विभाग नववा : ई-अंशुमान
एकलव्य - निषादाधिपति हिरण्यधेनुकाचा पुत्र. द्रोणाचार्यांनीं कौरव राजपुत्रांबरोबर याला धनुर्विद्या शिकविण्याचें नाकारल्यावरून यानें त्यांच्या पादुका गुरूस्थानीं स्थापून स्वत:च धनुर्विद्येचा अभ्यास करून तींत प्रवीण झाला. कौरवराजपुत्रांना त्याच्या अलौकिक धनुर्धारीत्वाबद्दल वषैम्य वाटून त्यांनीं द्रोणाचार्याकडे तक्रार केली. द्रोणांनीं हा अर्जुनाच्या वरचढ होऊं नये म्हणून अशी गुरूदक्षिणा मागितली कीं, तूं बाण सोडतांना अंगठा लावीत जाऊं नकोस. हें व्रत सर्व किरात अद्याप पाळतात असा समज आहे. (महा. भा. आदि. १४२, दक्षिण प्रत, १९१४०)