प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

एडवर्ड - (१) 'एडवर्ड दि कनफेसर' हा दुसर्‍या एथलरेडचा मुलगा होता. याची आई एम्मा ही नॉर्मंडीचा ड्यूक जो रिचर्ड त्याची मुलगी होती. १०१३ सालीं स्वेन हा जेव्हां इंग्लंडचा राजा झाला, तेव्हां एथलरेड हा आपल्या बायकांमुलांसह नॉर्मंडी येथें पळून गेला. १०४१ सालीं हार्डी कॅन्यूट यानें त्याला बोलावल्यामुळें तो इंग्लंडला परत आला. त्यानें आपल्या पश्चात एडवर्डला राज्याचा वारस ठरविलें. पुढें १०४२ सालीं हार्डी कॅन्यूट याच्या मरणानंतर तो राजा झाला. १०४३ व त्याला राज्याभिषेक करण्यांत आला.

एडवर्ड हा अर्धा इंग्लिश व अर्धा नॉर्मन असल्याकारणानें त्याचें लक्ष नॉर्मन लोकांकडे बरेंच असें. त्यानें आपल्या दरबारीं बर्‍याच नॉर्मन लोकांना जागा दिल्या होत्या. जुमांजेझ गांवचा रॉबर्ट या नॉर्मन जोग्याला त्यानें लंडडचा धर्मगुरू नेमलें. राजाच्या मर्जीतल्या या सर्व नॉर्मनांना दाबांत ठेवणारा असा वेसेक्सचा अर्ल गॉडविन हा एकटाच पुरूष होता. त्याची कन्या एडिथ हिच्याशीं एडवर्डनें विवाह केला होता. गॉडविनचा त्या वेळीं सर्व देशावर अमंल चालत असे; पण एडवर्डच्या मर्जीतील नॉर्मन लोकांनां हें मुळींच आवडत नसें. याच सुमारास एडवर्डचा मेहुणा बूलोनचा यूस्टिस याचा डोव्हर येथील लोकांशीं तंटा झाल्यामुळें डोव्हरच्या लोकांना शासन करण्याचे काम एडवर्डने गॉडविन याला सांगितलें; पण गॉडविननें तें नाकारलें. तेव्हां गॉडविन याच्यावर भलतेसलते आरोप ठेवून एडवर्डनें गॉडविन यास अपराधी ठरविलें. तेव्हां गॉडविन हा फ्लँडर्स येथे पळून गेला; पण लगेंच पुढील सालीं तो परत आला. विटेन (बुधजन) मंडळानें त्याला त्याची पूर्वीची जागा देऊं केली; पण गॉडविननें या जागेचा एक वर्ष उपभोग घेतला नाहीं तोंच तो आकस्मात मरण पावला. त्याच्यामागें त्याचा दुसरा मुलगा हॅरोल्ड याला गॉडविनची जागा मिळाली. त्यानें नॉर्थबर्लंड व वेल्स या प्रांतांत जे बखेडे झाले होते ते सर्व मिटविले. हॅरोल्डच्या अमलाखालीं लोक फार संतुष्ट होते. एडवर्डनें वेस्टमिनिस्टर येथें एक मठ बांधविण्यास सुरवात केली होती; पण तो पुरा झालेला पहाण्याचें त्याच्या नशीबीं नव्हतें. तो १०६६ च्या जानेवारींत ५ व्या तारखेस मरण पावला.

एडवर्ड हा साधुवृत्तीचा माणूस होता. राजाच्या अंगीं जे गुण असावे लागतात, त्या सर्व गुणांचा त्याच्या ठायीं अभाव होता. त्याच्या स्वभावामध्यें एक प्रकाराचा लोकांनां भारून टाकण्याचा गुण होता.

[संदर्भ ग्रंथ - डॉ. लॉर्ड यांनीं संपादित केलेलें. 'लाईफ ऑफ एडवर्ड दि कनफेसर. (लंडन १८५८)]

(२) पहिला (१२३९-१३०७):- इंग्लंडचा राजा एडवर्ड हा तिसर्‍या हेनरीचा ज्येष्ठ मुलगा होय. स्पेनचा राजा आलफान्सो याच्याबरोबर हेनरीनें जो तह केला, त्या तहांत स्पेनच्या राजाची सावत्र बहीण एलेनॉर इच्याशीं एडवर्डचें लग्न व्हावें असें एक कलम होतें. अर्थातच स्पेनच्या राजाच्या बहिणीशीं लग्न करून घ्यावयाचें म्हणजे एडवर्डला देखील त्या मानाप्रमाणें खर्च चालवितां यावा इतका बडा तनखा मिळणें जरूर होतें. तेव्हां त्यासाठीं हेनरीनें त्याला गास्कनीची डची, चेस्टरचें अर्लडम, वेल्समधील सरकारी जमिनी व इतर बरीच जहागीर दिली. १२५४ त एडवर्डनें ही सर्व जहागीर आपल्या ताब्यांत घेतली. नंतर त्याच वर्षाच्या आक्टोबर महिन्यामध्यें तो स्पेनमध्यें गेला असतां आल्फान्सो यानें त्याला सरदारीचा किताब दिला व एलेनॉरशीं त्याचें लग्न लवून दिलें. तो परत गास्कनी येथें आल्यावर त्यानें वेल्सच्या आपल्या जहागिरींत सुव्यवस्था लावण्याची खटपट चालविली. इंग्लिश कायद्यांचा अंमल त्या ठिकाणीं करण्यास त्यानें सुरवात केली; पण वेल्समधील लोक चालू असलेले वेल्स कायदे नाहींसे करून इंग्रजी कायदे चालू करण्याच्या विरूद्ध होते त्यामुळें वेल्स लोकांचा एडवर्डवर फार राग झाला. शिवाय लहानपणीं तो गविष्ठ व उद्दाम असल्यानें तो लोकांनां अप्रिय झाला होता. १२५८ त 'ऑक्सफोर्डच्या कराराला' (प्रोव्हीजन्स ऑफ ऑक्सफोर्डला) त्यानें विरोध केल्यामुळें तो अधिकच अप्रिय झाला; पण पुढें त्यानें आपलें धोरण बदललें. १२५९ त त्यानें राज्यव्यवस्थेंत सुधारणा करूं पहाणार्‍या सरदार लोकांशीं संगनमत करून त्यांनां आपला जोराचा पाठिंबा दिला. १२६३ त जो राजपक्ष स्थापन झाला होता. त्यांत याचें प्रामुख्यानें अंग होतें. १२६४ त राजा व बॅरन यांमध्यें जें युद्ध झालें त्यांत त्यानें महत्त्वाचा भाग घेतला. या लढाईंत राजाच्या वतीनें त्यानें चांगला पराक्रम गाजविला; पण लंडनच्या लोकांचा बेसुमार पाठलाग त्यानें केल्यामुळें राजपक्षीयांचा पराजय झाला व एडवर्डला लीस्टरला शरण जावें लागलें. हिअरफोर्ड येथें लीस्टरनें एडवर्डला कैदेंत ठेवलें होतें; पण १२६५ त त्यानें हरप्रयत्‍नानें सुटका करून घेतली. त्याच्या कैदेंतून निसटल्यानंतर लगेच त्यानें आपले जुने मित्र गोळा केले व त्यांच्या साहाय्यानें त्यानें लीस्टरवर स्वारी केली व लीस्टरला ईव्हशॅमच्या लढाईंत ठार मारलें.

सन १२७० त एडवर्ड हा 'धर्मयुद्धा'ला गेला. तो तिकडे असतांना इकडे हेनरी वारला. तेव्हां त्याच्या पाठीमागें एडवर्ड हा राजा झाला म्हणून लोकांस जाहिर करण्यांत आलें व तो धर्मयुद्धाहून परत येईपावेतों 'रॉयल कौन्सिल' अगर राजकीय मंडळानें त्याच्या नांवानें राज्यकारभार चालविला. एडवर्ड परत आल्यावर त्याला १२७४ त ऑगस्टच्या १९ व्या तारखेस राज्याभिषेक केला. या वेळीं तो वयानें ३५ वर्षांचा असून बांध्यानें उंच व बळकट होता. त्याचे केस काळे भोर असून डोळे सौम्य होते. तो आचरणानें अत्यंत शुद्ध होता. आपल्या मित्रमंडळींनां तो अतिशय प्रिय असे. आईबापांवर त्याच्या अत्यंत भक्ति होती. खेळांचा त्याला विशेषत: शिकारीसारख्या मर्दानी खेळांचा अतिशय नाद असे. तो लहानपणीं जरी थोडा कोपिष्ट होता तरी पुढें त्यानें आपला दोष नाहींसा करून टाकला. आपल्या नोकरचाकरांनां तो केव्हांहि कडक तर्‍हेनें वागवीत नसे. आपल्या बापाच्या चुका त्यानें पाहिल्या होत्या. यास्तव आपल्या लोकांचें प्रेंम जोडावें आणि त्यांनां चांगले कायदे करून द्यावे अशी त्याची फार इच्छा होती. आपलें राज्यकारभाराचें धोरण लोकांनां पसंत पडेल अशा तर्‍हेनें तो आंखीत असे.

