विभाग नववा : ई-अंशुमान
एरनाड - निलगिरी पर्वताला जोडलेला मद्रास इलाख्यांतील मलबारमधील एक तालुका. क्षेत्रफळ ९७९ चौ. मै. ह्यांत चौदा अमसम (खेडीं) आहेत. लोकसंख्या (१९०१) ३५७१४२. मुख्य गांवें:- मन्जेरी (मुख्य ठिकाण), मलप्पुरम, फेरोख, निलंबूर व तिरूरनगडी. पूर्व भागांत निलंबूरचें खोरें असून त्यांत सागवान वगैरे उत्तमपैकीं इमारतीलांकूड होतें. समुद्रकांठच्या प्रदेशांत तांदुळाचें उत्पन्न चांगल्या पैकीं होतें.