प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आफ्रिका - हें एक मोठें विस्तीर्ण खंड आहे. ह्या खंडासभावेतीं जिकडे तिकडे समुद्र आहे. भूपृष्ठाच्या दक्षिणेकडे झुकलेल्या मुख्य तीन भागांपैकीं हें सर्वांत मोठे आहे. किनाऱ्यालगतचीं बेटें सोडून या खंडाचें क्षेत्रफळ १,१२, ६२,००० मैल आहे. आफ्रिका हिंदुस्थानच्या सहापट आहे आफ्रिका व यूरेप या दोन खंडांमध्ये भूमध्यसमुद्र आहे. आशिया व आफ्रिका हीं दोन्ही खंडे सुवेझच्या संयोगीभूमीनें पूर्वी जोडिली होतीं. याची दक्षिणोत्तर लांबी म्हणजे 'रास बेन साक्का' या अगदीं उत्तरेच्या टोंकापासून तों अगुल्हास भूशिरापर्यंत ५००० मैल आहे, व पूर्वपश्चिम लांबी व्हर्ड भूशिरापासून तो रास हाफूनपर्यंत ४६०० मैला आहे. भूपृष्ठस्वरूपाचें अवलोकन करितां या खंडाचे त्याच्या रचनेप्रमाणें उत्तरआफ्रिका व दक्षिणआफ्रिका असे दोन भाग करतां येतील.

या खंडाची सर्वसाधारण उंची सुमारें दोन हजार फुटांपर्यंत येईल. जरी या खंडांत दहा हाजार फुटांपेक्षा उंच पर्वत अर्थात, पठारें नाहींत, तरी उंचवट्याचे प्रदेश हें एक या खंडाचें वैशिटय आहे असे म्हणतां येईल. हे उंचवट्याचे प्रदेश पूर्वेस व दक्षिणेस आहेत व उत्तरेकडे व पश्चिमेकडे प्रदेशाची उंची हळू हळू कमी कमी होत गेली आहे. या खंडाचे स्वाभाविकरीत्या चार मुख्य भाग पडतात; असें: - (१)किनाऱ्यालगतचा सपाट प्रदेश, येथें बहुतेक दलदल असते व ''मॅनग्रोव्ह'' वनस्पतीचें दाट जंगल यांत माजलेलें असतें. किनाऱ्याचा प्रदेश सखल होत जाणाऱ्या उंचवट्याच्या भागाच्या शेवटच्या पायऱ्या आहे तसें कांही ठिकाणीं दिसतें. (२) उतरेकडील ''अटलस'' पर्वताची रांग हा दुसरा महत्त्वाचा भूभाग होय. हा एकसारखा उंच प्रदेश नसून दूरपर्यंत फार सखल आहे व कांहीं ठिकाणीं तर समुद्रसपाटीपेक्षांहि खोल असे भूभाग आहेत. (३) दक्षिण व पूर्व या भागांत असलेल्या उंच पठारांची साधारण उंची ३५०० फूट आहे. (४) उत्तरेस व पश्चिमेस सपाट प्रदेश आहेत. त्यांभोंवतीं किनाऱ्याच्या आंत उच्च भागाचे पट्टे आढळतात.

पर्वत - या खंडाच्या दक्षिण भागांत पश्चिमेकडे जमिनीचा भाग खचल्यासारखा होऊन एक सरोवरांची माळ तयार झाली आहे. या मालिकेच्या पश्चिमेस किलीमांजारो पर्वत आहे. त्याचीं 'मावेन्झी' व 'किबो' हीं दोन शिखरें आहेत त्यांमध्यें किबा हें शिखर आफ्रिकेंत अतिउंच आहे. याची उंची १९३२१ फूट आहे. दुसरा केनया पर्वत, याची उंची १७००७ फूट आहे. या मालिकेच्या पूर्वेस 'रुवेनझोरी' नांवाची डोंगराची रांग आहे. 'किव्हु' सरोवराच्या उत्तरेस 'किरुंगा' नांवाचा ज्वालामुखी पर्वतसमूह आहे, त्यांपैकीं कांहींचीं मुखें सध्यां जागृतावस्थेत आहेत.

या खंडाच्या पूर्वेस व पश्चिमेस उंचवट्यच्या भागाचे पट्टे किनाऱ्यांशीं समांतर पसरलेले आहेत. अॅबिसीनियांतील पर्वताचा कांहीं भाग तांबड्या समुद्राच्या निकाऱ्यास लागून आहे. सर्वांत उंचवटयाचा प्रदेश 'गीनीच्या' आखाताच्या जवळ आहे व तेथें ६००० ते ८००० फूट उंचीचीं शिखरें आढळतात. त्यांत क्यामेरॉनचें शिखर सर्वांत उंच आहे अगदीं पश्चिमेकडे 'कुटा जालन' नांवाची उच्च भूमि आहे. हीमध्यें व अटलस पर्वंताच्या रांगेमध्यें मात्र उंचवट्याच्या जमिनीचा पट्टा सांपडत नाहीं.

पश्चिमेच्या व पूर्वेच्या उंच भागामध्यें जो या खंडाचा प्रदेश आहे त्याचे सहजगत्या दोन विभाग होतात (१) कांगोनदीच्या थंडीचा प्रदेश; याच्या आकारावरून येथें पूर्वीं समुद्र असावा अशी शंका भूगोलवेत्यास येते. (२) उत्तरेस साहाराचें प्रसिद्ध वाळवंट आफ्रिकेच्या पूर्वटोंकापासून पश्चिमेकडे तांबड्या समुद्रापर्यंत पसरलेलें आहे व आफ्रिकेचा उत्तर भाग यानेंच व्यापलेला आहे.

नद्या. - आफ्रिकेच्या उंचवट्याच्या भागांतूनच तेथील नद्यांचा उगम होतो. बहुतेक नद्यांचे प्रवाह लांबीनें लहान आहेत. ज्या कांहीं थोड्या मोठ्या नद्या आहेत त्यांचे प्रवाह उच्च प्रदेशांतून बाहेर पडण्यापूर्वीं बरेच दूरवर तेथेंच वहात गेलेले दिसतात. मुख्य नद्यांचें उगम उत्तरेच्या व पश्चिमेच्या भागांत आढळतात. नाईल व कांगो नद्यांचे उगमस्थान म्हटलें म्हणजे या खंडांतील सरोवरांचें पठार होय. नाईल नदी ही लांबीनें सर्वांत मोठी आहे. या नदीया उगम भूमध्यरेषेलगतच्या मध्य आफ्रिकेच्या डोंगराळ भागांत होतो. येथून उगम पावून या नदीचा प्रवाह 'व्हिक्टोरिया नायांझा' सरोवरास मिळतो. यापुढें नाईल नदीस (७० १०५) मोठया दलदलीच्या प्रदेशांतून वहात जातांना  'अबिसीनियाच्या' बेहरेलगाझल, सोबॅत, निळीनाईल व अॅतबरा वगैरे नद्या मिळतात. तेथून वाळवंटाच्या प्रदेशांतून जाऊन तो भूमध्यासमुद्रास मिळते. कांगो-चाँबेझो नदी बँगवेलू सरोवरास मिळते, व या सरोवरांतूनच कांगोचा उगम होतो. या स्थळीं या प्रवाहास पुष्कळ नांवांनी ओळखितात. येथून म्वेरु सरोवरांतून  वाहात  जाऊन ती पुढें उत्तरेकडे वळते. नंतर एक विस्तीर्ण अर्धवर्तुळाकार वळण घेऊन ती नैॠत्येच्या बाजूनें अतलांतिक महासागरास मिळते. अर्धर्वतुळाकार वळण घेतांना कांगोस  पुष्कळ नद्या मिळतात. कांगोच्या पाणवठ्याच्या उत्तरेस 'चाड' नांवांचें सरोवर आहे. हे सरोवर शारी नदीच्या प्रवाहानेंच भरतें. याच्या पश्चिमेस नायझर नदीच्या थंडीचा प्रदेश लागतो. या नदीचा उगम पश्चिमेच्या उंचवट्याच्या भागांत होतो. तेथून ही नाईलाच्या उलट दिशेनें वाहत जाऊन अतलांतिक महांसगारास मिळते. ड्राकेन्सबर्गचा डोंगर अगदीं आफ्रिकेच्या दक्षिण भागांत आहे. येथून आरेंज नदीचा उगम होतो व पुढें ती अतलांतिक महासागरास मिळते.

 

याशिवाय दक्षिण आफ्रिकेंतील पश्चिमेकडील उंचवट्याच्या भागांतून निघून अतलांतिक महासागरास मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांचीं नांवें क्युनेने, क्वान्झा. आगोबे व सनागा ही होत. व्होल्टा, कोमो, बंदना, गँबिया व सेनेगाल या आफ्रिकेच्या पश्चिमेकडील उंच प्रदेशांत उगम पावून दक्षिण दिशेनें वाहात जाऊन अतलांतिक महासागरास मिळतात. हिंदी महासागरास मिळणाऱ्या नद्यांपैकीं सर्वांत मोठी नदी झांबिजी होय. या नदीचा उगम ११० २१’ ३'' दक्षिण रे. २४० २' पूर्व रें. अया स्थळीं ५००० फूट उंचीवर होतो. यापुढें ती प्रथम पश्चिमेकडे व नंतर दक्षिणेकडे वाहात जाऊन पूर्वेकडे वळण घेते. 'न्यायासा' सरोवराच्या वरसांडीचें पाणी शिरे नांवाच्या नदीनें या नदीस मिळतें. ही नदी हिंदी महागागरास मिळते. याशिवाय दुसरी दक्षिणेंतील पूर्ववाहिनी नदी म्हटली म्हणजे लिम्पोपो ही होय.

पूर्वेच्या उंचवटयाच्या प्रदेशांतून निघून हिंदी महासागरास मिळणाऱ्या बऱ्याच लहान नद्या आहेत; त्यांपैकीं रोव्हुना, रूफिजी, टॅना, ज्युबा व वेवीशेबिली या मुख्य आहेत. 'वेवीशेबिली' ही नदी किनाऱ्यापर्यंत वाहात येऊन तेथील वाळवंटांत नाहींशी होते. त्याच प्रमाणें हॉवाश नदी अॅबिसीनियाच्या उच्च प्रदेशांत उगम पावून एडनच्या आखाताजवळील वालुकामय भागांत गुप्त होते. वरील नद्या सोडून, सरोवरांस मिळणाऱ्या नद्या बऱ्याच आहेत. त्यांत  ''ओमो'' नदी अॅबिसीनियाच्या पठारांतून निघून रूडाल्फ सरोवरास मिळते. आप्रिकेंतील बहुतेक नद्यांच्या मुखांसीं मृत्तिकाबंध प्रवाहाबरोबर आलेल्या गाळानें तयार होतो. व या नद्यांत त्या उच्च प्रदेशांतून आल्यामुळें धबधबेहि असतात. या सर्व अडचणी पार पडल्यावर गलबतें व्यापाराकरतां दूर जाऊं शकतात.

स रो व रें. - आफ्रिकेंत पूर्वेकडील उच्च प्रदेशांत बरीच सरोवरें आहेत. हीं सरोवरांची साधारण अर्धवर्तुलाकार मालिका या पठाराच्या कवचाचा कांहीं भाग खचून झाली असावी असें भूगोलवेत्त्यांचे मत आहे. दक्षिणेंत न्यासा व त्याच्या उत्तरेस टांगानिक, कीव्हु, आलबर्ट एडवर्ड व आलबर्ट हीं सरोरवें आहेत. टांगानिक हें पृथ्वीवरील गोडया पाण्याच्या सर्व सरोवरांत मोठें आहे. याची लांबी ४०० मैल, व रूंदी ३० – ४० मैल आहे. हें किती खोल आहे हें नक्की सांगतां येत नाहीं. यांशिवाय आविसीनियांत रूडाल्फ, व्हिक्टोरिया नायांझा चाड वगैरे सरोवरें आहेत.  चाड हें पश्चिमेस आहे. न्यासा हें ४३० पुरुष खोल आहे. बाकीचीं उथळ आहेत. व्हिक्टोयिा नायांझा हें फक्त ५० वाव खोल आहे. न्यासा व टागांनिका सरोवराच्या बाजू कड्यासारख्या उभ्या वर गेल्या आहेत. ॠतुमानांतील फरक सोडून या सरोवरांतील पाण्याची सपाटी खालींवर होत असते. कितीएक शतकांपासून हीं सुकावयास लागलीं आहेत. या सरोवरांच्य उत्पत्तीबद्दल बराच मतभेद आहे. येथें समुद्रांत सांपडणारे जलचर प्राणी आढळतात, म्हणून हा (अंतर्गत) प्राचीन समुद्राचा भाग असावा असे कांहींचे मत होतें. पण अर्वाचीन शोधांवरून हें चुकीचें आहे असें समजतें.
 
बे टें. - मादागास्कर बेटाशिवाय बाकी सर्व बेटें अगदीं लहान आहेत. मादागास्कर बेटाचें क्षेत्रफळ २२९८२० मैल आहे. हें आफ्रिकेच्या आग्नेयीस आहे. याच्या पूर्वेस मारिशस व रियुनियन हीं आहेत. वायव्येस केनरी व केपव्हर्डचा द्वीपसमूंह ही आहेत. हीं सर्व ज्वालामुखीपर्वताच्या क्रियेमुळें झाली आहेत.

ह वा पा णी. - हें खंड उष्णकटिबंधांत आहे. या खंडातून भूमध्यरेषा जाते. हवामान पावसावर, उंचीवर, व समुद्रासान्निध्यावर अवलंबून आहे. दक्षिण आफ्रिकेपेक्षां उत्तर आफ्रिका जास्त उष्ण आहे. वालुकामय प्रदेशांत व सखलांत असलेल्या सपाट भागांत उष्णतामान फारच अधिक असतं. साहाराच्या वाळवंटांत हवा अतिशय विरळ असल्यानें व किंरणरूपाने उष्णता  लवकर बाहेर गेल्यानें, दिवसाच्या व  रात्रीच्या उष्णतेच्या प्रमाणांत फारच अंतर असतें. रात्रीं केव्हां केव्हां पाणी गोठण्यापर्यंत थंडी पडते.

दक्षिण आफ्रिकेंत उष्णता कमी असते; याचें असें कारण आहे कीं, मोठमोठ्या महासागरांच्या सान्निध्यामुळें येथील अरुंद प्रदेशाच्या हवेंत दमटपणा येऊन त्यांतील उष्णता माफक होते. उत्तरेचा प्रदेश फारच विस्तीर्ण असल्यानें समुद्रावरून आलेल्या वाऱ्यांचा अंतःप्रदेशांत दूरवर शिरकाव होत नाही, म्हणून अगदीं किनार्‍यालगतच्या भागांत उष्णतामान कमी असतें. साहाराच्या वाळवंटांत पाऊस फारच कमीं पडतो. विषुववृत्ताच्या आसपास व अविसीनियाच्या उच्च प्रदेशांत व नाईल नदीच्या थडींत फार पाऊस पडतो. सर्वांत जास्त पाऊस गीनीच्या आखाताजवळच्या भागांत पडतो. कॅमरून पर्वतावर ३९० इंच पाऊस पडतो. पावसाचे पट्टे पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेले दिसतात. पूर्वेकडील किनार्‍यालगतच्या भागांत हवामान व पाऊस उत्तरेकडील प्रदेशांतल्या प्रमाणें असतो. विषुववृत्ताच्या असापास दोनदां पावसाळा येतो. साहारा वाळवंटाच्या सीमेवर असलेल्या प्रदेशांत अति उष्ण व वालुकामय वारे वाहातात. अगदीं उत्तरेकडील व दक्षिणेकडील भागांत हवा आरोग्यकारक असते. त्याचप्रमाणें साडेसहा हजार फूट उंचीवरच्या भागांत निरोगी थंड हवामान असतें. दलदलीच्या भागांत विषारी डांस असल्यामुळें तेथें तापाच्या सांथी नेहमीं सुरू असतात. हा भाग विषुववृत्ताच्या आसपासचा प्रदेश होय. कांहीं भागांत 'त्से' नांवाच्या एक प्रकाराच्या माशा चावल्यानें निद्रारोग होऊन मृत्यू येतो.

व न स्प ति. - वनस्पतीची वाढ उष्णता व ओलाव यांवर अवलंबून असते. उत्तरेकडील व दक्षिणेकडील समशीतोष्ण भागांतील वनस्पति दुसऱ्या प्रदेशांतील वनस्तीपेक्षां भिन्न आहे. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या आफ्रिकेच्या प्रदेशांत संत्रीं, आलिव्ह, ओक, बुचाचीं झाडें, देवदार, सायप्रस मर्टल वगैरे झाडें वाढतात. साहाराच्या वालुकामय प्रदेशांत डींकाचीं झाडें व खजूर, तालवृक्ष यांशिवाय दुसरीं कोणतीहि वनस्पति टिकूं शकत नाहीं.

पश्चिम आफ्रिकेच्या विषुववृत्ताच्या भागांत व नाईलच्या थडींत दाट घनघोर अरण्यें वाढली आहेत व उंचवटयाच्या प्रदेशांत गवतांचीं कुरणें दूरवर पसरलेलीं असतात. समुद्राकांठीं दलदलींत मॅनग्रव्ह झाडांची वाढ फार दाट असते.

ज्यांपासून तेल काढितां येतें असे तालवृक्ष यांखेरीज वेळू, टेंभुरणी, महागनी, आफ्रिकन ओक, काफी वगैरे विशिष्ट तऱ्हेचे वृक्ष आढळतात. ज्यापासून पूर्वी लिहिण्याकरतां भूर्जपत्राप्रमाणें कागद तयार करीत असत अशी ''पापायरस'' नांवाची वनस्पति आफ्रिकेच्या ईशान्य भागांत असलेल्या दलदलींत आढळते.

प्रा णी. - वनस्पतींच्या वौशिष्ट्यावर प्राण्याचें वसतिस्थान अवलंबून असतें. गवताळ माळरानासारख्या सपाट भागांत हरिणें, जिराफ, झीब्रा, रानरेडे, रानगाढवें, गेंडे वगैरे प्राण्यांचें वसतिस्थान असतें. त्याचप्रमाणें ती ज्यांचीं भक्ष्य आहेत असे हिंस्त्र प्राणी तेथेंच असतात. सिहं, चित्ता, तरस, अस्वलें खोकडें व लांडगे इत्यादि हिंस्त्र पशू अटलस पर्वताच्या भागांत राहतात. कुरणांत व दाट अरण्यांत हत्ती कळप करून राहतात. यांखेरीज बबून, मोडरील सपुच्छ व विपुच्छ माकडें हीं गवताच्या माळरानांत असतात. मोठ्या नद्या हें पाणघोडें, नक्र वगैरे जलचर प्राण्यांचें वसतिस्थान होय. दक्षिण यूरोपांत सांपडणारे बहुतेक पक्षी आफ्रिकेंत आढळतात. पण शहामृग व सेक्रेटरी ह्या दोन जातींचे पक्षी मात्र या खंडांतच असतात. विषारी साप, विंचू यांच्या पुष्कळ जाती विषुवृत्तांत आहेत. टोळ, वाळवी, यांचा कांहीं भागांत आतोनात उपद्रव होतो. दक्षिण व पूर्व आफ्रिकेंत कांहीं जागीं निद्रारोगकारक  'त्से' माशा आहेत. त्यांच्या दंशानें सर्व पाळींव प्राणी मरतात.

भू स्त र शा स्त्री य मा हि ती. - भुस्तरशास्त्रद्यष्टया व आकृतींत आफ्रिकेचें हिंदुस्थान देशाशीं पुष्कळ साम्य आहे. दोहोंमध्यें मोठालीं पठारें आहेत. दोन्ही उत्तर भागांत रुंद असून दक्षिणेकडे निमुळतीं होत जातात. आफ्रिकेचा मध्यभाग म्हणजे उंच पठार आहे. या पठाराची कड समुद्राकांठाशीं समांतर आहे. पठाराच्या भोंवतीं एक कमी उंचींचा पट्टा आहे व या पट्याच्या पायथ्याशीं समुद्रकांठची सपाट जमीन आहे.

मध्य (मेसोझोइक) युग सुरू होण्यापूर्वीं जी पृथ्वीच्या कवचाची हालचाल झाली तीमुळें आफ्रिकेंतील कांहीं खडकावर परिणाम झालेला दिसतो; परंतु एकंदरींत आफ्रिकेच्या मध्यभागांतील खडकाला त्याचा फारसा संसर्ग पोहोंचला नाहीं असेंच दिसतें. कारण अगदीं मूळचे स्फटिकमय खडक व त्यांच्यावर मध्य युगांतील जे जलजन्य खडक आहेत. त्यांच्यंत कोणत्याहि प्रकारचा फरक झालेला नाहीं.

मध्ययुगाच्या पूर्वीच्या खडकांत प्रस्तरीभूत पदार्थ सांपडत नसल्यानें त्यांचा कालनिर्णय करणें फार कठिण आहे. याकरितां यूरोपांतील कोणत्या खडकांशीं त्यांचें साम्य आहे, यावरूनच पुष्कळ वेळां आफ्रिकेंतील मध्ययुगापूर्वींच्या खडकांचा काल ठरवितात. आफ्रिकेचा मध्यभाग, पश्चिम व पूर्व आफ्रिका आणि त्याचप्रमाणें सहारा या सर्व ठिकाणीं प्राक्तनिक म्हणजे अगदीं मूळचे स्फटिकमय खडकच आहेत. समुद्रकांठीं मात्र त्यावंर इतर खडकांचे थर आढलतात. हे मूळ खडक वज्रतुंड (ग्रानाइट), जंबूर (नीस) व सुविभाज्य स्फटिकमय (शिस्ट) जातीचे आहेत. यांच्यांत प्रस्तरीभूत पदार्थ मुळींच सांपडत नाहींत इतकेंच नव्हे, तर ते र्कोब्रियन, आर्डोव्हिशियन किंवा सिलुरियन काळचे आहेत, हें सुद्धां नीट ओळखतां येत नसल्यानें तें सर्व केंब्रियनपूर्व या सर्वसाधारण नांवानें संबोधिले जातात.

मध्य आफ्रिकेंत पुराण (पॅलिओझोइक) युगांतील जे खडक आहेत; त्यांमध्ये समुद्रांतील प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या प्रस्तरीभूत भागाचा अंशहि सांपडत नसल्यामुळें तो भाग समुद्राच्या पाण्याखालीं केव्हाहि नसावा असेंच म्हणावें लागतें.

कर्बजनक म्ह० इंग्लंडांतील कोळशाचा काल ज्याला म्हणतां येईल, त्या काळाच्या शेवटच्या भागांत आफ्रिका व हिंदुस्थान हीं एकमेकांनां जोडलेलीं असून त्यांचे एक मोठें खंड असावें असें दिसतें. त्यावेळीं तयार झालेले आफ्रिकेंतील व हिंदुस्थानांतील खडक व तसेंच त्या वेळचे दोन्ही ठिकाणचे प्राणी अगदीं एकाच प्रकारचे होते. या वेळच्या खडकाच्या ज्या जमिनी आहेत, त्यांनां  'गोंडवणी' हे नांव आहे. आफ्रिकेंतली गोंडवणी जमीन ज्या ठिकाणीं तयार झाली त्या ठिकाणीं पूर्वी फार मोठालीं तळीं होतीं. ती एकसारखी वाळूच्या व वनस्पतींच्या थरांनीं भरली जात असतांनाच त्यांचा तळभाग खालीं खचत चालला होता. या दोन्हीं गोष्टी एकाच वेळीं चालूं असल्यामुळें तेथील खडकांचा व प्रस्तरीभूत पदार्थांच थर १८००० फूट उंचीचा झाला. या खडकांच्या थरांनां आफ्रिकेत  'कारू' हें नांव दिलें आहे. यामध्यें सर्व तऱ्हेंचे जलजन्य खडक आहेत व आप्रिकेंतील कोळसा व याच खडकांत सांपडतो. गोंडवणी जमीन तयार होण्यापूर्वीच्या सुरुवातीस हिंदुस्तानाप्रमाणें. आफ्रिकेंतहि हिमनद्या कांही ठिकाणीं असल्या पाहिजेत, अशा तऱ्हेचा पुष्कळ पुरावा आहे. हिंदुस्थानांत गोंडवणी कालानंतर ज्वालामुखींचे मोठ्या प्रमाणावर स्फोट होऊन काळवथरी (ट्रॅप) खडक झाला, त्याप्रमाणें आफ्रिकेंतहि कारू कालानंतर ज्वालामुखींचे स्फोट होऊन अग्निजन्य खडक बरेच बनले आहेत. कारु खडकांचा प्रदेशहि मोठा आहे. पूर्वेच्या बाजूस समुद्रकिनाऱ्यापर्यंत, पश्चिमेस किरटल पर्वतापर्यंत, दक्षिणेस केप कालनीपर्यंत व उत्तरेस सहाराच्या मध्यभागापर्यंत कारू खडकांचा विस्तार आहे.

यानंतरच्या कालांत गोंडवणी जमिनीचीं शकलें झालीं. हिंदुस्थान आफ्रिकेपासून अलग झाला. हल्लीं हिंदी महासागरांत व आफ्रिकेशेजारी जीं बेटें आहेत ती त्या जमिनीची शकलें आहेत.

ज्युरीन कालांत पूर्व आफ्रिकेंत मोझाबिकपर्यंत समुद्र येऊन पोहोंचला असावा व सितोपल (क्रेटॅसिअस) कालात समुद्र साहाराच्या मध्यभागापर्यंत गेला असावा. कारण त्या ठिकाणीं सितोपल काळच्या समुद्रांत सांपडणाऱ्या प्राण्याच व वनस्पतंचे प्रस्तरीभूत झालेले भाग दृष्टीस पडतात.

आफ्रिकेंत तृतीयावस्थाक (टर्शरी) काळातील खडक पूर्व व पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर काहीं ठिकाणीं अगदीं थोड्या प्रमाणांत आढळतात; परंतु उत्तर आफ्रिकेंत ते बऱ्याच मोठ्या प्रमाणांत सांपडतात. या खडकांत नम्युलिटिक (नम्युलाइट नांवाचे प्रस्तरीभूत झालेले लहान प्राणी ज्यांत सांपडतात असा ) नांवाच्या चुन्याचा खडक सांपडतो, ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हाच खडक आफ्रिकेंतील इजिप्तपासून आशिया खंडांतील चीन देशापर्यंत आढळतो.

यूरोपांत हिमनद्यांचा जो काल होऊन गेला त्या वेळीं आफ्रिकेच्या उत्तर भागांतहि हिमनद्या असल्या पाहिजेत असें तेथें सांपडणाऱ्या वाळूवरून व खडकावरून वाटतें. त्यांचा प्रभाव किलीमांजोरा, केनिया, रुवेंझोराय वगैरे ठिकाणापर्यंत पोहोंचलेला आढळतो.

आफ्रिकेंत वज्रतुंड वगैरे अगदीं मूळचे अग्निजन्य खडक आहेत. त्याशिवाय पूर्व आफ्रिकेच्या पठारावर व पश्चिम आफ्रिकेंत अग्निजन्य खडक आढळतात; परंतु ज्वालामुखींचे स्फोट आफ्रिकेंत कोणत्या कालांत प्रथमतः विशेष प्रमाणांत सुरू झाले हें जरी खात्रीनें सांगतां येत नाहीं, तरी पहिले स्फोट दक्षिण आफ्रिकेंत ज्युरिन काळांत व पूर्व आफ्रिकेंतील सितोपल काळांत झाले असावेत असें वाटतें. त्यानंतर केनिया, मावेंझी व त्याचप्रमाणें किबो वगैरे ठिकाणचे अग्निजन्य खडक ज्वालामुखी वगैरेंच्या स्फोटामुळें झाले उत्तर आफ्रिकेंत अगदीं नवप्रभात कालापासून तृतीयावस्थापक कालाच्या शेवटापर्यंत स्फोट होत असले पाहिजेत असें दिसतें.

आफ्रिकेंतील निरनिराळ्या लोकांच्या जाती, त्यांची उत्पत्ति व त्यांची संस्कृति यासंबंधी व आफ्रिकेंतील व्यापारोपयोगी वस्तु व तेथील व्यापार या संबंधी विवेचन पूर्वीं (विभाग चौथा पृ. ४५२-५५) येऊन गेलेंच आहे.

रो म न आ फ्रि का. - ज्या भागाला ग्रीक लोक लिबिया म्हणत होते त्याला रोमन लोकांनीं आफ्रिका हें नांव दिलें होतें. रोमन परिचित आफ्रिकेंत इजिप्त व इथिओपिया हे प्रात खेरीज करून त्यावेळेस माहींत असलेल्या सर्व भागांचा समावेश होत होता. ईनिअस या कवीनें कार्थेज व अॅटलासच्या पूर्वेकडील प्रदेशास आफ्रिका हें नांव दिलें होतें. आफ्रिका या शब्दाची व्यत्पत्ति निराळी आढळते.  ''एशिया टिक फिनिशिआ'' यापासून हा भाग विभक्त केला आहे. म्हणून याचें नांव  'आफ्रिका' असें पडलें असें काहींचे मत आहे. फरिकिया (म्हणजे फळे पिकणारा प्रदेश) यावरून आफ्रिका हें नांव पडलें असें काहीं म्हणतात; इतराचें असें मत आहे कीं  ''ऑरिघा'' हे बर्बर लोक पूर्वीं या भागात रहात होते व त्यामुळें या प्रातांचे नाव आफ्रिका असें पडलें. हे बर्बर लोक पूर्वीं या भागात होते असा रोमन व कार्थेजिअन लोकांचाहि समज होता. रोमन आफ्रिकेमध्ये सिरेनैका व मॉरेटानिया हे प्रांत समाविष्ट नव्हते. तिसऱ्या प्युनिक युद्धाच्या वेळेस कार्थेजिअन लोकांची आफ्रिकेची सरहद्द टस्का नदीच्या मुखापासून ग्रेब्साच्या आखातावरील टिना या शहरपर्यंत होती. आफ्रिकेच्या इतर भागावर न्युमिडिया किंवा बर्बर या लोकांच्या राजाचें स्वामित्त्व होतें.

ख्रि.पू. १४६ व्या वर्षीं सिपिओने कार्थेज घेतल्यावर हा सर्व प्रांत रोमन लोकांचा झाला व आपलीं सरहद्द ठरविण्याकरितां रोमन लोकांनीं उत्तरेस टाबार्कापासून दक्षिणेस टीनापर्यंत मोठा खंदक खणून त्यावर लहानसा तट उभारला होता. या तटाचे कांहीं अवशेष १९०७ सालीं आढळले. तिसऱ्या प्युनिक युद्धांत युटिका हाडरुमेपेटम, थेप्सस, लेपिस, मिनॅर, आचुल्ला, उझालिस, थियुडॉलिस हीं शहरें कार्थेजच्या विरुद्ध असलेल्या रोमनलोकांनीं लुटलीं व त्यामुळें त्यांची फार लौकर भरभराट झाली.

ख्रि.पू १०६ या वर्षीं जुगर्थाइन युद्ध झालें व त्यांत रोमन लोकांनां लेपटिसमॅग्ना, ओईआ, सॅबॉट्र इत्यादि शहरें मिळालीं.

ख्रि.पू. ४६ व्या वर्षी थॅप्सस येथें जी लाढाई झाली तीमुळें रोमन लोकांनां न्युमिडिया हा प्रांत मिळाला व त्याला हे लोक आफ्रिका नोव्हा हें नांव देऊं लागले. ख्रि.पू. २५ यावर्षी रोमन आफ्रिकेंत पश्चिमेस आम्पसागा नदीच्या मुखापासून पूर्वेस ट्रिपोलिटाना व सिरेनैकापर्यंतचा प्रदेश मोडत होता. राजा व सिनेट यांमध्यें आफ्रिकेच्या रोमन साम्राज्याची वाटणी झाली तेंव्हां आफ्रिकेचा प्रांत सिनेटच्या अंमलाखालीं आला व तेव्हांपासून आफ्रिकेचा राज्यकारभार एका वरिष्ठ सुभेदारा (प्रोकान्सलकडे) कडे सोंपविला जात असे. या प्रोकांन्सलच्या हाताखालीं तीन अधिकारी असून तीन भागावर.

नेमले जात असत. प्रोकॉन्सलला युद्धखात्याचेहि अधिकार होते. इ. स. ३७ सालीं बादशहा कॅलिगुला यानें सुभेदाराचे युद्धखात्याचे अधिकार काढून ते आपल्या प्रतिनिधीला (इंपिरियल लीगेटला) दिले व त्यामुळें प्रोकॉन्सलची सत्ता फार कमी झाली.

डायोक्किटियन यानें रोमन आफ्रिकेतील राज्याची पुनर्घटना करून त्याचे कार्थेज, हाड्रमेटन, सिट्रा, ट्रिपोलिस, सेटिफ, चरचेल असे सहा भाग केले व त्यांवर एक अधिकारी नेमला. पुढें मूर व व्हँडॉल यांच्याशी युद्ध झाल्यामुळें राज्यकारभारांत पुन: फेरबदल झाला व राज्याचे कार्थेज, बिझांशिअम, ट्रिपोलिटाना, न्युभिडिआ व मॅरेटानिया असे सहा भाग पडले गेले. यावेळेस मुलकी व युद्ध हीं खातीं वेगळीं असून त्यांवर वेगळाले स्वतंत्र अधिकारी होते. या काळांत बांधलेल्या दुर्गांचे अवशेष अद्याप आहेत. इ. स. ६४७ सालीं अरब लोक इफ्रिकिया प्रांतात घुसून त्यांनी तो मुलुख बळकावला व ६९७ मध्यें कार्थेजहि घेतलें.

रोमन आफ्रिकेंत तीन तर्हेचे लोक होते. मूळचे बर्बर लोक, पूर्वींचे कार्थेजियन लोक व वसाहतवाले रोमन लोक बर्बरलोकांमध्ये पुष्कळ जाती होत्या. या एकोणचाळीस होत्या असें टॉलेमी म्हणतो.

या लोकांच्या देवतांची नांवे पुढीलप्रमाणें आहेत : - माटमॅनिअस, लिलेअस, गिल्व्हा, सिनिफेरे, मास्टिमन व गर्झिल, टयुनिसिआ, कॉन्स्टेंटाईन व उत्तर आफ्रिका यांमध्ये बर्बर लोकांची थडगीं पुष्कळ आहेत. “कुबेर एर रुमिया” हे थडगें फार प्रसिद्ध झालें आहे.

रोमन सत्तेच्या आरंभीं समुद्रकिनार्यावरील शहरांतील बहुतेक लोक जुन्या कार्थेजियन लोकांचे वंशज होते. यावेळची प्रचलित भाषा “प्युनिक” होती, व तिचें अध्ययन ख्रिश्चन बिशपांना करावें लागत असे. सहाव्या शतकापर्यंत कार्थेजियन लोक हीच भाषा बोलत असत. रोमन लोकांनी हा देश घेतल्यापासून या देशाच्या संस्कृतीस रोमन लोकांचें वळण मिळालें. आगस्टसच्या वेळेस कार्थेज हें राजधानीचें ठिकाण असून तेथें पुष्कळ रोमन लोकांनीं वसाहत केली. फ्रेंचांनी अल्जेरिया व टयुनिसिया हे प्रांत घेतल्यापासून रोमन आफ्रिकेंत ऐतिहासिक संशोधन व पुरातन वस्तुसंशोधन झपाट्याने चालले आहे. या प्रांतात रोमच्या व बिझांशिअमच्या लोकांचे अवशेष पुष्कळ आहेत. देवळें, कबरी, कमानी, पुतळे, शिलालेख इत्यादि अवशेष प्रांतात आढळलेले आहेत, व कांहीं खणून काढलेले आहेत. अल्जेरिया व टयुनिसिया प्रांतांतील अजबखान्यांत हे अवशेष आहेत. अल्जेरिया प्रांतापेक्षा ट्युनिसिया प्रांतात जुने अवशेष फार आहेत. या पुढील १९१० पर्यंतचा आफ्रिकेचा इतिहास चवथ्या विभागांत दिला आहे.
१९१० ते १९२१ पर्यंतच्या काळांत आफ्रिकेतील प्रदेशाची बरीच पुनर्विभागणी झाली. बर्याच अज्ञात प्रदेशाचें भोगोलिक संशोधन झालें, आणि दळणवळणाचीं साधनें वाढलीं. त्यामुळें पुष्कळ ठिकाणच्या समाजिक व आर्थिक स्थितींत बराच फेरबदल झाला. सदरहु हकीकत ( १ ) संशोधन, ( २ ) दळणवळणाची साधनें, व ( ३ ) इतिहास या तीन सदराखालीं देऊं.

संशोधन. -  साहारा वाळवंट हा प्रदेश १९१० सालींहि सर्वांत अधिक अज्ञात होता. साहाराच्या पश्चिम भागाचें संशोधन १९०४ पासून फ्रेंच अधिकार्यांनी चालविलें होतें. १९२१ पर्यंत बरीच माहिती उपलब्ध झाली. पश्चिम साहाराचा मध्यभाग हा साधारण उंचवटयाचा प्रदेश असून त्यांत वस्ती होण्यास योग्य अशीं कांही ठिकाणें आहेत. पण हल्लीं तेथें वस्ती नाहीं. मात्र दक्षिण मोराक्केमधील कांही टोळ्या लुटालूट करण्याकरितां हो प्रदेश ओलांडून मॉरेटॅनियाच्या व मध्य नागारच्या प्रदेशांत जातात. तसेंच पश्चिम साहारामध्यें प्राचीन मानववस्तीचे अवशेष बरेच सांपडले आहेत. ही मानववस्ती इस्लमधर्मपूर्वकालीन होती, एवढेंच या अवशेषांवरून अनुमान निघते. त्याशिवाय अधिक माहिती मिळत नाहीं. लिबीयन वाळवंटाबद्दल डब्ल्यू. जे. हार्डिग किंग यानें देश्य साधनावरून बरीच माहिती जमविली आहे. १९२१ जानेवारीमध्यें मिसेस रोसिटा फोर्बेस नांवाच्या इंग्रज स्त्रीनें सीरेनैका येथून निघून कुफ्रापर्यंत प्रवास केला व तेथून ती नव्या मार्गांनें जाराबूबला परत आली. अपर नाइल, दक्षिण जुबालँड, मध्य आफ्रिकेचा पूर्वभाग, कांगो झँबेझी, वैगरे प्रदेशांचे संशोधन १९११-१४ पर्यंतच्या काळांत झालें. विशेषत: जागतिक युद्धाच्या वेळी जरूर म्हणून आफ्रिकेच्या उष्णकटिबंधातील प्रदेशाची पहाणी अंशत: विमानांच्या मदतीने, करण्यांत आली. १९२० मध्यें डॉ. पी. चामर्स मिचेलने केलेली खारटूम नजीकच्या प्रदेशाची पाहणी भूस्तरशास्त्रदृष्टया महत्वाची आहे. या प्रदेशांत अनेक ज्वालीमुखी पर्वत असल्याचें त्यानें प्रसिद्ध केलें आहे. मिचेलचें संशोधन हेंच आकाशमार्गाने केलेलें पहिलें महत्वाचे संशोधन होय.

दळणवळणाची साधने. – आगगाडी व आगबोट या दोहोंच्या साहाय्यानें मिळून आफ्रिका ओलांडून जातां येईल अशी व्यवस्था १९१५ मध्यें झाली. ह्या अटलांटिक-हिंदी महासागरमार्गाचा कांहीं भाग कांगो नदींतून आहे व नौकानयनास अशक्य अशा भागीं रेल्वे बांधून  हा मार्ग पुरा करण्यांत आला आहे. डेरासालामपासून टांगानिकासरोवराच्या पूर्व किनार्यावरील किगोमापर्यंतची जर्मन रेल्वे १९१४ मध्ये झाली होती, व नंतर या सरोवराच्या पश्चिम किनार्यावरील आल्बर्टव्हिलेपासून काबालो पर्यंत ( अपरकांगो ) रेल्वे १९१५ मार्चमध्यें तयार होऊन हा मार्ग पूर्ण तयार झाला. दक्षिण आफ्रिकेंत पूर्व पश्चिम जाणारा दुसरा पूर्ण रेल्वेमार्ग १९१५ सालींच तयार झाला. या रेल्वेनें वाल्फिशबे हा डेलागोआबेला जोडला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेत पूर्वपश्चिम जाणारा आणखी एक पूर्ण रेल्वेमार्ग तयार होत आहे, त्यापैकीं फक्त ६०० मैल रस्ता तयार होणें असून त्याला आरंभ १९२१ मध्येंच झाला.

आफ्रिका दक्षिणोत्तर ओलांडण्याकरितां केप ते कायरी या मार्गाची जी योजना केली आहे त्यासंबंधांत १९१०-२१ च्या काळांत फार अल्प प्रगति झाली. या मार्गावरचा बुकामा पर्यंतचा ( अपरकांगो ) रेल्वेरस्ता १९१८ मध्यें पुरा होऊन त्यामुळें केपपासून उत्तरेस २५९८ मैल रेल्वेनें जाण्याची सोय झाली; आणि रेल्वे व टांगानिका सरोवर व कांगो नदी यांतील आगबोटीच्या योगाने केपपासून कायरोपर्यंत प्रवास करण्याची सोय बहुतेक पुरी झाली आहे. फक्त मध्यंतरी ३०० मैल प्रवास पायी करावा लागतो.

सहारा वाळवंट सबंध ओलांडून जाण्याकरिता आल्जेरिया व नायगेरिया हे देश एकमेकाला जोडणार्या रेल्वेरस्त्याची पाहणी १९१२-१३ सालीच झाली असून या मार्गात बांधकमाला मोठ्याशा अडचणी नाहींत हे ठरलें आहें. या मार्गांपैकीं बिसकपासून टुगुर्टपर्यंतची रेल्वे १९१४ मध्यें सुरूहि झाली ब्लिडि तेजेल्फापर्यंतचा रेल्वेमार्गहि तयार झाला आहे.

ब्रिटिश वेस्ट आफ्रिकेंत रेल्वेरस्ता बांधण्याचें काम १९१० – २०च्या दरम्यान बरेंच झाले. नायगर नदीवर जेब्बा येथें पूल झाल्याने लॅगॉसपासून कॅनोपर्यंत (७०४ मैल) रेल्वेने जाण्याची सोय १९१४ मध्येंच झाली. हारकोर्ट बंदरापासून उदी येथील कोळशाच्या प्रदेशांतून लॅगॉस-कॅनो रेल्वेवरील कडुनापर्यंतहि रेल्वे पुरा झाला आहे. याशिवाय फ्रेंचांनी आपल्या हद्दींत रेल्वे बांधण्याचें काम बरेंच केलें आहे.

तारायंत्राचे बांधकाम बर्याच ठिकाणीं झालें असून बिनतारी संदेश पाठविण्याची सोय जागजागीं करण्यांत येत आहे. शिवाय जागतिक युद्धाच्या वेळीं आकाशमार्गाने दळणवळच बरेंच वाढून यूरोपांतून आशियाकडे व केपकडे ( दक्षिण अफ्रिका ) जाण्याच्या मार्गावरील कायरो हें महत्वाचें ठाणें बनले आहे. १९१९ मध्यें ब्रिटिश अधिकार्यांनीं कायरोपासून केपटाऊनपर्यंत जाण्याचा आकाशमार्ग आंखला व जागजागीं विमानें थांबण्याचीं स्टेशनें ( एअरोड्रोम ) २४ ठिकाणीं बांधली. हा आकाशमार्ग ५२०६ मैल लांबीचा आहे. कायरो ते केपपर्यंतचा जमिनीवरील मार्ग त्या मानानें अधिक लांब म्हणजे ६८२३ मैल आहे. आफ्रिकाखंड ओलांडून जाण्याचा पहिला प्रयत्न (१९२० फेब्रुवारी) डॉ. चामर्स मिचेल यानें केला; पण अर्ध्या वाटेंत त्याचें विमान मोडलें; पण पुढे १९२० च्या मार्चमध्ये कर्नल रीनेव्हेल्ड व मेजर सर ब्रँड यांनी कायरो ते केपपर्यंतचा प्रवास ७२ तास ४० मिनिटांत करून पूर्ण यश मिळविले. याच सुमारास आल्जेरियांतून निघून नायगर नदीवरील गाओपर्यंत फ्रेंच वैमानिक मेजर व्हिलेमननें प्रवास केला. १९२१ मध्यें कांगो नदीवरील स्टॅनलेपूलपासून स्टॅनलेव्हिलेपर्यंत १००० मैल अंतर आकाशयानाने जाण्याची कायमची सोय केली आहे.

इ ति हा स -  जुन्या संस्कृतीचें यूरोपीभवन ( वि. ८. ) वर्णन करतांनां स्थूल इतिहास दिला आहे आणि बराचसा राजकिय इतिहास प्रत्येक प्रदेशावरील लेखांत येईल. १९१० ते १९२१ या काळांत अफ्रिकेंत पुष्कळ घडामोडी झाल्या आहेत, त्यांचे कारण जागतिक युद्ध हें आहे. १९१० मध्यें केपकालनी, नाताळ, ट्रान्सव्हाल व आरेंज फ्री स्टेट यांचे एक राज्य बनवून त्याला यूनियन ऑफ साऊथ अफ्रिका असें नांव देण्यांत आलें व यूनियन सरकारला इंग्लंडने संपूर्ण स्वराज्याचे हक्क दिले. १९११ मध्यें फ्रेंच इक्किटोरियल आफ्रिकेचा बराचसा भाग कामेरूनच्या जर्मन प्रोटेक्टोरेटला जोडण्यांत आला आणि मोबदला म्हणून मारोक्कोच्या मोठया भागावर फ्रेंच प्रोटेक्टोरेट जर्मनीने मान्य केलें. १९१२ मध्यें इटालीनें ट्रिपोली व बेंगाझी ( सीरेनैका ) यापैकीं तुर्कस्तानचा बराचसा मुलूख आपल्या राज्यास जोडला व त्याला लीबीया असें नांव दिलें. याच सालीं युनैटेड स्टेटसनें लायबीरीयावर आपली आर्थिक सत्ता स्थापली. १९१४ मध्यें इजिप्त हें ब्रिटिश प्रोटेक्टोरेट असल्याचें जाहिर करण्यांत आलें. पुढें १९१९ जूनमध्यें जर्मनीने समुद्रापलीकडील भागावर जेथें जेथें स्वत:ची प्रोटेक्टोरेट राज्यें होतीं तीं सर्व व्हर्सेलस्च्या तहानें दोस्त राष्ट्रांच्या स्वाधीन केलीं. त्यायोगानें जर्मन साउथ वेस्ट आफ्रिकेवर दक्षिण आफ्रिकेच्या यूनियन सरकारची मँडेटरी सत्ता चालू होऊन त्या भागाला हल्लीं साउथ वेस्ट प्रोटेक्टोरेट असें नांव आहे. टांगोलँड ( हा १९१४ आगस्टमध्यें ब्रिटिश व फ्रेंच दोन्ही सैन्यांनीं मिळून जिंकला ) विभागला जाऊन त्यावर ब्रिटिश व फ्रेंच यांची कामेरूनच्या बहुतेक भागावर फ्रेंचांची व लहानशा भागावर ब्रिटिशांची, जर्मन ईस्ट आफ्रिकेवर ( हल्लींचें नांव टांगानिका टेरिटरी ) ब्रिटिशांची, याप्रमाणें सत्ता त्याच तहानें प्रस्थापित झाली आहे. जर्मन ईस्ट आफ्रिका, ब्रिटिश व बेल्जियन या दोन सैन्यांनी मिळून जिंकल्यामुळें त्यांपैकीं कांहीं भाग बेल्जियन कांगोला जोडण्यांत आला आहे. ब्रिटिश ईस्ट आफ्रिका १९२० पर्यंत प्रोटेक्टरेट होती, ती त्या सालीं ब्रिटिशांच्या पूर्ण मालकीची होऊन तिला केनिया वसाहत असें नांव देण्यांत आलें आहे. अशा रीतींने जागतिक युद्धामुळें मोठाले फेरफार झाले आहेत. अ फ्रिका खंडाची आज जी  वांटणी झाली आहे. ती येणेंप्रमाणें : -

देश  चौरस मैल.
प्रे. ब्रिटन ४३६४०००
फ्रान्स ४२०००००
पोर्तुगाल ७८८००
इटाली ६५००००
स्पेन  १४००००
बेल्जम ९३००००
लायबेरीया ४००००
आबीसिनिया (स्वतंत्र) ३५००००

१९१४ मध्यें जर्मनीच्या ताब्यांत आफ्रिकेंतील १०३०००० चौरस मैल व तुर्कस्तानच्या ताब्यांत ४००००० चौरस मैल प्रदेश होता, तो आज सर्व त्यांच्या हातून गेला आहे. तुर्कस्तानच्या हातून उत्तर आफ्रिकेंतला सर्व मुलूख जाणार, हें भविष्य पुष्कळ दिवस दिसत होतें. कारण या मुलुखावर तुर्कस्तानची जी पांच शतकें सत्ता होती तीमुळें बहुतेक दुष्परिणामच झाले होते; सबब या तुर्कस्तानच्या हानीबद्दल वाईट वाटण्याचें कारण नाहीं.

जर्मनीच्या आफ्रिकेंतील साम्राज्यास सुरुवात १८८४  पासून झाली व तें साम्राज्य झापाट्यानें वाढलें. जागतिक युद्धापूर्वीच्या दहा वर्षांतहि आफ्रिकेंत साम्राज्याची वृद्धि करणें हा जर्मन सरकारच्या धोरणाचा एक प्रमुख विषय होता. आफ्रिकेच्या भूमध्य समुद्रकिनार्याचा भाग मिळवणें व मोरोक्कोच्या अटलांटिक किनार्यावर एखादे तरी बंदर मिळविणें ही जर्मनीची इच्छा होती. त्यामुळें जर्मनीचा फ्रान्स व इटली या दोन्ही राष्ट्रांशीं विंरोध आला व या दोन्ही बाबतींत जर्मनीच्या विरुद्ध निकाल १९११ मध्यें लागला. इटालीनें तु्र्कस्थानाशीं युद्ध करून ट्रिपोली व सीरेनैका प्रांत जिंकून घेतले, त्यामुळें जर्मनीची निराशा झाली आणि मोरोक्कोकडील बंदराकरितां फ्रेंचाबरोबर चालू असलेल्या वाटाघाटींत यश येण्याचें चिन्ह दिसेना म्हणून फ्रेंच इक्किटोरियल आफ्रिकेचा बराच भाग फ्रान्सनें जर्मनीला द्यावा असें बोलणें जर्मनीनें लावलें. इतकेंच नव्हे तर मध्य आफ्रिकेचा बराचसा भाग ताब्यांत घेऊन कामेरूनचा जर्मन साऊथवेस्ट आफ्रिकेशीं व जर्मन ईस्टआफ्रिकेशीं संबंध जोडावा आणि या आफ्रिकेच्या भागांत उत्पन्न होणारा सर्व कच्चा माल स्वत:स मिळावा असा प्रयत्न जर्मन सरकार करीत होते. केवळ आर्थिक सत्ता जर्मनीनें घेण्यास ब्रिटिश मुत्सद्दी विरुद्ध नव्हते. १८९८ मध्यें पोर्तुगीज वेस्ट आफ्रिका ( अंगोला ) व पोर्तुगीज  ईस्ट आफ्रिका ( मोझांबिक ) या भागांवर आर्थिक सत्तेची विभागणी जर्मनी व इंग्लंड यांनीं करार करून ठरविली होती व तसलाच करार १९१२ मध्यें करून पोर्तुगालच्या साम्राज्यसत्तेस हरकत न येईल, अशा रीतीनें दोघांनी सदरहू पोर्तुगीजांच्या दोन प्रदेशांवरील  आर्थिक सत्ता आपसांत विभागून घेण्याचें पुन्हां ठरलें. मात्र १९१३ आगस्टमध्यें या करारावर सही करण्यापूर्वी हे करार प्रसिद्ध करावे म्हणजे पोर्तुगाल सरकारला संशय राहणार नाहीं, अशा प्रकारची अट ब्रिटिश परराष्ट्रमंत्री सर एडवर्ड ग्रे यानें घातली. या अटीला जर्मनीची संमति मिळून करारावर सह्या होण्यापूर्वीच १९१४ मध्यें जागतिक युद्ध सुरू झालें.

या १९१०-१४ च्या काळांत फ्रेंच व जर्मन सरकारनें आफ्रिकेंतील आपापल्या प्रदेशांत रेल्वे वगैरे बांधून बरीच प्रगति केली. इंग्लंडनेंहि इजिप्त, सूदन व इतर वसाहती यांत भौतिक सुधारणा बरीच केली; पण त्यबरोबरच इजिप्त मध्यें स्वराज्याचे हक्क मिळविण्याची चळवळ सुरू झाली होती. याच काळांत जर्मनीनें दक्षिणेमध्यें बोअर (डच) पुढार्यांशीं आणि उत्तर आफ्रिकेंत देश्य लोकांशी इंग्रज व फ्रेंच यांच्याविरुद्ध स्नेहसंबंध जोडले होते, असें जागतिक सुरू झाल्यानंतर उघडकीस आलें.

पण युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांच्या समुद्रावरील वर्चस्वामुळें जर्मनीला आपल्या वसाहतींनां मदत करणें अशक्य झालें म्हणून टोगोलँड व कांगो या प्रदेशांनीं युद्धांत सामील न होतां तटस्थ राहावें, अशी सूचना जर्मन सरकारनें फ्रेंच व ब्रिटिश यांनां केली. बेल्जियन कांगोनें तटस्थ राहावें, अशी बेल्जियमची इच्छा असल्यामुळें एम. डेव्हिग्नॉन या बेल्जियन परराष्ट्रमंत्र्यानें फ्रेंच व ब्रिटिश सरकारास तटस्थ राहणार कीं नाहीं, तें जाहीर करण्याबद्दल विचारलें; पण आगस्ट तारीख ६ च्या सुमारास ब्रिटिश व फ्रेंच यांनी आफ्रिकेंतील जर्मन मुलुखावर हल्ला करण्यास सुरुवात करून तटस्थ न राहण्याबद्दलचा निकाल जाहीर केला. तेव्हां जर्मनीनें तटस्थपणा राहावा म्हणून अमेरिकन सरकारमार्फतं प्रयत्न करून पाहिला; परंतु तेव्हांहि फ्रेंच व ब्रिटिश यांनी तटस्थ राहण्याचे नाकारलें. यामुळें लवकरच अबिसीनिया व स्पॅनिश प्रोटेक्टोरेट यांच्याखेरीज आफ्रिकेंतील सर्व भाग जागतिक युद्धांत सामील झाले. या सामन्यांत सर्व जर्मन वसाहती काबीज करूं, अशी खात्री फ्रान्स व इंग्लंड यांनां प्रथमपासूनच वाटत होती. कारण इटली लढाईंत पडण्यापूर्वी १९१५ एप्रिल २६ रोजीं लंडन येथें फ्रान्स, रशिया, ग्रेटब्रिटन व इटाली याच्यामध्यें करार झाला त्यांत जर्मन वसाहती जिंकून घेतल्यास इटालीला इरिट्रीया, सोमालीलँड व लिबीया वगैरे मुलुखांत सवलती देण्याचें कबूल केलें होतें. जागतिक युद्ध संपल्यावर इटलीनें बरींच अधिक मागणी केली; पण ती अमान्य होऊन इटालीला टयुनिशियांत कांही रेल्वेविषयक व व्यापारविषयक हक्क मिळाले. जारबूबचा सजल प्रदेशहि इटलीला मिळाला, शिवाय इटालियन सोमालीलँडनजीक ज्युबादरीनजीकचा पश्चिम भाग, ज्यांत उत्तम कापूस पिकतो तो व किसमायु बंदर हीं इटालीला मिळाली.

१९१९-२१ या काळांत आफ्रिकेंतल्या मोठ्या राजकीय गोष्टी म्हणजे दक्षिण आफ्रिकेंत डच राष्ट्रीयपक्षाची स्वतंत्र होण्याची चळवळ व इजिप्तची स्वराज्यप्राप्तीस्तव चळवळ याकरितां ‘दक्षिण आफ्रिका ’ व ‘इजिप्त’ पहा.

याखेरीज आणखी एक महत्वाचा प्रश्न दक्षिण व पूर्व ‘केनया’ या लेखांत येईल. पण यापेक्षांहि अधिक आफ्रिकेंतील हिंदी लोकांच्या दर्जासंबंधाचा; याचें कांही विवेचन विभाग पहिला (पृ. २६६) यांत केलें आहे व दक्षिणआफ्रिका महत्वाची गोष्ट म्हणजे नीग्रो लोकांत उत्पन्न झालेली स्वजातीबद्दलची जागृति. शिक्षण व ख्रिस्तीधर्म यांचा प्रसार, आफ्रिकेंतील कारखान्यांत पुष्कळ नीग्रोंनां मिळालेल्या नोकर्या जागतिक युद्धामुळें मिळालेले धडे, या सर्वांचा परिणाम नीग्रो लोकांत एकजातीयत्वाची भावना फार वाढून गोर्या वसाहतवाल्यांविरुद्ध सुरू झालेली चळवळ हा होय; पण नीग्रो लोकांच्या राष्ट्रीय भावनेला काय स्वरूप येणार हें अद्याप निश्चित कळत नाहीं.

आज ( १९२४ च्या जानेवारींत ) आफ्रिकेची एकंदर राजकीय परिस्थिति द्यावयाची म्हटल्यास असें सांगता येईल, कीं सर्व आफ्रिका यूरोपीय राष्ट्रांच्या ताब्यांत आहे, आणि याला अपवाद म्हटला तर दास्यमुक्त निग्रोंचें अमेरिकेच्या दयेनें स्थापन झालेले अर्वाचीन लोकसत्ताक राष्ट्र “लायबेरिया” ( पहा ) व ख्रिस्ती राष्ट्र “आबिसीनिया” हीं होत. म्हणजे जुनी आफ्रिका गेली व ख्रिस्ती व यूरोपीय सत्तेखालची आफ्रिका उरली आहे. या खंडांत तुर्कस्थानचें आतां काही नाहीं. लायबेरियाखेरीज सर्व आफ्रिका प्रत्यक्ष यूरोपीय सत्तेखालीं किंवा यूरोपीय संरक्षणाखालीं असलेल्या आफ्रिकन राजांच्या सत्तेखालीं आहें. सध्यांच्या आफ्रिकेची वांटणी येणेंप्रमाणें दाखवितां येईल:

स्वतंत्र आफ्रिका – ( १ ) लायबेरिया, क्षेत्र. ४०००० चौरस मैल आणि लोकसंख्या पंधरा पासून वीस लाख ( २ ) आबिसीनीया ( पहा ) लोकसंख्या व क्षेत्रफळ अनिश्चित आहे.

ब्रि टि श सा म्रा ज्य. – ३८ लक्ष ७२ हजारांवर क्षेत्रफळ  आणि लोकसंख्या साडेचार कोट ( इजिप्त खेरीज ) इजिप्त, क्षेत्रफळ तीन लक्ष पन्नास हजार. लोकसंख्या एक कोटि लत्तावसि लक्ष. इजिप्त अजून ब्रिटनच्या तावडींतून सुटला नाहीं असें धरलें तर ब्रिटिश साम्राज्याच्या ताब्यांत आफ्रिकेंतील ४२ लक्ष मैलांवर जमीन व पावणेसहा कोट लोक आहेत. या प्रदेशांतील प्रत्येक भागावर स्वतंत्र लेख आहेत ते पहावे. प्रत्येक भागाचीं नांवें मात्र येथें देतों. “ आसेन्शन बेट,” “सेट हेलीना” बेट, “नायजेरीया” “कामेरून”, “गोल्ड कोस्ट” ( संरक्षित संस्थानांसह ), टोगोलांड”, “सिएरालिओन” आणि संरक्षित संस्थानें ‘गांबिआ’ आणि सामंत राज्यें, “मारिशस” व तदाश्रयी भाग ‘सेचेलेस” , “सोमालीलांड,” “केनिया” वसाहत आणि संरक्षित संस्थानें, “टांगानिका,” “युगांडा संस्थान”, जंगबार (“झांबीबार” ) आणि “पेंबा” “न्यासालांड”, “ युनियन आफ साऊथ आफ्रिका ” “साऊथ वेस्ट आफ्रिका” ‘र्होडेशिया’, स्वाझीलंड,” “बासूटोलंड,” आंग्लो इजिप्शिअन “सूदाना” प्रस्तुत ज्ञानकोशांतील लेखविषय उलट्या विरामचिन्हांनीं अंकित केलें आहेत.

फ्रा न्स च्या ता ब्यां ती ल मु लू ख -  “ अलजीरिया ” लोकसंख्या ५८ लक्षांवर ( सेन्सस १९२१ ) क्षेत्र २२२१८० फ्रेंच इक्वेटोरिअल आफ्रिका उर्फ “ फ्रेंच कांगो ” क्षेत्रफळ ९८२०७४९ व लोकसंख्या अदमासें ( १९१५ तील ) नव्वद लाख.

“ कामेरून, ” क्षेत्रफळ १६६४८९.

“ मादागास्कर ” क्षे. २ लक्ष २८ हजार, लोकसंख्या ( ३१ डिसेंबर १९१७ ) ३५ लक्ष ४५ हजार.

“मोटेय” आणि “कोमोरा” बेटे क्षेत्र. ७९० चौ. मै. लोकसंख्या १ लक्ष.

“रेयूनिआं” क्षे. ९७० चौरस मैल व लोरसंख्या १ लक्ष ७३ हजार.

“फ्रेंच सोमालीलंड.” क्षे० ५७९० लो. ( १९२१ सालचा अंदाज ) ६५ हजार.

“फ्रेंच वेसट आफ्रिका” आणि सहारा क्षेत्र० १८ लक्ष. लो.संख्या एक कोटि बावीस लक्ष चौर्यायशी हजार.

“टयूनिस” क्षेत्रफळ ५० हजार चौरस मैल आणि लो.संख्या एकवीस लक्ष.

“मोरोक्को” फ्रेंच झोन क्षेत्रफळ दोन लक्ष वीस हजार चौ. मै. लोकसंख्या ५४ लक्ष.

स्पे न च्या ता ब्यां ती ल मु लू ख. – मोरोकोचा कांही भाग तेवढा स्पेनकडे आहे. क्षेत्रफळ ११ हजार मैल. व लोकसंख्या स्पानिशझोन व टांबीर मिळून ५ लक्ष.

पो र्तु गा ल च्या ता ब्यां ती ल मु लू ख. – यांत “केप व्हर्ड बेटें” “गिनी,” “प्रिन्सिपी,” “सेंट थामस बेटें” “अंगोला,” व “मोझांबिक” हे प्रदेश येतात. एकंदर क्षेत्रफळ ९ लक्ष सत्तावीस हजार चौरस मैल व लोकसंख्या ७७ लक्ष ३४ हजार आहे.

इ ट ली च्या ता ब्यां ती ल मु लू ख. – “ इरिट्रिया” क्षेत्रफळ ४५८०० लोकसंख्या चार लक्ष. इटालीयन “सोमलीलंड” क्षेत्रफळ १ लक्ष ४० हजार लोकसंख्या साडेसहा लक्ष. “त्रिपोलीटानिया व “सायरे नैका.” क्षेत्रफळ चार लक्ष सहा हजार चौ. मै. व लोक संख्या सुमारें दहा लाख.

बे ल ज म च्या ता ब्यां ती ल मु लू ख. – कांगो क्षेत्रफळ नउ लक्ष हा हजार चौरस मैल व लोकसंख्या सुमारे एक कोटि दहा लक्ष.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .