विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंदवर्धन - (८५०)-'अलकांर' या विषयावर लिहिणारा काश्मीरचा लेखक. आनंदवर्धन, मुक्ताकण आणि शिवस्वामी असे तिघेंहि ग्रंथकार अवंतिवर्मनाच्या कारकीर्दीत (८५४ -८८३) प्रसिद्धीस आले होते असें कल्हण म्हणतो (राजतरंगिणी ५.३४). परंतु आनंदवर्धनाचा काल यानंतरचाहि असूं शकेल. कारण अभिनवगुप्ताच्या 'लोचन' या ग्रंथामध्यें मनोरथ हा आनंदवर्धनाचा समकालीन होता असें सांगितले आहे. आनंदवर्धनाचे प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे, अर्जुनचरित, दीनाक्रंदनस्तोत्र, देवीशतक, ध्वन्यालोक किंवा हृदयालोक आणि विषमबाणलीला हे होत. यापैकीं ध्वन्यालोक हा अलंकारशास्त्रांत प्रमाणभूत मानलेला सुप्रसिद्ध ग्रंथ होय.