विभाग नववा : ई-अंशुमान
एक्रान - हें फिलिस्टाईन लोकांचें बादशही शहर होतें. रॅमलेहपासून ५ मैलांवर असलेलें सीरियांतील अॅकीर शहर तें हेंच असावें. सॅम्युएलच्या वेळेस हें फिलिस्टाईन लोकांच्या ताब्यांत होतें. येथें बालझेबुबचें देऊळ होतें. इ. स. ७० त यरूशलेमचा पाडाव झाल्यावर यहुदी लोक येथें येऊन राहिले. सध्यां येथें यहुदी शेतकर्यांची वसाहत आहे. जवळचा प्रदेश सुपीक आहे.