राज्यारूढ होतांच त्यानें तत्कालीन राज्यशासनपद्धतींत सुधारणा करून ती जेणेंकरून चांगल्या प्रकारची व जोमदार होईल अशी करण्याच्या प्रयत्‍नास सुरवात केली. या कामांत त्याला राबर्ट बर्नेल, वेल्स व बाथचा धर्मगुरू यांचें उत्कृष्ट साहाय्य झालें. त्या वेळीं प्रचलित असलेल्या कायद्यांमध्यें त्यानें सुधारणा करण्याचा उपक्रम सुरू केला. प्रत्येक वर्षी तो कोणताना कोणता तरी नवा कायदा करीत असे. सरंजामी सरदारांचें ('फ्यूडॅलिझम' चें) वजन राजकारणातून नाहींसें करण्याकडे त्याचें लक्ष्य होतें. जे मतदार लेखी जामीन लिहून देणार नाहींत त्यांचा मत देण्याचा अधिकार काढून घ्यावयाचें त्यानें ठरविलें; पण ही त्याची योजना सरसहा अमलांत आणतां आली नाहीं. तो जरी पुराणमताभिमानी होता तरी स्वत: न केलेले कायदे पाळण्याची त्याची तत्परता नसल्यामुळें पेकहॅम वगैरे धर्मगुरूंशीं त्याला झगडावें लागलें. मॉर्टमेनच्या स्टॅट्यूटनें त्यानें राजाच्या परवानगीशिवाय धर्ममंडळांनां जमीन दान देण्याची मनाई केली. तसेंच, 'सर्कमस्पेक्टेअ‍ॅगॅटिस' च्या हुकुमानें धार्मिक कृत्याशिवाय दुसर्‍या कोणत्याहि कार्याकरितां चर्चची जागा वापरण्यांत येऊं नये असें त्यानें ठरविलें. या दोन्ही कायद्यांच्या बाबतींत धर्मगुरूंनीं त्याला बराच विरोध केला. पण तडजोड करून त्यानें कसाबसा हा विरोध दूर केला. जमीनींच्या संबंधींचे कायदे त्यानें फार काळजीपूर्वक सुधारले. न्यायदानाच्या पद्धतींतहि त्यानें इष्ट त्या सुधारणा घडवून आणिल्या.

याशिवाय त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानें वेल्सदेश जिंकला ही होय. वेल्सचा राजपुत्र लुएलिन हा एडवर्डचा मांडलिक असतांना त्यानें एडवर्डची सत्ता झुगारून देण्याचा प्रयत्‍न चालविला होता. पुष्कळ दिवस एडवर्डनें तिकडे फारसें लक्ष दिलें नाहीं. पण लुएलिन हा कांहींच ऐकत नाहीं असें पाहातांच त्याच्यावर त्यानें १०७७ मध्यें स्वारी केली व लुएलिनचा त्यानें पराभव करून त्याला शरण येण्यास भाग पाडिलें. एडवर्डनें त्याचा मांडलिकीचा अधिकार काढून आपला अंकित संस्थानिक या दर्ज्याला त्याला आणून बसविलें. पुढें वेल्स देशांत ज्यावेळीं त्यानें इंग्रजी कायदे चालू केले त्यावेळीं वेल्स लोकांचीं मनें असंतुष्ट झालीं. ही संधि साधून लुएलिननें पुन्हां बंड केलें. पण एडवर्डनें त्याचा पुन्हां चांगला पराभव केला. लुएलिन हा या लढाईंत ठार मारला गेला. एडवर्डनें वेल्स देश इंग्लडच्या राज्याला जोडला.

परराष्ट्रीय धोरण आंखण्याच्या बाबतींत एडवर्ड हा फार काळजी येत असे. फ्रान्सचा राजा तिसरा फिलिफ याशीं त्याचें अंतस्थ नीट नव्हतें तरी तो वरकरणी त्याच्याशीं सरळ रीतीनें वागतो असें दाखवीत असे. पुढें १२८५ सालीं फिलिप वारल्यानंतर फिलिप दि फेअर फ्रान्सच्या गादीवर बसला. त्यावेळीं तो फ्रान्सला गेला व त्यानें फिलिपचें अभिनंदन केलें. याच सुमारास दोनतीन वर्षें तो गास्कनीमध्यें सुधारणा करण्याच्या बाबतींत गर्क झाला होता. त्यामुळें त्याच्या गैरहाजरींत इंग्लडमध्यें बरीच अंदाधुंदी माजली. पुढें १२८९ सालीं तो इंग्लडमध्यें परत आला व त्यानें ती अंदाधुंदी मोडून टाकली. १२९० सालीं त्यानें सर्व यहुदी लोकांना इंग्लड सोडून जाण्याच्या हुकूम केला.

यानंतर त्याचें लक्ष्य स्काटलंडकडे वेधलें. १२८६ सालीं स्कॉटलंडचा तिसरा अ‍ॅलेक्झांडर राजा मरण पावला तेव्हां त्याच्या गादीला वारस त्याची नात मार्गारट ही होती. हिचें व आपला ज्येष्ठ पुत्र एडवर्ड यांचें लग्न झाल्यास इंग्लड व स्कॉटलंड यांची एकी होईल या हेतूनें एडवर्डनें आपल्या मुलाचा विवाह तिच्याशीं करावयाचें ठरविलें होतें; पण ती एकाएकीं वारल्यामुळें स्कॉटलंडच्या गादीवर कोणी राजा अगर राणी राहिली नाहीं तेव्हां त्या गादीवर आपला हक्क सांगण्याकरतां तद्देशीय पांच बडे गृहस्थ पुढें आले. यांपैकीं कोणाला राज्यपद द्यावें हें ठरविण्याचें काम स्कॉच मंत्रिमंडळानें एडवर्डकडें सोंपविलें. एडवर्डनें या मंत्रिमंडळाकडून 'मी स्कॉटलंडचा फ्यूडल लॉर्ड आहे' असें कबूल करून घेतल्यानंतर या पांच वारसदारांची नीट चौकशी करून, जॉन बेलियल यास स्कॉटलंडचा राजा म्हणून पसंत केलें. त्याप्रमाणें बेलियल हा स्कॉटलंडचा राजा झाला व त्यानें एडवर्ड हा आपला अधिराज आहे असें कबूल करून त्याला प्रमाण केला; पण हें करणें स्कॉट लोकांनां पसंत पडलें नाहीं. त्यांनीं एडवर्डला स्कॉटलंडचा अधिराज म्हणण्याचें नाकारलें; व बेलियलची सत्ता झुगारून दिली; व फ्रान्सशीं गुप्त तह केला. गास्कनीसंबंधानें फ्रान्स व इंग्लडचें याच वेळीं वाकडें आलें. वेल्स लोकांनीहि या वेळीं बंड उभारलें. अशा रीतीनें एडवर्डवर एकापाठीमागून एक अशीं संकटें आलीं. या संकटांचें निवारण करण्यासाठीं त्यानें इंग्लडमधील सरदार लोकांची व इतर लोकांची मिळून एक सभा बोलावली व पुढें कोणतें धोरण स्वीकारावें यासंबंधींची त्यानें खुल्या दिलानें त्यांच्याशीं चर्चा केली. त्यांच्या संमतीनें त्यानें वेल्सवर स्वारी करून वेल्स देश पादाक्रांत केला व १९२६ मध्यें स्कॉटलंड जिंकून घेतलें. जिकडे तिकडे शांतता प्रस्थापित झाल्यानंतर गास्कनांची कायमची व्यवस्था लावण्याचें त्यानें मनांत आणिलें. पण याच सुमारास कांहीं भानगड उपस्थित होऊन धर्मगुरूंनीं कर देण्याचें नाकारलें. सरदार लोकांनीं गॉस्कनीवरील स्वारींत मदत करण्याचें नाकारलें. त्यामुळें त्यांच्या मदतीशिवायच एडवर्डला फ्रेंचावर स्वारी करणें भाग पडलें. त्याच्या गैरहजीरींत राज्याची व्यवस्था पहाणार्‍या अधिकारी मंडळावर सरदार लोकांनीं दाब पाडून जुलमी करांपासून संरक्षण करणारे कायदे नाखुषीनें कां होईना मान्यता देणें भाग पडलें. एवढ्यावरच एडवर्डवरील संकट थांबलें नाहीं. १२९७ मध्यें विल्यम वॉलेसच्या आधिपत्याखालीं स्कॉच लोकांनीं बंडाचें निशाण उभारलें. तेव्हां एडवर्डला त्यांच्याविरूद्ध शस्त्र उगारावें लागलें. १२९९ मध्यें फालकर्क येथें तुंबळ युद्ध होऊन एडवर्डनें स्कॉच लोकांचा पुरा पराभव केला. एकाच वेळीं स्कॉटलंड व फ्रान्स या दोन्ही शत्रूंशीं युद्ध चालू ठेवणें शक्य नाहीं असें एडवर्डला आढळून आल्यामुळें त्यानें फ्रान्सशीं तह केला, व फ्रेंच राजाच्या बहिणीशीं-मार्गारेटशीं-त्यानें लग्न केलें. नंतर १३०३ सालीं एडवर्डनें स्कॉटलंड पूर्णपणें कबजांत आणण्याचें ठरविलें. त्याप्रमाणें १३०५ सालीं स्कॉच लोकांनां त्यानें जेरीस आणलें व त्यांचा पुढारी वॉलेस याचा शिरच्छेद केला. पण याच सुमारास बेलियलचा प्रतिस्पर्धी ब्रूस यानें आपल्याला स्कॉटलंडचा राजा म्हणवून घेतलें व एडवर्डविरूद्ध त्यानें बंड पुकारलें. त्यामुळें वृद्धावस्थेंत असून सुद्धां या बंडाचा बीमोड करण्याचें एडवर्डनें ठरविलें. त्यानें जातीनें युद्धावर जावयाचें ठरविलें; पण स्कॉटलंड त्याच्या दृष्टीच्या टप्प्यांत आलें असतां बर्घ ऑन सँड्स गांवीं तो मृत्यु पावला. त्याच्या मृत्यूमुळें स्कॉटलंड जिंकण्याचें त्याचें काम अर्धवट राहिलें. तरी पण वेल्स जिंकणें, निरनिराळे कायदे अंमलात आणणें, इत्यादि बाबतींत त्यानें केलेली कामगिरी चिरस्थायी अशी होतीं.

