प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

एंजिन - एंजिन (विशेष प्रचारांतील मराठी शब्द इंजन) म्हणजे शक्ति उत्पन्न करणारें यंत्र. जें यंत्र शक्ति उत्पन्न करीत नाहीं तें एंजिन नव्हे. तें केवळ विशिष्ट काम करणारें यंत्र. असल्या यंत्रापासून काम घेण्याला एंजिन पाहिजे. एंजिन नसेल तर यंत्रापासून काम होणार नाहीं.

एंजिनांचे पुष्कळ प्रकार आहेत. मुख्य मुख्य एंजिनें पुढें दिलेल्या तर्‍हांचीं असतात. बाष्पयंत्र:-(स्टीम इंजिन) वाफेनें चालणारें इंजिन; तैलयंत्र- (ऑईलइंजिन), तेलानें चालणारें, धूम्रयंत्र (ग्यास  इंजिन) धुरानें चालणारें, पीडितवायुयंत्र (कांप्रेस्ड एअर एंजिन) उर्फ दाबलेल्या हवेनें चालणारें इंजिन; उष्णवायुयंत्र (हॉट एअर इंजिन)-जलयंत्र (हायड्रॉलिक इंजिन), जलप्रेरितयंत्र (वाटर टरबाईन) आणि सूर्ययंत्र (सन पावर इंजिन); भ्रमणयंत्र (रोटरी इंजिन) व पुरोपश्चाद्गामी यंत्र (रेसिप्रोकल) मागेंपुढें चालणारें; चलद्ययंत्र (लोकोमोटीव्ह इंजिन). सर्वांत जुनें व अद्यापहि सर्वांत महत्वाचें म्हणजे बाष्पयंत्र अथवा वाफेचें एंजिन होय. अजूनहि मुख्य मुख्य ठिकाणीं व मोठ्या शक्तीसाठीं वाफेचींच इंजिनें वापरतात हीं इंजिनें सुमारें दीडशें वर्षापूर्वी निघालीं. हीं शोधून काढण्याचा मान जेम्स वॅट या इंग्लिश गृहस्थास देतात. याच्याहि अगोदर किंवा जवळ जवळ याच्याच सुमारास न्यू कोमन यानेंहि एक वाफेचें इंजिन शोधून काढलें होतें. वॅट याच्या मनांत वाफेच्या शक्तीची कल्पना एका किटलीचें झांकण वाफेने उडतांना पाहून आली. अशाच नादांत तो एकदां किटलीच्या नळींतून येणार्‍या वाफेसमोर एक चमचा हातांत धरून त्या वाफेचा जोर पहात होता. त्या वेळेस त्याच्या आजीला तो अगदी वेड्यासारखा काय खेळत बसला आहे असें वाटून ती त्याला रागानें बोललीहि होती. वाफेच्या प्रसरणशक्तीचा फायदा घेणें व वाफेचें पुन्हा पाणी करून त्या रितीनेंहि इंजिनची शक्ति वाढवणें किंवा कमी जळण लागण्याची युक्ति योजणें याहि दोन्ही गोष्टीं यानेंच केल्या.

वाफेचें यंत्र चालण्याची तर्‍हा अशी आहे :- एका पंचपात्रांत (सिलिंडर) एक दट्टया (पिस्टन) असतो. या पंचपात्राच्या दोन्ही बाजू बंद असतात. तसेंच दोन्ही बाजूंनीं वाफ पंचपात्रामध्यें येण्याची व्यवस्था केलेली असते. दट्ट्या (पिस्टन) पंचपात्राच्या (सिलिंडरच्या) एका टोंकाला असते. त्या वेळेस त्या टोंकानें वाफ त्या पंचपात्रांत येऊं लागते. त्या वाफेच्या जोरानें दट्ट्या पुढें जाऊं लागतो. दट्ट्या कांहींसा पुढें गेला म्हणजे वाफ येण्याचें बंद होतें व दट्ट्या वाफेच्या प्रसरणशक्तीमुळेंच पुढें जातो. तो दट्ट्या पंचपात्राच्या दुसर्‍या टोंकाला जाऊन पुन्हां नव्या वाफेच्या जोरानें परत येऊं लागतो. याच वेळीं दट्ट्याच्या अलीकडच्या बाजूची काम करून फुकट गेलेली वाफ परत जात असते. ही वाफ परत जाऊन दट्ट्या पहिल्या जागेवर आला म्हणजे पुन्हां त्या बाजूनें पंचपात्रांत वाफ यावयास लागून दट्ट्या (पिस्टन) पुन्हां मागें जातो. अशा रीतीनें दट्ट्या पंचपात्रांत मागें पुढें जाऊन इंजिन चालतें.

वर सांगितल्याप्रमाणें जी गति उत्पन्न होते ती मागें पुढें अशी होते. या गतीवरूनच या जातीच्या इंजिनाला पुरोपश्चाद्गामी यंत्र (मागें पुढें होणारें इंजिन-रेसिप्रोकेटिंग एंजिन) असें म्हणतात. या मागें पुढें होणार्‍या गतीपासून वर्तुल गति उत्पन्न करावी लागते. त्यासाठीं निराळी योजना करावी लागते. पंचपात्रांत जो दट्ट्या मागेंपुढें होत असतो त्याला एक दांडा बसविलेला असतो. याला दट्ट्याचा दांडा (पिस्टन रॉड) असें म्हणतात. हा दांडा पंचपात्राच्या एका बंद बाजूमधून बाहेर येत असतो. या दांड्याच्या दुसर्‍या टोंकास एक आडवा दांडा (क्रॉसहेड) बसविलेला असतो. या आडदांड्याचें (क्रासहेडचें) काम दट्ट्याचा दांडा व जोडदांडा (कनेक्टिंग रॉड) यांचा सांधा करण्याचें असतें. दट्टयाचा दांडा अगदीं सरळ रेषेंत मागेंपुढें होत असतो. पण जोडदांड्याचें आडदांड्याला   (क्रासहेडला) जोडलेलें टोंक हें एकाच रेषेंत सरळ मागेंपुढें होत असतें. पण त्याचें दुसरें टोंकज्याला गतिपरिवर्तकाचें टोंक (क्रॅंकएंड) म्हणतात. तें चक्राकार फिरत असतें. या जोडदांड्याच्या, ट्ट्याच्या दांड्याच्या सरळ समांतर रेषेंत, मागेंपुढें होण्याचा गतीवर कांहीहि परिणाम होऊं नये म्हणून आडदांड्याच्या खालीं व वरतीं किंवा आडदांड्याच्या दोन्हीं बाजूंला त्याला लागून मार्गदर्शक   (गाईड) बसविलेले असतात. क्वचित् हे आडदांड्याच्या खालीहि बसविलेले असतात. त्यांच्या योगानें दट्ट्याच्या दांड्याची गति समांतर रहाते. जोडदांड्याचें (कनेक्टींग रॉडचें) दुसरें टोंक चक्राकार गतीनें फिरत असतें म्हणून वर सांगितलेंच आहे. हें टोंक गतिपरिवर्तकाच्या (क्रॅंकच्या)    एका टोंकाला बसविलेलें असतें; व गतिपरिवर्तकाचें दुसरें टोंक एका मोठ्या लाटेला (शाफ्टींगला) बसविलें असतें. जोडदांड्याचें टोंक वाटोळें फिरावयास लागलें म्हणजे गतिपरिवर्तकहि वाटोळा फिरूं लागतो. तो फिरला म्हणजे त्याबरोबर लाटहि फिरूं लागते. अशा तर्‍हेनें मागेंपुढें होणार्‍या गतीचें गोलगतीमध्यें परिवर्तन होतें.

वर सांगितल्याप्रमाणें एंजिनची गति गोल होते हें खरें. पण ती गति सांरखी रहाण्याला आणखीहि काहीं भाग लागतात. त्यापैकीं पहिला मुख्य म्हणजे शक्तिसंग्राहक अथवा प्रधानचक्र (फ्लायव्हील) होय. या प्रधानचक्राचा उपयोग इंजिनांत फार आहे. किंबहुना या चक्राशिवाय इंजिन चालणारच नाहीं. पंचपात्रांत वाफ शिरूं लागली म्हणजे कांहीं वेळ दट्ट्या जोरानें पुढें जाईल. वाफ येण्याची थांबली म्हणजे वाफेच्या प्रसरण शक्तीनें दट्ट्या पुढें जाईल खरा; पण त्याची गति कमी कमी होऊन दट्ट्या दुसर्‍या टोंकाला जाईपर्यंत ती फारच सावकाश होईल; व दट्ट्या थांबेलहि.  याचप्रमाणें दुसर्‍या बाजूनें वाफ येत असतांहि हीच स्थिति होईल. पण शक्ति उत्पन्न करीत असतां उत्पन्न होणारी गति ही अगदीं सारखी राहिली तरच तिचा उपयोग होईल. एकदां फार जलद दुसर्‍यांदा एकदम कमी अशा तर्‍हेचा बदल केव्हांहि चालणार नाहीं. हा बदल न व्हावा म्हणूनच प्रधानचक्र घालावें लागतें. प्रधानचक्र लाटेवर बसविलेलें असतें. प्रधानचक्राची धांव (रिम) फार जड केलेली असते. प्रधानचक्र (फ्लायव्हील) जड असल्यामुळें तें एकदम फिरतहि नाहीं व एकदम थांबतहि नाहिं. कारण तें पहिल्यानें फिरावयास लागतांना स्थिर स्थितीमधून गतींत येण्यास पुष्कळ शक्ति खातें. याचा परिणाम असा होतो कीं, दट्ट्या आपल्या फेरीच्या सुरवातीस, म्हणजे पंचपात्राच्या एका टोकांपासून पुढें जाऊं लागतो त्या वेळेस, त्यावर वाफेचा पूर्ण जोर असल्यामुळें फर जोरानें पुढें जाण्याचा प्रयत्‍न करतो पण त्या वेळेस इंजिन चालू होतांना प्रधानचक्र (फ्लायव्हील) स्थिर असतें. इंजिन चालावयास लागलें म्हणजे त्याबरोबर तें चक्रहि फिरूं लागतें. हें फिरावयास लावण्यासाठीं जोर पुष्कळ लागतो. सुरवातीला दट्ट्यावर वाफेचा पूर्ण जोर असल्यामुळें प्रधानचक्रास फिरावयास लावण्यांत तो खर्च होतों. पुढें पंचपात्रांत वाफ येण्याची बंद झाल्यावर दट्ट्याची गति कमी होण्याचा संभव असतो. पण प्रधानचक्रामध्यें पहिली गतीची शक्ति सांठविलेली असते तिच्यामुळें प्रधानचक्र आपली गति कमी होऊं देत नाहीं. यामुळें दट्ट्याची गति सारखीच रहाते. अशा तर्‍हेनें सबंध एंजिनची गती सारखी रहाते.

दुसरे मुख्य भाग म्हणजे पंचपात्रांत वाफ येऊं देणें, व काम झालेली वाफ बाहेर जाऊं देणें, यासाठीं जी उघड झांप करावी लागते ती करणारे पडदे (व्हालव्ह) व ते पडदे (व्हालव्ह) चालण्यासाठीं जी दंड्यांची तसेंच संत्र्यांची (एक्सिेंट्रिक) व्यवस्था करावी लागते ती होय. याला पडद्यांची गति (व्हालव्ह मोशन) असें म्हणतात. हीं निरनिराळ्या तर्‍हेची असते; व तींवरून इंजिनच्या कोणीं निरनिराळ्या जातीहि करितात. या तर्‍हांची माहिती पुढें एका ठिकाणीं दिलीं आहे. आणखी एक महत्त्वाचा इंजिनचा भाग म्हटला म्हणजे नियंत्रक (गव्हर्नर) होय. मागें सांगितल्याप्रमाणें प्रधानचक्राच्या (फ्लायव्हिल) योगानें एंजिनची गति सारखी रहाते हें खरें. पण तीं अगदीं सर्वस्वी सारखी राहूं शकत नाहीं. कारण समजा, एंजिन चालू होत आहे पण त्याच्या गतिमुळें दुसरीं कोणतीहि यंत्रे चालू नाहींत. अशा वेळीं पंचपात्रांत वाफ अगदीं थोडी सोडावी लागेल. नाहींतर एंजिन फार जोरानें धावूं लागेल. इंजिन चालू झाल्यानंतर यंत्रे चालूं लागलीं म्हणजे जर पंचपात्रामध्यें जास्त वाफ सोडली नाहीं तर एंजिनची चाल कमी होईल. चाल वाढविण्यासाठीं पंचपात्रांत जास्त वाफ सोडावी लागेल. पण केव्हां कांहीं यंत्रें थांबल्यास पुन्हां चाल वाढेल. चाल वाढली कीं, पुन्हां वाफ कमी करावी लागेल. ही चाल सारखी ठेवण्यासाठीं वाफ आंत सोडण्याचा पडदां (व्हालव्ह) कमी जास्त उघडण्याकरितां एक माणूस सारखा बसवून ठेवावा लागतो. आणि इतकेंहि करून इंजिनची गति कधीं सारखी राहणार नाहीं. या करितां ही गति सारखी ठेवण्याची एक योजना एंजिनमध्यें करावी लागते. तिला नियंत्रक (गव्हरनर) असें म्हणतात.  प्रत्येक इंजिनला नियंत्रक हा असावाच लागतो. इंजिनची गती जितक्या चांगल्या रितीनें सारखी ठेवावयाची असेल त्याप्रमाणें उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे नियंत्रक (गव्हर्नर) इंजिनांवर बसविलेले असतात. क्वचित एखाद्या ठिकाणीं एंजिनची गति सारखी रहाण्याची जरूरच नसल्यास त्या जातीच्या इंजिनांनां नियंत्रकहि नसतो. एंजिनचे पडदे निरनिराळे असतात हें मागें एका ठिकाणीं सांगितलेंच आहे. अगदीं पहिला निघालेला व सर्वांतहि साधा अशा पडद्याला सरकपडदा (स्लाइड व्हालव्ह) असें म्हणतात. हा इंग्रजी 'डी' च्या आकाराचा असतो म्हणून याला 'डी' सरकपडदा असेंहि म्हणतात. अजूनहि फार लहान एंजिनांत. कांहीं साधारण मोठ्या एंजिनांत, बोटीमधल्या एंजिनांत, तसेंच आगगाडीच्या एंजिनांतहि हेच वापरतात. याच्या बाहेरून एंजिनच्या पंचपात्रांत वाफ जाते व आंतल्या बाजूनें बाहेर जाते. साध्या पडद्याला एकमुखी पडदा (सिंगल पोर्टेड व्हालव्ह) म्हणतात.  इंजिन फार मोठें असल्यास त्यांत वाफहि पुष्कळ जावी लागते. ती एका बाजूनें पुरेशी जात नाहीं. म्हणून दोन किंवा तीन तोंडांचे द्विमुखी, त्रिमुखी पडदे (डबल-ट्रिपल पोर्टेड) करतात. असले पडदे बहुतकरून बोटींतल्या मोठाल्या एंजिनमध्यें असतात. असल्या एंजिनला सरकपडद्याचें इंजिन असें म्हणतात.

कांहीं एंजिनमध्यें सरकपडद्याच्या पाठीवर दुसरा एक पडदा चालत असतो त्याचें काम एंजिनवर भार (लोड) ज्याप्रमाणें कमी जास्त येईल त्याप्रमाणें इंजिनमध्यें वाफ कमी जास्त सोडण्याचें असतें. हें काम आपोआप होत असतें; म्हणून असल्या एंजिनांना स्वयंप्रेरित (आटोमॅटिक) सरकपडद्याचीं एंजिनें असें म्हणतात.

सरकपडदा (स्लाइडव्हालव्ह) हा चालत असतांना एंजिनच्या सिलिंडरच्या एका बाजूवर घांसत असतो. या वेळीं त्यावर तापकांतील (बॉयलर) वाफेचा असणारा सर्व दाब (प्रेशर) असतो. अगदीं जुन्या तापकांमध्यें वाफेच्या दाबाचें प्रमाण फार कमी असें. हें १०-२० पौंड पर्यंतहि असे. हळूहळू हा दाब वाढत चालला. हल्लीं हा दाबा  साधारणपणें १५० पासून २५० पौंडपर्यंत असतो. कांहीं विशेष ठिकाणीं हा दाब १५०० आहे व एका ठिकाणीं तर ३५०० पौंड दाबाची वाफ तयार करण्याचा प्रयत्‍न चालू आहे. वाफेचा दाब जसजसा वाढूं लागला तसतसें सरकपडद्याचें पंचपात्राच्या बाजूवर जास्त घर्षण होऊं लागलें. घर्षण फार वाढल्यामुळें सरकपडद्याची बाजू व पंचपात्राची बाजू या दोन्हीहि खराब होऊं लागून त्यांमधून वाफ निसटूं लागली. तसेंच पडद्यावर दाब फार असल्यामुळें पडदा चालविण्यासाठीं एंजिनची शक्तिहि जास्त फुकट जावयास लागली; म्हणून दट्टेपडदा (पिस्टन व्हॉल्व्ह) जातीचे दुसरे पडदे करण्यांत आले. या पडद्यांत दोन दट्ट्ये (पिस्टन) असतात.  यांची चालण्याची तर्‍हा सरकपडद्यासारखीच आहे. याचा प्रत्येक दट्ट्या मुख्य पंचपात्रांत प्रत्येक बाजूला वाफ आंत जाण्याची जी वाट असते त्या वाटेवर चालत असतो. दट्ट्यांच्या बाहेरच्या बाजूनें तापकांतील वाफ पंचपात्रांत जाते व दोन्ही दट्ट्यांच्या मधल्या भागांतून वापरलेली वाफ बाहेर जाते. या तर्‍हेच्या पडद्यामध्यें पडद्याचा दट्ट्यावर फारसा जोर नसल्यामुळेंसरकपडद्यापेक्षां यामध्यें पडदा चालविण्यास शक्ति कमी पुरते. या जातीचे पडदे असलेल्या एंजिनांस दट्टेपडद्याचें एंजिन असें म्हणतात.

फार लहान शक्तीच्या एंजिनांसाठीं सरकपडदे चांगले म्हणून मागें सांगितलेंच. एंजिन लहान असल्यामुळें त्यास वाफ किती लागली, कोळसे किती लागले याकडे लक्ष जरा कमीच असतें. कारण लहान एंजिनें फारकरून तुर्त उपयोगासाठींच असतात. एंजिनें मोठीं व्हावयास लागल्यामुळें त्यामध्यें जाणारी वाफहि पुष्कळ लागूं लागली. पुष्कळ वाफ जाण्यासाठीं मार्गाचें तोंड मोठें करणें किंवा एकापेक्षां जास्त तोंडे ठेवणें हे दोनच उपास सरकपडद्यामध्यें होते. मोठें तोंड केलें असतां पडद्याची चाल (मागें पुढें होणें) फार वाढेल. तोंडें लहान केलीं असतां एकापेक्षां जास्त लागतात. व त्यासाठीं दोन तोंडाचा (द्विमुखी  =  डबल पोर्टेड) किंवा जास्त तोंडाचा पडदा करावा लागतो हें मागें सांगितलेंच आहे. पण एवढाहि मोठा पडदा पुरत नाहीं. कारण जास्त दाबाची वाफ वापरून तिच्या प्रसरणशक्तीचा फायदा घेतला असतां आंत जाणार्‍या वाफेपेक्षां बाहेर येणार्‍या वाफेचा आकार किती तरी पटीनें मोठा असतो. यामुळें जर पंचपात्राचीं तोंडें पुरेशीं मोठीं नसलीं तर सर्व वाफ बाहेर न आल्यामुळें एंजिनपासून कमी शक्ति उत्पन्न होते. तसेंच सरक पडद्यानें पंचपात्रात वाफ येण्याचें एकदम बंद होत नाहीं. मागें सांगितलेल्या सरकपडद्यावर पडणार्‍या दाबानें होणारें नुकसानहि असतेंच. हीं सर्व काढून टाकण्यासाठीं कार्लींस नांवाच्या एका अमेरिकन गृहस्थानें दुसरी एक नवी योजना केली. त्या योजनेला त्याचेंच कार्लीस असें नांव पडलें आहे. या योजनेमध्यें पंचपात्राच्या एका बाजूला (वरच्या बाजूस) दोन्ही टोकांस वाफ पंचपात्रांत जाण्याची वाट असतें. त्याचप्रमाणें पंचपात्राच्या खालच्या बाजूला काम केलेली वाफ बाहेर जाण्यासाठीं दुसर्‍या वाटा त्याचप्रमाणें दोन्ही बाजूला असतात. वरच्या बाजूनें वाफ आंत येते व खालच्या बाजूनें बाहेर जाते. येवढाच या योजनेंत फरक आहे असें नाहीं. सरकपडद्यामध्यें वाफेच्या दाबानें होणारें नुकसान होऊं नये म्हणून या जातीच्या पडद्यामध्यें पडदा मागेंपुढें होत नाहीं. तो आपल्याचभोंवतीं फिरावा अशी त्याची योजना केलेली असते. त्याचा अर्धा भाग अगदीं वाटोळा असतो व राहिलेल्या अर्ध्या भागामध्यें गाळे पाडलेले असतात. जेव्हां वाटोळा अर्धा भाग पंचपात्रांत वाफ जाण्याच्या मार्गावर बसलेला असतो त्या वेळेस मध्यें फट न राहिल्यामुळें वाफ पंचपात्रांत मुळींच जात नाहीं. पण जर गाळ्यांचा कांहीं भाग त्या वाटेवर आला असल्यास त्या गाळ्यांमधून वाफ पंचपात्रांत जाते. ही उघडझांप अगदीं थोड्या वेळांत व्हावी, विशेषत: वाफ बंद होण्याच्या सुमारास हा वाटोळा पडदा फार जलदीनें फिरावा अशी योजना केलेली असते. तसेंच पडदा एकाच जाग्यावर असल्यामुळें त्याच्यावर फिरतांना वाफेच्या दाबाचा फारसा परिणाम होत नाहीं. वापरलेली वाफ जाण्याचा दुसरा पडदाहि वरच्याचसारखा जवळ जवळ असतो. कारण याचाहि खालचा अर्धा भाग सारखा वाटोळा असतो व वरच्या भागांत असणारे गाळे जास्त मोठे असतात. तसेच हे पडदे परत धांवेच्या वेळेस धांव सुरू होण्यापासून उघडतात ते धांव परी होण्याच्या वेळेस बंद होतात. हे पडदे जलदी उघडणें व जलदी बंद होणें याचें फारसें महत्त्व नाहीं. म्हणून हे सावकाशच बंद होत असतात. हें पडदे केंव्हां केव्हां आंत येण्याच्या व बाहेरजाण्याच्या एकाच चाकापासून चालतात. केव्हां केव्हां वाफ आंत जाण्याचें चाक निराळें व वाफ बाहेर येण्याचें चाक निराळें असें असतें. कार्लिस पडदे १२५ पौंड वाफेच्या दाबावर चांगले चालतात. १२५ पौडांवर वाफेचा दाब गेला तेव्हां कार्लीस एंजिनमध्येंहि जास्त त्रास होऊं लागला. जास्त दाब आल्यामुळें वाटोळा पडदा फिरतांना फार घांसून फिरूं लागला. त्याचा परिणाम पडदा वांकडा तिकडा घांसून तोंडावर बरोबर बसत नाहींसा झाला. म्हणून दुसर्‍या एका नवीन तर्‍हेचे पडदे निघाले. हे पडदे आपल्या जागेवर घांसत नाहींत, वरतीं उचलतात व खालीं पडतात. यामुळें वाफेच्या दाबाचा परिणाम यांवर फार थोडा होतो. तसेंच हे पडदे पंचपात्राच्या अगदीं टोंकाजवळ बसवितां आल्यामुळें पडदा व पंचपात्र यांमध्यें असणारी जागा अगदीं थोडी ठेवतां येते. यामुळेंहि वाफ कमी पुरते. हे पडदे अलीकडे २०-२५ वर्षे प्रचारांत आले आहेत. हे उचलून पडतात म्हणून यांनां उडतपडदे (ड्राप व्हालव्ह) असेंहि म्हणतात. कोणी त्यांच्या आकारावरून बाहुली पडदे (पपेट व्हालव्ह) असेंहि म्हणतात. या पडद्यांवरून हे पडदे या असलेल्या एंजिनांस उडतपडद्याचीं एंजिनें असें म्हणतात.

या वर सांगितलेल्या सर्व जातींच्या इंजिनांमध्यें वाफ एका बाजूनें येते, नंतर तिचें प्ररसण होतें. प्रसरण होतांना वाफ थंड होत जाते. नंतर पूर्ण प्रसरण झालेली वाफ परत त्याच बाजूनें बाहेर जाते. यामध्यें दोन तोटे होतात. थंड वाफ परत जातांना सर्व पंचपात्रास थंड करते. तसेंच वाफ ज्या बाजूनें येते त्याच्या उलट बाजूनें जात असल्यामुळें तिची दिशा बदलण्याला कांहीं शक्ति खर्च करावी लागते. तसेंच थंड झालेलें पंचपात्र गरम करण्यांत वाफेच्या अंगची कांहीं उष्णता खर्च होते. जेव्हां एंजिनें पूर्ण शक्तीनें काम करीत नसतात तेव्हां ह्या पंचपात्राच्या थंड गरम होण्यानें त्याचा परिणाम असा होतो कीं, दर अश्वशक्तीला (हॉर्स पावरला) लागणारें वाफेचें प्रमाण वाढत जातें. हें होऊं नये म्हणून एक नवीनच तर्‍हेचें इंजिन निघालें. हें प्रोफेसर स्टंफ नांवाच्या जर्मन प्रोफेसरानें शोधून काढलें. या जातीच्या एंजिनमध्यें वाफ पंचपात्राच्या टोंकानें आंत येते व त्याच्या मध्यावर द्वारें असतात त्यांमधून बाहेर जाते. यामुळें वाफेची वाहण्याची (फ्लो) दिषा बदलत नाहीं. म्हणून या जातीच्या एंजिनला एकदिग्वाहक (यूनिफ्लो किंवा युनाफ्लो) असें म्हणतात. या जातीच्या इंजिनांमध्यें इंजिनचे शेवट गरम असतात व मध्य थंड असतो. दट्ट्या, परत जात असतां आंत जी काय थोडी वाफ रहात असेल ती दाबली जाते. ती जसजशी दाबळी जाते तसतसें तिचें उष्णमान वाढत जातें. यामुळें पंचपात्रामध्यें वाफेचें पाणी होऊं शकत नाहीं. म्हणूनच तापलेले भाग थंड होत नाहींत व थंड भाग गरम करण्यासाठीं वाफेची उष्णता फुकट जात नाहीं. यामुळें एंजिन जरी कमीजास्त काम करीत असलें तरी एंजिनमध्यें दर अश्वशक्तीला लागणारें वाफेचें प्रमाण अर्ध्यापासून पूर्ण किंवा त्याहीपेक्षां जास्त शक्तीचें काम करीत असतांहि म्हणण्यासारखें बदलत नाहीं. या जातीचीं एंजिनें आजकाल अत्यंत उत्तम अशीं गणलीं जातात. या जातींच्या इंजिनमध्यें पंचपात्र एकच असतें. वाफेच्या एंजिनच्या इंजिन चालविण्याच्या तर्‍हेवरून आणखी दोन तर्‍हा आहेत. एक शीतकयुक्त (कंडेन्सिंग) व एक शीतक. विरहित (नॉनकंडेन्सिंग). साधें एंजिन चालत असतांना एंजिनमधली वाफ पंचपात्रांत काम करून नंतर बाहेर जाते. वाफ बाहेर जातांना तिचा दाब हवेच्या दाबापेक्षां कांहीं जास्त असावा लागतो. एंजिन पूर्ण शक्तीनें किंवा कमी चालत असेल त्याप्रमाणें हा जास्तींत जास्त पांच व कमींत कमी तीन इतकां जास्त असतो. दाब जास्त नसेल  तर एंजिन चालून शक्ति उत्पन्न करणार नाहीं. हवेचा दाब दर चौरस चाला पंधरा पौंड असतो. हा दाब जर कमी करतां आला तर त्याच एंजिनमध्यें तीच वाफ जास्त शक्ति उप्तन्न करील किंवा तीच शक्ति उत्पन्न करण्यासाठीं कमी वाफ लागेल. हें करण्यासाठीं जी योजना करावी लागते तिला शीतक (कंडेन्सर) असें म्हणतात. ही योजना ज्या एंजिनला लावलेली असते त्या एंजिनला शीतकयुक्त (कंडेन्सिंग) इंजिन म्हणतात, व ज्या इंजिनला ही योजना लावलेली नसते त्याला शीतकविरहित (नॉनकंडेन्सिंग) एंजिन म्हणतात.

ज्या तर्‍हेच्या कामाला एंजिन लावावें त्या तर्‍हेवरूनहि एंजिनचे वर्ग पडतात. विशेषत: अशा तर्‍हेनें तीन वर्ग पडतात. एक जमिनीवर चालणारें इंजिन, बोटीमध्यें चालणारें (मरीन) एंजिन, व आगगाडीचें एंजिन (लोकोमोटीव्ह –चलद्यंत्र) जमीनीवर चालणारें एंजिन बहुतेक आडवें असतें. त्याचा पाया (बेड) चांगला भक्कम असावा लागतो. त्याचे सर्व भागहि चांगले जड असावें लागतात. कारण जमीनीवरचें एंजिन चांगलें टिकाउ व मजबूत करण्याकडे जास्त लक्ष द्यावें लागतें. वजन पुष्कळ झालें तर एकपक्षीं तें बरेंच असतें. कारण वजन जर चांगलें सारखें वाटून गेलें असलें तर एंजिन मुळींच न हादरतां धीमें चालतें, तथापि उगाच नसतें वजन वाढविण्यांतहि फायदा नसतो. क्वचित् जमीनीवरहि उभीं (व्हरटिकल) एंजिनें असतात, पण तीं मरीन एंजिनापेक्षां जास्त भक्कम असतात.

मरीन इंजिन :-  हें सदोदित उभेंच असतें. याचें पंचपात्र वर असतें व त्याचा गतिपरिवर्तक खालीं असतो. बोटीवर आडवीं एंजिनें चालत नाहींत. कारण त्यांना जागा जास्त लागते. बोटीवर जास्त जागा लागणारीं एंजिनें वापरणें शक्यच नसतें. यासाठीं उभीं एंजिनेंच बोटीवर वापरतात. बोटीवरचीं सर्व एंजिनें दोन किंवा दोहोपेक्षां जास्त पंचपात्रांचीं सरकपडद्यांचीं किंवा दट्टेपडद्याच्या तर्‍हेचीं असतात. हीं एंजिनें शीतकयुक्तहि असतात व थोडक्या आटोपशीर जागेंत बसविण्याजोगीं केलेलीं असतात. या एंजिनला प्रधानचक्र नसतें. हीं मागे पुढेंह हवीं तशीं चालवितां येतात.

चलद्यंत्रें (लोकोमीटिव्ह) आगगाडीच एंजिनें :- हीं एंजिनें वाफेनें  चालणारींच असतात. क्वचित विजेनें चालणारीं व क्वचित तेलानें चालणारीं असतात. हीं एंजिनें रूळांवर चालणार्‍या एका गाडीवर बसविलेंलीं असतात. यांमध्यें वरच्या बाजूला तापक असतो व खालच्या बाजूला तापकाखालीं एंजिन बसविलेलें असतें. हीं एंजिनेंहि सरकपडद्याचीं किंवा दट्टेपडद्यांचीं (व्हाल्व्हचीं)    असतात. बहुतकरून सगळीं शीतकविरहित असतात. क्वचित कोणी शीतकयुक्त करितात.

वाफेच्या एंजिनच्या दुसर्‍या दोन जाती आहेत. त्यांचीं नांवें एकेरी व संयुक्त (सिंगल व कांपाउंड)   एकेरी म्हणजे एका पंचपात्राचें व संयुक्त (कांपाउंड) म्हणजे दुहेरी किंवा तिहेरी एकापेक्षां जास्त पंचपात्रांचें एकापेक्षां जास्त पंचपात्रें असल्यास पहिल्यापेक्षां दुसरें मोठें असतें व  दुसर्‍यापेक्षां तिसरें मोठे असतें. पंचपात्रें जास्त असल्यानें सुरवातीचा वाफेचा दाब जास्त असून पुढें तो कमी कमी होत जातो हें मागें सांगितलेंच आहे. वाफेचा दाब वाढूं लागल्याबरोबर एंजिनमध्यें वाफेच्या प्रसरणशक्तीचा फायदा घेण्यांत येऊं लागला. पण वाफेचा दाब पुष्कळ म्हणजे १०० तें १२५ पौंडांपेक्षां जास्त झाल्यानंतर एकाच पंचपात्रांत वाफेच्या अंगच्या प्रसरणशक्तीचा उपयोग करून घेणें फार कठिण होऊं लागलें; कारण वाफेचा दाब वाढल्यामुळें पंचपात्रामध्यें येणारी वाफ लवकर बंद करावी लागे व पूर्ण पसरलेली वाफ थंड असल्यामुळें परत जातांना सर्व पंचपात्र फार थंड होऊन क्वचित वाफेचें पाणीहि होई. पंचपात्रामध्यें पाणी असणें फार धोक्याचें आहे. कारण त्यामुळें पंचपात्र किंवा त्याचें झांकण फुटण्याचा फार संभव असतो. म्हणून पंचपात्रांत येणारी वाफ एकाच पंचपात्रामध्यें पसरण्याच्या ऐवजीं दोन किंवा दोहोंपेक्षां जास्त पंत्रपात्रांमध्ये पसरू देतात. यामुळें प्रत्येक पंचपात्रामध्यें वाफ जास्त वेळ येऊं देतां येतें. व वाफ एकाच पंचपात्रांत पुरी न वापरल्यामुळें तें पंचपात्र फारसें थंड होत नाहीं. यामुळें नव्या वाफेच्या अंगची उष्णताहि उगाच पाहले (थंड झालेले भाग गरम करण्यांत) फुकट जात नाहीं. यामुळें वाफ पुष्कळच कमी पुरते. जमीनीवर चालणार्‍या एंजिनमध्यें बहुतकरून दोनच पंचपात्रें असतात. बोटीवरच्या (मरीन) एंजिनमध्यें दोहोंपासून चारपर्यंत असतात. चलद्यंत्रामध्यें (लोकोमोटिव्ह) सोयीसाठीं बहुतकरून एक पंचपात्रच असतें. क्वचित एकापेक्षां जास्त पंचपात्रांचेंहि एंजिन असतें.

वाफेच्या एंजिनची आणखी एक तर्‍हा आहे. त्याचें तत्त्ववर सांगितलेल्या एंजिनपेक्षां अगदी निराळें आहे. समजा एखादें भिरभिरें आहे. तें जर वार्‍यांत उभें केलें तर वार्‍याच्या दिशेनेंच फिरावयास लागेल. नवें जें वाफेचें एंजिन आहे त्याची व याची तर्‍हा एकच. त्याचें नांव भ्रमणयंत्र (टरबाईन).   भ्रमणयंत्रांत एका वाटोळ्या पातळ चाकाच्या धांवेवर भिरभिर्‍यासारखींच लहान लहान पुष्कळ पातीं बसविलेलीं असतात. या पत्यांवर वाफ सोडली तर त्या वाफेच्या जोरानें तीं पातीं फिरूं लागतात. यामुळें सर्व एंजिन फिरावयास लागतें. रोटरी म्हणजें आपोआप वाटोळें फिरणारें इंजिन तें हेंच. या एंजिनला दुसरे कांहींहि भाग लागत नाहींत.  कारण याची मूळ उत्पन्न होणारी गतीच वाटोळी असते. यामुळें वर सांगितलेल्या मागें पुढें होणार्‍या एंजिनांपेक्षां याला जागा फारच कमी पुरते.

भ्रमणयंत्राच्या (टरबाईनच्या) तीन तर्‍हा आहेत. एक वाफेच्या गतीनें फिरणारें, दुसरें वाफेच्या दाबानें फिरणारें व तिसरें वाफेच्या गतीनें व दाबानें फिरणारें. कोणत्याहि वायूच्या अंगीं अशी शक्ति आहे कीं, त्यावरील दाब काढला असतां त्याचा आकार मोठा होतो पण त्याच वेळीं त्यामध्यें गतिहि अतिशय उत्पन्न होते. हींच गोष्ट पहिल्या जातीच्या वाफेच्या भ्रमणयंत्रामध्यें होते. या जातीचीं भ्रमणयंत्रें अगदीं पहिल्यानें निघालीं. यांमध्यें एका लहानशा चक्राच्या धांवेभोंवतीं जीं पातीं बसविलेलीं असतात त्यांवर दाब काढून अतिशय वाढलेली पण त्यामुळें फार गति आलेली अशी वाफ सोडतात. यामुळें तें चाक अतिशय जोरानें फिरावयास लागलें. इतकें कीं लहानलहान भ्रमणयंत्रांत त्याचे फेरे मिनिटास तीस हजार होतात. म्हणून त्याचें चाक अतिशय हलकें व आंस बारीक बसवावा लागतो. दीडशें अश्वशक्तीच्या जातीच्या टरबाईनचा आंस दीड इंची असतो. यावर त्याची गति कमी करून दुसर्‍या यंत्राला जोडण्यासाठीं लहानमोठीं दांत्यांचीं चक्रें बसवावीं लागतात. या जातीचीं भ्रमणयंत्रें (टरबाईन) डी लाव्हल नांवाच्या गृहस्थानें शोधून काढलीं म्हणून त्यांना त्याचेंच नांव पडलें आहे.

दुसरी दाबाच्या जातीचीं (प्रेशर) भ्रमणयंत्रें यांना 'पारसन्स टरबाईन्स' असेंहि (तीं शोधून काढणार्‍या माणसाच्या नांवावरून) म्हणतात. वर उल्लेखिलेलीं यंत्रे मोठीं करतां येत नसत. लहान जातीचीं साधारणपणें चांगलीं चालत. पण मोठी बनवितांना त्यांची गति आड येत असे म्हणून पारसन्स साहेबानें हीं नवीं शोधून काढलीं. पारसन्स हा एक लार्डचा मुलगा होता. या जातीच्या टरबाईन्स यंत्रांमध्यें एका आंसावर एकसारखीं चाकें न बसवितां एकापेक्षां दुसरें जरा मोठें, त्यापेक्षां तिसरें मोठें अशीं १० । १२ चाकें बसवितात. वाफ पहिल्यानें अगदीं धाकट्या चाकावर सोडतात. त्यावर त्या वाफेची क्रिया होऊन ती वाफ दुसर्‍या तिसर्‍या चाकांवर अशी जात असते. अगदीं शेवटल्या चक्रामध्यें काम करून ती बाहेर पडते. बाहेर पडतांना वाफेचें अगदीं पूर्ण प्रसरण झालेलें असतें. वाफ एकदमच न पसरतां संयुक्त इंजिनप्रमाणें एकापेक्षां जास्त जागीं पसरतें. म्हणून याला कोणी संयुक्त भ्रमणयंत्र (कांपाउंड टरबाईन) असेंहि म्हणतात. या भ्रमणयंत्रा (टरबाईन)ची गति तीं लहान (२५० । ३०० हार्स पावरचीं) असल्यास पांच हजार ते सहा हजार मोठी (३० । ४० हजार हार्सपावरचीं) असल्यास दर मिनिटास दोन हजार फेरे असतात. या जातीचीं टरबाईन इंजिनें मोठ्यांत मोठीं म्हणजे सत्तर ऐंशीं हजार हार्सपावरचीं असतात. मोठी इंजिनें पाहिजे असल्यास यांच्याशिवाय दुसरीं कोणतीहि चालत नाहींत. मोठमोठ्या बोटींवर जेथें फार मोठ्या शक्तीचीं इंजिनें घालावयाची असतात. त्या ठिकाणीं याच जातीचीं इंजिनें वापरावीं लागतात.

तिसरें गतींचें व दाबाचें भ्रमणयंत्र (इंपल्स अँड प्रेशर) :- या जातीचीं टरबाईनें लहानमोठीं सर्व जातीचीं असतात. या जातींमध्यें दोन्ही जातींचे गुण एका ठिकाणीं घेण्याचा प्रयत्‍न केला आहे. याचीं चाकें एकाहून जास्त असतात पण पारसन्स इतकीं नसतात. तीं सुमारें पांच सहा असतात, यामुळें हीं लांबीमध्यें पारसन्सपेक्षां जरा कमी असतात. गती दोघांची बहुतेक सारखीच असते हीं चालण्यासहि सारखींच असतात. कर्टीस, झोली, वगैरे कांहीं लोकांचीं ह्या जातीचीं भ्रमणयंत्रें असतात. भ्रमणयंत्रें शीतकयुक्त व शीतकविरहित या दोन्हीहि तर्‍हांनीं चालवितात. पण बहुत करून दुसर्‍या प्रकारचीं विशेष चालवितात.

धुम्रयंत्रें :- (ग्यास इंजिन्स):- वाफेच्या इंजिनाशीं स्पर्धा करणारीं इंजिनें म्हणजे धूम्रयंत्रें होत. धूम्रयंत्रें व तैलयंत्रें हीं दोन्हीं पुष्कळ अंशी सारखींच असतात. त्यांची क्रिया सर्वस्वी एकच असते. फरक फक्त तेलाचा धूर करण्याची जी जास्त योजना तिच्यांतच असतो. म्हणून येथें धू्रम्रयंत्रा (ग्यास इंजिन) च्या तत्त्वाचें जें वर्णन देऊं तें तैलयंत्रा (आईल इंजिनास) सहि सर्वथैव लागू पडेल. याला लागणारा धूर (वायु) हि कोळशापासून उत्पन्न होतो. अलीकडे तेल, लांकूड, लांकडी कोळसा, भाताचें किंवा शेंगदाण्याचें भूस; टरफल इत्यादींपासून धूर करण्याचीं यंत्रें निघालीं आहेत पण ती शेंकडा पांच इतकींहि नाहींत. सर्व बहुतेक कोळशाचाच धूर करणारीं असतात. धूर जर एखाद्या नळींतून नेला व त्याला जर पेटविला तर तो पेटूं लागेल व तेथें उष्णता उत्पन्न होईल. जर एखाद्या लहान भांड्यांत कांहीं धूर व तो सर्व पेटवण्यासाठीं लागणारी हवा ही खूप मिसळून भरून ठेवली व त्या मिश्रणास कांहीं योजना करून पेटवलें तर तें सर्व मिश्रण एकदम पेटून तेथें भडका होईल. ह्याच गोष्टीचा उपयोग धूम्रयंत्र (ग्यास इंजिनें) चालविण्यास होतो. वाफेचें इंजिन निघाल्यानंतर धुराचें इंजिन निघालें. हें इंजिन निघण्याच्या अगोदर विलायतेंत साधारण मोठ्या शहरांत दिवे लावण्यासाठीं कोळशाच्या धुराचा उपयोग करण्यास सुरूवात झालेली होती. हाच धूर इंजिनें चालविण्यासाठींहि विकत मिळत असे. यामुळें लहान लहान इंजिनें चालविण्यास त्याचा फार उपयोग होण्याजोगा होता. म्हणून तैलयंत्रे निघण्याच्या अगोदर धूम्रयंत्रें प्रचारांत आलीं. धूम्रयंत्र निघाल्यानंतर तसल्याच पण धुरावर अवलंबून न राहाणार्‍या अशा यंत्राची जरूर भासूं लागल्यावरून तैलयंत्र (ऑईल इंजिन) निघालें.

हें इंजिन चांगल्या तर्‍हेनें चालू करण्याबद्दल पुष्कळ प्रयत्‍न झाले पण त्यांत फारच थोड्या लोकांस यश आलें. त्यांत पहिला-निदान ज्यानें धूम्रयंत्र चांगलें चालण्यास जी क्रिया झाली पाहिजे ती क्रिया शोधून काढण्याचा मान काउंट बो डी रोचास या फ्रेंच माणसास आहे. यानें ही क्रिया शोधून काढली खरी पण त्यानें तिचा उपयोग केला नाहीं. तो मान ऑटो नांवाच्या जर्मन गृहस्थास आहे. यावरूनच या एंजिनांतील क्रियेला ऑटोचा फेरा असें म्हणतात.

हि क्रिया अशी आहे; धूम्रयंत्राचा (ग्यास इंजिनचा) दट्ट्या मागपासून एका टोंकापासून पुढें जाणें किंवा पुढून मागें येणें याला एक धांव म्हणतात, या पहिल्या धांवेला धूर व हवा यांचें मिश्रण पंचपात्रामध्यें येतें. या वेळेस दट्ट्या पुढें जात असतो. दट्ट्या मागें येतेवेळेस हें मिश्रण दाबलें जातें. यानंतर पुन्हां दट्ट्या पुढें जाण्यास सुरवात होण्याच्या वेळेस हें दाबलेलें मिश्रण पेटतें व दट्ट्यावर जोराचा धक्का बसतो व या धक्क्यानें दट्ट्या पुढें जातो. दट्ट्या पुन्हां मागें यावयाच्या वेळेस हे जळलेले सर्व वायू बाहेर निघून जातात व पंचपात्रांत हवा व धुराचें मिश्रण पुन्हां येण्यास मोकळीक होते. यानंतर पुन्हां दट्ट्या पुढें जातो तेव्हां हवा व धूर यांचें मिश्रण पंचपात्रांत येतें. अशा रीतीनें हें गाडें चालतें. म्हणजे मिश्रण येणें, तें दबणें, नंतर पेटणें व नंतर पेटलेले वायू बाहेर जाणें या क्रिया सर्व धूर्मयंत्रांत होत असतात. हें प्रत्यक्ष ऑटोनें करून दाखविलें म्हणूनच त्याला धूम्रयंत्र तयार करण्याचा मान आहे.

सर्व लहानमोठ्या धूम्रयंत्रांत हीच तर्‍हा असते. यांत कांहीं फरक होत नाहीं. पण तैलयंत्रांत तत्त्व जरी एकच असलें तरी प्रत्यक्ष क्रियेंत थोडा फरक असतो. तो असा:- धूर हा सर्वसाधारण एकाच जातीचा असतो.  पण तेलाची गोष्ट तशी नाहीं. पेट्रोल तेलाची वाफ ताबडतोब नुसत्या हवेंत उघडे राहिल्यानें होते. राकेल तेलाला चांगलें तापवावें लागतें. यापेक्षां जास्त जाड जें तेल असतें त्याला नुसतें तापवूनच पुरत नाहीं तर त्याला आणखी फोडून त्याचे बारीक तुषार करावे लागतात. एका जातीच्या तैलयंत्रामध्यें जरी फार जाड तेल वापरतात तरी त्याला मुळींच तापवावें लागत नाहीं. उलट हवाच इतकी तापलेली असते कीं, तींत तेलाचा फवारा सोडल्याबरोबर तें तेल जळून जातें.

या तेल जळण्याच्या तर्‍हेवरून तैलयंत्रांच्या (आईल एंजिनांच्या) निरनिराळ्या जाती झाल्या आहेत. साधें पेट्रोल तेलानें चालणारें इंजिन तें पेट्रोल एंजिन. त्याच्यांत व ग्लास इंजिनमध्यें कांहीं फरक नसतो. फक्त पेट्रोलची वाफ करणारा मिश्रक (कारबुरेटर) लावलेला असतो. तसेंच यांमध्यें एंजिनमधील मिश्रणाचा दाब जास्तींत जास्त म्हणजे चाळीस पौंड असतो. तेलानें चालणार्‍या इंजिनमध्यें तेलाची वाफ होण्यासाठीं पंचपात्राच्या पाठीमागें बाष्पक (व्हेपोराईझर म्हणजे तेलाची वाफ करणारा) बसवावा लागतो. हा एंजिन चालू कराण्याच्या अगोदर तापवावा लागतो. इंजिन चालू झाल्यापासून तें चालू असेपर्यंत हा तापलेलाच रहातो. यामध्यें होणारी तेलाची वाफ व हवा यांचें मिश्रण पंचपात्रांत येतें. तें मागल्यापेक्षां जास्त दाबावें लागतें. यांत दाब दर चौरस इंचाला साठ तें ऐशीं पौंडांपर्यंत वाढवावा लागतो. यालाच खरें आईल इंजिन म्हणतात. ज्याला क्रूड आईल किंवा सेमिडीझेल म्हणतात त्यांमध्यें वापरण्याचें तेल साधारणपणें दाट असतें. तें बाष्पकामध्यें जाण्याच्या अगोदर तापवावें लागतें व बाष्पकांत जातांना त्याचे अगदीं बारीक तुषार व्हावे लागतात. तेव्हांच त्या तेलाची चांगली वाफ होते. यावेळेस तर मिश्रणाचा दाब फारच वाढवावा लागतो. म्हणजे १२५ पौंडांपासून २००-२५० पौंडापर्यंत हा दाब असतो. या तर्‍हेच्या एंजिनपासून सुरवातीला हवा व तेलाची वाफ यांचें मिश्रण पंचपात्रांत येण्याच्या ऐवजीं नुसती हवाच पंचपात्रांत येते. ती पुरी दबण्याच्या सुमारास म्हणजे दुसर्‍या धांवेच्या शेवटीं तेलाची वाफ पंचपात्रांत येते. यामुळें धांव पुरी होण्याच्या अगोदर मिश्रण पेटण्याचा संभव रहात नाहीं. नव्या निघालेल्या क्रूड आईल इंजिनमध्यें व ढीझल एंजिनमध्यें फक्त नुसती हवाच पंचपात्रांत घेतात व ती नुसती दाबतात. या दाबण्याच्या वेळी पंचपात्रामधला दाब दर चौरस इंचाला ३०० ते ५०० पौंडपर्यंत वाढतो. इतक्या दाबामुळें हवा इतकी तापते कीं, तीमध्ये तेल आल्याबरोबर तें पेटतें, निराळें कांहीं करावें लागत नाहीं.

तैलयंत्राची (आईल इंजिनची) आणखी एक तर्‍हा आहे. मागें सांगितल्याप्रमाणें ज्या इंजिनमध्यें प्रत्येक क्रियेला एक धांव लागते त्या इंजिनला चार धांवांचें इंजिन (फोर सायकल इंजिन) असें म्हणतात. पण कांहीं कांहीं इंजिनमध्यें ह्या सर्व चारी क्रिया दोनच धांवांमध्यें होतात; म्हणजे पहिल्या जातीच्या एंजिनांमध्यें ती क्रीया पूर्ण होण्यास इंजिनचे दोन फेरे व्हावे लागतात. व दुसर्‍या जातीच्या इंजिनमध्यें त्या सर्व क्रिया एकाच फेर्‍यांत होतात. याला दुधांवी (दोन धांवांचें -टू स्ट्रोक सायकलचें -) इंजिन असें म्हणतात. यामध्यें इंजिनच्या पुढल्या भागास एक पोकळी असते. ती अगदीं बंद असते. इंजिनमध्यें मिश्रणाचा भडका झाल्यानंतर जेव्हां दट्ट्या पुढें येतो त्यावेळीं या पुढल्या भागामध्यें असलेली हवा दबते. दट्ट्या खालीं येऊन ही हवा जेव्हां पुरी दबते त्यावेळेस दट्ट्याच्या योगानें आपोआप दोन द्वारें उघडून एकामधून जळलेले वायू निघून जातात व दुसर्‍यामधून ही दबलेली हवा आंत येते. याच वेळेस तेलाची वाफहि आंत येते. दट्ट्या परत जातानां हें मिश्रण दबलें जातें. धांव परी होण्याच्या वेळेस हें मिश्रण पेटून दट्ट्या पुन्हां खालीं येतो. याप्रमाणें हें इंजिन चालतें. हें इंजिन चार धांवांच्या इंजिनपेक्षां जास्त साधें असतें. पण याला तेल थोडें जास्त लागतें.

धुराचें इंजिन किंवा तेलाचें इंजिन :- हें वाफेच्या एंजिनप्रमाणेंच मागेंपुढें होणारें एंजिन आहे. यामुळें याचे व त्याचे बरेचसे भागहि अगदीं एकच असतात. पण वाफेच्या इंजिनमध्यें असणार्‍या कांहीं भागांमध्यें फरक असतो. वाफेच्या इंजिनला ज्याप्रमाणें दट्ट्याच्या दांड्याला मार्गदर्शक (गाईड) लावलेला असतो त्याप्रमाणे तेलाच्या एंजिनमध्यें असत नाहीं. कारण ह्याची शक्ति दट्ट्याच्या एकाच बाजूला उत्पन्न होत असल्यामुळें दट्ट्याची दुसरी बाजू उघडी असली तरी चालते. व ती उघडीहि असते. फक्त दट्ट्याचा दांडा लांब करितात. यामुळें दट्ट्या व मार्गदर्शक अशीं दोन्हीं कामें एकाच दांड्याकडून होतात. दट्ट्यामध्येंच 'गजनपिन' बसविलेली असते व तिलाच जोड दांड्याचें एक टोंक जोडलेलें असतें.

तथापि कांहीं फार मोठ्या धुराच्या इंजिनमध्यें व दोन धांवांच्या मोठमोठ्या डीझल इंजिनमध्यें दट्ट्याच्या दोन्ही बाजूलां शक्ति उत्पन्न होत असते. अशा ठिकाणीं सर्व व्यवस्था वाफेच्या एंजिनप्रमाणेंच करावी लागते. क्वचित कांहीं तेलाचीं इंजिनें करणारे आपल्या एंजिनमध्यें मार्गदर्शक (गाईड) लावतात. बहुतकरून असलीं इंजिनें दोन धांवांची असतात. व त्यांचे परिवर्तक बंद नसतात. दट्ट्याच्या पुढेंच एक बंद भाग असतो, त्यांतच हवा दबली जाते.

दाबलेल्या हवेची इंजिनें फार थोड्या ठिकाणीं विशेषत: अगदीं कांहीं विशेष जरूर असल्याशिवाय कोणी वापरीत नाहींत. त्यांतलें तत्त्व व वाफेच्या इंजिनाचें तत्त्व हीं दोन्हीं एकच असतात. फक्त एंजिनच्या रचनेंत मात्र कांहीं थोडा फरक असतो. वाफेच्या चालू इंजिनला जर तितक्याच तर्‍हेच्या दाबाची हवा आणून जोडली तर तेंहि चालेल. पण हीं इंजिनें उर्फ हत्यारें फार लहान असतात. त्यांचा उपयोग दगड घडणें. फोडणें, टाकी देणें, भोकें पाडणें अशा विशेष ठिकाणींच होतो. दुसर्‍या कोठें यांचा मोठ्या शक्तिसाठीं मुळींच उपयोग होत नाहीं.

जलयंत्र (हैड्रालिक एंजिन) :- पाण्याच्या जोरानें चालणारीं एंजिनें. यांच्यांत दोन प्रकार येतील. एक, एखाद्या दुसर्‍या मोठ्या यंत्राच्या सहाय्यानें फार दाबाचें पाणी उत्पन्न करणें व त्यानें दुसरी लहान लहान यंत्रें चालविणें. दुसरें पाण्याचा दाब, जसें नदीचा प्रवाह किंवा उंचावर बांधलेलें तळें, अशाचा फायदा घेऊन त्यापासून पाण्याच्या चक्क्या वगैरे घालून शक्ति उत्पन्न करणारीं. पहिल्या तर्‍हेचीं यंत्रें किंवा इंजिनें हीं पूर्ण इंजिनें नव्हतच. कारण तीं जरी कांहीं शक्ति उत्पन्न करितात तरी त्यांना दुसर्‍यांवर अवलंबून रहावेंच लागतें. म्हणून तीं यंत्रेंच. याचें सर्वसाधारण उदाहरण म्हणजे गोदींतल्या यार्‍यांना मिळणारें दाबाचें पाणी गोदीच्या एका बाजूला मोठें थोरलें इंजिन आणि पंप लावून तयार करावें लागतें. दुसर्‍या तर्‍हेचीं इंजिनें मात्र खरी इंजिनें. कारण तीं शक्ति उत्पन्न करितात. ज्याप्रमाणें पाण्याची उंची कमी जास्त असेल त्याप्रमाणें यांचे चार पांच भेद आहेत. त्यांची नांवें अध:प्रवाही (अंडर शाट व्हींल), उपरि प्रवाही (ओव्हशाट व्हील), लोहेड वाटर टरबाईन हायहेड वाटर टरबाईन, पेल्टन व्हील इत्यादि.

अध:प्रवाही चक्र (अंडर शाट व्हील) :- जेथें पाण्याची उंची म्हणजे पाणी जेथून विशिष्ट जागेवर पडतें त्याच्यामधील उंचीचें अंतर १० ते २५ फूट असेल त्या ठिकाणीं या जातीचीं चक्रें बसवितात. हीं चक्रें खूप मोठीं म्हणजे १०-१२ फूट व्यासाचीं सुद्धां केव्हां केव्हां असतात. या चक्रांच्या धांवेवर धांवेइतके रूंद पाण्याच्या वाटेंत आडवे येतील असे तुकडे बसविलेले असतात. धांवेचा खालचा भाग पाण्यांत थोडासा बुडेल अशा तर्‍हेनें हीं बसविलेलीं असतात. पाणी वहात असतांना त्यांच्याबरोबर चाकाच्या धांवेवर बसविलेल्या तुकड्यांवर जोर येऊन तींहि फिरावयास लागतात. व चाक फिरूं लागतें. असल्या तर्‍हेच्या चाकांचा जुने लोक पुष्कळ उपयोग करीत असत. विलायतेंत बहुधा याच्यावर धान्य दळण्याची चक्की चालत असे. उंची जर पंचवीस फुटापेक्षां जास्त असेल तर त्या ठिकाणीं उपरिप्रवाही चक्र (ओव्हरशाट व्हील) हें बसवीत असत. यासाठीं पाणी बहुतकरून बांधून जरा बाजूला आणावें लागत असे. यांतहि चाकांच्या धांवेवरच पट्ट्या बसविलेल्या असतात; पण त्यांचा आकार कांहींसा निराळा असतो. यांमध्यें चाक पाण्यांत बंडालेलें नसतें. पाण्याचा लोंढा चाकावर वरच्या बाजूनें पडत असतो व त्याच्या जोरानें चाक फिरतें. पण हीं दोन्ही फार मोठ्या शक्तीचीं करतां येत नाहींत. व त्या वेळेस मोठ्या शक्तीची करण्याची जरूरहि नव्हती. पण पाण्याच्या शक्तीचा वीज उत्पन्न करण्याच्या कामीं उपयोग व्हावयास लागल्यापासून हीं चाकें मागें पडली व दुसरीं पाण्याचा चांगला उपयोग करणारीं पुढें आलीं.

अल्पोच्चताभ्रमित चक्र :- जेथें पाण्याची उंची फार नसेल तेथें हें (लो हेड वाटर टरबाईन) वापरतात. हें फार साधें असतें. बोटींचा पंखा पुष्कळांनीं पाहिला असेलच. अगदी जवळ जवळ त्याच आकाराचीं हीं असतात. पाण्याची उंची थोडी असल्यामुळें यांतून पाणी फार जावें लागतें. यामुळें यांचा आकारहि मोठा करावा लागतो. म्हणूनच यांची गतीहि फार कमी असते हीं अगदीं नवीं निघालेलीं आहेत.

जेथें पाण्याची उंची जास्त असते, उदाहरणार्थ कांहीं शेंकडे फूट असते त्या ठिकाणीं बहूच्चताभ्रमितचक्र (हाय हेड वाटर टरबाईन) वापरतात. हीं दोन जातींचीं असतात. एकामध्यें पाणी टरबाईनमध्यें बाहेरून येतें. व तें टरबाईनच्या मधल्या भागांतून बाहेर जातें. दुसर्‍यामध्यें पाणी मधल्या भागांतून टरबाईनमध्यें शिरून बाहेरच्या बाजूनें बाहेर जातें. दोन्हीमध्येंहि कांहिं फायदे व कांहीं तोटे आहेतच. यांची रचना कांहींशीं वाफेनें चालणार्‍या टरबाईनसारखी किंवा अगदीं साधारण प्रचारांतलें उदाहरण म्हणजे भिरभिर्‍यासारखी असते. तत्त्वांत फरक मुळींच नाहीं. फक्त कृतींत मात्र चांगल्या रीतीनें उपयोगी पडेल असा फरक करावा लागतो.

जेथें पाण्याची उंची फारच म्हणजे पांचशें फुटांहून जास्त असेल अशा ठिकाणीं पेल्टन व्हील म्हणजे पेल्टन साहेबानें केलेलें चाक वापरतात. यामध्यें एका चाकाच्या धांवेवर समांतर अशीं अर्ध्यां बादलीच्या आकाराचीं भांडीं बसविलेलीं असतात. तीं एका बंद झांकणामध्यें फिरतील अशी व्यवस्था केलेली असते. या भांड्यांवर नळातून आणलेलें पाणी एक किंवा एकापेक्षां जास्त तोट्यांमधून खूप जोरानें पडतें. याच्या चाकांना वेगहि पुष्कळ असतो. पन्नास अश्वशक्तीपासून पांचहजार किंवा जास्त शक्तीचीहि या जातीचीं चाकें वापरतात. मोठ्या शक्तीघरांमध्यें यांचा पुष्कळ उपयोग केला जातो. पाण्याचीं सर्व इंजिनें वाटोळीं फिरणारीं असतात. वाफेच्या किंवा आईलइंजिनासारखीं मागें पुढे होणारीं नसतात.

सू र्य यं त्रें :- सूर्याच्या उष्णतेचा शक्ति उत्पन्न करण्यासाठीं उपयोग करण्याचा पुष्कळ प्रयत्‍न झाला. पण अजून त्यांत फारसें यश आलें नाहीं. तथापि त्या बाजूनें कांहीं प्रयत्‍न चालू असून कांहीं इंजिनेंहि चालू झालीं आहेत. सूर्याकिरणांमध्यें पुष्कळ शक्ति भरलेली आहे. नुसत्या हिशोबानेंच पाहिलें तर एकट्या सहाराच्या वाळवंटांत इतकी शक्ति उत्पन्न होईल कीं, ती सर्व जगांतले कारखाने चालविण्यास पुरून उरेल. तथापि ही गोष्ट अजून साध्य झाली नाहीं. तरी पण शूस्टर नांवाच्या अमेरिकन गृहस्थानें ईजिप्तमध्यें नाईल नदीवर एक यंत्र करून बसविलें आहे. त्यानें पाणी पंप करण्याचें काम चालतें.

या यंत्रामध्यें सूर्याच्या उन्हाच्या उष्णतेचा उपयोग तापकामकध्यें वाफ उत्पन्न करण्याच्या कामीं केला आहे. उन्हाची उष्णता पाण्याची वाफ करण्याइतकी नाहीं. पण जर उन्हाच्या उष्णतेची दुप्पट किंवा कांहीं जास्तपट करतां आली तर तिनें वाफ उत्पन्न करतां येते. याचाच या यंत्रांत उपयोग केलेला आहे. एक मोठी परवलयाच्या (पाराबोलाच्या) आकाराची चौकट केली आहे.  त्या चौकटींत पुष्कळसे आरसे बसविण्याची व्यवस्था केली आहे. यामुळें त्यापासून पडणारे उन्हाचे कवडसे एका समांतर रेषेंत येतात. दर कवड्याची उष्णता त्यावर पडणार्‍या उन्हाच्या उष्णतेइतकीच असते. पण ते समांतर रेषेंत एका ठिकाणीं आले म्हणजे त्या ठिकाणची उष्णता कवडशांच्या संखेच्या प्रमाणांत वाढते. या चौकटीच्या मध्यभागीं एक तापक पाण्यानें भरून ठेवलेला असतो. त्यावर सर्व कवडसे एकवटून पडल्यानें पाण्याला पुष्कळ उष्णता मिळून त्या पाण्याची वाफ व्हावयास लागते. चांगली वाफ होऊं लागली म्हणजे ह्या वाफेनें इंजिन चालवितात. सूर्य फिरत असल्यामुळें जसजसा सूर्य फिरेल तशी तशी आरशांची चौकट फिरण्याची व्यवस्था केलेली असते. यामुळें ती चौकट सदोदित सूर्यासमोर राहून तापकावर सारखे कवडसे पडलेले रहातात. यामुळें तापकामध्यें वाफ होण्याची क्रिया बंद पडत नाहीं.

या जातीचें यंत्र एकदां बसविलें असतां मागून त्याला फारसा खर्च येत नाहीं. पण तें पहिल्यानें बसविण्यासच फार खर्च म्हणजे त्याच शक्तीच्या दुसर्‍या एंजिनाच्या जवळ जवळ चौपट लागतो. तसेंच हीं इंजिनें ज्या ठिकाणीं ऊन पुष्कळ दिवस व सारखें असेल. अशाच ठिकाणीं यांचा उपयोग होऊं शकेल. तसेंच हें इंजिन अजून फारसें पूर्णावस्थेस गेलेलें नाहीं, व याचें तत्त्वहि फारसें कोणाला समजत नाहीं. म्हणून हीं अजून प्रयोगावस्थेच्या फारशीं पुढें गेलीं नाहींत. पण जसजसा कोळसा कमी होत जाईल तसतशीं हीं इंजिनें पुष्कळ पुढें येण्याचा संभव आहे.

आणखी एक शक्ति उत्पन्न करणारें इंजिन म्हणजे पवनचक्की. याचें इंग्रजी नांव विंडमिल असें आहे. पुष्कळांनीं या पहिल्या असतीलच या जमिनीबरोबर बसवून चालत नाहींत. कारण जमिनीजवळून वारा फारसा वहात नसतो. या जमिनीच्या सपाटीपासून पंचवीस ते पन्नास फुटांपर्यंत बसविलेल्या असतात. या बसविण्यासाठीं एक लोखंडी चौकोनी पोकळ शंकूच्या आकाराची उभी चौकट करावी लागते. या चौकटीच्या वरच्या टोंकावर भिरभिर्‍याच्या आकाराचें एक चाक बसविलेलें असतें तें चाक वार्‍याच्या प्रवाहांत रहाण्यासाठीं कोणच्याहि बाजूला फिरावें असें केलेलें असतें. हें चाक वार्‍याच्या प्रवाहानें फिरत असतें. या फिरण्यापासून दांत्यांच्या चाकानें दुसरा एक दांडा फिरण्याची व्यवस्था केलेली असते. आपल्याला जें कांहीं कार्य करावयाचें असेल तें याच चक्रापासून करून घ्यावयाचें असतें.

हीं इंजिनें फार मोठी असूं शकत नाहींत. तसेंच यांचें काम वार्‍याच्या जोरावर असल्यामुळें यांपासून मिळणारी शक्तीहि अनिश्चितच असते. वार्‍याचा जोर चांगला असल्यास शक्ति चांगली मिळते. मुळीं वाराच नसल्यास इंजिन थांबतें. शिवाय ही सधारणपणें ५-६ अश्वशक्तीपेक्षां जास्त मोठीं नसतात. हॉलंड देशांत यांचा उपयोग फार करितात. कारण त्या देशांत समुद्राच्या बाजूनें वारा सारखा वहात असतो. त्या ठिकाणीं बहुतकरून यांचा उपयोग पाण्याचे लहान लहान पंप चालविण्यासाठींच फार होतो. आपल्या कडेहि तोच उपयोग करितात. हल्लीं एका अमेरिकन गृहस्थानें त्याच्यापासून विजेचे दिवे लावण्याची युक्ति काढली आहे.

याशिवाय भरती आहोटीच्या पाण्याच्या जोरापासून शक्ति उत्पन्न करणें, समुद्राच्या लाटांच्या जोरापासून शक्ति उत्पन्न करणें वगैरे पुष्कळ प्रयोग चालू आहेत. प्रयोग या नात्यानें यामध्यें बरेच  यशहि येत आहे. पण आजमितीला त्या युक्त्या प्रयोगावस्थेच्या पलीकडे गेल्या नाहींत. म्हणून शक्ति उत्पन्न करणारीं इंजिनें या दृष्टीनें त्यांचा येथें नुसता नामनिर्देश केला आहे. जास्त कांहीं लिहिलें नाहीं.     
(ले. दिवाकर यशवंत फाटक.)              

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .