विभाग नववा : ई-अंशुमान
एकलिंगजी - मेवाडांत उदेपूर शहरापासून एका मैलावरील एक देवस्थान. (उदेपूर पहा.) एकलिंगजीचें संस्थान मोठें आहे. वैष्णव मारवाड्यांत ज्याप्रमाणें दोन स्नेही एकत्र भेटले असतां 'जयगोपाल' म्हणून परस्परांस नमस्कार करितात. त्याप्रमाणें मेवाडांत 'जय एकलिंगजी' म्हणून रामराम करतात. येथें प्रत्यहीं दोनशें रूपयांचा खर्च आहे. एकलिंगजीचें देऊळ डोंगराळ प्रदेशांत आहे. येथें प्रसिद्ध मल्हारराव होळकर हें देवस्थान लुटण्यास गेला होता; परंतु लुटालुट न करितां तो तसाच मागें फिरला. एकलिंगजीच्या देवळांत 'गद्याची सोगण' म्हणून एक स्तंभ्ज्ञ पुरला आहे. [लो. हि. ग्रं. ६ राजस्थानचा इ. उदेपूर परिशिष्ट५]