विभाग नववा : ई-अंशुमान
उल्लाळ – मद्रास. दक्षिण कानडा जिल्हा. मंगलोर तालुक्यांतील एक गांव. मंगलोर शहराच्या समोर नेत्रवती नदीच्या दक्षिण किनार्यावर उल्लाळ वसलेलें आहे. १६-१७ व्या शतकाच्या सुमारास या ठिकाणीं जैनांचें एक कुल महत्त्वाला आलेलें होतें. सोमनाथाचें पडकें देऊळ व दक्षिणेस एका मैलाच्या अंतरावर पडकें परंतु विलक्षण खोदीव कामाचे अवशेष नजरेस पडतात, यावरून पूर्वीं हें गांव उर्जितदशेंत होतें असें अनुमान करतां येतें. सांप्रत मंगलोरशीं कांहीं व्यापार चालतो. १९०१ सालीं लोकसंख्या ६१८१ होती.