विभाग नववा : ई-अंशुमान
एकिल - या शब्दाचा अर्थ गरूड असा होतो. हें बेट आयर्लंडच्या पश्चिम किनार्याजवळ आहे. आयर्लंडच्या पश्चिमेस 'कुराऊनै' नावांचें जें एक द्विपकल्प आहे. त्यामध्यें व या बेटामध्यें 'एकिल' ची एक अरूंद सामुद्रधुनी आहे. मेयो नांवाच्या आयर्लंडच्या पश्चिम विभागांत याचा समावेश होतो. हें बेट डोंगराळ व दलदलीचें आहे. येथील लोक कोळ्याचा धंदा करून आपलें पोट भरतात.