विभाग नववा : ई-अंशुमान
एडन कालवा - बंगालमधील वरद्वान व हुगळी या जिल्ह्यांमध्यें असलेला पाणी देण्याचा कालवा. प्रांतांच्या ले. गव्हरवरून हें नांव पडलें. ह्या कालव्यांत दामोदर नदीचें पाणी खेळविलें आहे. ह्या कालव्याच्या बांधणीस सुरवात १८७३ मध्यें झाली; व १८८१ मध्यें हा कामास आला. हा बांधण्यास अंदाजे ७.८ लाख रूपये खर्च आला.