विभाग नववा : ई-अंशुमान
उर्फी, मौलाना – हा कवि सिराझ येथील रहिवाशी होता. याचें खरें नांव जमालउद्दीन असें होतें. पण उर्फी या टोपण नावानेंच तो प्रसिद्ध असे. दक्षिणेंत येऊन नंतर प्रथम आग्रा येथें जाऊन राहिला. पुढें १५८९ मध्यें खानखानानें त्याची अकबर बादशाहाशीं ओळख करून दिली. बादशहानें त्याची योग्यता जाणून त्याला आपल्या पदरीं ठेविलें. पुढें लवकरच १५९१ मध्यें लाहोर येथें तो वारला, त्यावेळीं त्याचें वय ३६ वर्षांचें होतें व एका कवितेंत‘आपलें कलेवर नजफ अश्रफ येथें अल्लीच्या शेजारीं पुरलें जावें’ अशी त्यानें इच्छा प्रदर्शित केल्यावरून मीर साजीर इस्फहानी यानें त्याच्या मरणानंतर कांहीं वर्षांनीं त्याच्या अस्थी त्या जागीं पाठविल्या. उर्फींनें अनेक ग्रंथ रचले आहेत. त्यांपैकीं “दीवाण” आणि “कसाएद” हे प्रख्यात आहेत. [बीलचा कोश]