प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

आहोम - आसामदरींतील ही एक शान जात असून, १९ व्या शतकाच्या आरंभी त्या देशांत ब्रह्मीलोक येईपावेतों हिचेंच वर्चस्व तेथें होतें. हे आहोम लोक व त्याचप्रमाणें ब्रह्मदेश व पूर्व चीन येथील शान लोक आणि सयामी लोक थाई वंशांतील होत. आहोम हें नांव ''आसाम'' या शब्दापासून बनलें आहे असें मानतात, व ''शान''(शाम) आणि ''सियाम'' हे शब्द आसामधील 'साम' याशीं जुळतात. इ. स. १२२८ मध्यें सु-का-फा राजाच्या नेतृत्वाखालीं पूर्वेकडून येऊन त्यांनीं आसामवर चाल केली व त्या देशाला आपलें नांव दिलें. यानंतर दीड शतकापर्यंत सु-का-फाच्या वंशजांनीं लक्किमपूर व सिबसागर या लहान जिल्ह्यांवर निर्वेधपणें राज्य केलेलें दिसतें. पश्चिमेकडे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यांत त्यांची सत्ता थोडथोडी वाढत होती तरी त्यांनां नेहमींच विजय प्राप्त होत असे, असें नाहीं. औरंगजेबाच्य काळीं सदियापासून गोलपारापर्यंत, आणि दक्षिणेकडील डोंगरांच्या पायथ्यापासून उत्तरेकडील भुतिया सरहद्दीपर्यंत. म्हणजे सबंध ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यांत आहोमराजांची सत्ता असे. या घराण्याच्या सत्तेचा कळस रुद्रसिंहाच्या कारकीर्दीत झाला (तो १६९५ त गादीवर बसला असे म्हणतात). या नंतरच्या शतकांत, अंतःकलहामुळें व बाहेरून होणाऱ्या शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळें आहोमांच्या सत्तेला उतरती कळा लागली. त्यांच्यातीलच एका भांडखोर पक्षानें इ. स. १८१० मध्यें ब्रह्मी लोकांनां सहाय्यार्थ बोलाविलें. एकदां आंत पाऊल पडल्यावर त्यांनीं सबंध खोरें आपल्या हस्तगत केलें. व १८२४-२५ त ब्रिटिश त्यांनां बाहेर पिटाळून लावीपर्यंत ब्रह्मी लोकांनीं तेथें फार अमानुषपणें राज्य केलें. १९०१ च्या खानेसुमारींत आसामांतील आहोमांची संख्या १७८०४९ होती व १९११ मध्यें ती १९७४४४ भरली.

आहोमांनीं आसाममध्येंहि शान जातींतील राज्यकारभाराची पध्दत कायम ठेविली. ही शान पध्दत म्हणजे कर घेण्याऐवजीं वैयक्तिक चाकरी घेणें होय. त्यांचा बौध्द धर्म नसून, एक निराळाच मूर्तिपूजाविशिष्ट धर्म होता; पण आसामध्यें आल्यावर त्यांनीं हळू हळू हिंदुधर्म स्वीकारला, व त्यांच्या राजांनींहि आपणाला हिंदूं नांवें व पदव्या घेतल्या. त्यांच्यांतली जगदुत्पत्तिविषयक कथा अशीः - मूळारंभं आकाशस्थ ग्रहतारे, हवा किंवा पृथिवी यापैकीं कांहींहि नसून, सर्वत्र जलमय झालें होतें. फा नांवानें ओळखिला जाणारा निर्गुण परमात्मा वर घिरटया घालीत होता. नंतर तो मोठया खेंकडयाचें रूप घेऊन वर तोंड करून पाण्यावर तरंगून राहिला. पुढें त्यानें एकामागून एक प्राण्यांचीं रूपें घेतली. सरतेशेवटीं दोन सोनेरी कोळी झाले व त्यांच्या विष्टेपासून पृथ्वी तयार होऊन ती भोंवताली असलेल्या महासागराच्या वर आली. नंतर फानें आपल्या शरीराचाच एक भाग स्त्रीरूप केला. तिनें चार अंडी घातलीं व त्यांपासून चार पुत्र निघाले. एकाला पृथ्वीवर राज्य करण्याकरितां नेमिलें पण तो वारला व भूत झाला. त्याचा पुत्रहि वारला. आहोमलोक त्याची घरोघर पूजा करितात. एका जलप्रलयाच्या कथेशींहि मनुष्योत्पत्तीचा संबंध जोडण्यांत आला आहे.

आहोम धर्म व भाषा नष्ट झालेली आहे; कोठें तरी थोडयाशा जुन्या भिक्षुकांच्या घरीं हीं फक्त आढळून येतील. तथापि त्यांच्यांत सुध्दां उच्चाराची परंपरा अजीबात नष्ट झाली आहे. आहोम भाषा सयामी-चिनी भाषाकुळाच्या 'थई' शाखेंतील एक अतिशय जुनी भाषा आहे. लॅटिनचा इटालियनशीं जितका संबंध आहे, तितकाच आहोम भाषेचा सयामी आणि शान भाषांशीं संबंध आहे. अर्वाचीन सयामी भाषेशीं अर्वाचीन शान भाषेपेक्षां हिचा निकट संबंध आहे. ही प्रकृतिभाषा असून, त्यांतील प्रत्येक शब्द एकाक्षरी आहे व तो वाक्यांतील संदर्भानुसार नाम किंवा क्रियापद म्हणून योजतां येतो. शब्दांचा अनुक्रम पाहातां षष्ठी तव्दिषयक नामाच्या पाठीमागून येते, व स्थान आणि काळ यांचे संबंध उपसर्गानें दर्शविले जातात. एकाक्षरीं शब्दांचे भिन्न अर्थ, इतर थई भाषा व चिनी भाषा यांतल्याप्रमाणें विशिष्ट आवाजांच्या पध्दतीनें ओळखितां येतात. ते लिहून दाखवितां येत नसल्यानें, त्यांची परंपरा नष्ट झाली. या भाषेला स्वतःची वर्णमाला होती.

ई. ए. गेट याच्या दि हिस्टरी ऑफ आसाम (१९०६) या पुस्तकामध्यें आहोमी वाड्:मयासंबंधानें थोडेसें लिहिलें आहे. आहोमीमध्यें इतिहासलेखन होतें असा त्या वाङ्मयाचा विशेष गुण गेट सांगतो. तथापि त्याचा इतिहास चाळून पाहिला असतां गेटनें त्या वाङ्मयाचा कितपत उपयोग केला हें स्पष्ट होत नाहीं. तें वाङ्मय आज अर्धे मुर्धे भुईंत पुरल्यासारखें आहे. या वाङ्मयाचा फारसा शोध झाला नाहीं आणि जे ग्रंथ उपलब्ध झालेले असतील ते संशोधकाकडून फारसे वाचले गेले नाहींत.

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .