विभाग नववा : ई-अंशुमान
उस्मान नगर :- हैद्राबाद संस्थानाच्या नान्देड जिल्ह्यांत पूर्वी असलेला एक तालुका.
क्षेत्रफळ २९० चौ. मै. जहागिरी धरून लोकसंख्या १९०१ सालीं ३७६६७ होती. १९०५ मध्यें ह्या जिल्ह्याची विभागणी करून कांहीं भाग बिलोलीमध्यें व कांहीं भाग कंदहारमध्यें घेण्यांत आला.