विभाग नववा : ई-अंशुमान
ऋक्षरजा - रामायणांतील वालीसुग्रीवांचा पिता. ब्रह्मदेवाच्या आनंदाश्रूंपासून याची उत्पत्ति आहे. मेरू पर्वतावरील सरोवरांत स्नान केल्यानें हा स्त्री झाला व इंद्र आणि सूर्य यांचे कामसंकल्प वाल व ग्रीव या शरीरांगावर पडून वाली व सुग्रीव नांवाचे दोन पुत्र झाले. पुन्हां पुरूषत्व प्रात्प झाल्यावर ब्रह्मदेवानें याला किष्किंधेचें राज्य दिलें [वा. रामायण उत्तर. स. १].