विभाग नववा : ई-अंशुमान
एनमे - उर्फ थिग्विन. लोअर ब्रह्मदेशांतील मियौंगम्या जिल्ह्याची एक वायव्येकडील टौनशिप (तालुका). क्षेत्रफळ ३१५ चौ. मै. लो. सं. (१९०१) ५९३६७. खेडीं १२२ मुख्य ठिकाण एनमे. येथील सपाट असून सुपीक आहे. एकतृतीयांशाहून अधिक लोक करेन आहेत. येथें खिश्चन लोकांचा भरणा बराच आहे.