विभाग नववा : ई-अंशुमान
उल्बारिया – बंगाल. हौरा जिल्ह्यांतील उल्बारिया पोटविभागाचें मुख्य स्थान. हें हौर्यापासून १५ मैलांवर असून हुगळी नदीच्या उजव्या किनार्यावर आहे. १९०१ सालीं लो. सं. ५२९५ होती. मिदनापूर कालव्यावर उल्बारिया हें पहिलें ठिकाण असून बंगाल-नागपूर रेल्वेवर स्टेशन आहे. आठवड्यास गुरांचा बाजार मोठा भरतो. १९०३ सालीं या ठिकाणीं म्यु. कमिटीची स्थापना झाली. १९०३-०४ सालीं म्यु. उत्पन्न ३००० असून खर्च २६०० होता.