विभाग नववा : ई-अंशुमान
ऊदाम्ल :- (बेंझॉइक अॅसिड) क६उ५कप्रप्र.उ याचा शोध इ. स. १६०८ मध्यें लागला. हें प्रथम शील यानें इ. स. १७८५ मध्यें प्राण्यांच्या मुत्रापासून तयार केलें. याची घटना १८३२ मध्यें व्हूलर आणि लिबीय यांच्या संशोधनानें ठरली गेली. प्रथम हें अम्ल मलाया बेटांत होणार्या स्टीरॅक्स बेंझॉइन नांवाच्या झाडांच्या गोंदापासून तयार करीत असत. सृष्टीमध्यें सुद्धां हे ड्रॅगन्सब्लड पेरू आणि तोलुबाल्सम, कॅन्बेरीज इत्यादिकांत सांपडतें. ऊदाम्ल घोड्याच्या मूत्रांत ग्लिकोकोलशीं संयुक्त स्थितींत असतें, त्यास हिप्युरिक अॅसिड (अश्वमूत्राम्ल) असें म्हणतात. त्यापासून ऊदाम्ल काढण्यास अश्वमूत्राम्ल उद्धराम्लांत उकळावें लागतें. ऊदाम्ल हें कोळशाच्या डामरांत सुद्धां असतें. ऊदिनहरिद (बेंझिल क्लोराइड) अथवा ऊदल हरिद (बेंझल क्लोराइड) यापासून कडु बदामाचें तेल तयार करतेवेळीं ऊदाम्ल हे आड उत्पन्न म्हणून पुष्कळ तयार होतें. हें अम्ल ऊदिल त्रिहरिद (बेंझोट्रायक्लोराइड) पाण्याशीं उच्च उष्णमानावर उष्ण केलें असताहि तयार होतें. ते खालीं दाखविल्याप्रमाणें:-
ऊदिल त्रिहरिद पाणी ऊदाम्ल उद्धराम्ल
क६उ५कह३ + २उ२प्र क६उ५कप्रप्रउ + ३उह
ऊदाम्लाचे स्फटिक सूचिकाकार किंवा पिसाच्या आकारासारखें चकचकीत असतात. हें अम्ल थंड असताना निर्गंध असतें; परंतु मंद उष्णतेनें त्यास ईषत्सुवास येतो. हें अम्ल १२०० अंशमानावर वितळतें आणि यापेंक्षां किंचित् अधिक उष्णमानावर याचें ऊर्ध्वपातन (सब्लीमेशन) होतें. तें २५०० अंश मानावर वितळतें आणि पाण्याबरोबर उकळलें असतां पृथक्करण न होता बाष्पीभूत होतें. हें २०० पट थंड पाण्यांत विद्रुत होतें. उष्ण पाणी असल्यास २४ पट पाण्यांत विरघळतें. उल्कहलांत हें त्वरित विरतें. पालाश आणि अम्न (अमोनिया) इत्यादि अल्कांत सुद्धां ऊदाम्ल विरतें. या अल्कद्रवांतून उम्लाच्या योगानें त्याचा निपात (प्रेसिपिटेट) होतो.
लोह ऊदित (फेरिक बेंझोएट) खेरीज करून सर्व उदितें (बेंझोएट्स) कमी अधिक प्रमाणांत द्रवीभूत होतात. निर्गुण ऊदिताच्या द्रवांत लोहहरिदा (फेरिक क्लोराइट) चा द्रव घातला म्हणजे तपकिरी किंवा फिकट पिवळ्या रंगाचा निपात (प्रेसिपिटेट) येतो.
ऊदाम्लांत प्रमाणापेक्षां अधिक चुनकळी मिळवून त्या मिश्रणाचें शुष्क पातन (ड्राय डिस्टिलेशन) केले असतां त्याचें पृथक्करण होऊन ऊदिन (बेंझिन) तयार होतो. हें खालीं दाखविलेल्या रासायनिक समीकरणावरून समजेल:-
उदाम्ल कळीचुना खटकर्बित ऊदिन
क६उ५कप्रप्रउ + खप्र खकप्र३ + क६उ६
ऊदाम्लाची वाफ उष्ण केलेल्या जशदचूर्णावरून (झिंकडस्ट) नेली म्हणजे तिचे रूपांतर होऊन कडू बदामाचें तेंल (बिटर आमंड ऑइल) तयार होतें, तें खालीं दाखविलेल्या रासायनिक क्रियाप्रतिक्रियेप्रमाणें:-
ऊदाम्ल जशद कडू बदामाचें तेंल जशदप्राणिद
क६उ५कप्र२उ + ज क६उ५ कउप्र + जप्र
या कडू बदामाच्या तेलाचें रासायनिक नांव ऊदप्रायोज्जिद (बेंझॉइक आल्डिहाइड) किंवा (बेंझ आल्डिहाइड) असें आहे.
ऊदाम्ल तीव्र नत्राम्ला (नायट्रिक अॅसिड) बरोबर उकळलें असतां त्याचें रूपांतर नत्रिल ऊदाम्लांत (नायट्रो बेंझॉइक अॅसिड) क६उ४ (नप्र२). कप्र२उ होतें.
स्फुर पंचहरिदानें (फास्फोरस पेंटा क्लोराइड) ऊदाम्लाचे रूपांतर ऊदायिलहरिदां [बेंझॉइल फ्लोराइड] त क६उ५कप्रह होतें. दारिल हहिदा [अॅसिटिल क्लोराइड] चा दार्वम्लाशीं जो संबंध आहे, तोच संबंध ऊदाथिल हरिदाचा ऊदाम्लाशीं आहे. उदाथिल आणि दारिल मूलकें यांचाहि संबंध सदरप्रमाणेंच उदिल आणि इथिल [बेंझिल अँड एथिल] या मूलकांशीं आहे असें दिसून येईल.
इ. [एथिल] इ. उज्जिद [इथुन] इ. उत्पा. [अल्कहल]
क२उ५ क२उ६ अ२उ५प्रउ
दा. [अॅसिटी.] दा. उज्जिद [प्रायोज्जिद] दा. उत्प्रा. दावाम्ल
क२उ३प्र'' क४उ४प्र क२उ४प्र२
ऊदिल [बेंझिल] ऊ. उज्जि. बोलिन (टोलुइन) ऊदिल उत्प्रा.
क६उ५कउ२ क६उ५कउ३ क६उ५क२प्रउ
ऊदायिल [बेंझोथिल] ऊदायिल उज्जिद ऊदायिल उत्प्राणिद
क५उ५कप्र' क६उ५कउप्र क६उ५कप्रप्रउ
ऊदानिरूद (बेंझॉइक अनहायड्राइड) (क६उ५कप्र)२ प्र किंवा द्विऊदायिल प्राणिद (डायबेंझोइल ऑक्साइड) हा पदार्थ ऊदायिल हरिदा (बेंझोयिल क्लोराइड) ची क्रिया पालाश ऊदितावर (पोट्याशियम बेंझोएट) केली म्हणजे तयार होतो तो असा:-
पालाश उदित ऊदायिल हरिद
(क६उ५कप्र (प्रपा) + क६उ५कप्रह
ऊदनिरूद पालाश हरिद
(क६उ५क.प्र)२प्र + पाह
ऊदायिल हरिद, निर्जल काष्टाम्लाबरोबर उष्ण केला म्हणजेहि ऊदनिरूद तयार होतो. या क्रियेंतील शेष पाण्यानें धुवून अल्कहलांत विद्रुत केला म्हणजे निरूद स्फटिकरूप पावतो. हे सूचिकाकार असून ४२० श मानावर वितळतात आणि ३६०० श वर उकळतात. हे पाण्यांत अविद्राव्य असतात परंतु अल्कहल व इध्र यांत त्वरित विद्रुत होतात. ऊदनिरूद पाण्यांत उकळला असतां त्याचें ऊदाम्लांत रूपांतर होतें.
ऊदायिल हरिद (क६उ५कप्रह) हा पदार्थ तयार होण्याकरितां ऊदाम्ल आणि स्फुर पंचहरिद यांच्या मिश्रणाचें निर्जल पातन करावें. हा निर्वण रसरूप असून त्यास फार वाईट वास येतो. याचा उत्क्वथनांक १९८० श असतो. शीतताजनक मिश्रणानें हा घनरूप होतो. हे स्फटिक - १० श वर वितळतात. यांमध्यें अम्लहरिदाचे अॅसिड क्लोराइडचे सर्व धर्म आहेत.
इथिल ऊदित (एथिल बेंझोएट क६उ५कप्रप्र.क२)उ५ तयार करण्याची उत्तम रीत म्हटली म्हणजे ऊदाम्ल आणि अल्कहल यांच्या मिश्रणांत थोडेसें गंधकाम्ल मिश्र करून तें सर्व मिश्रण कांहीं तासपर्यंत बरेंच उकळत ठेवावें. हा निर्वर्ण रसरूप असून त्याचा उत्क्वथनांक २१३० श आहे. यास ऊदईथ्र (बेंझाइक ईथर) असेंहि म्हणतात. हें अत्तराच्या वर्गांतील असून यास चांगला वास येतो. याचे वि. गु. १.०५ आहे.
कवड्या ऊदांत ऊदाम्लाचें प्रमाण शेंकडा १२ ते २० पर्यंत असतें. अमोनि ऊदिल (अमोनियम बेझोएट) आणि सिंधु ऊंदित (सोडियम बेंझोएट) यांचा औषधी कामांत फार उपयोग करतात. ऊदाम्ल हें मोठें शक्तिमान कोथघ्न अम्ल आहे. ऊदाम्ल पोटांत गेलें असतां तें अश्वमूत्राम्लाच्या रूपानें मूत्रांत येतें. मूत्रांतील अश्वमूत्राम्ल हे मूत्रमार्गातील अंतस्त्वचेंतील श्लेष्मल पदार्थास रोगबीजरहित करून उत्तेजितपणा आणतें.