विभाग नववा : ई-अंशुमान

उलूक - शकुनीचा पुत्र, यास दुर्योधनानें युद्ध आरंभण्यापूर्वीं उपप्लव्य नगरीस पांडवांकडे पाठविलें होतें (भार. उद्योग. अ. १६०-१६३). हा परत जाऊं लागला त्या वेळेस सहदेवानें,‘तुला व तुझ्या पित्याला मी युद्धांत मारीन’ अशी प्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणेंच हा त्याच्या हातून मरण पावला (भार. शल्य. अ. २८). यास कैतव असेंहि म्हणत असत