एलेनारपासून एडवर्डला चार मुलगे व नऊ मुली झाल्या. चार मुलांपैकीं कनिष्ठ पुत्र तेवढाच जिवंत राहिला. मार्गारेटपासून त्याला दोन पुत्र झाले.

[संदर्भग्रंथ-टाउट-एडवर्ड दि फर्स्ट (१८९३); सीलिलाइफ अँड रेन ऑफ एडवर्ड दि फर्स्ट (१८७२); मॉरीसवेल्स वॉर्स ऑफ एडवर्ड दि फर्स्ट (ऑक्सफर्ड १९०१.)]

दुसरा :- (जन्म १२८४; मृत्यू १३२७). दुसरा एडवर्ड हा पहिल्या एडवर्डचा चौथा मुलगा होता. हा कार्नाव्हन किल्ल्यांत जन्मात आला, म्हणून याला कार्नाव्हनचा एडवर्ड असें संबोधण्यांत येतें. पहिल्या एडवर्डनें याला राजाच्या कर्तव्यकर्माचें शिक्षण देण्याची फार खटपट केली. पण त्या खटपटीला मुळींच यश आलें नाहीं. दुसरा एडवर्ड हा फार चैनी, खेळांचा शोकी, हेकेखोर व मूर्ख होता. तो नेहमीं हलकट सोबत्यांच्या नादीं असे. पीअर्स गाव्हेस्टन नांवाच्या एका दुराचारी माणसावर याची फार मर्जी असे. गाव्हेस्टन याच्या नादानें आपला मुलगा बिघडला या समजुतीनें पहिल्या एडवर्डनें त्याला हद्दपार केलें होतें. पण दुसरा एडवर्ड राज्यावर आल्याबरोबर त्यानें प्रथम गाव्हेस्टनला परत बोलावून आणलें व त्याच्या तंत्रानें राज्यकारभार करण्यास सुरूवात केली. एडवर्ड हा जेव्हां फ्रान्समध्यें गेला त्या वेळीं त्याच्या गैरहजेरींत गाव्हेस्टन हाच स्वत: राज्यकारभार पहात असे. फ्रान्समध्यें असतांना त्यानें फ्रान्सचा राजा फिलिप दि फेअर याच्या मुलीशी-इसाबेलाशीं-विवाह केला.

फ्रान्स देशाहून परत आल्यानंतर १३०८ च्या फेब्रुवारीच्या २५ व्या तारखेस त्याला राज्याभिषेक करण्यांत आले. त्यानें लगेच गाव्हेस्टनला आपला प्रधान नेमलें. त्याच्या वाईट संगतींत राजा ख्यालीखुशालींत आपला काळ घालवीत असे. दोनदां त्याला सरदार लोकांनीं हद्दपार केलें. तरी पण दर खेपेस राजा त्याला परत बोलावी. शेवटीं त्याला सरदार लोकांनीं धरून कैदेंत ठेवलें व नंतर गाव्हेस्टनचा हाडवैरी जो वारविकचा अर्ल त्यानें गाव्हेस्टनला निर्दयपणें ठार मारिलें.

एडवर्ड हा कमकुवत असल्याकारणानें त्याला गाव्हेस्टनच्या वधाचा सूड घेण्याची छाती झाली नाहीं. सरदार लोकांनीं राजाच्या हातून राज्यकारभार काढून तो २१ लॉर्ड आर्डनर्सच्या कमिटीकडे सोंपविला होता; तरी पण राजाला त्याची फिकिर वाटली नाहीं. याच अवधींत रॉबर्ट ब्रूस हा स्कॉटंडमधील शहरांवर शहरें काबीज करीत होता. स्टर्लिंग व बरिक या दोन शहरांखेरीज इतर सर्व षहरें ब्रूसनें जिंकलीं होतीं व स्टर्लिंग शहरालाहि त्यानें वेढा दिला होता. स्टर्लिंग शहराला वेढा दिला आहे ही बातमी समजतांच एडवर्ड व सरदार लोक दोघेहि चिडून जाऊन त्यांनीं ब्रूसला तोंड देण्याचें ठरविलें. बॅनॉकबर्न येथें दोन्ही पक्षांची लढाई होऊन त्यांत इंग्लिशांचा पूर्णपणें पराजय झाला. स्कॉटलंडनें पुन्हां स्वातंत्र्य मिळविलें. इंग्रजांचा पूरता सूड घेण्याच्या निमित्तानें ब्रूसनें इंग्लंडच्या उत्तरेकडील परगण्यांवर स्वारी करून तो प्रदेश जवळ जवळ बेचिराख करून टाकला.

इ. स. १३२० सालीं राजाची मर्जी डिस्पेन्सर नांवाच्या एका गृहस्थावर व त्याच्या मुलावर बसली. पण या दोघां पितापुत्रांशीं सरदारलोकांनीं थोड्याच कालांत कलह करण्यास सुरूवात केली. १३२१ मध्यें त्यांनीं पार्लमेंटमध्यें खल करून पार्लमेंटच्या संमतीनें, डिस्पेन्सर्संनां इंग्लंडमधून हांकून लावलें. या गोष्टीमुळें राजाला अत्यंत क्रोध आला. त्यानें १३२२ मध्यें डिस्पेन्सर्सनां परत बोलावून आणिलें, व त्यांच्या साहाय्यानें सरदार लोकांवर स्वारी केली. या स्वारींत एडवर्डला जय प्रात्प झाला. त्यानें शत्रूकडील पुढारी मॉर्टीमर याला कैदेंत टाकलें. त्यांचा दुसरा पुढारी लँकेस्टर याचा शिरच्छेद करण्यांत आला. नंतर राजानें ऑर्डनर्स लोकांनीं केलेले नियम रद्द करून यॉर्क येथें पार्लमेंट भरविलें. उमरावांची सत्ता कह्यांत राखण्याची त्याची इच्छा होती. म्हणून त्यानें एक महत्त्वाचा कायदा पसार करून घेतला; तो असा कीं, सर्व गोष्टी कायम करणें त्या धर्माध्यक्ष, अर्ल, बॅरन व राज्यांतील सामान्य लोक या सर्वांनीं मिळून केल्या पाहिजेत.

पण डिस्पेन्सर्स हेहि चांगल्या रीतीनें राज्यकारभार करीत नसत. त्यामुळें व इतर दुसर्‍या कारणांमुळें लोक व इसाबेल राणीं हीं उभयतांहि त्यांचा द्वेष करीत होती. त्यामुळें सार्‍या राष्ट्रांत बंडाळी माजलेली होती. इसाबेल ही फ्रान्समध्यें कांहीं कामाकरितां गेली होती. त्याच ठिकाणीं तिचा प्रियकर लॉर्ड मॉटिमर हाहि कैदेंतून निसटून पळून आला होता त्या दोघांनीं मिळून एडवर्ड राजाला उलथून पाडून त्याच्या जागी त्याच्या मुलाला (तिसर्‍या एडवर्डला) गादीवर बसवावें अशी गुप्त मसलत चालविली. १३२६ च्या सप्टेंबर महिन्यांत ती मॉर्टिमर याजबरोबर इसेस्क प्रांतांत येऊन उतरली. डिस्पेन्सर्सनां हांकून लावण्याचा उद्देश तिनें जाहीर करतांच तिच्या पक्षास भराभर लोक मिळूं लागले. त्यामुळे एडवर्ड राजाला कोणाचीच मदत न मिळाल्यामुळें त्याला पळून जाणें भाग पडलें. त्याचा पाठलाग इसाबेलानें चालविला. डिस्पेप्सर्सचा शिरच्छेद करण्यांत आला. एडवर्डला पकडून केनिलवर्थ येथें तुरूंगांत ठेवण्यांत आलें. १३२७ त वेस्टमिन्स्टर येथें पार्लमेंट भरलें व त्यांत पार्लमेंटनें एडवर्ड हा राज्यकारभार करण्याला नालायक आहे असें ठरविलें; व त्याचा पुत्र तिसरा एडवर्ड हा राजा झाला आहे असा जाहिरनामा काढला.

यानंतर एका किल्ल्यांतून दुसर्‍यांत, दुसर्‍यांतून तिसर्‍यांत याप्रमाणें अनेक किल्ल्यांत एडवर्डला कैदेत ठेवण्यांत येउन त्याचे अनेंक तर्‍हेनें हाल करण्यांत येउन शेवटीं १३२७ च्या सप्टेबर महिन्यांत, बार्क्लि येथील किल्ल्यांत मॉर्टिमरच्या हुकुमानें त्याचा निर्दयपणें वध करण्यांत आला. एडवर्डला इसाबेलापासून दोन मुलगे व दोन मुली अशीं अपत्यें झालीं.

(४) तिसरा (जन्म १३१२. मृत्यू १३७७):- तिसरा एडवर्ड हा दुसर्‍या एडवर्डचा सर्वांत मोठा मुलगा होय. तो विंडसर येथें १३१२ मध्यें जन्माला आला. तो आठ वर्षाचा असतांना त्याला चेस्टरचा अर्ल करण्यांत आलें. १३२५ मध्ये तो अ‍ॅक्विटेनचा ड्यूक झाला. नंतर कांहीं वर्षें तो फ्रान्समध्येंच होता. त्याची आई इसाबेला व मॉर्टिमर या दोघांनीं मिळून ज्या वेळीं इंग्लंडवर स्वारी केली त्या स्वारी बरोबर तो इंग्लंडमध्यें आला. पुढें दुसर्‍या एडवर्डचा पराभव होऊन पार्लमेंटनें त्याच्या जागीं याला राजा म्हणून नेमलें. १३२७ त जानेवारीच्या २९ व्या तारखेस त्याला राज्यभिषेक झाला.

तो अल्पवयस्क असल्यामुळें त्याच्या नांवानें इसाबेला व मॉर्टिमर यांनीं राज्यकारभार चालविला. १३२८ त त्याचा एनोचा कौंट याची कन्या फितिप्पा हिच्याशीं विवाह झाला. १३३० सालीं जून महिन्याच्या १५ व्या तारखेस पुढें 'दि ब्लॅक प्रिन्स' या नावांनें उदयास आलेला त्याचा पहिला मुलगा जन्मास आला. मॉर्टिमरच्या ताब्यांत रहाण्याचा त्याला तिटकारा आल्यामुळें त्यानें नाटिंगहॅम किल्ल्यामध्यें रात्रीं शिरून मॉर्टिमर यास कैद केलें व १३३० च्या नोव्हेंबर महिन्यांत टायबर्न येथें त्यास फांशीं दिलें. आपल्या आईला मात्र त्यानें कधींहि दुखाविलें नाहीं.

मॉर्टिमरच्या ताब्यांतून तो मोकळा झाल्यानंतर त्यानें प्रत्यक्ष रीतीनें आपल्या हातांत राज्यसूत्रें घेतलीं. तो तरूण व उत्साही असल्यानें आपल्या आजच्या वेळीं जी इंग्लंडची चलती होती तशा प्रकारचें वैभव इंग्लंडला पुन्हां प्राप्त करून देण्याची त्यानें महत्त्वाकांक्षा बाळगिली. १३२८ सालीं झालेल्या नॉर्थहॅमूटनच्या तहानें स्कॉटलंडला जें स्वातंत्र्य मिळालें होतें त्याचा त्यानें इनकार केला. याच सुमारास राबर्ट ब्रूस हा मरण पावल्यामुळें त्याचा अल्पवयी मुलगा राज्यावर बसला होता. ही संधि साधून एडवर्डनें स्कॉटलंडवर स्वारी करून स्काटलंडच्या राज्यावर बेलियलचा मुलगा एडवर्ड यास बसविलें. पण थोड्याच अवधींत स्कॉच लोकांनीं बेलियलच्या मुलाला राज्यावरून हांकून लावलें. हें पाहतांच एडवर्डला राग आला व त्यानें १३३३ त स्कॉच लोकांवर स्वारी करून त्यांचा हॅलिडॉनहिल येथें पराभव केला. तरी पण बेलियलच्या मुलाला कांहीं स्कॉच लोक राजा म्हणून कबूल करीनात; त्यांनीं थोड्याच वर्षानीं ब्रूसचा मेहुणा डेव्हिड यास राज्यावर बसविलें.

पण या सर्व घडामोडी चालल्या असतां इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्यें वितुष्ट येत चाललें होतें. त्याला अनेक कारणें होतीं. एडवर्ड हा गास्कनीचा ड्यूक होता ही गोष्ट फ्रान्सला पसंत नव्हती. फिलिपचा व स्कॉच लोकांचा सलोख्याचा तहनामा झाला होता. त्यामुळें स्कॉच लोकांवर एडवर्डनें स्वारी करणें फिलिपला आवडलें नाहीं. शिवाय फ्लेमिंग लोकांचें व फ्रान्सचें वांकडें येऊन फ्लेमिंग्स लोकांनां एडवर्डनें सहाय्य देण्याचें कबूल केलें. एवढेंच नव्हें तर आपली आई इसाबेला ही फ्रान्सांतील राजघराण्याच्या जेष्ठ शाखेची मुलगा असल्यानें तिचा मुलगा या नात्यानें फ्रान्सच्या राज्यावर आपला हक्क आहे असें एडवर्डनें सांगण्यास सुरूवात केली. अशा निरनिराळ्या कारणांमुळें फ्रान्स व इंग्लंडमध्यें 'शंभर वर्षाच्या युद्धाला' तोंड लागलें.

१३३७ सालीं या युद्धाला सुरूवात झाली. १३४० सालीं स्लॉई नांवाच्या फ्लांडर्स देशाच्या किनार्‍याजवळच्या बंदराबाहेर आरमारी लढाई होऊन तींत फ्रेंच आरमाराचा पूर्ण पराभव झाला. या युद्धांत एडवर्डनें प्रत्यक्ष भाग घेतला होता. लगेच एडवर्डनें फ्रान्सचा राजा हा किताब धारण केला. हा किताब पुढें तिसर्‍या जॉर्जच्या कारकीर्दीतर्यंत प्रत्येक इंग्लंडचा राजा आपल्याला लावून घेत असे. स्लॉइ येथील लढाई आटोपल्यावर कांहीं दिवस शांतता होती. पण ब्रिटनच्या डचीच्या वारसाहक्कासंबंधानें वाद उपस्थित होऊन पुन्हां युद्धाला तोंड लागलें. सन १३४२ मध्यें त्याच्या सैन्यामध्यें व फ्रेंच सैन्यामध्यें ब्रिटनच्या प्रदेशांत चकमक उडाली; पण त्याचा निकाल लागला नाहीं. १३४३ सालीं तो इंग्लंडला परत आला. १३४४ मध्यें त्यानें विंडसर येथील किल्ला पुन्हां बांधण्यास सुरूवात केली; व 'आर्डर ऑफ दि गार्टर' ही पदवी अस्तित्वांत आणिली.

१३४३ च्या जुलै महिन्यांत पुन्हां इंग्लंड व फ्रान्स देश यांच्यामध्यें युद्धाला सुरूवात होऊन आपल्या जेष्ठ पुत्रासमवेत एडवर्ड हा नॉर्मंडी येथें उतरला. क्रेसी येथें दोन्ही सैन्यामध्यें लढाई होऊन फ्रेंच सैन्याचा पूर्णपणें पराभव झाला. लगेच पुढच्या वर्षी इंग्लिश सैन्यानें कॅले शहर जिंकून घेतलें. गास्कनी व ब्रिटन या मुलाखांत देखील इंग्रजांचा दोन ठिकाणीं जय झाला. पण पैशाच्या अभावीं ही मोहीम पुढें चालविणें अशक्य होऊन इंग्लंड व फ्रान्स यांच्या मध्यें तात्पुरता तह घडून आला. एडवर्ड १३४७ त इंग्लंडला परत आला व त्यानें जयोत्सवानिमित्त निरनिराळ्या शर्यती केल्या. याच सुमारास काळा आजार नांवाच्या तापाची सांथ इंग्लंडमध्यें पसरली. तरी पण मधून मधून फ्रान्स व इंग्लंड यांच्या दरम्यान किरकोळ लढाया चालू होत्याच.

१३४९ मध्यें कॅलेच्या आसपास झालेल्या लढाईंत तसेंच व विंचेल्शिया येथील आरमारी लढाईंत इंग्लंडनें जय मिळविले. पोपनें ही लढाई थांबावी यासाठीं पुष्कळ मध्यस्थी केली पण ती व्यर्थ गेली. १३५६ मध्यें एडवर्डचा मुलगा ब्लॅक प्रिन्स यानें पाइटियर्स येथील युद्धांत फ्रेंचांचा धुवा उडविला व फ्रान्सचा राजा जॉन याला पकडलें. जॉनचा त्यानें कोणत्याहि तर्‍हेनें उपमर्द केला नाहीं. १३ ५९ त एडवर्ड व जॉन यांमध्यें तह होऊन जॉननें एडवर्डला इतक्या सवलती द्यावयाचें कबूल केलें की, त्या तहाला फ्रेंच लोक मान्यताच देईनात. तेव्हां एडवर्डनें पुन्हां फ्रान्सवर स्वारी करण्याचें ठरविलें. तो कॅले येथें उतरून रीम्स येथें आला व त्या ठिकाणीं फ्रान्सचा राजा म्हणून राज्यभिषेक करून घेण्याचें त्यानें ठरविलें. पण फ्रेंच रहिवाश्यांनीं या त्याच्या कृत्याला जोराचा विरोध केल्यामुळें त्याचा तो बेत फसला. त्यामुळें चिडून जाऊन त्यानें पॅरीसवरच हल्ला करावयाचें ठरविलें. पण तोहि डाव हुकल्यामुळें १३६० मध्यें ब्रेटिग्नी येथें तो तहाची वाटाघाट करण्यास तयार झाला. शेवटीं कॅले येथें दोन्ही पक्षांचा तह होऊन एडवर्डला अ‍ॅक्विटेन प्रांताच्या मालकीवरच संतुष्ट होणें भाग पडलें.

या तहानें इंग्लंड व फ्रान्स यांमधील द्वेषाग्नि विझून दोन्ही राष्ट्रांनां शांततेचे दिवस येतील असें वाटत होतें. पण दुर्दैवानें तसें घडून आलें नाहीं. १३६२ व ६९ मध्यें काळा आजार सुरू झाला. त्यामुळें इंग्लंडात लोकसंख्येच्या एकतृतीयांश लोक या सांथीला बळी पडले. सांथींच्या भयानें ग्रस्त झालेल्या लेकांनी आपापल्या धंद्याकडे जरूर तेवढें लक्ष्य दिलें नाही. मजुरांची संख्या थोडी राहिल्यामुळें मजुरीचें प्रमाण वाढलें. भांडवलवाले व मजूर यांमध्यें झगडा सुरू झाला. शेवटीं या अनर्थकारक स्थितीला आळा घालण्यासाठीं 'स्टॅट्यूक ऑफ लेबरर्स' उर्फ मजुरांचा कायदा पास करून काळ्या आजाराच्यापूर्वी जो मजुरीचा दर होता त्याच दरावर मजुरांनीं काम केलें पाहिजे असें ठरविलें. पण मजुरांनां हा नियम कडक वाटल्यानें त्यांनीं याविरूद्ध चळवळ सुरू केली. औद्योगिक भनगडीप्रमाणेंच याच वेळीं धर्माच्या बाबतींतहि बराच झगडा चालला होता. शेवटीं याहि बाबतींत पोव्हाइसरचा स्टॅट्यूट व प्रेम्यूनायरचा स्टॅट्यूट असे पोपच्या अगर धर्मगुरूच्या विरोधक कायदे पास करून पार्लमेंटनें याहि बाबतीची कशीबशी विल्हेवाट लावली.

सन १३६९ सालीं फ्रान्सचा राजा पांचवा चार्लस यानें कॅलेचा तह मोडून युद्धाचें शिंग फुंकलें. एडवर्डला जो फ्रेंचांचा मुलूख मिळालेला होता त्यांतील रहिवाशांनींहि चार्लस राजाचीच बाजू घेतली. एडवर्डनें त्या वेळीं हें बंड मोडण्याकरितां आपले पुत्र ब्लॅक प्रिन्स व जॉन यांस पाठविलें. फ्रान्सशीं त्या दोघांनीं युद्ध चालविलें असतां एडवर्डनें पैशाची उणीव भरून काढण्याकरितां चर्चच्या पैशावर व हक्कांवर मोहिम सुरू केली. त्यानें जुन्या धर्मोपदेशकांना अधिकारावरून काढून टाकून नवे नवे अननुभविक धर्मोपदेशक नेमले. इकडे इंग्लंडमध्यें अशी परिस्थिति प्राप्त झाली असतां तिकडे फ्रान्समध्यें इंग्लिश सैन्याचा जिकडे तिकडे पराजय होत होता. १३७२ सालीं एडवर्डनें फ्रान्सवर पुन्हां स्वारी करण्याचा शेवटचा प्रयत्‍न केला; पण त्या वेळीं भयंकर तुफान होऊन त्याचा तो बेत फसला. त्यामुळें निराश होऊन तो फ्रान्सशीं तह करण्यास कबूल झाला. या तहान्वयें त्याच्या ताब्यांत कॅले, बोर्डो, बेयोन व ब्रेस्ट एवढींच काय तीं महत्त्वाचीं ठिकाणें राहिलीं.

एडवर्ड हा आता बराच म्हातारा झालेला होता. त्याची राणी फिलिप्पा इच्या मृत्यूमुळें त्याच्या मनावर निराशेचें पटल आलें होतें. अ‍ॅलीस पेरेर्स नांवाच्या एका लोभी बाईनें त्याच्यावर आपला अम्मल बसविला होता. राजमंडळामध्यें ब्लॅक प्रिन्सची बाजू घेणारा पक्ष व जॉनची बाजू घेणारा पक्ष असे दोन पक्ष अपस्थित झाले होते व त्यांच्यामध्यें चांगलेंच जुंपलें होतें. अ‍ॅलीस पेरेर्सच्या वजनामुळें एडवर्डनें जॉनची बाजू घेतली होती व जॉन हाच वस्तुत: राज्याचा कारभार पाहूं लागला होता. पण जॉनला पूर्वी हांकलून दिले गेलेले धर्मोपदेशक व ब्लॅक प्रिन्स यांनीं पदोपदी अडथळा करण्यास सुरूवात केली. शेवटी १३७६ मध्यें गुड पार्लमेंटची बैठक झाली व पार्लमेंटनें पेरेर्सला राजा जवळून घालवून व प्रधानांनां त्यांच्या जागांवरून काढून लावलें. पण याच सुमारास ब्लॅकप्रिन्सला मृत्यूनें गांठल्यामुळें पार्लमेंटचा एक मोठा आधार नाहींसा झाला. त्यामुळें जॉनच्या ताब्यांत पुन्हां सत्ता आली. यानंतर थोड्याच दिवसांनीं १३७७ मध्यें जूनच्या २१ व्या तारखेस एडवर्ड मरण पावला.

पहिल्या एडवर्डच्या इतका जरी तिसरा एडवर्ड मोठा मनुष्य नव्हता तरी त्याच्या अंगीं मुत्सद्देगिरी व क्षात्रतेज हे गुण मोठ्या प्रमाणांत वास करीत होते. तो जात्याच उमद्या स्वभावाचा व हौशी होता. त्याच्या दरबारच्या डामडौलाइतका डामडौल तत्कालीन यूरोपमधील कोणत्याहि राष्ट्राच्या दरबारीं नव्हता. तो उदार, सुस्वभावी व मनमिळाऊ होता. उधळेपणा, वचनभंगाची संवय व कामतिरेक हे त्याच्या अंगचे दोष होते.

एडवर्डला सात मुलगे व पांच मुली होत्या. सात मुलांपैकीं पांच मुलांनीं कोणत्याना कोणत्या तरी बाबतींत आपलें नांव इतिहासांत स्मरणीय करून ठेवलें आहे.

[सं द र्भ ग्रं थ:- लाँगमन - लाईफ अँड टाईम्स ऑफ एडवर्थ दि थर्ड; मॅकिन्नान - हिस्टरी ऑफ एडवर्ड दि थर्ड; बार्ने - हिस्टरी ऑफ एडवर्ड दि थर्ड (१६८८); स्टब्स - कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी ऑफ इंग्लंड (भाग २ रा); टाऊट पोलिटिकल हिस्टरी ऑफ इंग्लंड (१२१६-१३००)].

(५) चौथा :- (जन्म १४४२ - मृत्यू १४८३.) एडवर्ड हा रिचर्ड ड्यूक आफ यॉर्क याचा मुलगा होय. हा रूआं येथें १४४२ च्या एप्रिल महिन्याच्या २८ व्या तारखेस जन्मला. लहानपणीं त्याला 'अर्ल ऑफ मार्च' असें नांव पडलें होतें. १४५९ मध्यें लडलो येथें यॉर्किस्ट लोकांचा पराभव झाल्यानंतर एडवर्ड हा आपला चुलता अर्ल ऑफ सॅलिसबरी याच्यासह कॅले येथें पळून गेला. पुढें अर्ल ऑफ सॅलिसबरी व अर्ल ऑफ वॉरविक यांनीं ज्या वेळीं इंग्लंडवर स्वारी केली त्या वेळीं त्या स्वारीबरोबर तो लंडन येथें आला. त्याचा बामप यॉर्कचा रिचर्ड याला राज्याचा वारस ठरविण्यांत आल्यानंतर एडवर्ड हा वेल्सला परत गेला. थोडक्याच दिवसांत त्याला रिचर्ड हा वारल्याचें वर्तमान कळलें. त्या नंतर लगेच त्यानें आपलें सैन्य जमवून १४६१ सालीं मॉर्टिमर्स क्रॉस येथें पेम्ब्रोकचा अर्ल याचा पराभव केला व लंडनकडे आपला मोर्चा वळविला.  सहाव्या हेनरीच्या त्रासाला कंटाळलेल्या लोकांनीं त्याचें मन:पूर्वक स्वागत केलें. लंडन येथें यॉर्कपक्षीय बडेबडे लोक जमले व त्यांनीं १४६१ च्या मार्चच्या ४ थ्या तारखेस एडवर्ड राजा झाला म्हणून जाहीर केलें. त्यानंतर लगेच तो व वॉरविकचा अर्ल यांनीं उत्तरेकडे कूच केलें. सहाव्या हेनरीच्या राणीच्या सैन्याशीं त्यांची लढाई होऊन टॉउटन फील्ड येथें एडवर्डनें मोठा जय संपादन केला. एडवर्ड हा लंडन येथें माघारा आला व त्याला जूनच्या २८ व्या तारखेस राज्याभिषेक झाला.

हें राज्य संपादन करण्याच्या कामीं एडवर्डला त्याच्या आजोळच्या लोकांची फार मदत झाली; व राज्यप्राप्तीनंतरहि तो कांहीं दिवस त्यांच्याच तंत्रानें चालत असे. तो स्वत:चैनी प्रवृत्तीचा होता तरी १४६२-६३ सालीं हेनरीच्या राणीच्या सैन्याबरोबर चाललेल्या लढायांत त्यानें भाग घेतला. पण या दरम्यानच्या वेळांत एलिझाबेथ वुडव्हिल नांवाच्या एका विधवा बाईवर त्याचें मन बसून त्यानें तिच्याशीं विवाह केला. पण अशा एका गरीब मुलींशीं लग्न लावणें हें वॉरविकच्या अर्लला मुळींच पसंत पडलें नाहीं. वॉरविकच्या मनांत एडवर्डचा कोणा तरी फ्रान्सच्या राजघराण्यांतील मुलींशीं विवाह करून फ्रान्स व इंग्लंड याचें सख्य जुळवावें असें होतें. पण वरीलप्रामणें त्याचा बेत फसल्यामुळें त्याला एडवर्डचा राग आला. शिवाय एडवर्डनें आपल्या बायकोच्या आप्तेष्टांनां मोठमोठ्या हुद्याच्या जागा देण्यास सुरूवात केल्यामुळें तर एडवर्डच्या कृत्याची त्याला फार चीड आली. शिवाय फ्रान्सशीं सख्य करण्याचें वॉरविकचें धोरण न सांभाळतां बर्गेडीबरोबर तह करण्याला एडवर्ड प्रवृत्त झाला. या सर्व गोष्टींमुळें एडवर्डचें व वारविकचें पटेनासें झालें. तरी पण १४६९ पर्यंत त्यांच्या परस्परांमधील द्वेषाला तोंड फुटलें नाहीं.

एडवर्डच्या बायकोचे जे आप्तेष्ट अधिकारी झाले होते त्यांच्यासंबंधीं लोकांना आदर वाटत नसे. या गोष्टीचा फायदा घेऊन वॉरविकनें एडवर्डचा धाकटा भाऊ ड्यूक ऑफ क्लॅरेन्स याच्या साहाय्यानें एडवर्डला अचानक कैद केलें व एडवर्डच्या सासर्‍याचा शिरच्छेद केला. एडवर्ड हा सहा महिने वॉरविकच्या नजरकैदेंत होता. पण याच सुमारास लँकेस्टरच्या तर्फेच्या लोकांनीं बंड केल्यामुळें एडवर्डला कैदेंतून सुटावयाची संधि सांपडली. लगेच तो लंडन येथें परत आला व त्यानें वॉरविक व आपला भाऊ राजद्रोही आहेत असें जाहीर केलें. त्यामुळें वॉरविकला व ड्यूक ऑफ क्लॅरेन्सला फ्रान्सला पळून जाणें भाग पडलें. एडवर्डला आतां आपण सुरक्षित झालों असें वाटलें; पण इतक्यांत वॉरविक व ड्यूक ऑफ क्लॅरेन्स यांनीं लँकेस्टरच्या लोकांशीं सख्य संपादन करून ते आपल्याशीं लढाई द्यावयास तयार झाले आहेत असें त्याला आढळून येतांच तो घाबरून गेला. व त्यानें फ्लँडर्स देशांत पलायन केलें. नंतर बर्गंडीच्या राजानें त्याला मदत देण्याचें कबूल केल्यामुळें त्याच्या सैन्याच्या मदतीनें तो पुन्हां लंडन येथें परत आला; व त्यानें बार्नेट येथें वॉरविकचा व ट्यूक्सबरी येथें लँकेस्टरचा पराभव केला. या जयामुळें त्याचा मार्ग निष्कंटक झाला. तथापि क्लॅरेन्स याची त्याला भीति वाटत होती. व ती दूर करण्याकरितां त्यानें क्लॅरेन्सवर तोहमत आणवून त्याला देहान्त शासन केलें.

मध्यंतरीं १४७५ मध्यें त्यानें फ्रान्सवर स्वारी करण्याचा विचार केला. पण फ्रान्सच्या राजानें त्याला खंडणी द्यावयाचें कबूल केल्यामुळें त्यानें तो बेत रहित केला. दर वर्षी पार्लमेंटची बैठक भरविण्याच्या तो भानगडींतच पडला नाहीं. तो एकतंत्री व लहरी होता. त्याचा अंमल फार कडक असे. त्याचें आचरण अनीतीचें व बदफैलीपणाचें असे. तरी पण लोकप्रियता संपादन करण्याची त्याला चांगली हातोटी साधलेली होती. नवीन विद्येला तो मोठ्या आस्थेनें उत्तेजन देत असे. कॅक्स्टनला त्यानें चांगला आश्रय दिला. तो १४८३ मध्यें एप्रिल महिन्याच्या ९ व्या तारखेस वेस्टमिन्स्टर येथें मरण पावला. त्याला विंडसर येथें पुरण्यांत आलें. त्याला एलिझाबेथपासून दोन मुलगे व पांच मुली होत्या. त्याच्या ज्या इतर स्त्रिया होत्या त्यांपैकीं जेन शोअर ही त्याची आवडती स्त्री होती.

[संदर्भग्रंथ:- वार्कवर्थ -कॉनिकल; व दि आरायव्हल ऑफ किंग एडवर्ड दि फोर्थ; जेम्स रॅम्से-लँकेस्टर अँड यॉर्क (१८९२); ओमन - दि पोलिटिकल हिस्टरी ऑफ इंग्लंड भाग ४ था (१९०६)].

(६) पांचवा (जन्म १४७०-मृत्यु १४८३):- हा चौथ्या एडवर्डचा वडील मुलगा होय. चौथा एडवर्ड हा फ्लॅडर्स देशांत पळून गेला असतां त्याची बायको एलिझाबेथ वुडव्हिल ही वेस्ट मिन्स्टरच्या देवळांत लपून राहिली होती. याठिकाणीं या एडवर्डचा जन्म झाला. १४७१ मध्यें त्याला प्रिन्स ऑफ वेल्स करण्यांत आलें. जेव्हां चौथा एडवर्ड राजा वारला त्या वेळीं अधिकाराच्या बाबतींत दोन पक्षांमध्यें झगडा सुरू झाला. एलिझाबेथ राणी व तिचे नातलग यांचा एक पक्ष व एडवर्ड राजाचा भाऊ ग्लोसेस्टरचा ड्यूक रिचर्ड याचा दुसरा पक्ष. रिचर्डनें या छोट्या एडवर्डला कसेंबसें आपल्या ताब्यांत आणिलें व राणीच्या रिव्हर्स वगैरे नातलगांना ठार मारिलें. यानंतर त्यानें बालराजा एडवर्ड याच्या आईचें व चौथ्या एडवर्डचें लग्न धर्मविधीपूर्वक झालें नाहीं असा बहाणा करून राज्यपद बळकावलें. या वेळीं छोटा एडवर्ड व त्याचा धाकटा भाऊ रिचर्ड हे दोघे लंडनच्या टॉवरमध्यें तुरूंगांत होते. या दोघा राजपुत्रांची सुटका करण्याचा प्रयत्‍न करण्यांत आला. पण तत्पूर्वीच ते दोघेही मरण पावलेले आढळून आले. पुष्कळ वर्षे या मुलांच्या मृत्यूचें कारण नक्की समजण्याला मार्ग नव्हता; पण त्यानंतर जो पुरावा सांपडला त्यावरून रिचर्डच्या हुकुमानें त्या दोघा मुलांना बिछान्यांत गुदमरवून ठार करण्यांत आलें व जिन्यांत पुरण्यांत आलें असें निर्विवाद सिद्ध झालें आहे.

(७) सहावा :- (जन्म १५३७ - मृत्यु १५५३); हा आठव्या हेनरीचा जेन ऑफ सेमूरपासून झालेला एकुलता एक मुलगा होता. हा ग्रीनीच येथें जन्मास आला. जन्मत:च हा अशक्त होता व हा फार दिवस जगणार नाहीं असें पुष्कळांनीं भाकित केले होतें. सात वर्षाचा झाल्यावर डॉ. कोक्से याला त्याचा शिक्षक नेमण्यांत आलें. त्यानें लहानपणींच लॅटिन, ग्रीक व फ्रेंच या भाषांचें ज्ञान संपादन केलें. अवघा तेरा वर्षाचा असतांना त्यानें आरिस्टॉटलचा 'एथिस्क'    (नीतीशास्त्र) हा ग्रंथ मुळांतून वाचला होता; व सिसरोच्या ‘डे फिलॉसॉफिया' या ग्रंथाचें ग्रीक भाषेंत भाषांतर करण्याचाहि त्यानें उपक्रम केला होता.

अवघा नऊ वर्षाच्या वयाचा असतांना तो राज्यारूढ झाला. पण तो अल्पवयस्क व अतएव अज्ञान असल्यामुळें ड्यूक ऑफ सॉमरसेट यास प्रथम व ड्यूक ऑफ नॉर्थंबॅर्लंड यास मागाहून त्याचे संरक्षक म्हणून नेमण्यांत आलें. त्याला ज्ञानाची गोडी असल्यामुळें एडवर्डनें पुष्कळशा लॅटिन व ग्रीक पाठशाळांना कायमच्या देणग्या दिल्या. तो जात्या फार उदार व कनवाळू होता असें म्हणतात. पण त्याच्या खर्‍या स्वभावाची ओळख होण्याला जितका अवधि पाहिजे होता तितकाहि त्याला लाभला नाहीं. त्याला क्षयरोगानें गांठलें होतें व तो फार दिवस वांचणार नाहीं असें त्याच्या आसपासच्या लोकांनां कळून चुकलें. अर्थातच त्याच्या पाठीमागें कोणी राज्यावर बसावें यासंबंधींची चर्चा सुरू झाली. जर त्याची बहिण मेरी ही गादीवर बसेल तर ती कॅथॉलिक धर्म पुन्हां स्थापन करील व आपला नाश होईल असें राजाच्या राज्यसंरक्षक जो नार्थेबंर्लंड त्याला वाटत होतें. म्हणून त्यानें हरेक युक्त्या करून एडवर्डचें एक मृत्युपत्र तयार केले; व त्यावर एडवर्डला सही करण्यास प्रवृत्त केलें. त्या मृत्युपत्रांत एडवर्डच्या दोघी बहिणी मेरी व एलिझाबेथ यांनां एकीकडे सारून आठव्या हेन्रीची बहिण मेरी हिची नात जेन ग्रे हिनें एडवर्डच्या मागून गादीवर बसावें असें ठरविलें होतें या मृत्यूपत्रावर एडवर्डच्या भोंवतीं जे मोठमोठे पुरूष होते त्या सर्वांनीं सह्या केल्या. पण पार्लमेंटच्या संमतीवाचून तो कागद निरूपयोगी होता. एडवर्ड हा ग्रीनिच येथें १५५३ सालीं जुलैच्या सहाव्या तारखेस मरण पावला; व त्याला वेस्टमिन्स्टरमध्यें सातव्या हेनरीच्या चॅपेलमध्यें पुरण्यांत आलें.

[सं द र्भ ग्रं थ:- मार्कहॅम-एडवर्ड दि सिक्थ (१९०० पोलार्ड -इंग्लंड अंडर सॉमरसेट व लाइफ ऑफ क्रॅन्मर)]

(८) सातवा – (जन्म १८४१, मृत्यू १९१०.) एडवर्ड हा महाराणी व्हिक्टोरिया व आलबर्ट यांच्यापासून झालेला ज्येष्ठ पुत्र होय. हा बकिंगहॅमच्या राजवाढ्यांत, १८४१ सालीं नोव्हेंबर महिन्याच्या ९ व्या तारखेस जन्मला. लगेच महिन्यानंतर त्याल प्रिन्स ऑफ वेल्स व चेस्टरचा अर्ल अशी पदवी देण्यांत आली. १८४२ मध्ये त्याला बाप्तिस्मा देण्यांत आला. बालपणीं त्याचें शिक्षण, लिटलटन बाईच्या देखरेखीखालीं झालें. नंतर तो थोडा मोठा झाल्यावर, हेनरीबर्च, गिब्स, रेव्हरेड टार्व्हर व हर्बट फिशर या चौघांकडे त्याच्या शिक्षणाची व्यवस्था सोंपविण्यांत आली. पुढें प्रो. प्लेफेयर याच्या हाताखालीं त्यानें एडिंबरो येथें रसायन शास्त्राचा अभ्यास केला व नंतर त्याच विषयाचा अभ्यास केंब्रिज येथील ट्रिनटी कॉलेजमध्यें चालू केला. सन १८५८ मध्यें त्यास 'नाइट ऑफ दि गॉर्टर' करण्यांत आलें, व सैन्यांतील सेनापतीच्या जागीं त्याची नेमणूक झाली. १८५९ मध्यें त्यानें इटली व स्पेन या देशांत प्रवास केला व लगेच पुढच्या वर्षी लॉर्ड रेनक्यू या नात्यानें युनायटेड स्टेटस व कॅनडा या देशांना त्यानें भेट दिली.

केंब्रिज येथील आपला अभ्यासक्रम दुरा केल्यावर १८६१ मध्यें त्यानें कराघ येथें सैन्यांत आपलें नांव दाखल केलें. १८६२ मध्यें त्यानें पॅलेस्टाइन (होली लँड) चें दर्शन घेतलें. १८६३ मध्ये तो प्रिव्हि कौन्सिलचा सभासद झाला व ड्यूक ऑफ कॉर्नवाल या नात्यानें हॉउस ऑफ लॉर्डसमध्यें त्यानें प्रवेश केला. याच सालीं डेन्मार्कचा राजा नववा ख्रिश्चन याच्या अत्यंत लावण्यवती कन्येंशीं-अलेझांड्राशीं-त्याचा थाटानें विवाह झाला. या विवाहापासून त्याला एकंदर पांच अपत्यें झालीं. व्हिक्टोरिया राणी ही नेहमीं एकान्तप्रिय असल्यामुळें कोणतीहि महत्त्वाची सभा अगर दुसरें एखादें महत्वाचें कार्य असो, त्या ठिकाणीं एडवर्ड व अलेक्झांड्रा यांनाच हजर रहावें लागें. सार्वजनिक व लोकोपयोगी कार्याला मदत करण्याची एडवर्डला स्वभावत:च फार हौस असे, व अशा प्रसंगीं तो जीं भाषणें करीत असे तींहि चांगली वठत असत. १८६९ साली त्यानें इजिप्तला भेट दिली. १८७१ मध्यें त्याच्या हस्तें सर्वराष्ट्रीय प्रदर्शन उघडण्यांत आलें.

याच वर्षी त्याला विषमाच्या तापानें पछाडलें; व तें दुखणें इतकें विकोपाला गेलें कीं कांहीं दिवसपर्यंत त्याच्या जगण्याची आशाच नव्हती; पण ईरूवरीकृपेनें हळू हळू उतार पडत चालला. त्यामुळें लोकांनां आनंद होऊन १८८२ च्या फेब्रुवारी २७ व्या तारखेस आनंदाप्रीत्यर्थ सेंटपॉल चर्चमध्यें मोठा उत्सव करण्यांत आला.

१८७५ सालीं एडवर्डनें हिंदुस्थानाला भेट दिली. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या संस्थानिकांचा त्यानें परिचय करून घेतला. अवघ्या चार महिन्यांच्या मुक्कामांत त्यानें हिंदूस्थानांतील महत्त्वाचीं सर्व ठिकाणें पाहून घेतलीं. सन १८७६ सालीं व्हिक्टोरिया राणीनें हिंदुस्थानची महाराणी अशी पदवी धारण केली.

इंग्लंडमध्यें परत आल्यावर त्यानें सार्वजनिक कार्यात पुष्कळच भाग घेतला. आयर्लंडमध्यें असंतोष माजला असतांनासुद्धां त्यानें १८८५ मध्यें आयर्लंडला भेट दिली व तेथें बर्‍याच ठिकाणीं त्याचें थाटानें स्वागत करण्यांत आलें. १८८६ मध्यें हिंदुस्थान व वसाहतींतर्फे भरलेल्या प्रदर्शनाचा तो अध्यक्ष होता. १८८७ मध्यें व्हिक्टोरिया महाराणीची ज्युबिली झाली व तींत त्यानें बराच भाग घेतला होता. १८८९ मध्यें त्यानें अर्धवट खासगी स्वरूपाची फ्रान्सला भेट दिली, १८९० सालीं फोर्थ ब्रिजचा उद्धाटनविधि त्याच्या हस्तें झाला. १८९२ सालीं त्याचा ज्येष्ठ पुत्र अकस्मात वारल्यामुळें त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्यासारखें झाले.

१८९४ साल हें एडवर्डला अतिशय गडबडीचें गेलें. गरीब लोकांना वसतिगृहाची सोय करण्याच्या बाबतींत जें रॉयल कमिशन नेमण्यांत आलें त्यांत याची सभासद म्हणून नेमणूक झाली. हॉवरब्रिज उघडण्याचा समारंभ त्याच्या हस्तें झाला. १८९६ सालीं वेल्स विश्वविद्यालयाचा चॅन्सेलर म्हणून त्याला निवडण्यांत आलें. ब्रिटिन म्यूझियमच्या व्यवस्थापकांत तो एक व्यवस्थापक होता. १८९७ सालीं व्हिक्टोरिया महाराणीची जी ज्युबिली साजरी करण्यांत आली तींत देखील पूर्वीप्रमाणेंच यानें महत्त्वाचा भाग घेतला होता. १८९८ मध्यें बॅरन फर्डिनंड डी रॉथशाइल्ड याला भेटण्यास जात असतां त्याला गुडघ्यांत जबर दुखापत झाली. पण त्यातून तो लवकरच बरा झाला. १८८९ सालींहि, एका अराजक तरूणानें ब्रूसेल्सहून सेंटपीटसबर्ग येथें एडवर्ड जात असता, त्याच्यावर गोळीबार केला. पण सुदैवानें त्याला कोणत्याहि प्रकारची इजा झाली नाहीं.

निरनिराळ्या शारीरिक खेळांचा व करमणुकीचाहि तो भोक्ता होता. त्यानें १८९६ व १९०० मध्यें दोनदां शर्यंत जिंकली; व १९०९ मध्यें राज्सारूढ असतांनां देखील त्याचा शर्यतींत पहिला नंबर आला. फ्रीमेसनरी संस्थेच्या कार्यांत, तसेंच, किंग एडवर्ड हॉस्पिटल फंडाच्या बाबतींतहि त्यानें उत्साहानें भाग घेतला. प्रत्यक्ष राज्यारूढ होण्यापूर्वी त्यानें, राजपदाला आवश्यक असणार्‍या सर्व गोष्टींचा अनुभव घेतला होता. राजकारणांत प्रत्यक्ष भाग असा त्यानें कधींच घेतला नाहीं पण उप्रत्यक्षरीतीनें त्यानें इंग्रजी राजकारणाचा नीट अभ्यास केला, व त्याचा त्याला पुढें पुष्कळ फायदा झाला.

व्हिक्टोरिया राणी १९०१ सालीं मरण पावली व त्यानंतर हा सातवा एडवर्ड या नांवानें राज्यारूढ झाला. पुढें कांहीं महिन्यांनीं पार्लमेंटच्या कायद्यानुरूप एडवर्डनें 'एडवर्डनें 'एडवर्ड दि सेव्हन्थ, बाय दि ग्रेस ऑफ गॉड, ऑफ दि युनायटेड किंगडम ऑफ ग्रेटब्रिटन अँड आयर्लंड अँड ऑफ ऑल दि ब्रिटीश डोमीनियम्स बियाँड दि सीज किंग. डिफेंडर ऑफ दी फेथ, एंपरर ऑफ इंडिया ही पदवी धारण केली. १९०२ मध्यें आफ्रिकन युद्धाची समाप्ति झाल्यानंतर जून २६ तारखेला एडवर्डला राज्यभिषेक व्हावयाचें ठरलें; पण दोनच दिवस अगोदर त्याला 'आंत्रपुच्छदाह' नांवाचा रोग झाल्याचें दृष्टोत्पत्तीस आल्यामुळें ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचें ठरलें. त्यामुळें तो समांरभ ऑगस्टच्या ९ व्या तारखेला मोठ्या थाटानें साजरा करण्यांत आला.

१९०३ च्या फेब्रुवारी महिन्यांत एडवर्डनें पार्लमेंट उघडलें. नंतर एका महिन्यानें तो पोर्तुगालच्या राजाला भेटण्याकरितां गेला व तेथून त्यानें जिब्राल्टर, माल्टा, नेपल्स, या ठिकाणांनां भेट दिलीं. सप्टेंबर महिन्यांत तो व्हिएन्ना येथें गेला. १९०४ मध्यें कील येथें बोटींच्या शर्यतीला गेला असता. जर्मन बादशहानें त्याचें थाटानें स्वागत केलें.

या निरनिराळ्या राष्ट्रांतील प्रवासांचा एडवर्डला अतिशय फायदा झाला. विशेषत: सार्वराष्ट्रीय शांतताप्रस्थापनेच्या कामीं या प्रवासाचा फार उपयोग झाला. १९०३-४ सालांत इंग्लंडचे फ्रान्स स्पेन, इटली, जर्मनी, पोर्तुगॉल या देशांशीं सख्यत्वाचे तह झाले. एडवर्डला ‘शांतताप्रस्थापक एडवर्ड' असें नामाभिधान पडलें व तें त्याला शोभणारेंहि होतें. १९०८ मध्यें फ्रान्सच्या अध्यक्षाचें त्यानें इंग्लंडमध्यें मोठ्या थाटानें स्वागत केलें. व त्याचा परिणाम फ्रान्सशीं सख्य जोडण्यांत झाला. याच्या आदल्याच वर्षी अँग्लोरशियन तह घडून आला होता. या दोन तहांमुळें इंग्लंडची परराष्ट्रीय राजकारणांत छाप पडलीं. तरी पण कांहीं जर्मन राजकारणी मुत्सद्यांनीं हा सर्व खटाटोप व हे रशिया व फ्रान्सशीं झालेले तहनामे जर्मनीचें नुकसान करण्यासाठीं केलेले आहेत असें प्रतिपादन करण्यास सुरूवात केली. तेव्हां ही शंका दूर करण्यासाठीं १९०९ मध्यें एडवर्डनें बर्लिन येथें कैसरला मुद्दाम भेट दिली व त्या प्रसंगीं दोघांनींहि एकमेकांनें प्रेमानें स्वागत केलें व त्यामुळें या आक्षेपांचें आपोआप निरसन झालें.

१९०९ सालीं इंग्लंडमध्यें राजकीय परिस्थिति फार घोंटाळ्याची झाली होती. लाईड जॉर्जनें आपलें अंदाजपत्रक पुढें आणलें होतें, तें हॉउस ऑफ लॉर्डसनें फेंटाळून लावलें. तेव्हां लिबरल पक्षानें आपल्या पक्षाच्या कार्यक्रमांत पीअर्स लोकांनां जो मनाईचा (व्हेटोचा) अधिकार होता तो नष्ट करण्यासंबंधींच्या चळवळीचा समावेश करावयाचें ठरविलें. एडवर्ड हा पुराणमतवादी पक्षाचा असल्यानें त्याच्या मनाला या उदारमतवादी पक्षाच्या चळवळीनें धक्का बसला. १९१० सालीं लिबरल पक्ष अधिकारारूढ झाला व अ‍ॅस्क्विथनें असें जाहीर केलें कीं, लोकप्रतिनिधींच्या इच्छेला राजानें मान दिलाच पाहिजे, याबद्दल राजाकडून वेळप्रसंगीं जामीन घेणेंहि भाग पडेल. ही धमकी दिल्यामुळें एडवर्डच्या मनाला फारच अस्वस्थता प्रात्प झाली. त्यापूर्वी थोडे दिवस त्याची प्रकृति थोडीफार नादुरूस्त होती; तीं यामुळें अधिकच भडकली व तो एका दिवसांतच मरण पावला. अशा अकल्पित रीतीनें राजाचें देहावसान झालें. ही भयंकर बातमी ऐकतांच जनतेमध्यें हाहा:कार उडाला. मे १७।१८।१९ हे तीन दिवस वेस्ट मिन्स्टरमध्यें त्याचें प्रेत ठेवण्यांत आलें. मे २० तारखेस सर्व लंडनमधून शवाची फारच थाटानें मिरवणूक काढण्यांत येउन त्याचें शव विंडसर येथें पुरण्यांत आलें. या शवाच्या मिरवणुकीला जर्मन बादशहा ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल, डेन्मार्क, नार्वे, बेल्जम, बल्गेरिया इत्यादि देशांचे राजे, याशिवाय आस्ट्रियाचा युवराज, हॉलंडचा राजा व इतर राष्ट्रांचे वकील हजर होतें. चोहोंकडे शोकाचें साम्राज्य पसरलें होतें. केवळ इंग्लंडलाच नव्हे तर सर्व जगाला एडवर्डच्या मृत्यूमुळें हळहळ वाटली.

व्हिक्टोरियाच्या कारकीर्दींत इंग्लंडमध्यें ज्या सनदशीर राज्यपद्धतीची स्थापना भरभक्कम पायावर झाली होती ती अधिक चिरस्थायी करण्याचें काम एडवर्डनें केलें. राजा झाल्यावर, एडवर्डनें आपल्या अंगचे अनेक गुण जगाच्या निदर्शनास आणले. पूर्वी राजानें फारशी राज्यकारभारांत ढवळाढवळ करावयाची नाहीं अशीं जी पद्धत होती ती नाहींशी करून त्यानें आपल्या राष्ट्राला राजकारणांत मन घालण्यास सुरूवात केली. एडवर्ड हा फार चांगल्या स्वभावाचा व मुत्सेद्दीगिरींत निष्णांत होता; व त्यामुळें त्यानें जनतेचें मन आपल्याकडें आकर्षण करून घेतलें होतें.

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .