विभाग नववा : ई-अंशुमान
एओलिस - एओलिस (एओलिया) हा आशियामायनरमधील एक प्राचीन प्रांत होता. प्राचीन काळीं एओलिअन ग्रीक लोकांनीं या प्रांतांत वस्ती केली होती. हें नांव हरमस नदीपासून लेक्टमच्या भूशिरापर्यंत जो किनारा आहे त्याला म्हणजे आयोनिया (दक्षिण) पासून ट्रोआस (उत्तर) पर्यंतच्या प्रदेशास होतें. आयोनिअन लोकांनीं ह्या प्रांतांत बारा शहरें स्थापिलेलीं होतीं.