विभाग नववा : ई-अंशुमान
एंब्रान - दक्षिण कानडांतून येऊन मलबारमध्यें वसाहत केलेल्या तुलु ब्राह्मणांचें मल्याळम नांव. ते तुलु व मल्याळम या दोन्ही भाषा बोलतात. यांतील कांहीं स्वत:ला नंबुद्री म्हणवितात; पण ते नंबुद्रींशीं बेटिव्यवहार करीत नाहींत. हे शूद्रांचें पौराहित्य करतात. यांची लोकसंख्या ९४३ आहे. [थर्स्टन-सेन्सस रिपोर्ट].