विभाग नववा : ई-अंशुमान
एन्नार - मद्रास इलाख्यांतील चिंगलपट जिल्ह्याच्या पोण्णेरी तालुक्यांतील एक खेडें. हें बंगालच्या उपसागराच्या किनार्यावर आहे. येथील लोकसंख्या १९०१ सालीं ३१९२ होती. ह्याचें नांव 'कत्तिवक्कम' आहे. येथें पूर्वी बरेच यूरोपियन लोक रहात असत.