प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आनाम  - ही एक भाषा आहे, आणि ही भाषा बोलणारें राष्ट्र कोचीनचीन आणि टांक्विन हीं राज्यें पूर्वी आनामचा भाग समजत असत. या भाषेविषयीं परिचायक मजकूर पहिल्या विभागाच्या १८५ पृष्ठावर सांपडेल. आनाम आणि भोंवतालचा प्रदेश येथील सामाजिक पद्धति आणि राज्यव्यवस्था यांचेंहि विवेचन त्याच विभागच्या १९६-१९८ या पृष्ठांत दिलें आहे. या प्रदेशांत भारतीय व चिनी संस्कृतींचें मिश्रण कसें झाले आहे तें येथें सविस्तर स्पष्ट केलें आहे. या माहितीशिवाय इतर माहिती फक्त येथें दिली आहे.

लो क व र्ण न. - आनामी लोकांचें स्थानिक नांव  ''गिओची'' असें आहे. या लोकांमधील प्रचलित दंतकथावरून हे लोक पूर्वी चीनच्या दक्षिणभागांत होते. या लोकांचें स्वरूप पुढें मात्र हिंदुसंस्करणानें व सयामांतील शैवधर्मी चाम लोकांशी शरीरसंबंध झाल्यानें पालटलें आहे. हे मँगोलियन लोकांपैकीं सर्वांत निकृष्ट बांध्याचे व दिसण्यांत कुरूप आहेत असें वर्णन लोक करतात. चिनी लोकांपेक्षां हे काळे असतात. परंतु कांबोजी लोकांपेक्षें काळेपणांत कमी आहेत. यांचे केंस काळे व खरखरीत असतात, त्वचा जाड असते, व कपाळ अरुंद असतें. हे आपले  दांत काळे करतात आणि विडे फार खातात. त्यांच्या पायांचे आंगठे इतर बोटापासून अधिक दूर असतात व ही त्यांच्या जातीची विशेष खूण धरण्यास हरकत नाहीं. नाक अत्यंत चपटें असतें. मान आंखूड असते व खांदे फारच उतरते असतात. कोचीन-चीन मधील आनामी लोक टांक्विनच्या आनामी लोकांपेक्षां अधिकच दुर्बल व ठेंगणें असतात. पुरुष व स्त्रियां रुंद तुमानी वापरतात, अंगरख्यास बाह्या आंखूड वापरतात, पायांत जोडे घालीत नाहींत आणि गवती टोपी वापरतात.

इ ति हा स. - आनाम मधील मूळचे लोक  ''चाम'' जातीचे व हिंदु संस्कृतीचे होत, यांनां पुढें गिओची (आनामी) लोकांनीं जिंकले. व आनाम काबीज केला. चाम लोकांचें राज्य असतां तेथें संस्कृति चांगल्या प्रकारची होती. हें आज तेथील शिल्पांच्या अवशेषांवरून उघड होतें. गिओची लोक उत्तर आनाम व टांक्किन येथून आले व ते चिनी वंशाचे होते व त्यांचे प्राचीन राजे चिनी राजघराण्यांतील पुरुष होते असे त्यांचे ऐतिहासिक ग्रंथ म्हणतात. ते दक्षिणेकडे येऊन त्यांनीं राज्यस्थापना केव्हां केली हें निश्चयात्मक समजत नाहीं. परंतु प्राचीन राजघारण्यांची उचल बांगडी ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकांत झालेल्या चिनी स्वारीनें केली आणि स्वीरचा नायक त्या देशाचा राजा बनला. जुनें राजघराणें दोनशें वर्षे होतें असें धरून चाललें तर तेथें हिंदु संस्कृति ख्रि.पू. पांचव्या शतकांत अधिकारारूढ होती असें होईल व हिंदूंच्या तेथील वसाहतीचा काल त्याच्याहि पूर्वी जाईल. व या हिशेबाने हिंदुस्थानच्या इतिहासकल्पनेची व संस्कृतिप्रसारकल्पनेची पुन्हा उजळणी करावी लागेल. नवीन चीनी राजघराणें बारा शतकें म्हणजे ख्रिस्तोत्तर दहाव्या शतकापर्यंत टिकलें. त्यानंतर हें देश्य घराणें आलें. हा आनामी लोकांचा स्वातंत्र्याचा काल होय. तो काल १४०७ पर्यंत टिकला. १४०७ सालीं देश पुन्हां चिनी लोकांच्या तावडींत गेला पण पुन्हां १४२८ सालीं आनामी लोकांनीं स्वातंत्र्य स्थापन केलें, तें १८ व्या शतकांच्या अंतापर्यंत टिकलें. मात्र १५६८ सालीं कोचीन चीनचा सुभेदार स्वतंत्र झाला. १७८७ सालीं गियालांग नांवाच्या एका बंडखोरानें सोळाव्या लुईची मदत मिळविली आणि १८०१ मध्यें सबंध आनाम कोचीनचीन व टांक्विन हीं फ्रेंच सैन्याच्या मदतीनें हस्तगत केलीं, तेव्हां पासून फ्रेंचाचें मांडलीक या नात्याने हें राज्य अस्तित्वांत आहे.

 

ध र्म. - आनाम लोकांसबंधीं एक विशेष गोष्ट अशी आहे कीं त्यांच्यामध्यें धार्मिक संप्रदाय फार आहेत. स्वतःच्या मनाची खातरी वगैरे गोष्टींकडे न पाहतां परंपरागत आलेल्या धार्मिक गोष्टी करीत राहणारे हे लोक आहेत. चिनांतील बौद्धधर्म, कन्फ्युशियसचा संप्रदाय, व ताओधर्मपंथ या तीन परकी संप्रदायांचें ज्ञान या लोकांत आहे. या तीन संप्रदायांनां सरकारचा पाठिंबा असून उच्च वर्गांतले लोक व विद्वान लोक याच पंथांचें आचरण करतात; द्यौ व पृथ्वी यांची उपासन केली जाते पण ती फक्त राजाकडून. पण या दैवताबद्दल आनामी लोकांच्या मनांत पूज्य भावना असते. सामान्य जनता मृत पूर्वजांची पूजा करणारी आहे. पितरांचें पूजन करणें तें कुटुंबांतील मुख्य इसम करतो. इतर तामस दैवतें व भूतपिशाचें यांची पूजाअर्चा सार्वजनिक देवळांतून करतात. याशिवाय अभिचारकर्मे म्हणजे जादूटोणा वगैरेंचे अनेक प्रकार चीन, हिंदुस्थान व इंडो-चायना द्वीपकल्प येथील लोकांमधून अनामी लोकांत शिरले आहेत. कोणत्या देशांतल्या लोकांपासून कोणतीं अभिचारकर्में या लोकांनी उचललीं ते सांगतां येत नाहीं; पण एकंदरीने वन्य धर्माचे (अ‍ॅनिमिझम) अनेक प्रकार आनामी लोकांत दृढमूल झालेले आहेत.

रा ज्य व्य व स्था. - तत्वतः आनामवर तेथील बादशहाची सत्ता चालते. त्याच्या मदतीला  'कोमाट' म्हणजे एक गुप्त मंत्रिमंडळ असतें. अंतर्व्यवस्था, जमाबंदी, युद्ध, विधी, न्याय आणि सार्वजनिक कामें अशा सहा खात्यांवरील प्रमुख अधिकारी वरील मंडळाचे सभासद असतात. ह्युए येथें राहणारा रेसिडेंट फ्रान्सचा प्रतिनिधी असून देशाचा खरा सत्ताधीश तोच असतो. आनाममधील मुख्य फ्रेंच अधिकाऱ्यांचे एक मंत्रिमंडळ असून त्याचा अध्यक्ष रेसिडेंट हा असतो. या काँन्सेल डी प्रोटक्टोरेट मध्यें कोमाटमधील दोन सभासद घेतलें जातात. हें मंडळ सर्व स्थानिक कामें व करव्यवस्था पहातें.

प्रत्येक प्रांतावर एक एतद्देशीय गव्हर्नर असून त्यांतील जिल्ह्यांवर व तालूक्यांवर एतद्देशीय अधिकारीच असतात. बादशाही सरकारकडून गव्हर्नरांनां हुकूम सुटतात पण त्यांच्यावर फ्रेंच रेसिडेंटची देखरेख असते. दरबारकडून एतद्देशीय अधिकारी नेमले जातात पण एखादी नेमणूक रद्द करण्याचा अधिकार रेसिडेंटकडे असतो. अधिकारी वर्गांतील लोक समाजांतील सर्व दर्जांचे असतात. टुरेन प्रांतांत फक्त फ्रेंच न्यायसभा आहे पण एतदेशीयांचे कायदेच त्यांच्या खटल्यांतून उपयोजितात. इतर प्रांतांत एतद्देशीय न्यायसभा आहेत. आनामी खेडेगांव स्वयंशासित असतें; त्याचे एक लहान मंत्रिमंडळ असून एका अधिकाऱ्यामार्फत एकंदर अंतर्व्यवस्था चालते. लहानसहान गुन्हे चालविण्याची सत्ताहि या खेडेगांवाला दिलेली असते. मोठाले गुन्हो गव्हर्नरनें नेमलेला न्यायाधीश पाहतो. अशा खेडेगांवांची एका जिल्ह्यांतील मंत्रिमंडळें, जिल्हा प्रतिनिधी निवडतात व हा प्रतिनिधि सरकारपुढें लोकांची बाजू मांडतो. आनामच्या स्थानिक बजेटांत येणारे प्रत्यक्ष कर म्हणजे डोईपट्टी व जमीनपट्टी होत. डोईपट्टी १८ पासून ६० वर्षे वयाच्या पुरुषांवर असते. १९०४ सालीं स्थानिक बंजेटांतील प्रत्यक्ष करापासून जमलेली रक्कम २४७४३५ पौंड होती व खर्चाचा आकडा २३२४८० पौंड होता. समाजातील प्रत्येक माणसाला शिक्षण मिळावें अशी व्यवस्था केलेली आहे. प्राथमिक शाळेंत चिनी लिपी व कन्फ्यूशियसचीं वचनें फक्त शिकविलीं जातात. याच्याहून वरच्या दर्जाच्या जिल्ह्याच्या ठिकाणीं असणाऱ्या शाळेंत सहामाही परीक्षा घेण्यांत येऊन प्रांताच्या मुख्य ठिकाणीं इन्स्पेक्टरच्या देखरेखीखालीं असणाऱ्या शाळेंत निवडक विद्यार्थी पाठविले जातात. सरतेशेंवटची त्रैवार्षिक मोठी परीक्षा जी होते तींत पसार होणाऱ्या विद्यार्थ्यालाच फक्त डॉक्टरची पदवी व सरकारी अधिकार मिळविण्याला लायक असी जी ह्यूए येथे परीक्षा होते तिला बसण्याला परवानगी मिळते. ही जी आपल्याकडील आय.सी.एस्. सारखी परीक्षा असते तींत स्थानिक इतिहास, शासनविषयक विधींचे ज्ञान, चालीरीती कायदे, कन्फ्यूशियसची नीति, कुलीन आचार, राजकीय व सामाजिक आयुष्यांतील संस्कार व खाजगी आणि सार्वजनिक आयुष्याला उपयोगी अशा गोष्टी हे अभ्यासक्रमांतील विषय असतात याच्यापुढे आनामी लोकाचें शिक्षण गेलेलें नसतें. त्यांच्या एकंदर शिक्षणक्रमांत शास्त्रीय कल्पना, सृष्टिज्ञान, किंबहुना यूरोपियन शिक्षणक्रमांत येणाऱ्या अगदीं प्राथमिक गोष्टी यांना अजीबात फांटा दिलेला आढळून येईल. चिनी लेखनाच्या खाष्टपणामुळें शिक्षणाचें मातेरें होतें असें म्हणण्यास हरकत नाही. आनामी अधिकाऱ्याला चिनी भाषा अवश्य आली पाहिजे, कारण तो चिनी लिपींत लिहीत असतो. पण ती लिपी कल्पनासूचक असल्यानें लिपीवरू उच्चारलेले शब्द अनामी व चिनी भाषांत वेगवेगळे ऐकू येतात. त्यामुळें एकच सरकारी खलिता चिनी मनुष्य चिनी भाषेंत वाचतो व आनामी, आनामी भाषेंत वाचतो.

आनाममधील मुख्य शहरें म्हणजें फ्रेंच आणि एतद्देशीय सरकार या दोघांची राजधानी जी ह्यूए शहर (लोकसंख्या सुमारें ४२०००), टुरेन (४०००), फनथिएट (२००००), क्कीनॉन आणि फैफो हीं होत. कोचीन-चीन पासून टांक्कीन पर्यंत समुद्रकांठानें जाणारा रस्ता बहुतेक मोठ्या शहरांतून किंवा त्याजवळून जातो या रस्त्याखेरीज रेल्वेचे दळणवणाचे मार्ग आहेतच.

आ धु नि क स्थि ति. - टुरेन, क्कीन-नॉन आणि वसुआनडे हीं बंदरे यूरोपीयन व्यापारार्थ खुलीं केलीं आहेत. त्यांचें जकातीचें उत्पन्न फ्रान्सकडे जातें. ह्यूए राजधानींतील (लोकसंख्या ६०६११) किल्ल्याचा काहीं भाग फ्रेंच लष्कराकडे आहे. अनाम मधील सर्वांत मोठें शहर जें बिन्ह-डिन्ह येथें सुमारें पाऊणलाख वसती आहे. फ्रेंच सरकारच्या हाताखालील आनामी अधिकारी सर्व अंतर्व्यवस्था पाहतात. या संरक्षित राष्ट्राचें क्षेत्रफळ सुमारें ५२१०० चौरस मैल व लोकंख्या (१९१४) ५२००००० आहे. शहरातूंन आणि समुद्रकिनाऱ्याला आनामी लोकांची वस्ती आहे. पांच हायस्कुलें, मुलांच्या प्राथमिक शाळा ४६, व मुलींच्या प्राथमिक शाळा सात आहेत. स.१९१८ सालचें स्थानिक बजेट ५०४७१७३ पीअॅस्ट्री इतकें होतें. फनरंग नदीचा उपयोग सुमारें १०००० एकर जमीन भिजविण्याकडे होत असून मध्यआनामामध्यें कांहीं लहानसहान पाटबंधारेहि आहेत. तांदूळ, मका इत्यादि धान्यें, साखर, पानें, तंबाखू, वेलदोडे, दालचिनी, कॉफी, रंग, औषधी वनस्पती, बांबू इत्यादि वस्तू येथे होतात. कच्चे रेशीम दरवर्षी सुमारें ८००००० किलोग्रॅम इतकें तयार होत असून त्यापैकीं एकतृतीयांश परदेशीं रवाना होतें. आनामामध्यें सुमारें २१५००० गुरें आहेंत. लोखंड, ताबें, जस्त आणि सोनें, क्कांगनाम प्रांतांत सांपडतें. टुरेनजवळ कोळशाच्या खाणीहि आहेत. उत्तर, मध्य आणि दक्षिण भागांत मीठ तयार करण्याचे कारखाने आहेत. १९१६ सालीं आनाम मधील एकंदर आयात ५८२५००१ फ्रँक व निर्यात ४४३८२५१ फ्रँक होती. बाहेर जाणारा मुख्य माल म्हणजे कापूस, चहा पेट्रोल, कागदी माल आणि तंबाखू होय. साखर, तांदूळ, सुती व रेशमी कापड, दालचिनी, चहा आणि कागद हे बाहेरून येणाऱ्या जिन्नसापैकी मुख्य जिन्नस होत. [ ब्रिटानिका. ए. रि. ए. स्टेटसमन [ १९१९. ]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .