प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आपस्तंब - कृष्णयजुर्वेदीय पंधरा अध्वर्युशाखांपैकीं तैत्तिरीय शाखेंतील एक दाक्षिणात्य सूत्रकार. यानें एका उपशाखेचा प्रचार केला. सत्याषाढसूत्र हें हिरण्यकेशीय उपशाखेचें सूत्र आहे. त्याप्रमाणेंच  आपस्तंब हें आहे. या दोन सूत्रांमध्ये थोडा भेद आहे. या उपशाखेची श्रौत, गृह्य, धर्म, व शुल्ब अशीं चारहि प्रकारचीं सूत्रें प्रसिद्ध आहेत. आपस्तंब हा ख्रिस्तपूर्व कालांत होऊन गेला असें खात्रीनें म्हणवत नाहीं. आपस्तंब आपणांस अर्वाचीनच समजतो. याच्या हयातींत आंध्र राज्य दक्षिणें चालू होतें.

आ प स्तं ब क ल्प सू त्र - आपस्तंब कल्पंसूत्रांचे तीस भाग आहेत. या भागांस 'प्रश्न' अशी संज्ञा आहे. यांपैकी पहिल्या चोविसात 'वैतानिक' यज्ञासंबंधी माहिती आहे. पंचविसाव्या प्रश्नांत सर्व कल्पसूत्रांच्या परिभाषा दिल्या असून, प्रवरखंड, हौत्रक आणि त्यांचे काम यांची माहिती आहे. सव्विसाव्यात गृह्यविधींची माहिती असून सत्ताविसाव्यांत गृह्याग्नि व तत्ससंबधी नियम हीं हिली आहेत. अठ्ठावीस आणि त्याच्या पुढचा एक यात काहीं नियमावलि असून तिसाव्यांत वेदी कशा आखाव्यात याची चर्चा केली असून काही भूमितीची तत्त्वें दिलीं आहेत. आपस्तंब धर्मसूत्र हा एक कल्पसूत्राचा भाग आहे. यांत चार वर्णांचीं म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याचीं कर्तव्यें व त्याचप्रमाणें काहीं कर्मे वगैरे कथिलीं आहेत. या सूत्राचा पाया यजुर्वेदांतील तैत्तिरीय संहिता होय. धर्मसूत्र हें ग्रंथाच्या मध्येंच असल्यामुळें अशी सहज शंका येते कीं ते मागाहून लिहिलें गेले असावें. परंतु ही शंका व्यर्थ आहे. तसें जर असतें तर तो भाग ग्रंथाच्या प्रारंभीं किंवा शेवटीं आला असता. दुसरीहि कित्येक अशी अचुक प्रमाणें दाखवितां येतील कीं त्यावरून सर्व कल्पसूत्राचा कर्ता एकच असला पाहिजे हें सिद्ध होईल. सर्व कल्पसूत्रात  एकच विशिष्ट धोरण दिसतें. सत्ताविसावा 'प्रश्न' हा फार लहान आहे. आपस्तंब गृह्यसूत्रात फक्त गृह्यविधीच दिले आहेत. इतर गृह्यसूत्रांत (उदाहरणार्थ आश्वलायन, शाखायन, गोभिल आणि पारस्कर) पाकसंस्थासंबंधींहि विचार केलेला आढळतो. सत्ताविसावा 'प्रश्न' लहान आहे. याचें कारण असें की इतर भागांत त्या विषयाचें विवेचन करावयाचे होतें. दुसरा मुद्दा असा कीं सर्व कल्पसूत्रांत परस्पर उल्लेख आलेले आहेत. धर्मसूत्रांत कित्येक प्रसंगीं ज्या ज्या वेळीं विधी सांगितले आहेत त्या त्या वेळी 'यथोपदेशम्' असे शब्द आहेत. कित्येक सूत्रें 'प्रश्न' आणि धर्मसूत्र यांत एकच आहेत. अर्थात ही पुनरुक्ति वाचकांचें लक्ष जावें एतदर्थच कर्त्यांने केली असली पाहिजे. एतावता धर्मसूत्र हें वेगळें नसून तो मुख्य ग्रंथांतलाच एक भाग आहे. अर्थातच श्रौतसूत्र आणि धर्मसूत्र हे भाग एकानेंच लिहिले असले पाहिजेत. 'ॠत्वेवा जायामुपायेंत्' अशासारखीं अशुद्ध प्रयोगाचीं सूत्रें दोन्ही ठिकाणीं सांपडतात. आतां जर दोहोंचा कर्ता एख नाहीं असें मानलें तर दोघेहि तसाच अशुद्ध प्रयोग करतील हें संभवत नाही. अस्तु.

