विभाग नववा : ई-अंशुमान
एडप्पल्ली - मद्रासमधील त्रावणकोर संस्थानांत असणार्या कुन्नननाड तालुक्यांतील छोट्या संस्थानांपैकीं सर्वांत मोठें संस्थान. क्षेत्रफळ साडेसहा चौरस मैल. लोकसंख्या (१९०१) १३३४८. हें नम्बुद्री ब्राह्मणाच्या ताब्यांत असून त्याला एडप्पल्ली राजा म्हणतात.