विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आप्पाकवि - हा कवि तैलंगणांत रहात असे. यानें तेलगू भाषेंत छंदःशास्त्रावर 'आंध्रप्रयोगरत्नाकर' आणि 'वृंदा संभावना काव्य' असे दो ग्रंथ रचिले. पहिला ग्रंथ तेलगू छंदःशास्त्र व भाषाशास्त्र यांवर फार उत्कृष्ट असून लोकमान्य आहे. दुसऱ्या ग्रंथांत भागवतांतील वृंदेची कथा वर्णिली आहे. या कवीच्या कालासंबंधीं माहिती नाहीं. [ कविचरित्र. तेलगू वाङ्मय अ. कोश. ]