परंतु खरा कर्ता कोण हें कोडें अद्यापि उलगडलें गेले नाहीं. आपस्तंब हें उपनांव अथवा एका कुलाचें नांव आहे. परंतु एवढें बरें आहे कीं आपणांस या शाखेचा थोडा बहुत इतिहास व आपस्तंबाचे कांहीं ग्रंथ याची माहिती आहे. चरणव्यूह ग्रंथांत खालील माहिती आहे. तैत्तिरीय शाखेंत अंतर्भूत असलेली जी काडिकेय (''खाडिकेय'' असा सुद्धां रूपभेद आढलतो.) शाखा, त्या शाखेची आपंस्तब ही एक शाखा आहे. काडिकेय शाखेचे पाच भेद आहेत. “ काडिकेयानां पंच भेदा भवन्ति। आपस्तंबी बौधायनी, सत्याषाढी, रिहण्यकेशी औखेयीचेति'' असे भेद एकाठिकाणीं दिले आहेत. पण ''कालेता, शाटयायनी हैरण्यकेशी भारद्वाज्यापस्तंबीचेति'' असाहि पाठ आहे. बोधयानांचीं सूत्रें आपस्तंबाच्या आधी रचलीं गेलीं आहेत. आपस्तंबाच्या ग्रंथावरून पाहतां तो आपणांस ॠषि किंवा मंत्रद्रष्टा म्हणून म्हणवून घेत नसे. आपस्तंब ब्राह्मण हें तैतिरीय ब्राह्मणाचेंच दुसरें एक नाव आहे. तित्तिरी हा वैशंपायनाचा शिष्य असून त्यानें तित्तिरी पक्षी होऊन कृष्ण यजुर्वेद उचलला अशी दंतकथा आहे. आपस्तंबाच्या मतें 'अवर' लोकांत ॠषि जन्मास येणें शक्यच नाहीं केवळ पूर्व जन्मीच्या पुण्याईनें ते ॠषीसारखे होतात. तो स्वतः आपणांस कालयुगांत जन्मलेला समजत असे. आपस्तंबाच्या वेळेस यजुर्वेदाच्या सूत्रकालास प्रारंभ झाला होता. आतां सर्व वेदांच्या सूत्रांचाकाल एकच आहे हें मॅक्समुल्लरचें म्हणणें खोटें असो वा खरें असो आपस्तंबसुत्राचा काल हा वेदकाल नसून तो ख्रिस्तीशकाच्या पूर्वी पांचव्या शतकांत किंवा त्यानंतरहि बरचा अलीकडे असला पाहिजे.

 

आतां बौधायन हा आपस्तंबाच्या पूर्वीचा आहे हें पुष्कळ प्रमाणांनी सिद्ध करून दाखवितां येईल. (१) कित्येक प्रसंगीं आपस्तंबानें बैधायनाचें म्हणणें खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. (२) कित्येक ठिकाणी दोघांची सूत्रें जशींच्या तशींच आहेत (आपस्तंब. घ.सू. १.१०, २९;८-१४). यावरून कोणी कोणाची नक्कल केली असा संशय येईल परंतु इतर प्रमाणांनीं तो संशय दूर होतो. कांहीं ठिकाणीं आपस्तंबाचीं मतें अगदीं सुधारक थाटाचीं आहेत. परंतु या दोहोंमध्ये किती काल गेला असावा हें सांगतां येत नाहीं. महादेवाच्या मतें भारद्वाज हा या दोहोंमध्ये होऊन गेला असावा. बौधायन आणि आपस्तंब यांच्यामधील कालाचें अंतर शतकांनींच मोजलें पाहिजे. त्याचप्रमाणें आपस्तंब हा सत्याषाढ अथवा हिरण्यकेशिन् याच्या पूर्वीचा असला पाहिजे, कारण त्याने आपस्तंबाच्याच सूत्रांचा थोडाबहुत फेरबदल करून संग्रह केला आहें. हिरण्यंकेशीय गृह्यसूत्र आणि धर्मसूत्र यांचा मेळ बसत नाहीं. मातृदत्तानें गृह्यसूत्रावर व महादेवानें धर्मसूत्रावर टीका- लिहिल्या आहे. ते दोघेहि ओढाताण करून दोहोंचा कर्ता एकच आहे असें म्हणतात. कित्येक ठिकाणीं संकल्पांत ''आपस्तंबांतर्गत हिरण्यकेशी शाखाध्यायी'' असें वाक्य आढळतें. यावरून आपस्तंब हा आधींचा आहे हें निराळें सांगावयास नकोच. दोहोंमधल्या कालाचें अंतर सुमारें शेंदीडशें वर्षे असावें. या सर्व प्रमाणांवरून असा निष्कर्ष निघतो कीं कृष्णयजुर्वेदाच्या सूत्रकालाच्या मध्यें कोठें तरी आपस्तंबाचा काल असावा. आपस्तंबानें चारहि वेदांतील वचनें उद्भृत केलीं आहेत. ॠग्वेद आणि सामवेद यापेक्षां यजुर्वेदांतील बरीचशीं वचनें उद्धत केलीं गेलीं आहेत. श्रौतसूत्रांत शुक्लयजुर्वेदांतील वचनें आहेत. अर्थववेदांतील वचनें श्रोत वाङ्मयांत विशेष आढळून येत नाहींत, आपस्तंब धर्मसूत्रांत तर तें एकच आहे.

आपस्तंबानें आपल्या धर्मसूत्रांत नऊ आचार्यांचा उल्लेख केला आहे. ते कण्व, काण्व, कुणिक, कुत्स, कौत्स, पौष्करसादि, वार्ष्यायणी, श्वेतकेतु आणि हारित हे होत. यांपैकीं कांहींचा उल्लेख निरुक्तांत आहे, व कांहींचा पाणिनीच्या सूत्रांवरी जी वार्तिके आहेत त्यांत आहे. यौपैकी कण्व आणि हारित हे सूत्रकार आहेत. अपस्तंबास पूर्वमीमांसा आणि वेदांत यांची चांगली माहिती होती. प्रत्यक्ष जैमिनीच्या मीमांसासूत्राची त्याला माहिती नसेल परंतु तशाच कोणच्या तरी ग्रंथाची असली पाहिजे. त्याचप्रमाणें केवळ उपनिषदें आणि अरण्यकें यांतील माहिती होती असें नाहीं तर वादरायणाच्या सूत्राप्रमाणेंच पद्धतशीर रीतीनें मांडलेल्या वेदांततत्वांचीहि त्याला माहिती होती.

आपस्तंबानें पुराणांचाहि आधार कित्येक ठिकाणीं दिला आहे. व नुसतें पुराणांत आहे इतकेंच सांगून न थांबतां त्या विशिष्ट पुराणाचें नांवहि दिलें आहे भविष्यपुराण हें  'उपपुराण' आहेः त्याचा उल्लेख केला आहे. परंतु हल्लींच्या भविष्य पुराणांत आणि त्यांत साम्य दिसत नाहीं. सर्व पुराणांत पुढें बरेच फेरबदल झाले असावे असें यावरून दिसतें.

शूद्र आणि स्त्रिया यांनां अर्थशास्त्राचें ज्ञान असावें असें त्यांचे मत आहे ( अर्थशास्त्र पहा ). अर्थशास्त्रांत गायन, वादन, नर्तन, कला, व्यापार इत्यादिकांचा समावेश होतो. मधुसूदनसरस्वतीनें आपल्या प्रस्थानभेदांत अर्थशास्त्रास अथर्ववेदाचा 'उपवेद' म्हटलें आहे. यावरून आपस्तंब हा अलीकडचा असावा असें अनुमान निघतें.

आपस्तंब शाखेची जुन्या संस्कृत वाङ्मयांत कोणची जागा होती याचें आतांपावतों विवेचन झाले. आतां हिंदुस्थानाच्या कोणत्या भागांत या शाखेची परंपरा होती व आहे तें पाहूं. चरणव्यूहभाष्यांत आणि महार्णव ग्रंथांत पुढील माहिती दिली आहेः हिंदुस्थान हा देश नर्मदा नदीनें विभागला गेला असून आपस्तंभ शाखेचा प्रसार नर्मदेच्या दक्षिण भागांत आहे. पुढें असेंहि म्हटले आहे कीं, तौत्तरीय आणि आपस्तंब शाखा या मुख्यतः आंध्र देशांत असून त्यांचा प्रसार उत्तरेस गोदावरी नदीपावतों आहे. हें वर्णन वस्तुस्थितिद्योतकच आहे. महाराष्ट्र कानडा, निजाम सरकारचा प्रातं आणि उत्तरसरकार हा प्रांत वगळला असतां संपूर्ण मद्रास इलाखा या प्रांतांत या शाखेचा प्रसार आहे. देशस्थ ब्राह्मणांशिवाय कोंकणांतले कांहीं चित्तपावन ब्राह्मणहि आपस्तंबीय आहेत असें एक ग्रंथकार म्हणतो पण तें चुकीचें आहे. गैरसमजानें हिरण्यकेशीयांस आपस्तंब म्हणतात. उत्तरहिंदुस्थाना आणि मध्यप्रांत या भागांत ही शाखा दिसून येत नाहीं. क्वचित स्थलीं जेथें मराठा सरदारांच्या बरोबर इकडचे ब्राह्मण गेले आहेत तेथें या शाखेचे लोक आहेत. परंतु तेथील मूळच्या रहिवाशांचा यांच्याशी बेटीव्यवहार होत नाहीं. गुजराथेंत नागर, खडावल, भार्गव, कपिल, मोताल वगैरे लोक शुक्लयुजर्वेदाच्या माध्यंदिन अथवा कण्व शाखेचे आहेत. राजपुताना, हिंदुस्तान आणि पंजाब या देशांत हीच स्थिति आहे. मध्यप्रांतांत कोठें कोठें मैत्रायणीय शाखेचे लोक आहेत. पूर्वी राजे लोकांनीं ब्राह्मणांनां ज्या जमीनी दिल्या आहेत त्यांच्या शास्नपत्रांतूनहि हीच गोष्ट दिसून येते.

आपस्तंब हा स्वतः दाक्षिणात्या होता. कारण तो ठिकठिकाणीं म्हणतो कीं 'उत्तरकडील लोंक असें असें करितात' या शोधावरून हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासावर बराच प्रकाश पडतो. जुनी संस्कृति व परंपार यांचे मूलस्थान हिंदुस्थानच्या वायव्य दिशेस अथवा फार झालें तर विंध्याचलाच्या उत्तरेस होतें. दक्षिणेंतले कलिंग, द्रविड, आंध्र, चोल आणि पांडय या देशांनीं या संस्कृतींत विशेषसा भाग घेतला नव्हता. ब्राह्मणें आणि सूत्रें यांत यांचा उल्लेख नाही. एतेरिय ब्राह्मणांत दक्षिणेकडल्या ( व त्यांतच आंध्र देश आहे) कांहीं रानटी जातींचा उल्लेख आहे. बौधायनानें आपल्या धर्मसूत्रांत ( १ ) असें म्हटलें आहे कीं कलिंग देशांत कोणी गेल्यास त्यानें यज्ञ करून शुद्ध झालें पाहिजे. पाणीनीच्या अष्टाध्यायींत आणि कात्यायनाच्या वार्त्तिकांत चोल आणि पांडय यांचा उल्लेख आहे. कित्यक खोदकामें व नाणी यांवरून असें सिद्ध होतें कीं इसवीसनापूर्वी दुसऱ्या शतकांत आंध्र देश पार भरभराटींत असून त्याची राजधानी कृष्णा नदीच काठीं कोठें तरी असावी. त्या देशांतील राजांनीं बुद्धधर्मास जरी आपली मदत दिली तरी ते सनातन ब्राह्मण धर्माचे अनुयायी होते. कित्येकांनां 'वेदश्री' आणि 'यज्ञश्री' म्हणण्याचा परिपाठ असे. तिसऱ्या शतकापासूंन या दक्षिणेंतील देशांचा पूर्ण इतिहास आपणांस उपलब्ध आहे.

एवढें मात्र आपणास निःसंशय म्हणतां येईल कीं आर्यन् लोकांनीं दक्षिण देश जिंकून तेथें आपली सुधारण स्थापिली परंतु उत्तर हिंदुस्थानच्या सुधारणेच्या मानानें पाहतां ती फार उशीरां झाली. अर्थात् कोणत्या शतकांत ती झाली हें निश्चितपणें सांगतां येत नाहीं. आर्यन लोकांनीं तो देश जिंकिल्यानंतर बराच काळ लोटला असावा. यावरून आपस्तंबाचा व त्याप्रमाणें दक्षिणेंतील इतर वाङ्मयाचा काल फार अलीकडला असला पाहिजे. म्हणजे इसवीसनापूर्वी आंध्र देशांत जेव्हां ब्राह्मण राजे राज्य करीत होते तेव्हां तो असावा. परंतु जॉर्ज ब्यूलर आणि मॅक्समुल्लर यांच्या मतें हें विधान चुकीचे आहे. त्याला ते धर्मसूत्रांत आलेल्या 'श्वेतकेतु’ शब्दाचा आधार दाखवितात. या श्वेतकेतूचा उल्लेख शतपथ ब्राह्मण आणि छांदोग्योपनिषद् यांमध्यें आलेला आहे आणि तो 'अवर'  होता म्हणजे अर्वाचीन अथवा समकालीन होता. हा श्वेतकेतु मॅक्समुल्लरच्या मतें शुक्लयुजर्वेदाचा याज्ञवल्क्य व विदेहराजा जनक यांनां समकालीन होता. आणि ज्या अर्थी आपस्तंब हा श्वेतकेतूस ‘अवर’म्हणतो त्या अर्थी आपस्तंब आणि श्वेतकेतु यांमध्यें फार झालें तर दोन अथवा तीन शतकांचा काल लोटला असावा. यावरून आपस्तंबाचा काल मागें लोटला पाहिजे. हें अनुमान दुसऱ्याहि गोष्टीवरून सिद्ध करतां येईल. आणि ती म्हणजे सूत्रांचे भाषावैशिष्टय होय. या सूत्रांतले काहीं शब्दप्रयोग वैदिक आहेत, कांहीं पाणिनीनें मुद्दाम बनविलेले आहेत तर कांहीं अपाणिनीय आहेत. वाक्यरचनेंतहि बराच फेरबदल दिसतो. एवढयाशा लहानशा धर्मसूत्रांत अपाणिनीय प्रयोग बरेचसे आल्यामुळें असें अनुमान निघतें कीं आपस्तंब हा पाणिनीच्या पूर्वीचा असावा. निदान पाणिनीचें व्याकरण प्रचारांत येण्यापूर्वीचा असावा. तेव्हां आपस्तंबाचा काल इसवी सनापूर्वीं तिसरें शतक असावा. आपस्तंब धर्मसूत्राचा उल्लेख पहिल्यानें विज्ञानेश्वराच्या मिताक्षरेंत सांपडतो. या धर्मसूत्रावर हरदत्तानें सोळाव्या शतकांत 'उज्ज्वलवृत्ति' नामक टीका लिहिली आहे. या पूर्वीहि बऱ्याच टीका झाल्या असल्या पाहिजेत हें हरदत्तानें 'अन्ये' 'अपरे' इत्यादि केलेल्या शब्दप्रयोगावरून कळतें.

कृष्णयजुर्वेदाच्या तेत्तिरीय शाखेचेच आपस्तंब, वैखानस, बौधायन, भारद्वाज, वाधूल व हिरण्यकेशी हे सूत्रभेद आहेत. या प्रत्येक सूत्राचे श्रौत, गृह्य व धर्म असे भाग आहेत. वरील सर्व सूत्रांत कर्मपरत्वें थोडथोडा फरक आहे (बौधायन पहा.). आज लोकांत ॠग्वेदी व त्यांच्या जोडीला आपस्तंब असा उल्लेख केला जातो व तो सर्व कृष्णयजुर्वेदाचें अध्ययन करणारांनां उद्देशून केला जातो. परंतु कृष्णयजुर्वेदाचें अध्ययन वरील सर्व सूत्रांचे लोक करतात. आपस्तंब हे सामान्यतः देशस्थ आहेत व हिरण्यकेशी हे कोंकणस्थ आहेत.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .