागीं गंगाधरशास्त्री नांवाचा दुसरा एक इसम आला, तेव्हां त्यानें कांहीं कारणें काढून गंगाधरशास्त्र्यांचीहि गांठ घेण्याचें नाकारले. (इ.स. १८१४); परंतु इंग्रजांनी हीं कारणे गैरवाजवीं असल्याचें ठरविल्यावरून शेवटीं बाजीरावानें अहमदाबाद वगैरेंचा इजारा गायकवाडाकडेच पुन्हां चालू ठेवण्याची विनंति साफ नाकारली; इतकेंच नव्हे तर त्याच्या मर्जीतील त्रिंबकजी डेंगळें नांवाच्या इसमानें पेशव्याच्या नांवावर गुजराथेंतील जिव्हेहि आपल्या ताब्यांत घेतले. हें पाहून गंगाधरशास्त्र्यानें ब्रिटिश रेसिडेंटाचा सल्ला घेऊन, वादाच्या प्रश्नांचा निकाल लावण्याचें काम इंग्रजांकडे सोंपवून पुन्हां परत बडोद्यास जाण्याचें ठरविलें. गंगाधरशास्त्र्यानें परत जाण्याचें ठरविलें आहे, असें समजतांच बाजीराव व त्रिंबकजी यांच्या वृत्तींत एकदम फरक पडला ( इ.स. १८१५). त्रिंबकजी डेंगळे आतां गंगाधरशास्त्र्यास हरभऱ्याच्या झाडावर चढवून त्याची मनधरणी करूं लागला व शेवटीं पंढरपूर मुक्कामीं संधि साधून त्यानें त्याचा खून करविला (१५ जुलै १८१५ गंगाधरशास्त्री पहा ).

गंगाधरशास्त्र्याच्या खुनांत गायकवाडांचा मुख्य भारभारी सीताराम रावजी याचेंहि अंग होतें. सीताराम रावजी हा गंगाधरशास्त्र्यांचा मत्सर करीत असून तो बाजीरावांस फिुतुरहि झाला होता. पंढरपूर येथें गंगाधरशास्त्री कोणता हें मारेकऱ्यांनां दाखवून देण्याचें काम या सीताराम रावजीच्याच दोघां हस्तकांनीं केलें होतें. इंग्रजानीं बाजीरावापासून त्रिंबकजी डेंगळ्यास आपल्या ताब्यांत घेतलें त्याच वेळेस या दोघां इसमांसहि कैद करण्यांत आलें होतें. त्यानंतर त्यांनां गायकवाडाच्या स्वाधी केलें व गायकवाडानीं त्यास डोंगरी किल्ल्यांत अटकेंत ठेविलें. बाजीरावानें त्रिंबकजीस इंग्रजांच्या हवालीं करण्यापूर्वी सीताराम रावजी हा त्रिंबकजीच्या काहीं लोकांसह सैन्य जमा करीत होता म्हणून सीताराम रावजी यांस बडोद्याच्या राज्यकारभारांतून दूर करून इंग्रजांनी पुढें त्यास फत्तेसिंहाच्या इच्छेविरुद्ध आपल्या ताब्यांत घेतलें.

इं ग्र जां शीं पु र व णी त ह. - ता. १३ जानेवारी सन १८१७ रोजीं इंग्रज आणि पेशवे यांच्या दरम्यान जो तह झाला त्याअन्वये बाजीराव केवळ चार लक्ष रूपये वार्षिक खंडणी घेऊन गायकवाडावरील आपल्या जुन्या नव्या सर्व हक्कास सोडचिठ्ठी देण्यास तयार झाला; व १८१४ सालीं ज्याची जुनी दहा वर्षांची मुदत संपल्यामुळें गायकवाड ती वाढवून घेण्यासाठीं खटपट करीत होते तो अहमदाबादचा इजारा पूर्वीच्याच म्ह.साडेचार लक्ष रुपये रकमेवर त्यानें गायकवाडांस कायमचा दिला. या तहामुळें गायकवाडास स्वतः कांहीं हातपाय न हलवितां फार फायदा मिळाला असा मुंबई सरकारचा समज होऊन ते गायकवाडावर आणखी कुमकी फौज लादण्याचा विचार करूं लागले. त्याप्रमाणें तारीख ६ नोव्हेंबर सन १८१७ रोजीं इंग्रजांनी गायकवाडांशी एक नवीन तह केला. मुलुखाचा बंदोबस्त करणें व गायकवाडावर लष्करी खर्चाचें योग्य प्रमाण लादणें असे या तहाचे दोन उद्देश होते. गायकवाड लष्कराकडे पुष्कळ खर्च करतात तरी त्यांच्या सैन्याची व्यवस्था नीट नसल्यामुळें बंदोबस्ताचा भार आम्हांवरच पडून लढायांचा खर्च आम्हांस सोसावा लागतो अशी इंग्रजांची तक्रार होती. म्हणून त्यांनीं आतां गायकवाडांची काहीं शिबंदी कमी करून त्यांच्या कुमकी सैन्यांत एक हजार पायदळ व घोडदळांची दोन रोजमेंटें एवढी भर टाकाली, व या सैन्याच्या खर्चाकरिता आपल्या मुलुखाच्या बंदोबस्तासाठीं जो प्रदेश घेणें अवश्य दिसलें तो गायकवाडापासून मागून घेतला.

इं ग्र जां ना यु द्धां त म द त. - या तहानें गायकवाडांचें सैन्य कमी केलें गेल्या बद्दल जरी फत्तेसिंहास वैषम्य वाटत होतें तरी त्यानें १८१७ च्या अखेरीस इंग्रजांचे पेशव्याशीं व नागपुरकर भोसल्याशीं जें युद्ध उपस्थित झालें इंग्रजाचे बरेच सैन्य पेंढाऱ्याचा बंदोबस्त करण्यातं गुंतले होतें. त्यांत पुन्हां त्याचें शिंद्याशी सूत नसून मल्हारराव होळकराच्या दरबारांतील एक पक्षहि त्याच्या विरुद्ध होता. यामुळें इंग्रजास गायकवाडाकडून जी कांहीं मदत मिळेल ती हवीच होती. नुकत्याच झालेल्या तहाप्रमाणें फत्तेसिंहानें इंग्रजांची कुमकी फौज तर ताबडतोब वाढविलीच, पण शिवाय त्यानें आपल्या एका सरदारास बरोबर २००० सैन्य देऊन त्यास इंग्रज अधिकाऱ्याबरोबर माळव्यांतील मोहिमींत पाठविले व पुढें इंग्रजांनी या सैन्यापैकी २०० स्वार कोंकणांतील मोहिमींत पाठविण्याविषयीं विनंति केली तेव्हां त्यानें तिलाहि आपली संमति दिली. माळव्यांतील या युद्धांत गायकवाडास फार खर्च येऊन १८१२ पासून संस्थान कर्जमुक्त होतें तें पुन्हा कर्जबाजारी झाले. या मदतीबद्दल गायकवाडास इंग्रजांना नवीन मुलूख वगैरे कांहीं दिला नाहीं. या युद्धापासून त्यांना जो कांहीं फायदा झाला तो इतकाच की, पेशव्यांची सत्ता अस्तित्वांत असती तर त्यांना पेशव्यांना जे ४ लक्ष रुपये खंडणी म्हणून द्यावे लागले असते ते आतां द्यावे लागणार नव्हते.

फ त्ते सिं हा चा मृ त्यु. - २३ जून १८१८ रोजी फत्तेसिंह मरण पावला. आनंदरावानंतर बडोद्याच्या गादीचा वारस त्याचा १९ वर्षांचा धाकटा भाऊ सयाजी हा असून शिवाय तो स्वभावानें शांत पण चलाखहि होता. म्हणून संस्थानांतील कित्येक लोक सयाजीच्या नेमणुकीविरुद्ध होते तरी इंग्रजांनीं त्याचीच बाजू घेऊन पत्तेसिंहानंतर त्यास राजप्रतिनिधि नेमलें. पण सयाजी हा स्वतंत्र विचाराचा माणूस होता. १८१७ सालीं झालेल्या तहामध्यें असे एक कलम होतें कीं, इंग्रजांनां बाहेर कोठ युद्धांत पडावें लागलें तर गायकवाडांनीं त्यास मदत करावी व तिजबद्दल त्यांनां युद्धांपासून झालेल्या फायद्याचा हिस्सा मिळेल. या कलमाच्या आधारावर सयाजीराव इंग्रजांपासून त्यांनां मागील युद्धांत जो मुलूख मिळाला त्यांतील हिस्सा मागूं लागला. इंग्रजांनां वाटत होतें की, गायकवाडांस आपल्यापासून अगोदरच फार फायदा झाला असल्यामुळें त्यास नवीन मुलूख देण्याची गरज नाही.

या व दुसऱ्या एका प्रश्नाचा विचार करण्यास व अंतर्गत भानगडीचा निकाल लावण्यास गव्हर्नर एलफिन्स्टस बाडोद्यास येणार तोंच २ आक्टोबर १८१९ रोजी आनंदराव मृत्यु पावला. मरणसमयीं त्याचें वय पंचावन्न वर्षांचे होतें.

[ संदर्भ ग्रंथः - ग्रांटडफ; मुंबई गॅझेटियर-बडोदें; रूलर्स ऑफ बरोडा (एज्युकेशन सोसायटीज प्रेस बायकला; येथें १८७९ सालीं छापलेलें) ].

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .