विभाग नववा : ई-अंशुमान
एपिक्टेटस - हा स्टोइक नांवाच्या पंथांतील एक प्रख्यात तत्त्ववेत्ता होऊन गेला. हा सुमारें ९० इसवी मध्यें प्रसिद्धीस आला. हा मुसोलिअस रूफसचा शिष्य होता. हा मूळचा फ्रिजीया येथील राहणारा असून गुलामगिरींत रोम येथें राहत असे.
या चीं म तें:- तत्त्वज्ञानाची व्याख्या त्यानें अशी केली कीं, ज्या शास्त्रापासून अमुक ग्राह्य व अमुक त्याज्य असें ठरवतां येतें तें तत्त्वज्ञान होय. या ज्ञानास तो ''व्यवहारोपयोगीं तत्त्वज्ञान'' म्हणे. जगांतील सर्व बाह्य वस्तूंपासून अलिप्प्त रहाणें यांतच खरें सुख आहे असें याचें मत होतें.