प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

उरोगामी - या प्राणिवर्गांत सरडा, पाल, घोरपड, सर्प, कांसव व नक्र इत्यादि सरपटणारे प्राणी येतात. यास इंग्रजींत‘रेप्टाईल’ असें म्हणतात.

ल क्ष णें  – उरोगामी अथवा सरपटणारे प्राणी यांचा वर्ग सपृष्ठवंशांतील शीतरुधिर (कोल्डब्लडेड), सशीर्ष (क्रानिएटा) विभागांत येतो. जे पूर्वकालीन सपृष्ठवंश (व्हर्टिब्रेटा) प्राणी पहिल्याप्रथम पाण्यापासून अलिप्त झाले व स्वतंत्रपणें जमीनीवर राहूं शकले त्यांचे हे उरोगामी प्राणी वंशज होत.  जलस्थलचर प्राणी उदाहरणार्थ, बेडूक यांच्यामध्यें ज्याप्रमाणें अर्भकाला त्याचा पूर्ण विकास होईतों श्वासोच्छवासाच्या क्रियेकरितां कांहींकाळ पाण्यांत दवडावा लागतो तशी गरज या वर्गांतील प्राण्यांना लागत नाही. कारण परिपूर्णतावस्थेंत या प्राण्यांत भ्रूणाच्या (एंब्रिओ) नालाच्या      (अ‍ॅलनटोइक) भागापासून एक बाह्य शरीरावरण तयार होतें व तें अशा प्रकारचें असतें कीं, त्यांतून रुधिराभिसरण होऊं लागतें, व या रुधिराभिसरणामुळें श्वासोच्छवासाची क्रिया म्हणजे रुधिराशीं हवेंतील प्राणवायूंचें संलग्न होणें ही घडून येते. नालाच्या भागापासून झालेल्या या शरीरावरणाला नालावरण (अ‍ॅलेन्टाईस) म्हणतात. अशा प्रकारचें शरीरावरण पक्षी व सस्तन (मॅमल्स) या वर्गांतील प्राण्यांतहि बनत असतें. तसेंच परिपूर्णतावस्थेंत भ्रूणाचें पूर्व व पश्चिम शेवट व पृष्ठभाग मिळून सर्व एका बाह्यास्तरणाच्या (एपिब्लॅस्टिक) आवरणानें आच्छादिले जातात. म्हणजे भ्रूणाच्या पूर्व व पश्चिम शेवटापासून तसेंच दोहोंकडेनें पृष्ठभागावर बाह्यास्तराचा भाग वाढतो. व त्यामुळें भ्रूणाचे हे सर्व भाग या बाह्यस्तराच्या आवरणानें आच्छादिले जातात. तेव्हां अर्थातच भ्रूणाच्या या भागासभोंवतीं हा एक बाह्यस्तराचा कोश तयार होतो व या कोशाच्या विवरांत एक उदकरूपी द्रव सांठतो. म्हणजे भ्रूणाचें पूर्व व पश्चिम शेवट व पृष्ठभाग ह्या उदकपूर्ण कोशानें आच्छादिले जातात. व या उदकपूर्ण कोशाचा उपयोग वाढत्या शरीराच्या रक्षणार्थ होतो. याला भ्रूणोदककोश (अ‍ॅम्निअन) म्हणतात. अ‍ॅम्निअन किंवा भ्रूणोदककोश हा पक्ष्यांत व सस्तन प्राण्यांतहि झालेला असतो, व नालावरण व भ्रूणोदककोश हीं दोन्हीं आवरणें एकसमयावच्छेदेंकरून या तीन वर्गांत होतात. म्हणून उरोगामी पक्षी व सस्तन प्राणी यांनां नालावरणसहित (अ‍ॅलेन्टॉईडिया) व भ्रूणोदककोशसहित (अ‍ॅम्निओटा) असें म्हणतात. तेव्हां सपृष्ठवंशांतील हे तीन वर्ग मासे व स्थलजलचर या दोन वर्गांपासून भिन्नता पावतात. कारण या दोन वर्गांत नालावरण व भ्रूणोदककोश हे बनत नाहींत. यामुळें या वर्गांनां नालावरणरहित (अनॅलेन्टाईडिया) अथवा भ्रूणोदककोशविहीन (अनॅम्निओटा) म्हणतात. सपृष्ठवंश प्राण्यांत उरोगामी, प्राण्यांचा वर्ग जणूं कांहीं एक मध्यवर्ती असलेला समूह असा झालेला दिसतो व या उरोगामी प्राण्यांचें पक्षी व सस्तन या वर्गांतील प्राण्यांशीं जितकें परस्पर सादृश्य आहे असें दिसतें, तितकें त्यांचें मासे व स्थलजलचर या वर्गांतील प्राण्यांशीं असलेलें दिसत नाहीं. पक्षिवर्गाशीं या उरोगामी वर्गाचें जास्त साम्य असल्याकारणानें उरोगामी व पक्षी या दोन वर्गांस वर्गीकरण करतांना एकाच विभागांत एकत्र केलें जातें व त्या विभागाला सौरोसीडा ही संज्ञा देतात.

उरोगामी अथवा सरपटणारे प्राणी हे शितरुधिर सशीर्ष प्राण्यांमध्यें मोडत असून त्यांच्यांत बाह्य त्वचेंतून (एपिडर्मल) शृंगमय पदार्थांचे खवले झालेले असतात व या खवल्यांचें शरीराला एक कवचरूपी आच्छादन बनतें. हें बाह्य त्वचेचें कवच मधून मधून काढून टाकलें जातें व तें पुन्हां पुन्हां तयार होतें. सर्पामध्यें याला कात म्हणतात. पुष्कळ वेळां हें कवच श्वेतत्वचेंतून (डर्मल) झालेल्या अस्थिमय तगटांचें बनून बाह्यत्वचेच्या खवल्यांनीं आच्छादित असें झालेलें असतें. उदाहरणार्थ, कांसव व नक्र यांचें कवच या वर्गांतील प्राण्यांच्या विशेषेंकरून आधुनिक विद्यमान उरोगामी प्राण्यांच्या पाठीचा कणा तपासला असतां असें आढळून येईल कीं, बहुतकरून मणक्यांचे कशेरुघन (सेंट्रा) पूंर्वखात (प्रोकॉक्लस) असे बनलेले असतात. तसेंच त्यांच्यांत त्रिकास्थि (सॅक्रम) हें बहुशः दोन मणके किंवा कशेरू जुळून झालेलें असतें. अस्थिपंजरांतील पूर्वउरोस्थि (प्रिस्टरनम) जेव्हां झालें असतें तेव्हां तें जत्रूपासून (क्लॅव्हिकल) अलग रहातें व प्रगंडास्थिसंधिविवराच्या (ग्लेनॉइड कॅव्हिटी) भूमीचा भाग बहुतेक अस्थिमय झालेला असतो. तसेंच दोहों बाजूवरचे भगास्थि (प्यूबिक बोन्स ) व कुकुंदरास्थि (इश्चिआटिक) ह्यांचा उदरतलभागीं बहुशः एकमेकांशीं संयोग झालेला असतो. पादकूर्चशिरोस्थि (मेंटाटार्सल्स) व पादकूर्चास्थि (टार्सल्स) हे जुळलेले नसतात. या वर्गांतील प्राण्यांत तोंडाचे जबडे बहुतकरून दंतपंक्तिवाहक असे झालेले असतात. मेंदूमधील चक्षुमस्तिष्क (ऑप्टिकलोब्ज) मेंदूच्या पृष्ठभागावर असणारें असे बनलेले असतात. या वर्गांतील नक्रगणांखेरीज करून इतर सर्व प्राण्यांत हृदयाच्या निःसारकर्णाचे (व्हॅट्रिकल्स) दोन भाग क्वचितच पडले जातात. म्हणजे सुसरींत निःसारकर्ण दोन कप्प्याचें झालेलें असतें व इतर सर्व प्राण्यांत निःसारकर्णाला एकच कप्पा असतो. या वर्गांतील पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांत महाधमनीच्या (एओर्टा) दोन कमानी एक डावीकडे व दुसरी उजवीकडे अशा झालेल्या असतात.

व र्गी क र ण.–  उरोगामी या वर्गांतील प्राण्यांचें वर्गीकरण खालीं दिल्याप्रमाणें आहे.–

उरोगामीगण १ ला - शल्कयुक्ततनु (सिनॅमेटा), उपगण-सरट गण (लॉर्टालिज), अपादउरग (ऑफिडिया), गण २ रा –  कूर्मगण (चंलोनिया), गण ३ रा – नक्रगण (क्राकोडिलिया); गण ४ था – र्‍हिंचोसिफेलिया; गण ५ वा निर्वंश होऊन नष्ट झालेले.

उरोगामी वर्गांतील पुष्कळ प्राणी निर्वंश होऊन नष्ट झालेले आहेत. त्या सर्वांचे प्रस्तरीभूत (फासिलाइज्ड) अस्थिपंजर इत्यादि अवशेष भागांवरून असें अनुमान निघतें कीं, हे प्राणी पक्षी व सस्तन प्राण्यांच्या पूर्वी या पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वांत आले. दुसरें असें कीं या वर्गाच्या आधुनिक गणांतील प्राण्यांहून पूर्वींचे प्राचीन उरोगामी प्राणी भिन्न होते व त्यांचें वर्गीकरण केलें असतां त्यांचे निरनिराळे गण पडतील, व ते प्राणी स्थूल मानानें पाहूं गेले असतां आधुनिक प्राण्यांहून आकारानें मोठे असावेत. त्यांत कांहीं गण हवेंत उडणार्‍या प्राण्यांचे होते तर कांहीं स्थलाजलचर असेहि होते. आधुनिक उरोगामी प्राणी त्यांच्यापासून पायरी पायरीनें भिन्नता पावून झालेले दिसतात. तेव्हां साधारणतः असें म्हणण्यास हरकत नाहीं कीं, उरोगामी प्राण्यांचा सपृष्ठवंश प्राण्यांमध्यें एक मध्यवर्तीं असा समूह बनला, व त्या अन्वयें त्यांच्यांतील कांहीं निर्वंशगण आधुनिक स्थलजलचर म्हणजे बेडूक वर्ग यांच्याशीं साम्यता दाखवितात व याशिवाय त्यांच्यांतील दुसरे निर्वंशगण पक्ष्यांशीं साम्यता दाखवितात व याशिवाय त्यांच्यांतील दुसरे कांहीं निर्वंशगण सस्तन वर्गांतील कांहीं प्राण्यांशीं साम्यता दाखवितात. एवढ्यावरून यांतील अमुकच एखादा निर्वंशगण पक्ष्यांच्या किंवा सस्तनप्राण्यांच्या पूर्व पिढींतला गण होय असें जरी म्हणतां येणार नाहीं तरी एवढी गोष्ट बहुतकरून सिद्ध होते ती ही कीं, कांहीं फेरबदल होत असलेल्या उरोगामी प्राण्यांपासून निरनिराळ्या रीतीनें पक्षी व सस्तन प्राणी यांच्या दोन शाखा स्वतंत्रपणें उत्पन्न झाल्या आहेत.

गण (ऑर्डर) शल्कयुक्ततनु (स्कामाटा) सरड, पाल, घोरपड, सर्प इत्यादि प्राण्यांचीं लक्षणें:- सरट किंवा सरडा, पाल (पल्लि) घोरपड इत्यादिकांसारखे प्राणी तसेच सर्प व त्यांच्या सारखे प्राणी हे या शल्कयुक्ततनु प्राण्यांच्या गणांत मोडतात. शल्कयुक्ततनु प्राण्यांचा गण हा उरोगामी वर्गाच्या गणांपैकीं एक होय. या गणांतील प्राण्याचें शरीर बाह्यतः बाह्यत्वचेपासून झालेलें (एपिडर्मल) शृंगमय शल्क किंवा खवले यांनीं आच्छादिलेलें असतें. याशिवाय कांहींमध्यें श्वेतत्वचेंतूनहि (डर्मल) अस्थिमय घट्टे झालेले असतात. या प्राण्यांच्या शरीराच्या पश्चिम अग्रास त्वचाविवराचें बाह्यमुख (क्लोकल अ‍ॅपरचर) आडवें पसरलेलें असतें. या गणांतील प्राण्यांत नराला शिस्नासारखे दोन अवयव असतात. पाठीच्या कण्यासंबंधीं मणक्यांचे कशेरूघन (सेंट्रा) बहुतकरून पूर्वखात (प्रोकॉक्लस) असे बनलेले असतात. या गणाचे दोन उपगण आहेत. त्यांपैकीं अपादउरग (ओफिडिआ) ह्या उपगणांतील अहिसमूह व अजगरसमूह यांमध्यें अस्थिपंजराला त्रिकास्थि (सॅक्रम) जें झालेलें नसतें तें सरटगण (लॅसर्टिलिआ) या उपगणांत दोन कशेरू अथवा मणके जूळून झालेलें असतें. पर्शुकांचीं कण्याला जोडलेलीं टोंकें साधीं एकेरीं असतात.  करोटीपैकीं क्वाड्रेटास्थि अथवा हनुसंधानास्थि ह्याची हालचाल होऊं शकेल अशा रीतीनें तें करोटीला जूळून बनलेलें असतें. शीर्षाच्या भागांत कानपट्टीच्या अथवा कपोलपट्टीच्या (टेंपोरल आर्च) खालच्या भागाचा उठाव या प्राण्यांत बरोबर झालेला नसतो. करोटीला लागलेलीं नासाछिद्रें निरनिराळीं अशीं बनलेलीं असतात. या गणांतील प्राण्यांत गात्रें झालेलीं असली तर ती त्यां प्राण्यांना जमीनीवर चालण्यास उपयोगीं पडतात (उदाहरणार्थ सरड, घोरपड). अथवा तीं त्यांनां पाण्यांत पोहोण्यास उपयोगीं पडतात. उदाहरणार्थ कांहीं नष्ट झालेला अजगरसमगात्रयुक्ततनु (पायथोनोमॉर्फा) होय. या गणांतील प्राण्यांत दांत हिरडीच्या वरच्या धारेला लागलेले असतात किंवा तिच्या अंतःपृष्ठाला लागलेले असतात. श्वासनेंद्रियें म्हणजे फुप्पुसें हीं साध्या पोत्याप्रमाणें झालेलीं असतात. हृदयाच्या निःसारकर्णाला (व्हेंट्रिकल) एकच कप्पा असतो. तरी त्याच्या डाव्या व उजव्या बाजूच्या पोकळीच्या भागांच्या मध्यंतरांतील भाग थोडासा पडद्याप्रमाणें बनून रुंद छिद्रयुक्त असा असतो. मेंदूतींल चक्षुमस्तिष्कांचे गोल (ऑप्टिक होल्स) एकमेकांना लागून राहतात व अनुमस्तिष्क (सेरिबेलम) फारच लहान असें झालेलें असतें. या गणाचे वर सांगितल्याप्रमाणें दोन विद्यमान उपगण आहेत ते असे. –  एक सरटगण (लॅसरटिलिया) व दुसरा अपादउरग (ऑफिडिआ) हा होय.  

उ प ग ण, (सबऑर्डर) सरटगण (लॅसर्टिलिया). लक्षणें:- सरड, पाल, घोरपड इत्यादि यांच्यासारखे प्राणी या सरटगणांत मोडतात. हा उपगण शल्कयुक्ततनु (स्क्वामाटा) या गणापैकीं एक असून यांतील प्राण्यांनां गात्रें झालेलीं असतात व त्यांचा उपयोग प्राण्याची हालचाल होण्यास होतो. या उपगणांतील प्राण्यांचें तोंड बेतानेंच उघडतें अथवा तोंडाचा आ फारसा पसरूं शकत नाहीं. मुखाच्या भागाला लागलेलीं काहीं हाडें म्हणजे मुखास्थी (मॅक्सिला) ताल्वस्थि (पॅलाटाइन) व बटेरीगॉईड नामक अस्थि जशी अपादउरग उपगणांतील सर्पांच्या शरीरांत मोकळ्या रीतीनें हालतात तशी या उपगणांतील प्राण्यांच्या शरीरांत तीं हालूं शकत नाहींत. यांच्यांत तोंडाचा खालचा जबडा कांहीं हाडें मिळून झालेला असतो व हीं दोन्हीं बाजूचीं हाडें पूर्णपणें मध्याला सांध्यानें जोडलीं गेलेलीं असतात. या उपगणांतील प्राण्यांच्या नेत्रांनां हालणार्‍या पापण्या झालेल्या असतात व कर्णपटल (इअर ड्रम अथवा टिम्पॅनम्) चांगलें बनलेलें असून पूर्णपणें व्यक्त होतें. अस्थिपंजरापैकीं उरःफलक (स्टर्नम्) व पूर्वोरःफलक (एपिस्टर्नम्) झालेले असतात.

हे प्राणी साधारणतः फार चपळ असतात, व यांची कातडी पुष्कळवेळां रंगीबेरंगी झालेली असते. हा कातडीचा रंग कित्येक प्राण्यांमध्यें बाह्य परिस्थितींतल्या वस्तूंच्या रंगाला मिळून असा झालेला असतो, व या कारणामुळें तो रंग या प्राण्यांना प्राणरक्षक होतो. सरड्यासारखे या उपणांतील प्राणी मनःक्षोभ झाला असतां रंग बदलतात व त्यांनां तसें करतां येतें, याचें कारण त्यांच्या कातडींमध्यें कामरूप रंगीत पेशी असतात, व त्यांच्या संकोचविकासानें रंगांत फरक होतो. कांहीं जातिविशेषांमध्यें शेंपूट आपोआप मोडून टाकून देतां येतें. शेंपूट किंवा एखादें गात्र तुटून गेल्यास तें सबंध पुन्हां नव्यानें वाढूं शकतें. या प्राण्यांचें भक्ष्य म्हटलें म्हणजे षट्पद कृमि इत्यादि लहान लहान प्राणी होत. कांहीं वनस्पतिभक्षक आहेत. पाल ही कित्येकवेळां स्वजातिभक्षक बनते. अति थंड प्रदेशांत हे प्राणी आढळून येत नाहींत. हे उष्ण प्रदेशांत सांपडतात. या उपगणांतील बहुतेक प्राणी जमीनीवरच वावरणारे आहेत. कांहीं झाडांवर राहतात. पाण्यांत क्वचितच असतात. समुद्रांत राहणारिहि एक जात आहे. या उपगणांतील कांहीं प्राणी जरायुज (व्हिव्हिपॅरस) आहेत.

या उपगणांतील कांहीं ठळक उदाहरणें खालीलप्रमाणें आहेत. –

(१) घोरपड - व्हारेनस, ड्रासीना, मॉनीटर अथवा व्हारेनस बेगालेन्सिस. घोरपड मांसभक्षक असून नक्रांचीं पिलें, व त्यांचीं अंडीं यांची तिला विशेष आवड असते. घोरपडीला पाण्यांत पोहोतां चांगलें येतें व बुडीहि मारतां येते. तरी हा प्राणी पाण्यांत रहाणारा नव्हे. याला पाण्यांतला प्राणी असें समजणें ही चूक होय. याच्या पिलाला द्वित्त अशी जिव्हा असते त्यामुळें या पिलांना लहानपणीं विषार असतो असा समज झालेला आहे व या कारणानें त्यांना उत्तर हिंदुस्थानांत‘घोसांप’ ही संज्ञा देतात किंवा ‘बिसकोब्रा’ असें म्हणतात.

(२) सरडा:- (अ) (क्यालोटीस व्हर्सिकोलर.) हा प्रणी सर्वसाधारण आढळतो. (ब) क्यालोटिस रुक्सै. हा जातिविशेष मुंबईच्या जवळ माथेरानच्या टेकडीवर आढळतो.

(३) पाल.– (अ) (हेमीड्याक्टीलस ग्लीडोव्हिआय.) (ब) हेमीड्याक्टीलस कॉक्टीआय हे दोन्ही जातीविशेष घरांतून वावर करणारे होत. (क) जेको व्हर्टीसिलेटस. हा घरांत अथवा झाडांवर असणारा प्राणी. हा एक प्रकारचा ध्वनि करीत असतो.

(४) पालीसारखे दिसणारे प्राणी. (अ) जिम्नोड्याक्टीलस कच्छेन्सीस. (ब) जि. डेकनेन्सीस हे दोन्ही जातीविशेष मुंबई इलाख्यांत आढळतात. (क) ओफीऑप्स जरडोनाय या प्राण्याचा पृष्ठभाग तांब्याच्या रंगाचा असून बाजूला दोन उभ्या पिवळ्या रेषा काळ्या रेषांनीं मर्यादित अशा असतात.  उदरतलाचा भाग पिंवळट पांढरा असतो.

(५) उडणारा सरड - डाको डसूमैरी. या प्राण्याला पंखरूपी अवयव त्वचेचे झालेले असतात. मलबार, कोचीन त्रावणकोर या देशांतील अरण्यांत व माडांची व सुपारीची लागवड असलेल्या मळ्यांत हे आढळतात. म्हणजे विशेषेकरून पश्चिम किनार्‍याच्या सखल प्रदेशांत हे प्राणी सांपडतात.

उ प ग ण, (सबऑर्डर) – अपाद उरग (ओफिडिया) सर्व प्रकारचे सर्प.  उदाहरणार्थ:- भुंजग, घोणस, अजगर, दिवड, धामण, फुरसें इत्यादि या उपगणांत मोडतात. हा उपगण‘शल्कयुक्ततनु’ या गणांत येतो, व ‘शल्कयुक्ततनु’ उरोगामी वर्गाच्या गणांपैकीं एक गण होय.

या उपगणांतील प्राण्यांचे देह अरुंद-लांबोळे असून गात्रविहीन असतात. या लक्षणांवरून हे प्राणी इतर सर्व उरोगामी प्राण्यांहून भिन्न आहेत हें सहज लक्षांत येण्यासारखें आहे. तरी सरटगणांतील कांहीं उरोगामी प्राणी गात्रविहीन आहेत. तसेंच स्थल्लालचरांतहि कांहीं प्राणी गात्रविहीन आहेत व माशांनां अंगुलीयुक्त गात्रें नसतात. म्हणजे मासे सुद्धां गात्रविहीन असतात. तेव्हां यावरून असें अनुमान निघण्यासारखें आहे कीं, शरीरासंबंधीं आतां वर सांगितलेल्या प्राण्यांत व या अपादउरगांमध्यें साम्य आहे. परंतु येथें एक गोष्ट लक्षांत आणिली पाहिजे कीं, शरीराकृतीसंबंधीं या अपादउरगप्राण्यांची आतां वर सांगितलेल्या प्राण्यांशीं जरी साम्यता दिसली तरी या अपादउरगांच्या शरीरांतील इंद्रियांच्या रचनेंत बरीच भिन्नता आहे. शरीराकृतीचें बाह्यतः साम्य असणें हें केवळ बाह्यपरिस्थिति सारखी असल्यानें व आयुष्यक्रम एकाच तर्‍हेनें कंठिला गेल्यामुळें घडून येतें व त्या आयुष्यक्रमाला अनुसरून तें साम्य अशाप्रकारच्या शरीराकाराची सयुक्तता दर्शवितें. या उपगणांतील प्राण्यांनां जणूं कांहीं जमीनींतील भेगांत शिरण्याच्या संवयीमुळें अथवा मोठमोठ्या अडचणींतून सरपटून जाण्याच्या संवयीमुळें गात्रविहीनता प्राप्त झाली आहे. परंतु ही अपादउरगांची गात्रविहीनता नुसती त्यांना बाह्यगात्रें नाहींत यांवरूनच दिसण्यांत येतें असें नसून त्यांच्यांत असंमंडल (पेक्टोरल गर्डल) व उरःफलक (स्टर्नम) हीं कधींच विकास पावत नाहींत व श्रोणिमंडलहि (पेल्व्हिक गर्डल) झालेलें नसतें. कदाचित छायारूपानें तें अजगरसमूहामध्यें दिसून येतें.

या उपगणांतील प्राण्यांत बाह्यत्वचेंतून बनलेल्या शल्कांचें किंवा खवल्यांचें आच्छादन सर्व शरीरभर झालेलें असतें व तें कांहीं नियमित कालानें संबंध बाहेर काढून टाकण्यांत येतें. यालाच सर्पाची कात म्हणतात. हे खवले दोन तीन प्रकारचे असतात. कांहीं सर्पांत शीर्षाच्या पृष्ठावरील खवले फार मोठे व पत्र्याप्रमाणें चपटे असतात व ते स्पष्टपणें एकमेकांपासून विभक्त असे बनलेले असून फक्त ते त्यांच्या कांठांनीं एकमेकाला जुळलेले असतात; जसें धामण, नाग इत्यादि. पुन्हां शरीराच्या उदरतलभागावर चपटे, अरुंद व लांबट पत्र्याप्रमाणें बनलेले परंतु आडवे रचलेले असे खवले असून त्यांचे कांठ एकमेकांवर शाकारलेल्या कौलांप्रमाणें चढलेले असे असतात. ह्या खवल्यांनां ‘शिल्ड’ म्हणतात. उदाहरणार्थ:- धामण, नाग इत्यादि. कांहीं सर्पांच्या शीर्षाच्या पृष्ठावरील खवले लहान असून एकमेकांवर चढलेले असे असतात, जसें फुरसें. खवल्यांचे हे प्रकार सर्पांचें वर्गीकरण करण्यास उपयोगी पडतात. सर्पांनां तोंडाचा आ फारच विस्तृत प्रमाणावर पसरतां येतो. याचें कारण हें आहे कीं, सर्पाच्या तोंडांतील खालच्या जबड्याच्या दोन्ही बाजूच्या हन्वस्थींचा (मॅडिब्यूलर बोन) संधि होऊन तीं जोडलेलीं नाहींत परंतु तीं पूर्वमध्यभागीं एका लवचिक व स्थितिस्थापक अशा संधिबंधनाच्या योगेंकरून जोडलेलीं आहेत. तसेंच पुरोमुखास्थि (प्रिमॅक्सिलरी), मुखास्थि (मॅक्सिलरी), ताल्वस्थि (पलॅटाइन), हनुसंधानास्थि (क्वाड्रेट) व टेरी गॉईड नामक अस्थि हीं सर्व हाडें शिथिलबंधनानें करोटीशीं जोडलेलीं असतात व त्यामुळें ती पुढेंमागें फिरूं शकतात. सरटगणांत व या उपगणातील प्राण्यांत हा मोठा भेद आहे.

मुखक्रोडाच्या (माउथ कॅव्हिटी) आकारापेक्षां अथवा गलविवराच्या आकारापेक्षां मोठ्या आकाराचा एखादा प्राणी सर्प गिळंकृत करूं शकतात ते या वरच्या कारणामुळें होय. व हीं करोटीचीं मुखक्रोडाभोंवतालचीं हाडें शिथिलतेनें बसलेलीं आहेत याचें कारणहि या प्राण्यांनां मोठ्या आकाराचें भक्ष्य गिळण्यास सुलभ व्हावें हेंच होय. असें जरी असलें तरी ज्या करोटीच्या भागांत मेंदू बसलेला असतो त्या मस्तिष्कावरणाच्या (ब्रेनकेस) भागाचीं हाडें अचल व घट्ट रीतीनें जोडलेलीं असतात. करोटीचीं सर्व हाडें येथें देण्याची जरूरी नाहीं. मुखक्रोडांत खालच्या बाजूला दांत दंतास्थींना (डेन्टेरिक्स अ. मँडिब्युलर बोन्स) चिकटून लागलेले असतात. वरच्या बाजूस ते मुखस्थीनां, ताल्वस्थीनां व टेरिगाईड नामक अस्थीनां लागलेले असतात. क्वचितच पुरोमुखास्थींना लागलेले असतात. या दांतापैकीं कांहीं विषदंत किंवा विषदंष्ट्रा (फँग्स) असतात. विषदंताला अंतिम अंगीं छिद्र असून तो सप्रणाल असतो अथवा त्याच्या बहिःपृष्ठावर खांचणी असते. या प्रणालींतून किंवा खांचणीच्या द्वारें विष खालीं उतरतें. विषदंत ओळखण्याचें हेंच लक्षण होय. सविष सर्पाच्या जातींत विषदंत फक्त मुखास्थींतच लागलेले असतात व विषदंतांची संख्या फार थोडी असते. हे विषदंत मोडून पाडले असतां त्यांच्या जागीं त्यांच्या पाठोपाठ असलेले परंतु वाढ न झालेले व जणू काय राखून ठेविलेले असे विषदंत वाढतात व हे नवीन विषदंत गमावलेल्या विषदंतांची जागा बरोबर भरून काढतात. याप्रमाणें सविष सर्पांमध्यें विषदंत एकामागून एक वाढतात. मुखक्रोडामध्यें लालपिंड (सॅलिव्हरि ग्लँडस) बनलेले असतात. व सविषसर्पांत या लालापिंडाचें विषपिंडा (पॉयसन ग्लँड) मध्यें रूपांतर होतें. हे विषपिंड सविषसर्पांत नेत्रांच्या खालीं पश्चिमभागीं प्रत्येक बाजूस वरच्या जबड्यावर झालेले असतात व त्यांचें स्रोतस (डक्ट) विषदंताच्या मूळाशीं उघडतें. विषारी सर्प जेव्हां चावण्यास किंवा दंश करण्यास झडप घालतो तेव्हां त्याचा खालचा जबडा खालच्या बाजूस उतरतो व करोटीस शिथिलतेनें लागलेलीं कांहीं हाडें पुढें मागें ढकललीं जाऊन मुखास्थीला चक्राकार गति मिळते. यामुळें त्यावर बसलेले विषदंत उभे राहतात. ह्याच सुमारास विषपिंढावर एका स्नायूच्या संकोचानें दाब बसतो व विषदंतावाटे पिचकारीप्रमाणें विष बाहेर टाकलें जातें.

या उपगणांतील प्राण्यांत नेत्रांनां लागलेल्या पापण्या हालचाल करणार्‍या अशा झालेल्या नसतात. तसेंच बाह्यकर्णरंध्र (इअर ओपनिंग) झालेलें नसतें व कर्णपटल (टिपॅनम), कर्णपटलविवर (टिपॅनिक कॅव्हिटी), व गलकर्ण पटलविवर संधिनलिका (यूस्टाचिअन ट्यूब) हीं पण झालेलीं नसतात. बाह्यनासाछिद्रें मुसकटाच्या पुढच्या टोंकाला लागलेलीं असतात. मुखक्रोडांत असलेलीं दुभंगलेली जिव्हा आंतबाहेर काढितां येण्यासारखी व वरचेवर हालणारी अशी झालेली असते. तिचा उपयोग एखाद्या विशिष्ट स्पर्शेद्रिंयाप्रमाणें होतो. सर्पांचा अस्थिपंजर म्हटला म्हणजे करोटी (स्कल) व पृष्ठवंश (बॅकबोन) मिळून झालेला असतो. पृष्ठवंशाला (अपेंडिक्युलर आर्चेस) गात्रमंडलें लागलेलीं नसतात व पृष्ठवंशाच्या मणक्यांची संख्या पुष्कळ असते. या पृष्ठवंशाचे दोन भाग ओळखतां येतात. एक पुच्छाचा किंवा शेंपटाचा भाग व दुसरा कबंधाचा. प्रत्येक मणक्याचा कशेरू घन    (सेंट्रम) पूर्वखात (प्रोकॉक्लस) असा बनलेला असतो. म्हणजे कशेरूघनाच्या पूर्वशेवटाला कर्णिका असून पश्चिमशेवटाला कंदुक असतो. तेव्हां मणके कंदुककर्णिका संधीनें एकमेकांशीं जोडलेले असल्यामुळें सर्पांचा पाठीचा कणा साधारणतः हवा त्या दिशेस फिरूं शकतो.

पुच्छाला असलेल्या मणक्यांची संख्या बहुतेक कबंधाच्या मणक्यांच्या संख्येपेक्षां कमी असते. पहिले एक दोन कशेरू अथवा मणके खेरीज करून इतर सर्व कबंधाच्या भागाच्या मणक्याला हालचाल होईल अशा तर्‍हेनें दोहो बाजूवर पर्शुका (रिब्स) जोडलेल्या असतात. व या पर्शुकांचे अंतिम शेवट उदरतलावरच्या खवल्यांशी संलग्न झालेले असतात. शरीराच्या उदरतलावरील खवल्यांचा व पर्शुकांचा असे सर्व संधी चाळून पाळून अनेक पायांसारखे उपयोगी पडतात. सर्प चालतानां किंवा सरपटतांनां पर्शुकांमधील स्नायूंच्या संकोचविकासानें यांपैकीं कांहीं खवले जमीनीवर घट्ट दाबिले जातात. आडवे असलेले उदरतलावरील खवले उभे होऊन त्यांचे कांठ चालून पाळून जमीनीवर टेंकतात व त्यांवर सर्व शरीराचा भार तोलून धरून सर्प पुढें किंवा मागें सरतो. पुच्छाच्या भागीं पर्शुका झालेल्या नसतात. परंतु त्यांच्याऐवजी कबंधाच्या भागांत नसलेले कशेरूबाहू (ट्रॅन्सव्हर्स प्रोसेस) येथें झालेले असतात व ते पर्शुकांच्या जागीं त्यांच्याप्रमाणें वागून शरीराची हालचाल करण्यास मदत करितात. तेव्हां ह्या उपगणांतील प्राण्यांनां निराळीं गात्रें झालेलीं नसल्याकारणानें त्यांनां अपाद ही संज्ञा दिली आहे. परंतु खरें म्हटलें तर हे प्राणी अनेकपाद आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण उदरतलावरील खवले हे यांचे पायच होत.  

