विभाग नववा : ई-अंशुमान
एमेअस - हें पॅलेस्टाईनमधील दोन गांवांचें नांव आहे. ड्यूकच्या मतें हें गांव यरूशलेमपासून ७ मैलांवर होतें. हें कोठें होतें याबद्दल बराच वाद आहे. साधारणत: अर्वाचीन एक कुबैबेह अथवा उर्तास हें असावें. एमेअस-निकोपोलिस, सध्यांचें अमवास, हें समुद्राजवळच्या मैदानांत होतें. येथेंच जुडास मॅकोबीनें जार्जियसचा पराभव इ. स. पूर्वी १६४ त केला. हें शहर पुन्हां बांधल्यावर याला निकोपोलिस नांव मिळालें. रोगनिवारक झर्यांबद्दल याची प्रसिद्धि होती.