विभाग नववा : ई-अंशुमान
ऊदिल प्रायोज्जिद (बेन्झाल्डिहाइड) - ऊदिल-प्रायोज्जिद यास कडू बदामाचें तेल म्हणतात. याची घटना क६उ५कउप्र अशी असून गंधप्रायोज्जिदा (अॅरोम्याटिक) च्या वर्गांतील पदार्थांचा हा अगदीं साधा दर्शक प्रायोज्जिद आहे. याचा शोध प्रथम १८०३ मध्यें लागला. इ. स. १८३७ मध्यें लीबीगनें याचें परिशीलन केलें. ऊदिल प्रायोज्जिद क६उ५कउप्र कडू बदामांत असणार्या बदामिन [अमिग्डालिन] क२०उ२७नप्र११ शीं संयुक्त असून चिक्किदा [ग्लुकोसाईड] च्या रूपानें असतें. कडू बदामाशिवाय अन्य वनस्पतीजन्य फळें, पानें, वगैरे मध्येंहि हा बादामिन चिक्किद असतो. एक विशेष प्रकारचा बलकिद [आल्युमिनाइड] फेन [फरमेंट] वनस्पतीमध्यें असतो त्याजवर याचें कार्य होऊन त्याचें पृथक्करण होतें व ऊदिल प्रायोज्जिद उत्कनाम्ल आणि द्राक्षशर्करा [डेक्स्ट्रोस] यांत रूपांतर होते तें खालील रासायनिक समीकरणानें दाखविलें आहे.
बादामिन पाणी उत्कनाम्ल द्राक्षशर्करा ऊदिलप्रा.
क२०उ२७नप्र११ + २उ२प्र = उकन + २क६उ५२२प्र + क७उ६प्र
उत्कानाम्लाचें अस्तित्व असल्यानें कडू बदामाचें तेल विषारी असतें.
ऊदिल प्रायोज्जिद हा पदार्थ कृत्रिम रीतीनें पुष्कळ तर्हेनें तयार करता येतो.
[१] ऊदिल अल्कहल [बेंझिल अल्कहलाचें प्राणिदीकरण [ऑक्सिडेशन] केल्यानें.-
ऊदिल अल्कहल प्राण ऊदिल प्रायोज्जिद पाणी
क६उ५कउ२प्रउ + प्र = क६उ५कउप्र + उ२प्र
हें तयार होतें.
नवजात (नॅसंट हायड्रोजन) उज्जाची क्रिया ऊदाम्ल (बेंझॉइक अॅसिड) च्या हरिदावर क्लोराइडवर) म्हणजे रूदायिल हरिदावर केली असतां. जसे:-
ऊदायिल हरिद उज्ज ऊदिल प्रायोज्जिद उद्धराम्ल
क६उ५कउह + २उ = क६उ५ कउप्र + उह
(३)ऊदलहरिदावर [बेझल क्लोराइड] पाण्याची किंवा कलीचुन्याची [जलद्रव] क्रिया म्हणजे; जसें:-
ऊदल हरिद पाणी = ऊदिलप्रायोज्जिद + उद्धराम्ल
क६उ५कउह२ + उ२प्र क६उ५कउप्र २उह
(४) ऊदाम्ला (बेझाइक अॅसिड) चें उज्जिदीकरण (रिडक्शन) केल्यानें ऊदिल प्रायोज्जिद तयार होतें. परंतु या रीतींत प्रत्यक्ष ऊदाम्ल न घेतां खटऊदित व खटपुत्तकित [क्यालशिअम फॉर्मेट] यांच्या मिश्रणाचें निर्जल म्हणजे शुष्कपातन करावें लागतें; इत्यादि अनेक रीती आहेत. परंतु व्यापारी ऊदिलप्रायोज्जिद मोठ्या प्रमाणावर करण्याची रीत म्हटली म्हणजे बोलिन [टोलुइन] पासून करतात. बोलिनपासून ऊदिल हरिद [बेंझिल क्लोराइड] तयार करून तो सीसनत्रिता [ लेडनायट्रेट] बरोबर उष्ण करतात; जसें:-
ऊदिलहरिद सीसनत्रित नत्रद्विप्राणिद
क६उ५कउ२ह + स [नप्र३]२ २नप्र२ +
हरिद अनाम्लसीस ऊदिल प्रायोज्जिद
+ सह. प्रउ + क६उ५कउप्र
कडू बदामाच्या तेलांत ऊदिल प्रायोज्जिदीचें प्रमाण शेंकडा १.५ २ ते पर्यंत असतें.
शुद्ध ऊदिल प्रायोज्जिद हें पातळ वर्णहीन रस रूप असून त्याच्या अंगीं विलक्षण वक्रीभवनाचा धर्म आहे. यास एक प्रकारचा सुगंध वास असतो. हें १७९० श वर उकळतें. त्याचें वि. गु. १.०५ असतें. हें पाण्यांत फार अल्प प्रमाणांत विद्रुत होतें; परंतु अल्कहल व इथ्र [ईथर] यांत सर्व प्रमाणांत विद्रुत होतें. त्यांत मिसळलें म्हणजे ऊदिल प्रायोज्जिदाचा निपात [प्रेसिपिटेट] होतो. वातावरणाच्या साहचर्यांत त्याचें प्राणिदीकरण होऊन उदाम्लांत तें रूपांतर पावतें. दार्वम्ल [असेटिक अॅसिड] वर्गांतील जीं प्रायोज्जिदें आहेत त्यांचे उज्जिदीकरण [रिडक्शन] धातूंच्या क्षारांवर जितकें होतें त्यापेक्षां या प्रायोज्जिदाचें कार्य कमी होतें. ऊदिल प्रायोज्जिद सिंधु गंधकायिताच्या दाट (सोडियम सल्फाइट) द्रवांत विद्रुत होतें. आणि या द्रवांत पातळ गंधकाम्लाच्या द्रवाचा एकएक थेंब घातला तर ऊदिल प्रायोज्जिद आणि अम्ल गंधकायित (अॅसिड सल्फाइड) यांचा संयोग होऊन तें स्फटिक रूपानें क७उ६प्रधुउगप्र३ निपात पावतें. हा द्रव उष्ण केला म्हणजे स्फटिक विद्रुत होतात, पण थंड होऊं लागतांच पुन: निपात पावतात.
अम्न (आमोनिया) च्या योगानें ऊदिल प्रायोज्जिदाचें रूपांतर उद-ऊदामिदांत (हायट्रो बेंझ अमाइड) क६उ५कउ३न२ होतें. हें पांढरें स्फटिक रूप असतें. ही रासायनिक क्रिया खालीं दाखविली आहे.
ऊदिल प्रायोज्जिद अम्न उद-उदामिद पाणी
३ (क६उ५.कउप्र) + २नउ३ (क६उ५.कउ)३न२ + ३उ२प्र
सर्व गंध वर्गांतील प्रायोज्जिदांचें कार्य अम्नवर याप्रमाणें होतें. व त्यायोगें चर्बीवर्गाचीं प्रायोज्जिदें आहेत त्यापांसून यांस ओळखतां येतें.
ऊदिल प्रायोज्जिदाची (कडू बदामाच्या तेलाची) परीक्षा करण्याची उत्तम रीत म्हटली म्हणजे तें थोडाशा दाहक पालाशाबरोबर परींक्षानळींत उष्ण करावें आणि तें थंड झाल्यावर त्याचा पाण्यांत द्रव करावा व त्यांत उद्धराम्ल घालावें म्हणजे पिसासारखे ऊदाम्लाचें स्फटिक निपात पावतात.