प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

एकनाथ - महाराष्ट्र संत व कवि (एकनाथाचा जन्म शके १४७० मध्यें (रा. पांगारकरांच्या मतें १४५०) पैठणास झाला. पूर्वी भानुदास या नांवाचा एक भगवद्भक्त देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण पैठणांत होऊन गेला. त्याच्याच वंशांत एकनाथ हा जन्मला. भानुदासाचा मुलगा चक्रपाणी, चक्रपाणीचा सूर्यनारायण व सूर्यनारायणाचा एकनाथ अशी एकनाथांची पितृपरंपरा आहे. एकनाथाच्या आईचें नांव रूक्मिणी. एकनाथाच्या जन्मानंतर त्याचीं मातापितरें लवकरच निवर्तलीं. यामुळें एकनाथाचें सर्व पालनपोषण त्याचा जो आजा चक्रपाणी त्यानेंच केलें. लहानपणापासूनच एकनाथाचें चित्त परमेश्वराकडे वळलेलें होतें. दगडाचे देव मांडून त्यांची पूजा करावी व कांहीं तरी पुराणांतील गोष्टी सांगून कीर्तन करावें, अशा तर्‍हेचे याचे खेळ असत. याची साहाव्या वर्षी मुंज होऊन पुढें विद्याभ्यासास सुरूवात झाली. एकनाथची बुद्धि फार तीव्र होती, यामुळें गुरूनें दिलेली संथा त्याला तेव्हांच पाठ होई, असें त्याचे बहुतेक चरित्रकार सांगतात. रीतीप्रमाणें ब्रह्मकर्माचें सर्व म्हणणें पुरें झाल्यावर एक दिवस एकनाथास असा दृष्टांत झाली कीं, देवगिरीस जनार्दनपंत हा दत्तोपासक आहे, त्याचा अनुग्रह घ्यावा. याप्रमाणें एकनाथानें जनार्दनपंताकडे जाऊन त्याचा अनुग्रह घेतला व त्याजपाशीं पुढील ज्ञान संपादन केलें. जनार्दनपंतानें एकनाथास शके १४८० मध्यें कालयुक्त संवत्सरी उपदेश दिला व एकनाथनें ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांचें अध्ययनहि जनार्दनस्वामीपाशींच केलें. स्वामीच्या आज्ञेनें चतु:श्लोकी भागवत या ग्रंथास एकनाथानें टीका लिहिली. ती फारच सरस आहे. चतु:श्लोकी भागवताचें हें विवरण पाहून जनार्दनस्वामींनीं लवकरच आपल्या या शिष्यास श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधावर व्याख्यान करण्यास सांगितलें. पैठणास नाथानें लेखनास आरंभ करून विक्रमशक वृषसंवत्सर १६३० या सालीं कार्तिक शुद्ध पौर्णिमेस सोमवारीं हा ग्रंथ पुरा केला. या अपूर्व ग्रंथाचे ३१ अध्याय असून त्याची ओंबीसंख्या सुमारें २० हजार आहे. भागवत संपविल्यानंतर लागलीच पुरे पांच महिने लोटले नाहींत तोंच एकनाथानें 'रूक्मिणीस्वयंवर' लिहिलें. याचे १८ अध्याय असून ओंवीसंख्या सुमारें दोन हजार आहे. एकनाथाच्या चरित्रपर अथवा पौराणिक ग्रंथांपैकीं हा अगदीं पहिला ग्रंथ दिसतो. 'श्रीकृष्णानें श्रीखंड्याच्या रूपानें' 'स्वकरें चंदन घासलें' व 'कावडीनें गंगेचें पाणी' भरलें, त्याच्या स्मरणार्थ हा कृष्णाचा स्वयंवरवृत्तांत नाथांनीं सांगितला आहे असें म्हणतात. भागवताच्या आधारानें दोन प्रचंड ग्रंथ लिहिल्यावर या पौराणिक ग्रंथाच्या वेळीं वेदांतविषय कवीच्या अगदीं दृष्टीआड झाला होता असें नाहीं.  पौराणिक आख्यानांवर रचलेले दुसरे लहान लहान ग्रंथ 'बालक्रिडा' 'प्रल्हदचरित्र' व 'शुकाष्टक' हें होत. 'प्रल्हादचरित्र' हें लहानसें १७६ ओव्यांचें प्रकरण जसें सुरस आहे, तसेंच १४४ ओव्यांचें 'शुकाष्टक' हि आहें. हीं आख्यानें रचून एकनाथानें प्रथमच आख्यान वाड्:मयाचा पाया घातला व मराठींत काव्यरस ओतला. 'शुकाष्टका' शिवाय शुकाष्टकाच्या आधारें अथवा टीकात्मक असा रचिलेला 'स्वात्मसुख' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. अद्वैतावर हा लहानसा ग्रंथ फारस उत्कृष्ट उतरला आहे. स्वात्मानुभवाप्रमाणेंच 'आनंद-लहरी' 'अनुभवानंद' आचार्यांच्या हस्तामलकावरील टीका, चिरंजीवनद, गीतासार, मुद्राप्रकाश वगैरे हे सर्व ग्रंथ वेदांतपर असून अद्वैतमतप्रधान आहेत. यांखेरीज पदें, भारूड वगैरे लहान लहान चुटके आणि अभंग अशी विविध रचना एकनाथानें केली आहे.

हे लहानसान ग्रंथ लिहीत असतांना फार मोठें असें एक मराठी भाषेंसंबंधाचें काम एकनाथानें आरंभिलें. तीनशें वर्षापूर्वी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रती मिळवून तो ग्रंथ प्रतिशुद्ध करण्यास आरंभ केला. ज्ञानेश्वरीच्या समाधीचा जीर्णोद्धार केल्यावर त्यांच्या कृतीच्या अवशिष्ट भागाचाहि जीर्णोद्धार करण्याची कल्पना एकनाथास सहजासहजीं सुचली असावी. एकनाथानें आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार शके १५०५ मध्यें जेष्ठांत केला आणि नंतर वर्ष सव्वा वर्षानें म्हणजे शके १५०६ च्या भाद्रपदांत ज्ञानेश्वरीचा जीर्णोद्धार पुरा झाला. ज्ञानेश्वरीप्रमाणेंच अमृतानुभवासंबंधींहि कांहीं खटपट करून हा ग्रंथ महाराष्ट्रीयांस सुभल करून देण्याचा एकनाथानें यत्‍न केला असावा. यावर एकनाथानें प्रत्यक्ष एक टीका लिहिली असावी असा विद्वांनांचा तर्क आहे; परंतु ही टीका हल्लीं संपूर्ण उपलब्ध नाहीं असें रा. भावे म्हणतात. (सरदार मेहेंदळे यांनीं अमृतानुभवावरील एकनाथकृत टीकेचें एक पृष्ठ रा. वि. का. राजवाडे यांच्या हवालीं केलें होतें).

एकनाथाचा ग्रंथरचनेचा अद्योग अखेरपर्यंत सतत चालू होता असें दिसतें. आपल्या पूर्ववयांत यानें भागवतसारखा ग्रंथ मराठींत आणिला व त्यावर टीका रचिली. तसेंच उत्तरवयांतहि यानें दुसरा एक मोठा ग्रंथ रचण्याचा उपक्रम केला. हा ग्रंथ रामायण हा होय. मूळ रामायणाच्या आधारें हा ग्रंथ मराठींत लिहिण्यास सुरूवात अगदीं साठीच्या सुमारास केली असावी असें दिसतें. 'भावार्थरामायण' ग्रंथ युद्धकांडाच्या ४४ व्या अध्यायापर्यंत रचून झाल्यावर एकनाथाची प्रकृति विशेष क्षीण झाली आणि ग्रंथरचनेचे परिश्रम त्याच्यानें होईनात, तेव्हां पुढील ग्रंथ पुरा करण्याचें काम आपला एक शिष्य गावबा याजवर एकनाथानें सोंपविलें.

एकनाथाच्या उपरिनिर्दिष्ट ग्रंथांपैकीं बहुजनमान्य व सर्वांगसुंदर ग्रंथ म्हटला म्हणजे भागवत एकादश स्कंधावरील विस्तृत टीका हा होय भागवतांतील या भागाला उद्धवगीता असेंहि म्हणतात. नाथांचें चरित्र म्हणजे या ग्रंथांतत प्रामुख्यानें प्रतिपादिलेल्या (अ. २, ३, ५, २९ पहा.) भागवतधर्मरहस्याचें प्रत्यक्ष केवळ उदाहरणच होय. या विषयाचें विवरण करतांना नाथांची वाणी रसाळ, प्रसंगविशेंषीं 'प्रासादिक' कवित्वानें स्फुरलेली, समर्पक दृष्टांतांनीं खुटलेली, सद्भावानें आर्द्र झालेली, प्राकृत जनांसहि गुंगवून त्यास सात्विकवृत्तिप्रवण करणारी, वक्तृत्वाची व निरूपणकुसरीची साक्ष पटविणारी व विवेचक अशी स्पष्ट दिसून येते. तसेंच भारदस्तपणांत परमार्थाचें उद्धाटन करण्याच्या कामीं संस्कृत भाषेला मराठी भाषा रेंसभरहि हार जाणार नाहीं ही बाब स्पष्टोक्तीनें व स्वरचनेच्या ठाकठिकीनें एकनाथानें निदर्शनास आणून दिली आहे. एकनाथाचा एतद्विषयक कटाक्ष बिलकुल अस्थानीं नाहीं हें उघड आहे. ज्ञानेश्वराचें अनुकरण करून एकनाथानें भारूडाची रचना करितांना रूपकें योजण्यांत अनुपम चातुर्य दाखविलें आहे. नित्याच्या व्यवहारांतीलच गोष्टी घेऊन व तात्कालीन समाजांत चालू असलेल्या विविध धंद्यांस अनुरूप अशी रोचक भाषापद्धति घालून आत्मज्ञान परोपरीनें विशद व सुगम करण्याची खुबी या चटकदार रचनेंत एकनाथाला ठळकपणें साधली आहे. या बहरीच्या रचनेंत मात्र एकनाथाचें कवित्व जसें निर्विवादपणें दिसून येत आहे तसें त्याचें योजकत्वहि पट आहे. हा शके १५५१ मध्यें फाल्गुन वद्य षष्ठीस समाधिस्थ झाला. नाथाच्या जन्मशकाप्रमाणें मृत्युशकहि निश्चित नाहीं. आर्वाचिन कोशकार, रा. सहस्त्रबुद्धे (श्रीएकनाथमहाराजचरित्र) यांच्याप्रमाणेंच तो शके १५३१ धरतात. अर्वाचीन मराठी भाषेचा जनक म्हणून एकनाथाची योग्यता मोठी आहे. ज्ञानेश्वर व एकनाथ यांच्या मध्यें साडेतीनशें वर्षाचा काळ लोटला आहे. तेव्हां या दोघांच्या वेळची मराठी भाषा विचारांत घेतां असें दिसून येईल कीं, ज्ञानदेवाच्या वेळीं भाषेंत जुनीं रूपें आणि त्यांचे अम्थिर प्रकार फार होते. एकनाथाची भाषा सुसंस्कृत व अधिक स्थिरावलेली दिसते. ज्ञानेश्वर व एकनाथ यांमधील काळांत मराठी भाषा संस्कृत पेहरावानें विशेष नटली, तिनें पूर्वीचे गांवढळ शब्दप्रचार टाकून दिले व प्रौढपणा धारण केला. म्हणून या दोघांच्या भाषेंत फार फरक आढळतो. ज्ञानेश्वरापासून मोरोपंतापर्यंत सर्व ग्रंथकारांनीं आध्यात्मिक विषयाच्या विवेचनासाठीं ओवीबद्ध छंद वापरला आहे; तेव्हां एकनाथाचाहि पाठ होता हें सांगणें नकोच. नाथाची ओवीं साडेचार चरणीं असून शेवटच्या चरणांत अनुप्रास साधलेला आढळतो एकनाथाच्या काव्याचा मासला म्हणून रूक्मिणीस्वयंवरांतील (अ. १५) रूक्मिणीवर्णन पहा:-

भिंवई सुरेख सरळ नासिक । गंडस्थळीं तेज अधिक । नाकींचे मोतीं जडित माणिक । तेणें श्रीमुख शोभत ॥ सुरंग तळवे आणि तळहात । अधरबिंब अति आरक्त । बोलीं मधुरता तळपत । तेणें झळकत दंतपंक्ति ॥ कटिप्रदेश शोभवी जघन । माज अतिशयेंसी सान । घोटी कळाविया सुलक्षण । बरवेपण पाउलां ॥ नेसली क्षीरोदक पाटोळा । त्यावरी नवरत्‍नाची मेखळा । सुनीळ कांचोळी वेल्हाळ । लेइली माथां मोतलग ॥ गंगातीरीचीं चक्रवाकें । तेंवि कुचद्वय सुरेख । हृदयीं घननीळ झळके । शोभा पदकें दाविजे ॥

विरहानलानें पोळणारी रूक्मिणी म्हणते:-

मज नलगे विंझणवारा । तेणें अधिकची होतो उबारा । प्राणरिघों पाहे पुरा । शारंगधरावांचोनी ॥ आंगीं न लावा गे चंदन तेणें अधिकचि होय दीपन । माझे निघों पहाती प्राण । कृष्णचरण न देखतां ॥  (अ. ५)

वेदांत सांगतांनाहि एकनाथाची वाणी अस्खलित व हृदयभेदी वाटते. स्वात्मुसुख ग्रंथांत आस्तिकनास्तिकासंबंधीं बोलतांना पुढील विवेचन केलें आहे:-

जैसे सूर्याचे किरण । सूर्यापुढें धांवती आपण । तेणें प्रकाशे सूर्यपणा अधिकाधिक ॥ कां चंदनास वासा चंदनाहुनि चौपसा धांवे तेणें अधिक प्रकाश । चंदनत्वा आणी ॥ तैसें विश्वप्रकाश तया गभस्ती । त्यांचीं किरणें त्या त्या नाना व्यक्ती । तेथें नास्तिकता जे देखती । ते मूर्ख मृगतृष्णिका ॥ मोत्यांची करूनियां भूषणें । अंगीं प्रत्यंगीं लेणें । बाणलिया सुंदरपणें । शोभे स्वयें ॥ तैसें हें स्वरूप निर्विकार । त्याचें सर्वांग भूषण चराचर । तेणें अलंकारालें मनोहर । स्वरूपचि भासे ॥ सुवर्ण आणि भूषण । तेथें काय आहे दोन्हीपण । प्रगट पाहतांही कांकण । सोनेंचि दिसे ॥ सौधपट पाहतां दृष्टी । तंतुसीच होय भेटी । तैसी अवलोकितां सकल सृष्टी । स्वरूपचि भासे ॥

एकनाथाच्या अभंगासंबंधीं विवेचन 'अभंग' या लेखांत आलेंच आहे.

एकनाथाची साधु म्हणून मोठी ख्याति आहे. त्यानें केलेले चमत्कार महिपतीनें भक्तिविजयांत वर्णिले आहेत. एकनाथ अस्पृश्यता जातिभेद वगैरे सामाजिक दोष मानीत नव्हता असें दाखवून देणार्‍या कांहीं कथाहि सांगतात

[संदर्भ ग्रंथ:- महाराष्ट्रसारस्वत. एकनाथाचीं स्वतंत्र सहा चरित्रें आहेत, त्यांपैकीं एक रा. ल. रा. पांगारकर यांनीं लिहिलें आहे. अर्वाचीन कोश व कविचरित्र यांत एकनाथावर लेख आहेत, भक्तिविजय व भक्तलीलामृत या पुराणांतून एकनाथांच्या आख्यायिका वर्णिल्या आहेत, याशिवाय किरकोळ वाङ्‌मय बरेंच आहे].

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .