विभाग नववा : ई-अंशुमान
उशीनर.- (१). भोजनगरीचा राजा, यास ययातिकन्या जी माधवी तिजपासून शिबि नामक पुत्र झाला होता.
(२). सोमवंशी अनुकुलोत्पन्न महामना राजाच्या दोन पुत्रांतील जेष्ठ. यास सुरथा स्त्रीपासून शिबि, वन, शमि आणि दक्ष असे चार पुत्र झाले होते.
३. भारतवर्षीय देश व लोक (भार० भीष्म० अ०९) यांचा भागवत (स्कं ७. अ. २) व बृहत्संहितेंत (४. २२; १६, २६) उल्लेख आलेला आहे. यांतील लोकांस औशीनर असेंहि नांव होतें.