या उपगणांतील प्राण्यांच्या मेंदूला दहा जोड्या मस्तिष्क रज्जूंच्या (क्रॅनिअल नर्व्हज) झालेल्या असतात. सुसरी शिवाय इतर सर्व उरगवर्गांतील प्राण्यांप्रमाणें या अपाद उरगांमध्यें हृदयाला तीनच कप्पे असतात. कारण निःसारकर्णाच्या आंतील भिंतीप्रमाणें असणारा पडदा अपूर्ण बनलेला असतो. शरीराचें पश्चिमद्वार (क्लोकल अपर्चर) हें आडवें पसरल्यासरखें झालेलें असतें. या प्राण्यातील नराला शिश्नासारखीं दोन पोकळ व कंटकित अशीं इंद्रियें असून तीं संभोगकालीं या पश्चिमत्वचा विवरमुखावाटे बाहेर पडतात.

सर्पांच्या शरीराच्या लांबोळ्या आकारामुळें कांहीं अंतरिंद्रियांच्या रचनेंत थोडासा फरक आढळून येतो तो असा:- डावीकडील फुप्पुस बहुतकरून लहान असतें. किंबहुना कित्येक सर्पांत एकच फुप्पुस बनलेलें असतें. यकृत बरेंच लांबवर वाढलेलें असतें व वृक्कें दोन असतात, परंतु तीं एकमेकांसमोर झालेलीं नसतात.

नै स र्गि क वि स्ता र. –  सर्प सर्व जगभर पसरलेले आहेत. तरी ते उष्ण कटीबंधांतील प्रदेशांत विशेषेंकरून आढळून येतात. न्यूझीलंड व आईसलंड ह्या प्रदेशांत सर्प मुळींच आढळून येत नाहींत. हिंदुस्थानांत सर्प विपुलतेनें सांपडतात व सर्पदंशानें दरवर्षीं हजारों मनुष्यें मृत्यूमुखीं पडतात. सर्प हा प्राणी सरसकट विषारी आहे असा बहुतेक लोकांचा ठाम समज झालेला दिसतो. पुष्कळवेळां दंश करणारा सर्प निर्विष असतो परंतु तो सविष असणार या समजुतीनें व धास्तीनें मनुष्य मरण पावतो. कांहीं खरे विषारी सर्प खेरीज करून पुष्कळ नेहमींच्या आढळण्यांतले सर्प निर्विष असतात.  परंतु ते स्वभावतः क्रूर असल्यामुळें चावतात. ह्या कारणास्तव सविष सर्प कोणते व कसे ओळखावे याबद्दल थोडें विवेचन खालीं दिलें आहे.

व र्गी क र ण.–  सर्पांचें वर्गीकरण निरनिराळ्या रीतीनें करण्यांत येतें. निर्विष व सविष असें सर्पांचें वर्गीकरण करणें वैद्यशास्त्राप्रमाणें जरी सयुक्तिक असलें तरी तें प्राणिशास्त्राच्या नियमानुरूप नाहीं म्हणून चुकीचें होय. शास्त्रीय पद्धतीनें वर्गीकरण करणें म्हणजे सर्पाच्या अस्थींचें भिन्नत्व व इतर सर्व सर्पांचीं दुसरीं लक्षणें हीं लक्षांत घेऊन करावयाचें असतें. व तें तसें केलें असतां विषारी व निर्विष सर्पांचा एकाच समूहांत किंवा कुटुंबांत समावेश झाला म्हणून बिघडत नाहीं. उलटपक्षीं अशा रीतीनें वर्गीकरण केलें असतां निरनिराळ्या सर्पजातींतील आप्तसंबंध काय आहे हें त्यामुळें सहज समजतें व वर्गीकरणाच्या मूळ उद्देशाची सिद्धता होते.

बोलेंजर यानें सर्पांचें वर्गीकरण शास्त्रीयरीत्या केलें आहे व त्यानें सर्पांची एकंदर नऊ कुलें ठरविलीं आहेत. हीं नऊ कुलें शास्त्रीयपद्धतीनें जाणण्यास व त्यांतील सर्पांच्या जाती व जातिविशेष ओळखण्यास सर्पांचें शरीरव्यवच्छेदन कुशलतेनें करावें लागतें; त्याशिवाय गत्यंतर नाहीं.  व्यावहारिकरीत्या पाहिलें असतां हें करणें सर्वांनां शक्य नाहीं. परंतु व्यवहारांत सविष सर्प कोणता व निर्विष सर्प कोणता हें एकाद्या सुलभ रीतीनें ओळखतां येणें जरूर आहे म्हणून कर्नल एफ. वॉल ह्यानें मोठ्या प्रयासानें व दीर्घ प्रयत्‍नानें सर्पांच्या बाह्य लक्षणांवरून सविषसर्प कोणता व निर्विषसर्प कोणता हें ओळखण्याची एक रीति बसविली आहे. कर्नल वॉल ह्यानें बोलेंजर ह्याच्या वर्गीकरणांतील नऊ कुलें ग्राह्य धरून त्यांची पुढें दिल्याप्रमाणें रचना केली आहे. त्यावरून कोणतीं सर्पकुलें विषारी आहेत हें सहज समजतें.

ज्या सर्पांचें पुच्छ किंवा शेंपूट पार्श्वभागीं अथवा दोहोंबाजूनें अगदीं चापटकें म्हणजे साधारण गोलाकार आहे असे सर्प असून, ज्यांच्या शरीराला उदरतलभागीं मोठें आडवे खवले (ज्यांना उदरतलस्थ खवलें म्हणतात ते) नाहींत असे सर्प (या सर्पांत साधारणतः एकच तर्‍हेचे खवले शरीराच्या पृष्ठभागावर व उदरतलभागावर असतात. यांत (१) टायफ्लोपिडी व (२) ग्लौकोनैडी हीं दोन कुलें मोडतात.) यांनां विष नसतें.

ज्यांच्या  शरीराला उदरतलभागी अरुंद, लहान व आडवे खवले (ज्यांनां उदरतलस्थ खवले म्हणतात ते) असून ते खवले त्यांच्या शरीराचा उदरभाग सर्वत्र व्यापून टाकित नाहींत असे सर्प) म्हणजे ज्या सर्पाचें शव पाठीवर उताणें ठेविलें असतां त्याच्यांत पर्शुकस्थ खवल्यांची उदरतलभागाकडील शेवटली रांग किंवा त्यांच्यापैकीं जास्त रांगा शवाच्या बाजूस दिसून येतात - यांत (३) बांईडी (४) ईलीसैडी, (५) यूरोपेल्टिडी, (६) झेनोपेल्टिडी व (७) कोलूब्राईडीतींल होमालाप्सीनी उपकुल हीं कुलें मोडतात. यांना विष नसतें.

ज्यांच्या शरीराला उदरतलभागीं मोठे रुंद खवले (ज्यांना उदरतलस्थ खवले म्हणतात ते) असून ते खवले त्यांच्या शरीराचा उदरतलभाग बहुतेक सर्वत्र व्यापून टाकितात आणि ज्या सर्पांचें शव पाठीवर उताणें ठेविलें असतां त्याच्यांत पर्शुकस्थ खवल्यांच्या उदरतल भागाकडील शेवटल्या रांगेंतील खवल्यांचा थोडासा भाग सर्पाच्या शवाच्या प्रत्येक बाजूस दिसून येतो. यांत कोलूब्राईडी कुलांतील होमालॉप्सीनी व हैड्रोफाईनी हीं दोन उपकुलें खेरीज करून बाकीचीं सर्व उपकुलें येतात. यां उपकुलांत विषारी व निर्विष असे दोन्हीं प्रकारचे सर्प मोडतात. यांत (८) अ‍ॅम्ब्लीसीफलिडी कुल मोडतें व यांतील सर्प निर्विष असतात. तसेंच यांत (९) व्हिपरीडी कुलहि मोडतें. या कुलांतील सर्प विषारी असतात.

ज्यांचें शेंपूट किंवा पुच्छ पार्श्वभागाकडे दोन्हीहि बाजूनें अगदीं चपटलेलें म्हणजे ईलमाशाच्या पुच्छाप्रमाणें बनलेलें असतें असे सर्प. यांत कोलूब्राईडी कुलांतील हैड्रोफाईनी हें उपकुल मोडतें या हैड्रोफाईनी उपकुलांतील सर्व सर्प समुद्रांत राहणारे खरे क्षारोदक सर्प होत. हे सर्व सर्प विषारी आहेत.

वरील विवेचनावरून असें दिसतें कीं, कोलूब्राईडी व व्हिपरीडी या कुलांतील सर्प विषारी आहेत. व्हिपरीडी कुलांतील सर्वच जातीचे सर्प विषारी आहेत. परंतु कोलूब्राईडी कुलांतील सर्वच सर्प विषारी आहेत असें म्हणतां येणार नाहीं. कारण या कुलांतील कांहीं जातींच्या सर्पांच्या लाळेंत जरी विषद्रव्य कमी जास्त प्रमाणानें विषमय असें झालेलें असलें तरी त्यांतील कांहीं दुसर्‍या जातींच्या सर्पांच्या लाळेंतील विषद्रव्य मनुष्याला बाधक होत नाहीं व त्यामुळें अशा सर्पांच्या दंशानें मनुष्याचा प्राणांत कधींच होत नांहीं. येथे वर सांगितल्याप्रमाणें लक्षांत ठेवण्याची एक गोष्ट आहे ती ही कीं, मनुष्याला सर्प चावला असतां तो अगोदर भितिनेंच मरणोन्मुख होतो व सर्प जरी निर्विष असला तरी पुष्कळवेळां या भीतीचा परिणाम प्राणोत्क्रमण घडवून आणण्याकडे होतो. तेव्हां मनुष्याला जो मृत्यू येतो तो सर्पाच्या विषारीपणाचा परिणाम खास नसून मनुष्याच्या गलितधैर्याचा अथवा धैर्यभंगाचा परिणाम होय. धामण ही निर्वीष आहे. तरी तिच्या दंशाने मनुष्याला मृत्यु आलेली कांहीं उदाहरणें आढळून येतात. सारांश मनुष्याला सर्पाच्या दंशानें खरोखरच विषबाधा झाली म्हणजे त्या सर्पाला विषारी म्हणावें, व असे सर्व सर्प हेच खरे विषारी सर्प होत. बाकीचे सर्प निर्विष होत असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. निरनिराळ्या जातींच्या विषारी सर्पांच्या दंशापासून होणारीं लक्षणें विषयाचें महत्त्व जाणून पूढें थोडक्यांत सांगितलीं आहेत. तसेंच सर्पांच्या विषासंबंधींहि थोडेसें विवेचन केलें आहे.

ज्या अर्थी कोलूब्राईडी व व्हिपरीडी कुलांत खरे विषारी सर्प आढळतात त्या अर्थी त्यांचें वर्गीकरण करून थोडीशी जास्त माहिती देणें आवश्यक आहे. कोलूब्राईडी कुलांत सहा उपकुलें मोडतात. व त्यांचें वर्गीकरण त्यांच्या मुखास्थीवर लागलेल्या दांतांच्या लक्षणावरून केलें जातें तें पुढील कोष्टकावरून समजेल.

कोलूब्राईडी कुल.
विभाग १. विभाग २. विभाग ३.
अप्रणालदंतिन् पश्चिमसप्रणालदंतिन्  पूर्वसप्रणालदंतिन्
(अ‍ॅग्लिफा) (ओपिस्योग्लिफा) (प्रोटेरोग्लिफा)
उपकुलें उपकुलें उपकुलें
१ कोलूब्राईनी  ३ डिप्स्याडिनी ५ एल्यापैनी
२ अ‍ॅक्रोकॉर्डीना, ४ होमालॉप्सीनी, ६ हैड्रोफाईनी

विभाग १ ला –  अप्रणालदंतिन् (अ‍ॅग्लिफा) म्हणजे असे सर्प कीं ज्यांच्या मुखक्रोडांत मुखास्थींच्या पश्चिम शेंवटास असलेल्या दांतांनां खांचण्या नसतात किंवा ते दांत नलिकामय असले तरी त्यांच्या अंतिम शेवटांनां छिद्र नसतें. थोडक्यांत म्हणावयाचें म्हणजे ज्यांच्यांत विषदंत नाहींत असे सर्प. ते निर्विष सर्प होत. या विभागांत वर दिलेलीं दोन उपकुलें मोडतात. अप्रणाल दंतिन विभागाच्या कोलूब्राईनी उपकुलांतील कांहीं नेहमींचीं आढळणारीं व सर्वसाधारणतः माहीत असलेलीं अशीं ठळक उदाहरणें खालीं दिलीं आहेत.

धामण (झामेनिस म्युकोझस):- हा सर्प स्वभावतः क्रूर आहे व चावण्यास तत्पर असतो. याच्या शीर्षाचा भाग मानेपासून फारसा निराळा व स्पष्ट असा दिसून येत नाहीं व शीर्ष चपटलेलें असें असतें. हा फार चपळ असून चांगला पोहणारा आहे. दंश करतानां एक प्रकारचा अवाज करतो व थोडासा फुगतो, तसेंच शीर्ष व कबंधाचा पूर्वशेवटाचा भाग कमानदार वळून थोडा मागें ओढून घेतो. प्रत्येक वर्षीं कुरणांत वावरणार्‍या लोकांत सर्पदंशानें जी मृत्युसंख्या होते तीपैकीं पुष्कळ अंशीं बरेच मृत्यू या सर्पाच्या दंशानें झालेले असतात. बहुतेक भीतीनेंच मृत्यु येतो. याच्या शरीरावर पूर्वशेवटाला पृष्ठावर १७ खवल्यांच्या उभ्या रांगा असतात. व पश्चिमशेवटीं त्यांची संख्या १४ पासून १५ पर्यंत असते. याच्या शीर्षावर तीन नासाक्षिमध्यस्थ (लोरिअल) खवले असतात. नासाक्षिमध्यस्थ खवले सविषसर्पांत नसतात. निर्विष सर्पांत ते बहुत करून असतात.

राजिल साप (लैकोडॉन स्ट्रिआटस,) लै. ऑलिकस व लै. फॅसिआटस:- लैकोडॉन ही जाति निर्विष आहे तरी ह्या जातिविशेषाच्या शरीरावर आडवे, पांढरे किंवा लाल पट्टे असल्यामुळें ते खर्‍या राजिल विषारी सर्पांप्रमाणें दिसतात. मानेचा भाग या जातिविशेषामध्यें साधारण स्पष्ट असा झालेला असतो. शीर्षावर नासाक्षिमध्यस्थ खवला असतो. पुच्छोदरस्थ खवले (सबकँडल्स) दुहेरी असून दोन रांगांनीं लागलेले असतात. हे सर्प सुद्धां दंश करण्यास तत्पर असतात. ते कुरणांत वावरतात व रात्रौ संचार करतात. तेव्हां ह्यांच्या चावण्यानें सुद्धां विषारी राजिल सर्प चावला असें समजून मनुष्य भीतीनें मरतो.
नानेटी (ट्रोपीडोनोटस स्टोलेटस):- पावसाळ्याच्या सुरवातील हे पुष्कळ दिसतात. दिवड (ट्रोपीडोनोटस पिस्केटर.) हें पाण्याजवळ आढळतें व पाण्यांत राहूं शकतें. हा सर्प निर्विष आहे तरी क्रूर असून चावण्यास तत्पर असतो व जबर चावा घेतो. फार रागावला असतां ताठ उभा राहूं शकतो व नागाप्रमाणें पूर्वशेवटीं थोडा फुगतो. तेव्हां हा सर्प अशा रीतीनें चवताळून मनुष्यास चावल्यास नागदंश झालेल्याचा गैरसमज होतो.

साप टोळी प्रमाणें दिसणारा:- ट्रो. प्लंबीकलर अथवा म्याक्रोपिस्थोडन प्लंबीकलर. ह्याचा रंग शरीराच्या पृष्ठाला एकसारखा हिरवा किंवा हिरव्या व काळ्या ठिपक्यांची भेसळ झालेली असा असतो. उदरतलाचा भाग पांढरा किंवा पिंवळा असतो. हा सर्प निर्विष आहे तरी वरवर पाहणार्‍याला दिसण्यांत विषारी व्हीपरीडी कुलांतील व्हीपराईन सर्पाप्रमाणें भासतो. याच्या शीर्षपृष्ठावरील खवले मोठे पत्र्याप्रमाणें असतात व त्या लक्षणानें हा व्हिपराईन सर्प नव्हे हें कळून येतें.

वृक्षसर्प; मण्यारीप्रमाणें दिसणारे. (डेन्ड्रेलाफीस ट्रीस्टीस) –  हा बहुतकरून झाडावर असतो. पूर्ण वाढ झाल्यावर क्रूर बनतो व चावण्यास तत्पर होतो. हा विषारी सर्प नव्हे परंतु ह्याच्या दंशानें सुद्धां मनुष्य निव्वळ भीतीनें हृदयाची क्रिया बंद होऊन मरतो. डेंड्रोफिस पिक्टस हा एक वरील जातीहून थोडा निराळा सर्प आहे.

विभाग २ रा – पश्चिमसप्रणालदंतिन् म्हणजे असे सर्प कीं ज्यांच्या मुखक्रोडांत मुखास्थींच्या पश्चिमशेवटीं त्यांनां असलेल्या दांतांनां खांचण्या असतात अथवा ज्यांच्यांत विषदंत मुखास्थींच्या पश्चिमशेवटांनां लागलेले असतात. या विभागाच्या दोन उपकुलांतील कांहीं नेहमींचे आढळणारे सर्प खालीं दिले आहेत.
उपकुल पहिले – डिप्स्याडिनी - यांतील सर्प जमीनीवर अथवा झाडावर वावरणारे आहेत.

(१) डिप्सस गोकुल - ह्या सर्पाला विषपिंड नाहीं म्हणून हा विषारी नाहीं. हा बाहेरून व्हीपरीडी कुलांतील विषारी सर्प फुरसूं याच्याप्रमाणें दिसतो. तरी पत्र्याप्रमाणें असणार्‍या मोठ्या शीर्षपृष्ठावरील खवल्यांच्यामुळें हा फुरसूं नाहीं हें कळतें.

(२) वृक्षसर्प. –  डिप्स्याडोमॉर्फस ट्रेगोनेटस - या सर्पांनां देखील विष नाहीं. हा झाडावर असणारा उदी रंगाचा सर्प होय. ह्याच्या शिर्षाचा आकार, मानेची ठेवण, ऊर्ध्व कनीनिका यांवरून हा वरवर पाहणार्‍याला व्हीपरीडी कुलातील विषारी सर्पाप्रमाणें दिसतो. परंतु याच्या शीर्षावरील खवले निरीक्षण करून पाहिले असता हा व्हीपरीडी कुलांतील सर्प नव्हे हें सहज समजण्यासारखें आहे.

(३) वृक्षसर्प सापटोळी:- ड्रायोफीस मिक्टेरिझन्स-हिरवा; झाडावरील सर्प. हा बहुधा झाडावरील दुसर्‍या सर्पांप्रमाणें वेटोळें घालून बसत नाहीं. बहुतेक लांबवर शरीर पसरून असतो. हा सुद्धां चावतो. ह्याला विष दंताप्रमाणें दंत आहेत तरी ह्यांच्यांत विषपिंड मुळींच विकास पावलेला नसतो, त्या कारणानें हा निर्विष सर्प आहे हें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. निदान मनुष्याला ह्याचा विषार होणें शक्य नाहीं.

उपकुल दुसरें:- होमालॉप्सीनी या उपकुलांतील सर्प शुद्धोदकांत अथवा गोड्यापाण्यांत राहणारे आहेत. हे पाण्यांत राहणारे सर्प असल्याकारणानें यांचीं नासाछिद्रें मुसकटाच्या अगदीं पृष्ठावर झालेलीं असतात. हे जरायुज असून यांची वीण पाण्यांत होते.

(१) पाण्यांतील सर्प (सरबेरसर्‍हींचॉप्स) हे नद्यांच्या काठीं चिखलांत राहतात. समुद्राच्या कांठावर सुद्धां हा सर्प राहूं शकतो.

(२) हिप्सर्‍हीना एनहैड्रीस. याला उडण म्हणतात. हा विषारी सर्प आहे.

विभाग ३ रा:- पूर्वसप्रणालदंतिन् म्हणजे ज्यांच्या मुखक्रोडांत मुखास्थींच्या पूर्वशेवटीं त्यांनां लागलेल्या दातांनां अंतिम टोंकाला छिद्र असून ते नलिकेसारखे असतात किंवा त्यांना खांचण्या असतात ते खरे विषारी दंत ह्याच विभागांतील सर्पांनां असतात. या तिसर्‍या विभागांत दोन उपकुलें मोडतात तीं उपकुलें म्हणजे जमीनीवरील कोलूब्राईडी कुलांतील विषारी सर्प व हैड्रोफॉईनी अथवा क्षारोदक सर्प किंवा खरे समुद्रांतील सर्प.

एल्यापैनी उपकुलांत नेहमींचे आढळणारे विषारी सर्प, नाग, अहिराज, क्रेट अथवा मण्यार (?) कॉरल सर्प इत्यादि होत. हे विषारी सर्प दरवर्षीं मनुष्यहानि फार करितात. त्यामुळें व ते सर्वसाधारणतः आढळून येणार्‍यांपैकीं असल्याकारणानें त्यांचें प्रत्येकाचें व्यक्तिशः सविस्तर वर्णन विषयाचें महत्त्व जाणून पुढें दिलें आहे. पुन्हां वर वर्णन केलेल्यापैकीं कांहीं निर्विष सर्प ह्या विषारी सर्पाप्रमाणें वरवर पाहणार्‍यास अगदीं सारखे दिसतात. तेव्हां त्यांनां बिनचूक आळखण्याचीं खरीं लक्षणें जाणणें हें किती आवश्यक आहे हें सांगावयास पाहिजे असें नाहीं.

आतां विषारी सर्पांचें राहिलेलें कुल व्हीपरीडी हें होय. या व्हीपरीडी कुलाला मंडलीकुल ही संज्ञा देतात. या कुलांतील सर्प बहुतेक विषारी आहेत हें वर सांगितलेंच आहे. या मंडलीकुलाचें वर्गीकरण केलें असतां त्याचीं दोन उपकुलें पडतात. पहिलें उपकुल व्हीपरैनी अथवा रंध्रविहित (पिटलेस) व्हीपरीडी सर्पांचें होय. यांत फुरसूं व घोणस अथवा मंडलीसर्प इत्यादि येतात. दुसरें उपकुल क्रोटोलैनी अथवा रंध्रयुक्त (पिटेड) व्हीपरीडी सर्पांचें होय. यांत हरियाल किंवा हिरवा योनिज सर्प किंवा बांबूसर्प वगैरे येतात.

वरील वर्गीकरणाच्या विवेचनावरून साधारणपणें सविष सर्पांचीं कुलें कोणतीं व निर्विष सर्पांचीं कुलें कोणतीं हें थोडेसें लक्षांत येण्यासारखें आहे. हिंदुस्थानांत साधारणपणें पाहूं गेलें असतां सर्पांचे ३३० जातिविशेष आढळून येतात. या एकंदर ३३० जातिविशेषांपैकीं शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणें ६९ जातिविशेष सविष आहेत व यांतील ४० जातिविशेष जमीनीवर वावरणारे आहेत व २९ जातिविशेष समुद्रांत राहणारे आहेत. तेव्हां तूर्त जमीनीवरील सविष जातिविशेषांपुरता विचार केला तरी वरील वर्गीकरणाच्या धोरणानें एकदम एखादा जातिविशेष सर्प ओळखणें अशक्यच आहे. शिवाय शरीरकृतीवरून किंवा कातडीच्या रंगारूपावरून सविष अथवा निर्विष सर्प ठरविणें हें किती धोक्याचें आहे हेंहि वरील विवेचनावरून सिद्ध होतेंच. पुष्कळ निर्विष सर्प खर्‍या विषारी सर्पाप्रमाणें दिसण्यांत दिसतात व कित्येक वेळां त्यांची चावण्याची ढब सुद्धां अगदीं खर्‍या विषारी सर्पांप्रमाणें असते. त्यामुळें मनुष्यहानि फार होते. या गोष्टीला थोडासा आळा बसावा यासाठीं सर्पांविषयीं जितकी जास्त शास्त्रीय माहिती फैलावेल तितकी इष्ट आहे. याच्यामुळें चावणारा सर्प खरोखर निर्विष आहे हें सर्प चावलेल्या मनुष्यास ताबडतोब कळल्यास त्याचा धैर्यभंग होणार नाहीं व त्याचे प्राण वांचविण्यास सुलभ पडेल.

हे एकंदर सर्व विचार मनांत ठेवून कर्नल वॉलसाहेबांनीं पुष्कळ मेहनतीनें सर्पांच्या कांहीं ठराविक बाह्य लक्षणांवरून जी रीति बसविली आहे ती खालीलप्रमाणें आहे. त्यांच्या मताप्रमाणें सर्व सविष सर्पांचे पांच समूह पडतात. याला एकच अपवाद आहे; परंतु हा अपवादादाखल सर्प नेहमींच्या आढळण्यांतला नसल्यामुळें त्याचा विचार येथें करणें नाहीं. कर्नल वॉल यांची रीति नमूद करण्यापूर्वीं एका गोष्टीचा उल्लेख येथें केला पाहिजे तो हाच कीं, त्यांच्या रीतीप्रमाणें सर्प ओळखण्यास सर्पाच्या आंगावरील खवल्यासंबंधीं साधारणतः माहिती अगोदर असावी लागते. कांहीं तज्ज्ञांनां सर्पाच्या खवल्यांचें महत्त्व इतकें वाटत नाहीं. परंतु पूर्ण अनुभवावरून ही गोष्ट सिद्ध होते कीं सर्पांच्या अंगावरील खवल्यांची संख्या व रचना निरनिराळ्या जातिविशेषांत कांहीं विवक्षित तर्‍हेनें झालेल्या असतात व त्यांच्यामध्यें क्वचितच फेरफार घडून येतो. तेव्हां खवल्यांची संख्या,रचना व स्थानपरत्वें त्यांचीं नांवें ह्यासंबंधीं माहिती असणें जरूर आहे व कर्नल वॉल यांच्या रीतींत सर्प ओळखण्याची मुख्य भिस्त ह्या गोष्टीवरच आहे. तेव्हां सर्पाच्या खवल्यांची प्रथमतः स्थानपरत्वें नांवें जाणणें आवश्यक आहे. व तशीं तीं खवल्यांचीं नांवें येथें दिलीं असतां विषयांतर होणार नाहीं. तीं नांवें पुढीलप्रमाणें आहेत –  सर्पाचें मस्तक - (अ) मस्तकाचा ऊर्ध्व पृष्ठभाग:- नासाग्रस्थ (रोस्ट्रल); नासास्थ (नॅसल); नासामध्यस्थ (इंटर नॅसल); ललाटाग्रस्थ (प्रीफंटल अथवा अँटिरिअर फ्रंटल); ललाटस्थ (फ्रंटल); पार्श्वशीर्षस्थ (परीएटल); शिरःपृष्ठस्थ (ऑक्सिपिटल); ऊर्ध्वनेत्रस्थ (सुप्राऑक्युलर); नेत्राग्रस्थ (प्री आक्युलर); नेत्रपश्चिमस्थ (पोस्ट ऑक्युलर), (ब) मस्तकाचा अधःपृष्टभाग:- अधोनेत्रप्रांतस्थ (सबआक्युलर); ऊर्ध्वनासाक्षि मध्यस्थ (सुप्रालोरिअल); नासाक्षिमध्यस्थ (लोरिअल); कर्णप्रांतस्थ (टेंपोरल); ऊर्ध्वोष्ठस्थ (सुप्रालेबिअल ) इत्यादि. सर्पाचा खालचा जबडा अथवा हनु यांवरील खवले हनुपूर्वमध्यस्थ (मेंटल); पूर्वाधोजिव्हास्थ (सबलिंग्वल); पश्चिमाधोजिव्हास्थ (पोस्टीरिअर सबलिंग्वल); अधरोष्ठस्थ (इन्फ्रालेबिअल्स) सर्पाच्या कबंधावरील खवले:- (अ) ऊर्ध्वपृष्ठभाग. पृष्ठवंशस्थ (व्हर्टिब्रल्स); पृष्ठवंशीयप्रांतस्थ (डोरल्स); (ब) पार्श्वभाग:- पर्शुकास्थ (कोस्टल्स) (क) उदरतल भाग:- उदरतलस्थ (व्हेंट्रल्स); मलद्वारप्रांतस्थ (अ‍ॅनल). सर्पाच्या पुच्छावरील खालचा भाग:- पुच्छोदरतलस्थ (सबकँडल). वर म्हटल्याप्रमाणें सविष सर्पाचे पांच समूह ओळखण्याची कर्नल वॉल ह्यांची रीति:-

समूह १ ला:- पुच्छ चपटलेलें ईलमाशाप्रमाणें असून ज्याच्या मुसकटाच्या व मस्तकाच्या पृष्ठावर मोठे पत्र्याप्रमाणें किंवा तबकड्यासारखे खवले झालेले आहेत असे सर्प. या समूहांत सर्व क्षारोदकसर्प मोडतात व त्यांच्या २९ जाती आहेत.

समूह २ रा:- पुच्छ गोलाकार असून ज्यांच्या पृष्ठवंशस्थ खवल्यांच्या अगदीं मध्याच्या रांगेंतील खवले सबंध कबंधभर मोठे बनलेले असतात व अधरोष्ठस्थ खवले चारच असून चवथा अधरोष्ठस्थ खवला सर्वांत मोठा असतो असे सर्प. या समूहांत “क्रेट” किंवा राजिल सर्प येतात.

समूह ३ रा:- पुच्छ गोलाकार असून तिसरा ऊर्ध्वोष्ठस्थ खवला नासास्थ खवल्याला व नेत्राला स्पर्श करितो असे सर्प. या समूहांत नाग जाति व कॉरल सर्प मांडतात. यांत नऊ जातिविशेष आढळतात. हे तीन समूह विषारी कोलूब्राईडी सर्पांचे होत.

समूह ४ था:- पुच्छ गोलाकार असून नेत्र व नासाछिद्र यांच्यामध्यें मुखाच्या प्रत्येक बाजूवर स्पष्ट दिसणारें एक रंध्र असतें व पृष्ठवंशस्थ खवले व विशेषतः शीर्षपृष्ठवंशस्थ खवले मोठे बनलेले नसतात असे सर्प. या समूहांत रंध्रयुक्त मंडली सर्प अथवा क्रोटोलैनी हे मोडतात. यांच्यांत तेरा प्रकारचे जातिविशेष आढळतात.

समूह ५ वा:- पुच्छ गोलाकार असून सर्पांच्या मुसकटावर व शीर्षपृष्ठावर एकंदर सर्व खवले कबंधाच्या पृष्ठावरील खवल्याप्रमाणें लहान व समसमान असे असतात व सर्पाचें शव पाठीवर उताणें ठेविलें असतां त्याच्या पर्शुकस्थ खवल्यांच्या उदरतल भागाकडील शेवटल्या रांगेंतील खवल्यांचा थोडासाच भाग शवाच्या प्रत्येक बाजूवर दिसून येतो असे सर्प. या समूहांत रंध्रविहिन मंडलीसर्प अथवा व्हीपरैनी हे मोडतात. यांच्यांत सहा प्रकारचे जातिविशेष आढळतात. हे शेवटले दोन समूह म्हटले म्हणजे मंडलीकुलाचीं दोन उपकुलें होत.

वर निर्दिष्ट केलेल्या अपवादाखेरीज करून जर एखादा सर्प ह्या वर सांगितलेल्या पांच समूहांपैकीं कोणत्याहि एका समूहांत त्याच्या लक्षणांनीं मोडत नसल्यास तो निर्विष सर्प आहे असें खास समजण्यास कांही हरकत नाहीं. तेव्हां वर म्हटल्याप्रमाणें जमीनीवरील नेहमीचे आढळणारे सविषसर्प यांचें वर्णन क्रमानें खालीं दिलें आहे.

कोलूब्राईडी कुलाच्या पूर्व सप्रणालदंतिन् या विभागापैकीं एल्यापैनी या उपकुलांत कोब्रा म्हणजे नागकुटुंब व क्रेट म्हणजे राजिमंत कुटुंब हीं फार महत्त्वाचीं आहेत. कारण हे सर्प नेहमींच्या आढळण्यांतले असून यांचें विष फार जहाल असतें.

नागकुटुंब अथवा दर्वीकर सर्प यांची लक्षणें:- यांचें पुच्छगोलाकार असतें, उदरतलस्थ खवले आडवे रुंद असे असतात. तिसरा ऊर्ध्वोष्ठस्थ खवला नासास्थ खवल्याला व नेत्राला स्पर्श करितो. या कुटुंबांत चार जाती आहेत त्यांपैकी “नाया” म्हणजे नागजाति ही फार विपुलतेनें आढळणारी असल्याकारणानें ती महत्त्वाची आहे. तिच्या खालोखाल दुसर्‍या “हेमीबंगेरस” नांवाच्या जातीपैकीं “हेमीबंगेरस निग्रेसन्स” अथवा हिंदुस्थानांतील कॉरल सर्प हा जातिविशेष पुष्कळ वेळां आढळून येतो. हा सर्प बहुधा पर्वतावरील रहिवासी असल्यामुळें पर्वतांवर आढळतो. तिसरी जाति “डोलिओफीस” व चवथी जाति “क्यालोफीस” ही होय. ह्या जातींतील सर्पांना सुद्धां “कॉरल” सर्प म्हणतात; कारण त्यांच्या उदरतलाचा रंग बहुतेकांमध्यें लाल पोवळ्याप्रमाणें असतो. हा रंग मद्यार्कांत निघून जातो. या जातींतले सर्प बहुतकरून ब्रह्मदेश, मलाया प्रदेश व हिमालयांतील प्रांत या ठिकाणीं विशेष आढळतात. त्यांतील एखादा क्वचित सह्याद्रिपर्वतावर सांपडतो.

नाग अथवा दर्वीकर:- नाया या जातीमध्यें दोन जाती आहेत. एक नाया ट्रीपुडिअन्स अथवा नेहमींच्या आढळण्यांतला नाग व दुसरा नाया बंगेरस अथवा नागराज अथवा अहिराज.

नायाट्रीपुडिअन्स:- याचीं लक्षणें – (१) पुच्छगोलाकार असतें. (२) उदरतलस्थ खवले आडवे रुंद असतात. (३) ऊर्ध्वोष्ठस्थ खवला नासास्थ खवल्याला व नेत्राला स्पर्श करितो. (४) नेत्राग्रस्थ खवला नासामध्यस्थ खवल्याला लागलेला असतो. (५) चौथ्या व पांचव्या अधरोष्ठस्थ खवल्यांच्या मध्यें एक लहान कीलाकार अथवा “क्यूनियेट” नांवाचा खवला आढळतो. कित्येकवेळां दोन किंवा तीन क्यूनियेट खवले असतात. (६) मलद्वारप्रांतस्थ खवला एकच अखंड असतो. (७) पुच्छोदरस्थ खवले संबंध पुच्छभर दुभागलेले असतात.

हिंदुस्थानांत सर्व ठिकाणीं आढळणारा मोठा विषारी सर्प नाग हा होय व या कारणानें हा सर्प सर्वास चांगल्या रीतीनें माहितीचा आहे. या सर्पास फणा असते म्हणून याला दर्वीकर म्हणतात. हा आपल्या शरीराचा पूर्वभाग ताठ करून उभा राहूं शकतो व तात्काळ फणा पसरतो. हा फार चपल आहे व पाण्यांत पोहूं शकतो. याच्या फणेवर चक्र, नांगर, छत्री, स्वस्तिक व अंकुश यांचीं चिन्हें असतात. कांहीं नागांमध्यें फणेवर मुळींच कसलेंहि चिन्ह नसतें. या चिन्हांवरून नेहमींचा नाग (जाति विशेष) म्हणजे नाया ट्रीपुडिअन्स याचे प्रकार ओळखता येतात. पूर्णपणें फणा उभारणारा सर्प व त्याच्या फणेवर एखादें चिन्ह असलें कीं तो नाग होय व या लक्षणावरून नाग सहज ओळखतां येतो. परंतु एका प्रकारच्या नागामध्यें फणेवर चिन्ह नसतें. तसेंच फणेसंबंधीं एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे ती ही कीं, कांही निर्विष सर्प, (उदा. धामण) थोडीशी फणा उभारूं शकतात. यावरून वरील लक्षणें ताडून पाहिल्याशिवाय एखादा सर्प नाग आहे हें ठरविणें किती धोक्याचें आहे हें वाचकांच्या लक्षांत सहज येण्यासारखें आहे. व वरील लक्षणांची महति किती आहे हेंहि समजून येण्यासारखें आहे. नागाच्या पृष्ठवंशाच्या चौथ्या कशेरूपासून पर्शुका त्यांनां लागलेल्या असतात. चौथ्या कशेरूपासून तर सत्तावीस कशेरूपर्यंत लागलेल्या पर्शुका इतर कबंधाच्या भागावरील पर्शुकासारख्या कमानदार नसतात व त्यांच्यापेक्षां ह्यांची हालचाल जास्त विस्तृत प्रमाणानें होऊं शकते. यांची हालचाल त्यांनां लागलेल्या स्नायूंच्या संकोचविकासानें होते. उजवीकडील ९ वी पर्शुका व डावीकडील १० वी पर्शुका ह्या वर सांगितलेल्या पर्शुकांत जास्त लांब असतात व तेवढ्या भागांत ह्यांच्या वरच्या व खालच्या पर्शुका अनुक्रमें कमी कमी होत जातात. या पर्शुकांनां लागलेल्या स्नायूंच्या संकोच पावण्यानें त्या सरळ उभ्या होतात व त्यामुळें त्या भागावरलें शरीराच्छदन विस्तार पावतें व नागाची फणा म्हणजे हा शरीराच्छादनाचा विस्तार पावलेला भाग होय. आतां वर सांगितल्याप्रमाणें तो मध्यें जास्त विस्तृत असून दोहों शेवटाला कमी असतो त्यामुळें फणा अंडाकृति गोलाकार बनते. नागास फणा विस्तृत ठेवून तोंड चांगलें उघडतां येत नाहीं. व चावावयाचें असलें म्हणजे तो वरचेवर फणा आवरून किंवा मिटून वांकडी मान करून तोंड टाकीत असतो. नागाच्या कातडीचा रंग निरनिराळा असतो. शीर्षाचा भाग दबलेला असून मुसकटाचा भाग बराच कमी असतो व तो वरून गोलदार दिसतो. नासाछिद्र बरेंच मोठें असतें. नागाला कर्णरंध्र व कर्णपटल हीं नसल्याकारणानें ध्वनिवाहक हवेच्या लहरिमुळें त्याला ऐकूं येणें शक्य नाहीं. परंतु त्याला श्रवणक्रियेचें मुख्य साधन अंतरिंद्रियें हें आहे व त्याच्या साह्यानें घन पदार्थांच्या कंपामुळें होणारें ध्वनिज्ञान त्याला होतें. नागाचीं अंडीं गर्भधारण होऊन ६० दिवसांनीं साधारणतः घातलीं जातात व तीं अंडीं उबून वीण होण्यास सुमारें ६९ दिवस लागतात. नागाच्या पिल्लास जन्मतःच विष असतें. तरुणावस्थेंत नाग फारच रागीट व क्रुर असतो व झटकन दंश करितो. उतार वयांत आल्यावर एकाएकी अंगावर येत नाहीं.

नाग आढळत नाहीं असें एकहि ठिकाण नाहीं. पडक्या भिंतींत तो असावयाचाच. त्याला मनुष्यवस्तीपासून त्रास होत नाहींसा दिसतो. नाग बहुतकरून उंदीर, घूस, बेडूक इत्यादि प्राण्यांवर आपली उपजीविका करितो. केव्हा केव्हां हा सर्पभक्षकहि होतो.

नागाची दंष्ट्रा किंवा विषदंत लहान असतो. तरी तो मंडली सर्पांच्या अथवा व्हीपरीडी सर्पांच्या विषदंतापेक्षां सापेक्षतेनें जास्त मजबूत असतो. प्रत्येक मुखास्थीला पूर्ण वाढ झालेले असे दोन विषदंत झालेले असतात, परंतु ते एकामागून एक असे कांहीं दिवसांच्या अंतरानें टाकले जातात. नागाचे विषपिंड म्हटले म्हणजे त्याचे लालापिंड होत. व ते त्याच्या कर्णप्रांताला लागलेले असतात. ते एखाद्या पोकळ पिशवीप्रमाणें असून त्याच्यापासून एक स्रोतस निघतें. या पिंडाला एक मासीटर नांवाचा स्नांयु लागलेला असतो. तो बहुतेक या पिंडावर पसरून बसलेला असल्या कारणानें जेव्हां या स्नायूचें संकोचन होतें तेव्हां या विषपिंडावर दाब बसतो. या दाबामुळें विष स्रोतसांत जाऊन त्याच्या वाटे मुखांत येतें व विषदंताच्या प्रणालीच्या योगेंकरून बाहेर टाकिलें जातें.

नागाचें विष जेव्हां ताजें असतें तेव्हां तें निर्मळ परंतु थोडेसें पिवळट स्निग्ध असें दिसतें. तेंच उघडें ठेविलें असतां घन होतें व त्याचें वजन ६० ते ७५ टक्क्यानें कमी होतें. सुकून घन झाल्यावर तें पारदर्शक राहतें व डिंकाच्या खड्याप्रमाणें दिसतें. या स्थितींत त्या विषाचा विषारीपणा पुष्कळ वर्षें टिकतो. विषाचें परिमाण हें नागाच्या वाढीवर तसेंच त्याच्या शरीरस्वास्थ्यावर जरी अवलंबून असतें तरी तो चवताळला असल्यास जास्त होतें. त्याच्या वृद्धावस्थेंत विषाचें परिमाण कमी असतें.

नागाचें विष पेयरूपानें पोटात गेल्यास इजा होत नाहीं ही गोष्ट बहुतेकांस माहित आहेच. परंतु तेच विष रक्तांत मिसळल्यास तात्काळ भयंकर परिणाम घडून येतात. नागाचें विष फार जलद रीतीनें शरीरांतील रक्तामध्यें भिनून जातें. विषप्रयोगशाळेंत तज्ज्ञ लोकांनीं पुष्कळ तर्‍हेनें नागांच्या विषासंबंधी प्रयोग करून निरनिराळ्या जातींच्या जनांवरांच्या शरीरांत किती प्रमाणानें विष रक्तांत भिनलें असतां मृत्यु येतो हें ठरविलें आहे व त्यावरून मनुष्यासंबंधीं प्रमाण साधारणपणें अटकळीनें काढलें आहे. त्यावरून असें अनुमान निघतें कीं एका सर्वसाधारण अशा नागाच्या विषपिंडामध्यें एकावेळीं पंधरा मनुष्यांनां मृत्युमुखीं नेण्यासारखें विष असतें. तरीपण आजपर्यंतच्या नमूद केलेल्या सर्पदंशाच्या माहितीवरून व अनुभवावरून नागदंश झाला असूनहि कांहीं मनुष्यें त्यामुळें न दगावतां बरीं झालेलीं आहेत किंवा बचाविलीं आहेत. कांहींनां मुळींच विषबाधा झालेली दिसून आली नाहीं. या सर्व गोष्टींवरून साधारण सिद्धांत निघतो तो हाच कीं, जरी नागदंश झाला तरी त्याचें विष जितकें शरीरांत जावें, तितकें गेलेलें नसतें किंवा नागानें दंश केला तरी विष ओतलें जात नाहीं. तेव्हां भीतीचा भाग बाजूस ठेविला म्हणजे असें म्हणतां येईल कीं नागाच्या दंशांत सुद्धां मनुष्याला विषार न होण्याचा कांहीं थोडा संभव आहे. कारण कित्येक वेळां नागाचा दंश फारच ओझरता होतो. कित्येक वेळां ज्या प्रमाणानें विष शरीरांत भिनावें त्या प्रमाणानें तें भिनलें नसल्यामुळें किंवा ओतलें गेलें नसल्यामुळें जीवितनाश झालेला नाहीं. हे सर्व प्रकार अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. त्यांचा सविस्तर उल्लेख येथें करणें अशक्य आहे.

नागाच्या विषाची क्रिया मुख्य ज्ञानेंद्रियें म्हणजे मेंदू व सुषुम्ना यांच्यावर होते. तेव्हां त्याच्या विषाचीं लक्षणें देणें अवश्यक आहे. नागांच्या विषाराचीं लक्षणें दोन प्रकारानें देतां येतील; पहिल्याप्रथम दंशस्थानीं आढळून येणारीं लक्षणें किंवा स्थानिक लक्षणें हीं होत. दुसरीं प्रकृतिपरिणामी किंवा सार्वदैहिक लक्षणें होत. दंशस्थानीं प्रथमतः व नित्याचें होणारें लक्षण म्हणजे असह्य व दाहक वेदना होत. या दुखापतीच्या मानानें फारच असतात व ताबडतोब सुरू होऊन पुष्कळ तास चालू राहतात. शरीराचा एखादा भाग ओरखडला गेल्यानें जशा साधारण वेदना होतात तशा वेदना दंशस्थानीं होऊन त्या थोड्या वेळानें बंद पडल्यावर विष शरीरांत गेलेलें नाहीं असें समजण्यास पुष्कळ आधार होतो. दुसरें लक्षण म्हणजे वेदना सुरू होतांच दष्टभाग सुजूं लागतो व सूज थोडी थोडी वाढत जाऊन तो भाग फुगतो. दष्ट भागांत विषाचा प्रवेश झालेला आहे ह्याची नेहमींची खूण म्हणजे तिसरें लक्षण होय व तें हेंच कीं, दष्ट भागांतून रक्तमिश्रित लस बाहेर वाहत राहणें. जर नेहमींच्या प्रमाणें एखाद्या ओरखडलेल्या भागावर जसें बाहेर रक्त गोठून ओरखडा बंद होतो तसें द्रष्टस्थान झालेलें दिसल्यास साधारण अनुमान असें निघतें कीं विष शरीरांतील धातूंमध्यें भिनलें नाहीं. चौथें स्थानिक लक्षण बाह्यतः दिसण्यांत येण्यासारखें नाहीं तरी तें दष्टभागावर शस्त्रक्रिया केल्यानें दिसून येतें. वरील तीन लक्षणें चांगल्या तर्‍हेनें दिसून आल्यास व विशेषतः ताबडतोब सूज येऊन फुगारा झाल्यास विष आहेच असें समजावयाचें. दष्टभागीं कापून पाहिलें असतां मध्याला जांभळेपणा दिसतो. नंतर रंग लाल जरद होऊन गुलाबी होतो व त्यापासून पातळ लस वाहूं लागते. जेव्हां हें लक्षण दिसून येतें तेव्हां खात्रीनें विष भिनलें आहे असें समजावें. जर हें लक्षण भाग कापून पाहिलें असतां आढळून आलें नाहीं, तर विष शरीरधातूमध्यें पोहोंचलें नाहीं, असें साधारणतः म्हणण्यास हरकत नाहीं. नागाच्या विषाचा जहालपणा या वर सांगितलेल्या तात्काळ घडून येणार्‍या शरीरधातूवरच्या परिणामावरून व्यक्त होतोच. याशिवाय दुसरा विशेष हा कीं, दंश होऊन मनुष्य सुदैवानें त्यांतून निभावल्यास पृष्ठभाग सडल्यासारखा होऊन त्यांतून सर्व जळमट निघून जातें.

सार्वदेहिक लक्षणें म्हटलीं म्हणजे पक्षवायु क्रमाक्रमानें तरी बराच जलद रीतीनें होणें. कारण नागाच्या विषाचा परिणाम ज्ञानेंद्रियें म्हणजे मेंदू व सुषुम्ना यांची शक्ति नाहींशी करून त्यांचे व्यापार बंद पाडणें असा होतो व शेवटीं मेंदूंतील श्वसनक्रियेचें मर्मस्थान (रेस्पिरेंटरी सेंटर) याचा नाश करून श्वासोच्छवासाची क्रिया बंद पाडून मृत्यू आणण्याकडे होतो. प्रथम पाय गळतात व चालण्याची किंवा उभें राहण्याची शक्ति नाहींशी होते. ही क्षीणता वर चढत जाऊन मानेची शक्ति जाते व त्यामुळें डोकें कोलमडूं लागतें. जिव्हा, ओंठ व घसा यांचे स्नायू शिथिल होतात व त्यामुळें वाचा बंद होते. ओंठ लोंबकळतात व लाळ गळूं लागते व कांहींहि गिळण्याची शक्ति राहत नाहीं. डोळ्याच्या पापण्या लोंबकळूं लागतात व चेहेर्‍यावर झांपड येते. हे सर्व प्रकार घडतात तोंच श्वसनक्रियेंत बिघाड होतो, श्वासावरोध होऊं लागतो व शेवटीं श्वासोच्छवास बंद पडून मृत्यु येतो.  श्वासोच्छवास अगदीं बंद पडल्यावरहि कांहीं वेळ (२-३ मिनिटेंपर्यंत) नाडीचीं स्फुरणें होत असतात. हीं वर सांगितलेलीं लक्षणें मुख्य होत; परंतु त्यांच्याबरोबर दुसरीं कांहीं लक्षणें दिसून येतात तीं म्हणजे तोंडाला मळमळ सुटून वेळेवर उलट्या होणें व रक्तस्रावहि होणें. असें होण्याचें कारण रक्ताच्या घटकरचनेंत विष फरक घडवून आणतें व त्यामुळें त्याची गोठण्याची शक्ति नाहींशी होते व त्यांतींल रक्तपेशींचा विध्वंस होऊन त्या विरल्या जातात. तथापि हा रक्तावरचा परिणाम नागाच्या विषापेक्षां व्हीपरीडी सर्पांच्या दंशानें झालेल्या विषामध्यें विशेषतः आढळून येतो. येथें मोठी लक्षांत ठेवण्याची गोष्ट ही आहे कीं, नागाच्या विषाचा परिणाम हृदयाची क्रिया प्रत्यक्ष बंद करण्याकडे जरी होत नाहीं तरी कांहीं इतर गोष्टींच्या परिणामादाखल हृदयाची क्रिया मंदावते. उदाहरणार्थ, वेदना व भीतिह्यांच्यामुळें हृदयपात होण्याचा बराच संभव असतो. भीतीमुळें एकदम एका क्षणांत शक्तिपात होऊन मूर्च्छनाहि येते च ती मूर्च्छना तशीच राहून त्यांतच मृत्यू होतो. अंग थंडगार होतें व नाडी बरोबर लागत नाहीं व शेवटीं हृदयाची क्रिया बंद होऊन मृत्यू होतो. भीतीमध्यें श्वासोच्छवासाची क्रिया लघुतर होत जाते. तेव्हां दंश झाल्यावर त्यापासून होणार्‍या लक्षणांची चिकित्सा करतांना भीतांचा प्रकार कोठपर्यंत गेला आहे, त्याची खबरदारीहि ठेवणें जरूर असतें.

नागाच्या दंशाच्या विषाराला खात्रीचा उपाय एकच आहे. व तो “अ‍ॅन्टीव्हिनीन” लस टोंचणें हाच होय; परंतु ही लस नागदंश झाल्यावर ताबडतोब टोंचण्यांत आली पाहिजे. तसेंच ती शिरांमध्यें टोंचली पाहिजे म्हणजे तिचें कार्य ताबडतोब होऊं लागतें. शिवाय तिचें परिणाम शंभर क्यूबिक सेंटीमीटरपेक्षां कमी नसलें पाहिजे व ही लस तयार केल्यावर दोन वर्षांच्यावर राहिलेली नसली पाहिजे. ह्या वर नमूद केलेल्या सर्व अटींमुळेंच असें उत्तम रामबाण औषध मनुष्याच्या हातीं असूनहि नागदंशाच्या विषारावर त्याचा व्हावा तितका उपयोग होत नाहीं. पुनःआतां वर सांगितल्याप्रमाणें जरी हृदयावर विषाचा व्यापार होत नाहीं, तरी हृदयपात दुसर्‍या कारणांमुळें होतो. हृदयाच्या क्रियेंत फरक झालेला असल्यास त्याविषयीं उपाय योजिले पाहिजेत व तसें न करतां निव्वळ लसेचाच प्रयोग करून राहिल्यास मृत्यू टळणार नाहीं. मंद किंवा जलद नाडी वाहणें व शरीर थंड पडणें, हीं लक्षणें स्पष्टपणें हृदयाच्या व्यापारामध्यें फरक झाल्याचें दर्शवितात व हृदयाच्या क्रियेचें उद्दीपन जेणेंकरून होईल असे उपाय ताबडतोब अमलांत आणण्यास सुचवितात; तेव्हां नागदंश झालेल्या इसमाजवळ असणार्‍या मंडळीनें न घाबरतां प्रथमतः वेदना होत असल्यास त्यांच्या शमनार्थ शेक करावा. अंग थंड पडण्यास सुरवात झाली असल्यास उष्णता आणण्यासाठीं सुंठीची पूड किंवा मोहरीची पूड शरीराला काहीं ठिकाणीं घांसावी व बाकीचें सर्व अंग धाबळी किंवा बुरणूस अशासारख्या गरम कपड्यानें गुंडाळून ठेवावें व गरम पाण्यानें भरलेले शिसें अंगाला लावून ठेवावे. दंश झालेल्या इसमाला गिळतां येत असल्यास थोडी कॉफी किंवा बोव्हरीला असें पेय द्यावें; परंतु मद्यार्क किंवा ब्रॅन्डी कधींहि देऊं नयें. खर्‍या विषारामध्यें ब्रॅन्डीमुळें फार हानि होते. विषार झाला नाहीं, अशी खात्री झाल्यावर दिल्यास हरकत नाहीं. नागदंश झाल्यावर वर सांगितल्याप्रमाणें केव्हां केव्हां विषार होत नाहीं. येथें विस्तारभयास्तव ह्या विषाचें जास्त विवेचन करतां येत नाहीं.

नागराज किंवा अहिराज:- नाया बंगेरस-दि हेमाड्रीयड. ह्या जातिविशेषाच्या फणेवर कसलेंहि चिन्ह नसतें; परंतु हा सर्प शरीरानें फार लांब, मोठा व बळकट असतो. कधीं कधीं याची लांबी १४ ते १५ फूट भरते. याच्या पिल्लाच्या कातडीचा रंग अगदीं काळा असून सर्व शरीरावर पांढरे किंवा पिंवळे आडवे पट्टे असतात व शीर्षाच्या भागावरसुद्धां चार आडव्या रेघा असतात; परंतु प्रौढावस्थेंत ह्या शीर्षावरील आडव्या रेघा नाहींशा होतात. कातडीचा रंग बदलतो व तो पिंवळा, पिंवळट-हिरवा, उदी किंवा काळसर उदी असा होतो व कबंधावरील आडवे पट्टे किंवा कमानदार रेघा स्पष्ट दिसतात. हा स्वभावतः फार क्रुर असून मनुष्याहून बळकट असतो. हा सर्प बहुधां बंगाल्यांतील सुंदर बनांत सापडतो. सिंव्हलद्वीप, राजपुतान्याचा पश्चिम भाग व सिंधप्रांतखेरीज करून सर्व हिंदुस्थानांतील इतर ठिकाणीं क्वचित् सांपडतो.

या सर्पाचे विषदंत शरीराच्या मानानें फार लांब असतात व त्यामुळें याचा दंश फार भयंकर असतो. याचें विष नागापेक्षांहि जहाल असतें. हा बहुशः सर्पभक्षक आहे व आपली उपजीविका सर्पांवरच करतो.
याचीं लक्षणें:- (१) पार्श्वशीर्षस्थ (पॅरिक्टल्स) खवल्यांच्यामागें मोठे शिरःपृष्ठस्थ (आक्सिपिटल) खवल्यांची एक जोडी असते, व हे दोन शिरःपृष्ठस्थ खवले एकमेकांनां लागून बनलेले असतात. ह्या एका लक्षणांवरून नागराज सर्प सहज ओळखिला जाण्यासारखा आहे. कारण शिरःपृष्ठस्थ खवले दुसर्‍या सर्पांमध्यें असले तरी ते एकमेकांनां लागून झालेले नसतात. (२) पुच्छोदरतलस्थ खवले पुच्छाच्या आंरभीं अखंड असतात परंतु पुच्छाच्या शेवटाला ते दुभागले जातात. (३) पृष्ठवंशस्थ खवले (व्हर्टिब्रल) आकारानें व त्यांच्या परिमाणानें पाहिले असतां इतर पृष्ठवंशप्रांतस्थ (डार्सल) खवल्यांच्या सारखेच असतात. हीं दोन शेवटचीं लक्षणें पहिलें लक्षण हजर असल्यासच उपयोगाचीं आहेत व पहिलें लक्षण ताडून पाहिल्यावरच तीं पहावयाचीं असतात. नाहींतर त्यांना महत्त्व नाहीं.

हेमीबंगेरस निग्रिसन्स:- हिंदी सर्वसाधारण कॉरल सर्प. हा जातिविशेष पर्वतावरचा राहाणारा असून सह्याद्रिपर्वत, निलगिरी वगैरे ठिकाणीं सांपडतो. याच्या विषासंबंधीं माहिती फारशी ग्रंथित नाहीं. याची लांबी कधीं कधीं चार फूट भरते. याच्या शीर्षाचा व मानेचा भाग काळा असतो. शीर्षाच्या पश्चिम शेवटीं पिवळ्या रंगाचा तिरपा व आडवा बारीक पट्टा असतो. पृष्ठभाग सबंध लाल, जांभळा, तपकिरी अथवा लाल-तपकिरी असून त्यावर ३ पासून ५ पर्यंत ठिपक्यांच्या उभ्या ओळी झालेल्या असतात. किंवा कांहींमध्यें हे ठिपके एकत्र होऊन त्यांच्या रेषा बनलेल्या असतात.  उदरतलाचा भाग सबंध सारखा लाल असतो. लक्षणें:- नागकुटुंबाचीं दिलेलीं लक्षणें असून हा जातिविशेष ओळखण्याचीं खास लक्षणें पुढीलप्रमाणें आहेत (१) मलद्वारप्रांतस्थ खवला दुभागलेला असतो. (२) कर्णप्रांतस्थ खवला सात ऊर्ध्वोष्ठ खवल्यांपैकीं पांचव्या, सहाव्या आणि सातव्या ऊर्ध्वोष्ठ खवल्यांना स्पर्श करितो. याशिवाय दुसरीं पुराव्यादाखल लक्षणें.– (३) पुच्छोदरतलस्थ खवले सबंध दुभागलेले असतात. (४) पूर्वाधोजिव्हस्थ खवले चार अधरोष्ठ खवल्यांनां लागलेले असतात. (५) पश्चिमाधोजिव्हस्थ खवले चवथ्या अधरोष्ठ खवल्यांना लागलेले असतात. (६) चवथा अधरोष्ठस्थखवला सर्वांत मोठा असून त्याच्या पाठीमागें तो दोन खवल्यांना स्पर्श करतो.

क्रेट –  बंगेरस अथवा राजिमंत कुटुंब.–  वर सांगितल्याप्रमाणें क्रेट कुटुंबांतील जातिविशेष ओळखण्याचें पहिलें मुख्य लक्षण म्हणजे पुच्छ गोलाकार असून पृष्ठवंशीय खवल्यांच्या अगदीं मध्याच्या रांगेंतील खवले सबंध कबंधभर मोठे बनलेले असतात हें होय. या लक्षणाच्या अभावीं सर्प क्रेट कुटुंबांतील नव्हे. परंतु कांहीं निर्विष सर्पांनांहि हें लक्षण असतें म्हणून वर दुसरें लक्षण सांगितलें तें हें कीं, अधरोष्ठस्थ खवले या कुटुंबांत चारच असतात व ४ था अधरोष्ठस्थ खवला सर्वांत मोठा असतो. या तीन लक्षणांखेरीज दुसरीं लक्षणें म्हटलीं म्हणजे (४) नासाक्षिमध्यस्थ खवले नसतात. (५) मलद्वारप्रांतस्थ खवला एकच अखंड असतो. (६) पुच्छोदरतलस्थ खवले सबंध पुच्छभर अखंड असतात, किंवा कांहीं जातिविशेषांमध्यें आरंभीं अखंड असून पुढें दुभागले जातात.

बंगेरस या जातींत बारा जातिविशेष आहेत. त्यांपैकीं बहुतेक हिंदुस्थानांत आढळतात.

बंगेरस सेरूलिअस –  नेहमीं आढळणारा क्रेट किंवा राजिमंत सर्प (मण्यार ?):- वर दिलेलीं या कुलाचीं लक्षणें तपासून क्रेट आहे असें ठरल्यावर या जातिविशेषाला ओळखण्याचीं खास लक्षणें खालील होत – (१) याच्या शरीरावर पांढरे आडवे कमानदार पट्टे असतात व या पट्टयांचा रंग कबंधाच्या शेवटच्या भागीं जास्त स्पष्ट रीतीनें दिसण्यांत येतो. कबंधाच्या पूर्वशेवटीं हा रंग फिका पडून पट्टे दिसेनासे होतात. कांहीं निर्विष सर्पांनां असले पट्टे असतात परंतु ते त्यांच्या शरीराच्या पूर्वभागीं विशेष स्पष्ट रीतीनें पांढरे फटफटीत असून पश्विमशेवटीं फिके पडलेले असतात. (२) शरीरावरील खवल्यांच्या उभ्या रांगा १५ असतात. (३) पुच्छोदरतलस्थ खवले सबंध पुच्छभर अखंड असतात. (४) तिसरा व चवथा ऊर्ध्वोष्ठस्थ खवला हे एकसारखे असतात. याच्या कातडीचा रंग तकतकीत काळा असून याच्या शरीरपृष्ठावर पांढरे कमानदार पट्टे जोडीनें झालेले असतात. शरीराच्या पूर्वभागीं कित्येकवेळां हे पट्टे दिसत नाहींत. उदरतलाचा रंग सुद्धां पांढरा तकतकीत असतो. याची लांबी साधारणतः ४।। फूट असते. हा सर्प स्वभावानें क्रूर नाहीं. हा सर्पभक्षक आहे. हा शेतांत, कुरणांत सांपडतो. लांकडांच्या राशींत किंवा मोडून पडलेल्या घराच्या आवारांत व घरांच्या छपरांतहि असलेला आढळतो. याचा विषार बहुतेक नागाच्या विषाराप्रमाणें असतो. विषप्रयोगशाळेंतील प्रयोगांवरून याचें विष नागाच्या विषापेक्षां जास्त जहाल आहे असें समजतें. श्वासोच्छवासाच्या क्रिया बंद पडून मृत्यु येतो. याचा विषार झाला असतां दंशस्थानीं वेदना कांहीं वेळानंतर मागाहून होऊं लागतात. दुसरें एक विशेष चिन्ह दिसून येतें तें हे कीं, या विषारांत असह्य पोटदुखी होते. याचें कारण बहुधा अंतरिंद्रियांत रक्तस्त्राव होणें हें होय. रक्तस्त्राव व्हीपरीडी सर्पांच्या विषारामध्यें नेहमीं होत असतो.

बंगेरस फ्यासीएटस:- म्हणजे पट्टेवाला क्रेट याला राज साप म्हणतात. या जातिविशेषाला वरच्या जातिविशेषाचीं सर्व लक्षणें असतात. मात्र याच्या कातडीवर आडवे पिंवळे पट्टे असतात व ते आळीपाळीनें शरीराच्या काळ्या भागाबरोबर स्पष्ट दिसतात. वरवर पाहाणार्‍याला हा सर्प लायकोडान फ्यासीएटस या निर्विष जातिविशेषासारखा दिसतो. याचा स्वभाव क्रुर नाहीं. याचें विष नागाच्या विषाप्रमाणेंच मारक असतें तरी नागाच्या विषापेक्षां थोडें सौम्य आहे. आसामांत व ब्रह्मदेशांत हा जातिविशेष फार आढळतो.

व्हीपरीडी अथवा मंडलीसर्पकुल:- व्हीपरीडी अथवा मंडलीसर्प यांनां योनिजसर्प म्हणतात. कारण यांची प्रजा जिवंत निपजते. परंतु मंडलीसर्प हेच योनिज आहेत असें नाहीं, कारण क्षारोदकसर्प व शुद्धोदकसर्प हेहि योनिज आहेत.

व्हीपरीडी सर्पांचीं लक्षणें –  (१) यांचें मुख्य लक्षण हें आहे कीं, यांचे मुखास्थी उभे बनलेले असतात व त्या प्रत्येकाला दोन नलिकासम दंष्ट्रा लागलेल्या असतात. दुसर्‍या सर्व सर्पांमध्यें मुखास्थि आडवे असतात (२) यांचे विषदंत कोलूब्रॉईडी विषारी सर्पांच्या विषदंतापेक्षां सापेक्षतेनें फार लांब असतात. (३) तसेंच हे विषदंत थोडे नाजूक असून जास्त कमानदार असतात व त्यांच्या प्रणालीसंबंधीची जोडरेषा त्यांच्या पृष्ठावर फार करून दिसून येत नाहीं. ही जोडरेषा सविष कोलूब्रॉईडी सर्पांच्या विषदंतांत दिसते. (४) यांच्या मुखास्थीला फक्त विषदंतच लागलेले असतात. विषदंताखेरीज करून दुसरे साधे भरीव दांत मुखास्थीला कधींच लागलेले नसतात.

व्हीपरीडी कुलाचें वर्गीकरण दोन उपकुलांत करितात. हें वर्गीकरण या कुलांतील सर्पांत नासाक्षिमध्यस्थ रंध्र हजर असतें किंवा नसतें या लक्षणावरून केलें जातें. तेव्हां रंध्रविहीन व्हीपरीडी अथवा व्हीपरैनी हें एक उपकुल आहे. व दुसरें उपकुल म्हटलें म्हणजे रंध्रयुक्त व्हीपरीडी अथवा क्रोटोलैनी हें होय.

वर म्हटल्याप्रमाणें व्हीपरीडी सर्प एकंदर विषारी असतात. तरी त्या सर्वांचें विष सारख्या प्रमाणानें जहाल नसतें. कांहीं व्हीपरीडी सर्पांचा दंश फार भयंकर असतो व तो प्राणघातक होतोच. परंतु दुसर्‍या कांहींच्या दंशानें मृत्यु येत नाहीं व इतर कांहींच्या दंशानें फारच थोडी इजा होते. व्हीपरीडी सर्पांच्या विषाचा परिणाम हृदय व रुधिर यांच्यावर होतो व त्यांच्या विषारानें मृत्यु येतो तो रक्त दूषित झाल्यामुळें हृदयाची क्रिया बंद पडून येतो.

उपकुल (१) - क्रोटोलैनी अथवा रंध्रयुक्त व्हीपरीडी सर्पाच्या उपकुलांतील सर्पांचीं लक्षणें – (१) पुच्छ गोलाकार असतें. (२) नासाक्षि मध्यस्थ रंध्र हें नेत्र व नासाछिद्र यांच्यामध्यें स्पष्टपणें दिसून येण्यासारखें असतें. (३) पृष्ठवंशीय खवले मोठे नसतात. या उपकुलांतील सर्प साधारणतः उंच डोंगरावरील प्रदेशांत आढळतात. यांच्या कांतीवर सुद्धां हें नासाक्षिमध्यस्थ रंध्र दिसून येतें. परंतु त्याला त्याचा काय उपयोग होतो हें बरोबर समजलें नाहीं. या उपकुलांत हरियाळ (?) अथवा बांबूसर्प येतो.

ल्याकेसीस ग्रामीनिअस, - बांबूसर्प, हिरवा योनिजसर्प अथवा हरियाळ (?):- हिंदुस्थानांत रंध्रयुक्त व्हीपरीडी सर्पांतील जातिपैकीं हा जातिविशेष जास्त ठिकाणीं सापडतो. हा सर्प हिरव्या गवताच्या रंगाचा असतो व याची कनीनिका मांजराच्या मनीनिकेप्रमाणें ऊर्ध्व बनलेली असते. केव्हां केव्हां याच्या कातडीवर काळ्या रेघा उभ्या किंवा आडव्या झालेल्या असतात. उदरतलाचा रंग पांढुरका असतो. याची लांबी कित्येक वेळां ३।। फूट भरते. या जातिविशेषाचीं खास लक्षणें.– (१) कबंधाच्या पश्चिमभागीं एकंदर खवले १५ असतात. (२) ऊर्ध्वनेत्रस्थ खवला एकच असतो. (३) ऊर्ध्वोष्ठस्थ खवले ९ ते १२ असतात व यांतील दुसर्‍या खवल्याच्या वरच्या भागाला खांचणी असून ती रंध्राकडे गेलेली दिसते. या सर्पाचे विषदंत मोठे असतात तरी या जातिविशेषाचा विषार क्वचितच मारक होतो.

या जातीपैकीं दुसरा जातिविशेष सह्याद्रि व निलगिरी प्रांतांत आढळून येतो. तो ल्याकेसीस स्ट्रीगेटस अथवा नालांकित योनिज सर्प होय. हा सर्प उदी रंगाचा असतो व ह्याच्या कातडीवर नानातर्‍हेचे काळसर डाग पडलेले असतात; त्यामुळें ती कातडी चित्रविचित्र दिसते. याच्या मानेवर घोड्याच्या नालासारखें पिंवळट चिन्ह झालेलें असतें व नेत्राच्या पश्चात प्रत्येक बाजूवर काळी रेघ असते. या जातिविशेषाचें खास लक्षण म्हटलें म्हणजे दुसरा ऊर्ध्वोष्ठस्थ खवला नासाक्षिमध्यस्थ रंध्रापासून सबंध अलिप्त असतो.

ह्याच्यासारखा दुसरा जातिविशेष ल्याकेसीस अनामालेन्सीस हा कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील डोंगराळ प्रांतांत सापडतो.

उपकुल (२) व्हीपरैनी अथवा रंध्रविहीन व्हीपरीडी सर्प:- या उपकुलांतील सर्पांचीं लक्षणें. – (१) पुच्छ गोलाकार असतें. (२) मुसकटावर व शीर्षपृष्ठावर कबंधाच्या पृष्ठावरील खवल्यासमान लहान खवले असतात. (३) ह्या सर्पांचें शव पाठीवर उताणें ठेविलें असतां शेवटल्या पर्शुकस्थ खवल्याचा किंचित भाग उदरतलस्थ खवल्यांच्या दोहोंबाजूस दृष्टीस पडतो. (४) नासाक्षिमध्यस्थ रंध्र यांच्यांत कधींहि बनलेलें नसतें. या उपकुलांत फुरसें व घोणस हीं येतात. फुरसें म्हणजे“एकीस करैनेटा”अथवा करवतीच्या दांत्याप्रमाणें खवल्यांना दाते असलेला व्हैपर. या जातिविशेषास –  रंध्रविहीन व्हीपरीडीचीं सर्व लक्षणें असून पुढील खास लक्षणें असतात. (१) पुच्छोदरतलस्थ खवले दुभागलेले नसतात. (२) ऊर्ध्वनेत्रस्थ खवला दुभागलेला नसतो. (३) नासिकास्थ खवला नासाग्रस्थ खवल्याला व पहिल्या ऊर्ध्वोष्ठस्थ खवल्याला स्पर्श करितो. (४) सर्व ऊर्ध्वोष्ठस्थ खवल्यांत चवथा (क्वचित तिसरा) ऊर्ध्वोष्ठस्थ खवला मोठा असतो. (५) नेत्राच्या खालीं त्याच्या व ऊर्ध्वोष्ठस्थ खवल्यांच्या ओळीमध्यें दुसर्‍या खवल्यांच्या दोन ओळी असतात.

याचा रंग वाळूच्या रंगासारखा असून कित्येक वेळां तो काळसर उदी बनतो. याच्या प्रत्येक बाजूवर एक नागमोडी फिकट रेघ बहुतेक स्पष्ट रीतीनें झालेली दिसते व याच्या शीर्षपृष्ठावर पक्ष्याच्या पदचिन्हाप्रमाणें एक फिकट चिन्ह झालेलें असतें. उदरतलाचा रंग सारखा पांढरा असतो किंवा त्यावर काळसर ठिपके पसरलेले असतात.

हा जिवंतपणी शरीराला फुगवटा आणून आपल्या शरीराची दुहेरी चक्राकार अळीं घालतो व तीं अळीं एकमेकांवर घासतो त्या घर्षणामुळें एकप्रकारचा फूत्कार उत्पन्न होत असतो. हा जातिविशेष बहुतेक सर्व ठिकाणीं सांपडतो. याची लांबी दोन फूट असते. याच्या विषारासंबंधीं एकमत नाहीं.  तरी याचें विष मारक आहे. याचा विषार एकदम चढून येत नाहीं तरी शेवटीं त्याचा हानिकारक परिणाम होतो.

घोणस-मंडलीसर्प-रसेलचा व्हैपर, अथवा दि डबोईआ अथवा चेन व्हैपर.- या जातिविशेषास रंध्रविहीन व्हीपरीडीचीं सर्व लक्षणें असून पुढील खास लक्षणें असतात. (१) अधोजिव्हस्थ खवले चार किंवा पांच अधरोष्ठस्थ खवल्यांना लागलेले असतात. (२) पुच्छोदरतलस्थ खवले दुभागलेले असतात. (३) शरीराच्या पृष्ठावर तीन उभ्या ठसठशीत मोठ्या ठिपक्यांच्या ओळी-एक मध्यस्थ व तिच्या दोन्ही बाजूवर दोन असा-झालेल्या असतात. (४) ऊर्ध्वनेत्रस्थ खवला एकच असतो.

याचा रंग फिकट उदी किंवा म्हशीच्या कातडीसारखा असून त्याच्या पृष्ठावर तीन उभ्या ठसठशीत मोठ्या ठिपक्यांच्या ओळी असतात. प्रत्येक ठिपक्याचा आंतला भाग कातडीच्या रंगाचा असून त्याला काळसर रंगाचें वेष्टन झालेलें असतें व या वेष्टणाला पांढुरकी किनार असते. शीर्षावर काळसर चिन्हें असतात व शीर्षाच्या दोहों कडांवर फिकट गुलाबी दोन रेघा झालेल्या असून त्या मुसकटाच्या शेवटपर्यंत जाऊन तेथें मिळतात. उदरतलाचा भाग पांढरा असून त्यावर अर्धचंद्राकृति काळे डाग असतात.

हा जातिविशेष बहुतकरून सर्व ठिकाणीं सांपडतो. याची लांबी ५ फूट असते. कित्येक वेळां ५।। फूटहि भरते.

हा सर्प मंद असला तरी स्वभावानें फार क्रूर आहे. याचें विष फार जहाल असतें. याच्या विषानें बहुतकरून प्राणहानि होते.

याच्या विषाराचे परिणाम रक्तदोष घडवून आणतात. याच्या विषारामध्यें एक द्रव्य असतें, तें रक्त रुधिरपेशींचा (रेड ब्लडकॉर्प्युस्कलस) नाश करितें. शरीरांत या रक्तरुधिरपेशींचा मुख्य व्यापार म्हटला म्हणजे शरीरधातूंना प्राणवायु पोहोंचविणें हा होय. तेव्हां त्यांचा नाश झाल्याकारणानें शरीराची जीवनक्रिया बरोबर चालेनाशी होते. तसेंच मेंदूंतील रुधिरवाहिनी मर्मस्थानाचा (व्हेसोमोटर सेंटर) व्यापार बंद पडतो व हृदयाच्या स्नायूवर मारक परिणाम होऊन हृदयाची क्रिया बंद पडते व मृत्यु येतो.

याच्या विषाराचा दुसरा भयंकर परिणाम दिसून येतो तो रक्तस्राव होय. हा रक्तस्राव अंतरिद्रियांत होतो व तो बाहेरून दिसून येत नाहीं. किंवा दष्टस्थानापासून व दुसर्‍या इतर ठिकाणांहून होतो व बाहेरून दिसतो. एखाद्या वेळीं दष्टस्थानापासून रक्तस्राव प्रथम बंद होतो व नंतर कांहीं दिवसांनीं सुरू होतो. इतकें यांचें विष जहाल आहें व तें शरीरांत भिनून जातें. रक्तस्राव होण्यास मुख्य दोन कारणें होतात. एक कारण हें असावें कीं, याच्या विषाच्या द्रव्यामुळें रक्ताची गोठण्याची शक्ति नाहींशी होते. व रक्त बाहेर निघत असतें. दुसरें कारण हें असावें कीं, या विषाच्या द्रव्यानें रक्तवाहिन्यांची अंतरकला नाश पावते व त्यामुळें रक्त वाहिन्यांतून अंतरिंद्रियांत शिरूं शकतें. याच्या विषारामध्यें पोटदुखी होते ती बहुतकरून हा अंतःस्राव झाल्यानें होत असली पाहिजे. तेव्हां रक्तस्राव जेणेंकरून होणार नाहीं असे उपाय योजण्याचें धोरण ठेविलें पाहिजे. कारण साधारणतः व्हीपरीडी सर्पांच्या विषाराची खूण म्हटली म्हणजे रक्तस्राव होणें ही होय. याचा दंश झाल्यावर दष्टभागीं सूज येणें व त्यांतून रक्तस्राव न होणें, तसेंच पोटदुखी वगैरे न होणें हीं चांगलीं चिन्हें होत. व्हीपरीडी सर्पांच्या विषारामध्यें पक्षवायूचा झटका येत नाहीं परंतु गलितधैर्यपणा विशेष वाढतो व त्यामुळें धैर्यभंगी मुर्च्छना येऊन हृदयाची क्रिया बंद पडते व मृत्यू येतो. तेव्हां उपाय योजीत असतांना ही गोष्ट विसरतां कामा नये. दष्टस्थानापासून किंवा दुसर्‍या ठिकाणाहून जो सारखा रक्तस्राव वर सांगितल्याप्रमाणें जेव्हां होत असतो तेव्हां त्या ठिकाणीं सांसर्गिक विषारी जतूंचा प्रवेश होण्याचा संभव असतो. यासाठीं या सांसर्गिक विषारी जंतूंचा शरीरांत प्रवेश होणार नाहीं असे उपाय योजिले पाहिजेत. रक्तस्राव झाल्याकारणानें व रक्तदूषित झाल्याकारणानें या जंतूचा नाश करण्याची शरीराची शक्ति नाहींशी झालेली असते. याच्या विषाच्या जहालपणामुळें दष्टस्थानीं शरीरधातू नाश पावून तेथें जळमट निघत असतें व अशा वेळीं सांसर्गिक विषारी जंतू आपला प्रभाव दाखवितात.

कू र्म ग ण (चेलोनिया) –  लक्षणे:- याला संस्कृतमध्यें कच्छप, मराठींत कांसव व इंग्रजीत टार्टाइज किंवा टर्टल असें म्हणतात. या गणात जमीनीवरील कासव व पाण्यांतील कांसव इत्यादि प्राणी मोडतात. हा कूर्मगण उरोगामी प्राण्यांच्या वर्गांतील एक गण आहे. या गणांतील उरोगामी प्राण्यांचें शरीर एका कवचानें आच्छादिलेलें असतें व हें कवच अस्थिमय तबकड्यांचें बनलेलें असतें. या कवचाला दोन भाग असतात; एक पृष्ठावरला भाग; ज्याला कांसवाची ढाल म्हणतात तो होय, व दुसरा भाग उदरतलभागीं असतो या कवच्यांच्या तबकड्यांच्या पृष्ठावर बाह्यत्वचें (एपिडर्मल)तून झालेल्या शृंगमय खवल्यांचें आच्छादनहि असतें. या कवच्यांच्या ढालीची उत्पत्ति कशी होते हें पाहूं गेलें असतां असें आढळून येतें कीं, ती श्वेतत्वचेंतून बनलेल्या अस्थिमय तबकड्या व अस्थिपंजराचा कांहीं भाग या दोहोंचा संयोग होऊन झालेली असते. तेव्हां कांसवाची ढाल ही पाठीच्या कण्याचे चपटलेले कशेरूकंटक व दोहों बाजूनें चपटलेल्या व एकमेकांना जुळून कशेरूकांना जोडलेल्या पर्शुका ह्यांचा पृष्ठावरील श्वेतत्वचेंतून झालेल्या अस्थिमय तबकड्यांशीं संयोग होऊन झालेली असते. उदरतलावरील कवचाचा भाग श्वेतत्वचेंतून झालेल्या अस्थिमय तबकड्यांच्याच झालेला असतो. या गणांतील कांहीं जातींत वर सांगितलेली ढाल बनलेली नसते. परंतु पृष्ठकवचाचा भाग श्वेतत्वचेंतूनच फक्त झालेला असतो. क्वाड्रेटास्थि किंवा हनुसंधानास्थि हालूं शकणार नाहीं अशा रीतीनें करोटीच्या भागाला अचल जुळलेलें असतें. या प्राण्यांस बाह्यभागीं तोंडाला नासाछिद्र एकच असतें. मुखाच्या जबड्यांनां दांत लागलेले नसतात परंतु जबडे एका शृंगमय आच्छादनानें झांकले जातात. गात्रें अंगुलीयुक्त झालेलीं असतात. या गणांतील जमीनीवर वावरणार्‍या प्राण्यांत या गात्रांच्या अंगुलींनां नख्या लागलेल्या असतात. परंतु पाण्यांत असणार्‍या प्राण्यांत या गात्रांचें पोहोण्याकरितां वल्ह्याप्रमाणें बनलेल्या अवयवांत रूपांतर झालेलें असतें. या प्राण्यांचीं श्वसनेंद्रियें फुप्पुस असून त्या फुप्पुसांच्या आंतील पोकळ्याचें पुष्कळ विभाग झालेले असतात. शरीरचें पश्चिमद्वार अथवा पश्चिमबाह्यत्वचाविवरमुख (क्लोकल अ‍ॅपरचर) हें उभें पसरलेलें असतें. या प्राण्यांत तें आडवें कधींच नसतें. प्रजननासंबंधीं पाहिलें असतां जननेंद्रियांखेरीज करून दुसरे सहकारी भाग (किंवा इंद्रियें) विशेष झालेले नसून नरामध्यें मध्यभागीं एकच शिश्न झालेलें असतें. हे प्राणी अंडज असून यांच्या अंड्यांनां‘चेलोनिडी’ जाती शिवाय करून इतरांत टणक व बहुतकरून चुनखडी क्षाराची अशी एक कवची असते.

हे प्राणी बहुतकरून उष्ण प्रदेशांत राहणारे असून वनस्पतीवर आपली उपजीविका करितात. ह्यांच्यांत कांहीं प्राणी मांसभक्षक आहेत व ते मृदुकायप्राणी (मोलस्का), कवचधरसंधिपाद (क्रस्टासिया) व मासे भक्षण करितात. समुद्रांत राहणार्‍या कांसवांची पाठ सपाट असते व त्यांचें शीर्ष व गात्रें त्यांनां कवचाच्या आंत ओढून घेतां येत नाहींत. शुद्धोदकांतील व पंकांतील कासवांचीहि पाठ सपाट असते. परंतु त्यांनां आपलें शीर्ष कवचाच्या आंत ओढून घेतां येतें. जमीनीवरच्या कांसवाची पाठ बाह्यतः कमानदार असून अस्थिमय असते. यांनां शीर्ष व गात्रें कवचाच्या आंत ओढून घेतां येतात. यांचीं गात्रें गोलदार असून त्यांच्या अंगुली नखापर्यंत जुळलेल्या असतात. गात्रांच्या तळाचा भाग जाड झालेला असतो. हे प्राणी बहुशः वनस्पतिभक्षक आहेत. या गणांतील ठळक उदाहरणें खालीं दिलीं आहेत :

ज्यांच्या पृष्ठावर ढाल झालेली असते असे. – (१) टेस्ट्रडो एलेगन्स यांच्यांत ढाल फार कमानदार झालेली असते, जबड्यांनां दांत असतात, कवचाची लांबी दहा इंच असते. हे जमीनीवरील कांसव होत. (२) एमीस ट्रैजूगा:- नेहमीं आढळणारा गोड्या पाण्यांतला कांसव. हा जमीनीवरहि राहूं शकतो. याला लोक विहिरीमध्यें बहुतकरून टाकतात. हा गोड्या पाण्यांतले खेंकडे मारून टाकतो. हे खेंकडे विहिरीच्या तळाचा भाग खोदून बरीच नुकसानी करतात. तेव्हां त्यांनां मारून टाकण्यास हा कांसव फार उपयोगी पडतो. हा बहुतकरून मासे खात नाहीं. याच्या पाठीला ढाल असते. याच्या पूर्व गात्रांच्या अंगुलींना चार किंवा पाच नख्या असतात; परंतु पश्चिम गात्रांनां चारच असतात. अंगुली कातडीनें जोडलेल्या असतात. (३) एमीडा सिलोनेन्सीस अथवा व्हिटेट:- हा कांसव सुद्धां गोड्या पाण्यांत राहणारा आहे. याच्या पाठीचें कवच गुळगुळीत चामड्यासारखें भासतें. हा मांसभक्षक व वनस्पतिभक्षक आहे. (४) चेलोनिआ व्हिरगेटा अथवा समुद्रांतील हिंदी हिरवा कांसव:- ह्याला ढाल झालेली असते. ह्याला गात्रांच्या ऐवजीं वल्ह्याप्रमाणें अवयव झालेले असतात. व या प्रत्येक अवयवावर दोन नख्यांपेक्षां जास्त नख्या नसतात. ह्या लक्षणांवरून हे कांसव इतर पाण्यांतील कांसवापासून सहजी ओळखतां येतात. यांच्यांत मादी एका वेळेस सुमारें शंभरावर अंडीं घालते व तीं ती समुद्रकिनार्‍यावरील रेतींत पंधरा इंच खोल असा खाडा करून त्यांत पुरून ठेविते. (५) (अ) चेलोन इंब्रीकेटा:- अथवा चलोनिआ ऑलिव्हेसिआ अथवा‘क्यारेटा स्क्वॉमेटा’ म्हणजे बहिरीससाण्याच्या चोंचीप्रमाणें तोंडाचे जबडे असणारा कांसव. याच्या कवचाच्या तबकड्या जाड असून त्यांच्या फण्या वगैरे जिन्नस होतात. तेव्हां ह्याचें कवच व्यापारी दृष्टीनें उपयोगाचें आहे. (ब) ज्यांच्या पृष्ठावर ढाल मुळीच झालेली नसते; परंतु कवचाच्या श्वेतत्वचेंतून झालेल्या तबकड्या अस्थिमय असतात. (६)‘डर्म्याटोचेलीस कॉरिएशिआ’:- या कांसवांत पाठीच्या कण्याचे मणके व पर्शुक श्वेतत्वचेंतून झालेल्या कवचाला संयुक्त झालेल्या नसतात. तेव्हां यांनां ढाल नसून ह्यांचें पाठीवरचें कवच लवचिक चांबड्यासारखें असतें. विद्यमान प्राचीन मोठ्यांतले मोठे कांसव हे होत. यांची लांबी सहा फूट असते. हे समुद्रांतील कांसव होत.

न क्र ग ण (क्रोकोडिलिया), लक्षणें :- सुसर, नक्र, मगर इत्यादि प्राणी नक्रगण या गणांत मोडतात. नक्रगण हा उरोगामी वर्गांतील कांहीं प्राण्यांचा समूह आहे. सर्व आधुनिक उरोगामी प्राण्यांत या गणांतील प्राणी शरीरानें फार मोठे व लांबलचक असे असतात. तरी त्यांच्या शरीराची ठेवण साधारणतः सरड्याप्रमाणें झालेली आहे. तथापि सरडगणामध्यें व या गणांतील प्राण्यांत सकृद्दर्शनीं एक मोठा फरक दिसून येतो तो तोंडाच्या जबड्यासंबंधीं होय. यांचे जबडे करोटीच्या इतर सर्व भागांशीं ताडून पाहिले असतां फारच मोठे व लांबलचक असे वाढलेले असतात व त्यामुळें त्या प्राण्यांना तोंडाचा आ विस्तृत रीतीनें पसरतां येतो. या गणांतील आधुनिक प्राणी बहुतेक सर्व गोड्या पाण्यांत राहणारे आहेत. सरोवरांत किंवा मोठ्या तलावांत, नद्यांत व विशेषेंकरून त्यांच्या मुखाजवळ सुसरी आढळतात. या गणांतील समुद्रांत राहणारे प्राणी बहुतेक निर्वंश होऊन नष्ट झालेसे दिसतात. हिंदुस्तानांतील सुसर सुमारें १८ फूट लांब असूं शकते. कित्येक वेळां याच्यापेक्षां जास्तहि मोठी आढळते. पूर्ण वाढ झाल्यावर हा प्रबळ प्राणी पाण्यांत असल्याकारणानें बहुतेक अजिंक्य आहे. याला मनुष्याखेरीज इतर शत्रू फार थोडे असतात. कारण शत्रु कितीहि मोठा बलवान असला तरी त्याला जबड्यांत धरून पाण्यांत बुडविण्याची शक्ति याच्या अंगीं असते. तथापि सुसरीचीं अंडीं लहान मुंगूस व कांहीं सरडगणांतील प्राणी (उदाहरणार्थ घोरपड), हे खाऊन टाकतात. सुसर फार खादाड असते. तिच्याशीं इतर प्राणी सलगी करीत नाहींत. तरी एका जातीच्या लहान पक्ष्यामध्यें व सुसरीमध्यें मित्रभाव जमलेला दृष्टीस पडतो. हा पक्षी या गणांतील प्राण्यांच्या कातडीला लागलेले कांही बाह्य परोपजीवि जीव (पॅरासाइट्) खातो व त्यामुळें या प्राण्यांची कातडी स्वच्छ राहते. आधुनिक सुसरींमध्यें तीन जाती (जीनेरा) आहेत. एक‘अलीगेटर’ नांवाची होय. या जातीच्या सुसरींमध्यें शीर्षाचा भाग आंखूड व रुंद असा असतो.  ही जात अमेरिका खंडांत विपुलतेनें सांपडते. दुसरी जात “क्रॉकोडाईल” नांवाची होय. हिच्यामध्यें शीर्षाचा भाग अ‍ॅलीगेटरपेक्षां लांब झालेला असतो. ही जात हिंदुस्थानांत आढळते. तिसरी जात “गेव्हिअल” नांवाची होय. या जातीच्या सुसरीमध्यें मुसकटाचा भाग अगदीं अरुंद व लांबलचक असा पुढें वाढून झालेला असतो. गंगा नदींत या प्रकारची जात पुष्कळ आढळते. ही मुख्यत्वेंकरून मासे खाऊन राहते. या जातींतील वयोवृद्ध झालेल्या नरांमध्यें मुसकटाच्या शेवटीं पृष्ठावर एक तरुणास्थीचें बनलेलें टेंगूळ तयार होतें व त्यांत पोकळी बनून हवा सांचते. यामुळें या जातींतील माद्या व तरुण नर यांच्यापेक्षां हे वृद्ध नर पाण्यांत जास्त वेळ राहूं शकतात.

उरोगामी वर्गाच्या या गणांतील प्राण्यांत शरीराच्या पृष्ठभागांवर किंवा पृष्ठ व उदरतल अशा दोन्ही भागांवर श्वेतत्वचेंतून खोदीव कामाप्रमाणें दिसणार्‍या अस्थिमय तगटांच्या रांगांचें आच्छादन झालेलें असतें, व या तगटांवर बाह्यत्वचेचे खवलेहि लागलेले असतात. या गणांतील आधुनिक प्राण्यांत पाठीच्या कण्याच्या मणक्यांचे कशेरूघन (सेंट्रा) पूर्वस्थान (प्रोकॉक्लस) असे झालेले असतात. उरोभागावरील मणक्यांचे कशेरूबाहू (ट्रॅन्सव्हर्स प्रोसेस) लांब व द्वित्त असे झालेले असतात. त्रिकास्थि (सॅक्रम) हें दोन मणक्यांचें झालेलें असतें. पृष्ठवंशाला लागलेल्या पर्शुकांच्या टोकांनां दोन फांटे झालेले असतात. “क्वाड्रेटास्थि” अथवा हनुसंधानास्थि हें अचल असें करोटीला लागून झालेलें असतें. उरःफलक (स्टर्नम) बनलेलें असतें, व उदराच्या भागीं कांहीं पर्शुका बनलेल्या असतात. या प्राण्यांना जमीनीवर चालतां यावें अशा रीतीनें यांच्या शरीराचीं गात्रें बनलेलीं असतात. मुखक्रोडांतील हिरड्यांच्या उथळ्यामध्यें यांचे दांत बसलेले असतात. यांचीं श्वसनेंद्रियें फुप्पुसें असून फुप्पुसाची पोकळी आंतून पुष्कळ विभागली गेलली असते. हृदयाचें निःसारकर्ण (व्हेंट्रिकल) एका पडद्यानें आंतून विभागलें जातें व त्यामुळें त्याला दोन कप्पे झालेले असतात. या कारणास्तव पक्षी व सस्तन या वर्गांतील प्राण्यांप्रमाणें सुसरीमध्यें हृदय चार कर्णांचें बनलेलें असतें. महाधमनीच्या दोन कमानींपैकीं उजवी कमान या निःसारकर्णाच्या डाव्या कप्प्यांतून निघते व ती ग्रीवाधमनीवाटे मेंदूला व जत्रुधमनीवाटे पूर्वगात्रांच्या जोडीला शुद्ध रक्त पुरविते. शरीराचें पश्विमद्वार अथवा पश्चिमत्वचाविवराचें बाह्य मुख लांबट असून पूर्वपश्चिमरीत्या उभें पसरलेलें असतें. या प्राण्यांत नराला शिश्न एकच असून तें मध्यभागीं असतें. हे प्राणी अंडज आहेत. अंडी जमीनीच्या भेगांमध्यें घातलीं जातात. व त्यांनां चुनखडी क्षाराचें किंवा खडूप्रमाणें असणार्‍या पदार्थाचें टणक कवचीसारखें आच्छादन असतें.

सुसरीमध्यें गात्रें जमीनीवर वावर करण्यालायक झालेलीं असलीं तरीं त्यांचा उपयोग स्वच्छंदानें हालचाल करण्याकडे नसून तीं फक्त शरीर फरपटत नेण्यास उपयोगी पडतात. सुसरीचें शेंपूट दोहोंबाजूनीं चपटलेलें व बरेंच लांबलचक असें झालेलें असल्यामुळें तिला पाण्यांत पोहोण्याचें तें एक मुख्य व मोठें साधन आहे. शेंपटीमुळें सुसरीचें बळ पाण्यांत दुणावतें. भक्ष्य पकडण्याकरितां हे प्राणी पाण्याच्या कांठावर दबा धरून बसलेले असतात. यांची बाह्य नासाछिद्रें त्यांच्या लांब मुसकटाच्या अंतिम टोंकाला झालेलीं असतात. व मुखक्रोडाच्या आंतील नासाछिद्रें ध्वनिमंजुषामुखाजवळ किंवा ध्वनिद्वाराजवळ झालेलीं असतात. यामुळें या प्राण्यांनां पाण्याच्या आंत सर्व शरीर लपवून ठेवून श्वासोच्छवासाकरितां फक्त मुसकटाचा बाह्यनासाछिद्रें असलेला अंतिम टोंकाचा भाग अचल अशा तर्‍हेंनें पाण्याच्या वर ठेवून तासांचे तास दबा धरून बसतां येतें. अशा संधींत एखादें गैरसावध सावज पाणी पिण्यास तेथें आलें असतां त्याला अकस्मात गांठून हा प्राणी आपल्या मजबूत जबड्यांनीं त्याला पकडतो व पाण्यांत ओढून नेऊन बुडवितो व खातो. या गणांतील कांहीं परिचित उदाहरणें पुढें नमूद केलीं आहेत.

(१) क्रॉकोडीलिआ पालूस्ट्रिस:- सर्वसाधारण सुसर म्हणजे ह्या जातिविशेषा (स्पीसीज) पैकीं प्राणी होय. हे नद्यांत खोल तळ्यांत वगैरे पुष्कळ ठिकाणीं सांपडतात. यांचें मुसकट लहान असतें व प्रत्येक बाजूच्या पूर्वमुखास्थीला (प्रेमाक्सिला) पांच दांत असतात. क्रॉकोडीलिआ पोरोसेस ही जात बंगाल प्रांतांत व विशेषेंकरून हिंदुस्थानच्या पूर्व किनार्‍यावरील प्रांतांत आढळते. नद्यांच्या मुखाजवळ वावरत असतांना हे प्राणी समुद्रांत शिरून भ्रमण करतात. हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर ही जात आढळून येत नाहीं. ह्याचें मुसकट लांबट असतें व पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांत पूर्वमुखास्थीला चार दांत असतात. ३३ फूट लांबीची सुसर या जातिविशेषापैकीं आढळलेली आहे.

(२) “गेव्हिएलीस ग्यांजेटीकस” - ही जात माश्यांवर आपली उपजीविका करून राहते. ह्यांचे अरुंद व लांब जबडे मासे धरण्यास फार सोईवार असतात.

(३) अ‍ॅलीगेटर – ही जात चीन देशाशिवाय आशिया खंडात दुसर्‍या ठिकाणीं सांपडत नाहीं. अमेरिकाखंडांत हे प्राणी पुष्कळ सांपडतात. (ले. प्रो. वि. ना. हाटे.)

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .